Author: प्रदीप केळुस्कर

Avatar photo

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

उत्तरार्ध साईनाथ नाट्यमंडळाने संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटक सादर केलं. नाट्यमंडळाचा दिग्दर्शक सुदर्शन याने देवव्रत भूमिका साकारली. तर, ज्योतीने सत्यववती, अरुणने चंडोलच, मनोजने पराशरची भूमिका केली. विशेष म्हणजे, स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा या नाट्यमंडळाचा प्रमुख प्रतिस्पर्धी नटराज ग्रुप, जो दुसऱ्या शहरातील होता, त्यांनी पण यंदा ‘मत्स्यगंधा’ हेच नाटक स्पर्धेत उतरविले होते. आधी साईनाथ नाट्यमंडळाचे नाटक झाले आणि नंतर नटराज ग्रुपचे होणार होते. प्रयोग उत्तम झाला पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खूष नव्हता. नटराज नाट्य ग्रुपचा ‘मत्स्यगंधा’चा प्रयोग होणार होता, त्याला जायचे ठरले होते. त्यानुसार ही मंडळी पुन्हा जमा झाली एक ट्रॅव्हलर घेऊन तिथे गेली. सुदर्शन आणि बाकी ग्रुपमधील इतर…

Read More

पूर्वार्ध साईनाथ नाट्यमंडळाची वार्षिक बैठक. ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ. बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता. मंडळाचा दिग्दर्शक सुदर्शन याच्यासह मनोज, अरुणा, ज्योती, उदय, वासंतीबाई, सदानंद हजर होते. संस्था संगीत  नाटकं करण्यात प्रसिद्ध होती. दरवर्षी शासनाच्या संगीत नाट्यस्पर्धेत भाग घेऊन मग त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी होत असत. संस्थेने अनेक नाटके सादर केली आणि बक्षिसे मिळविली. यंदा कुठले संगीत नाटक करावे, यासाठी बैठक होती. सुदर्शनने मागच्या काही वर्षांतील संस्थेने केलेल्या नाटकंचा आढावा घेतला, दरवर्षी आपली संस्था प्राथमिक स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर मिळविते, पण अंतिम स्पर्धेत आपण पहिला नंबर मिळवत नाही, ही सल सुदर्शनने बोलून दाखवली. याबाबत काही मेंबर्सनी आपापली मते मांडली. अरुणा -…

Read More

एका न्यूज चॅनेलचा मी हेड झालो आणि पहिल्याच महिन्यात महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक संस्थाचा कारभार जवळून पहाण्याचे मी ठरवले. याकरिता महिन्यातील आठ दिवस दौरे काढून विशेषतः ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांना भेट द्यायचे ठरविले. अर्थात, माझ्या डोळ्यांसमोर आली माझी शाळा… म्हणजेच जोंधळे गुरुजींची शाळा! या शाळेत मी पहिलीपासून दहावीपर्यंत शिकलो होतो. राज्यातील एक आदर्श शाळा म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी खुद्द राज्यपालांकडून आमच्या शाळेचे कौतुक झालेले. त्या वेळचे शिक्षणमंत्री सहा महिन्यांतून एकदा तरी या शाळेत येत… सोबत कुणी ना कुणी शिक्षणतज्ज्ञ असायचेच. हे विविध राज्यांतील शिक्षणातज्ञ्ज संस्थेचा कारभार पाहात, विविध उपक्रम पाहात आणि तोंडात बोटे घालत. मी शाळेत असताना म्हणजे अंदाजे तीस वर्षांपूर्वी या…

Read More

उत्तरार्ध डॉक्टर मधुरने देवीच्या देवळाजवळ गाडी उभी केली. रेवती देवळात गेली. देवळात अजून फार गर्दी नव्हती, आज महाआरती होती. मधुरने गाडी कामत मेडिकलच्या दिशेने वळवली. अशोक कामत त्याचा कॉलेजमधील मित्र. देवळात रेवतीला नाडकर्णी दाम्पत्य दिसले. नंतर महाआरती सुरू झाली. आरती टिपेला पोहोचली असताना मिसेस नाडकर्णी एकदम ओरडल्या, “अहो, काय होतंय.. काय होतंय…?” रेवतीने पाहिले.. मिसेस नाडकर्णी खाली वाकल्या होत्या आणि खाली पडलेल्या नाडकर्णीना उठवत होत्या. रेवती पण खाली बसली आणि तिने पाहिले, नाडकर्णी निपचित पडले होते आणि मिसेस नाडकर्णी मोठमोठ्याने “आरती थांबवा… आरती थांबवा” अशा ओरडत होत्या. नाडकर्णीना जास्त बरे नाही आणि त्याना मेडिकल मदत हवी आहे. चटकन तिने आपल्या…

Read More

पूर्वार्ध रेवती आंघोळ करून तयार होत होती. तिचा नवरा डॉ. मधुर नाश्ता करत होता, त्याला रेवती म्हणाली, “मधुर, माझ्यासाठी आज एक काम कर…” “काय?” “बारा वाजता देवीच्या देवळात महाआरती असते, तू आता दवाखान्यात गेलास की, साडेअकराला घरी ये आणि मला देवळात सोड…” “अगं, पण मला कसं जमेल?” “जमेल… बाकी पुरुष बघ आपल्या बायकोला घेऊन सायंकाळी फिरायला जातात, हॉटेलात जातात, मॉलमध्ये जातात आणि देवळात पण जातात, तू माझ्याबरोबर कुठे येतोस का?” “अगं, त्यांचं आणि माझं प्रोफेशन वेगळं आहे, मला सायंकाळी दवाखान्यात जायचे असते आणि…” “आणि नाही नि बिणी नाही… पुढचे सर्व मला माहीत आहे. तुला देवळात यायची फारशी इच्छा नसते.. मग…

Read More

उत्तरार्ध त्या दिवशी स्नेहल, पार्वती आणि रंभा यांनी ठरवले, घराचे काम सुरू करण्याआधी मुंबादेवीला नमस्कार करून येऊ. म्हणून तिघींनी महालक्ष्मी स्टेशनवर जमायचे ठरविले. स्नेहल गोरेगावहून निघाली. तिने पार्वतीला फोन केला, तेव्हा तिला कळले ती पण मुलुंडवरून निघाली आहे. रंभा माहीममध्ये राहत होती… ती पण निघाली. सकाळी अकरा वाजता तिघी मैत्रिणी महालक्ष्मी स्टेशनवर दोन नंबर प्लॅटफॉर्मवर भेटल्या. प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होताच, तिघी जिना चढायला लागल्या. पुढे रंभा, मधे पार्वती आणि तिच्या मागे स्नेहल अशा पायऱ्या चढता चढता पाचव्या पायरीवर असताना स्नेहलच्या छातीत कळ आली आणि गडगडत खाली जाऊ लागली… मागून येणाऱ्या माणसाने तिला अडवले आणि तो ओरडू लागला… “गिर गयी.. गिर…

Read More

पूर्वार्ध स्नेहल ऑफिसला जायची तयारी करत होती. आता हा शेवटचा महिना नोकरीचा. एक एक दिवस संपतोय, आता काही शेवटचे दिवस… पस्तीस वर्षांच्या नोकरीत दहा शाखांमध्ये बदली झाली, पण मुंबईतल्या मुंबईत. बाहेर ती गेली नाही, बढती होती पण नाकारली. आता पुढे काय करायचे? नोकरी धंदा न करणाऱ्या बायका घरी काय करतात? कसा वेळ घालवतात? याचा स्नेहलला प्रश्न पडे. आता तिच्यावर ही वेळ आली होती. महिन्यानंतर आपणही घरीच. नवरा दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालाय. पण त्याचा वेळ जातो मजेत… एकतर महिन्यातले दहा दिवस तो गावी असतो, इथे असतो तेव्हा त्याचे मित्रमंडळ… कुठे कुठे ट्रिप्स सुरू असतात त्याच्या… शिवाय नाटकावर प्रेम! त्या लाइनमधली अनेक…

Read More

विनायकचे मंदाशी लग्न झाले आणि मंदा परबांची सून म्हणून आमच्या गावात आली. खरंतर, विनायक नीलाशी लग्न करणार, असा सर्वांचा अंदाज होता; कारण कुठल्या कुठल्या जत्रेत दोघे फिरताना दिसत होती. नीला विनायकच्या दुकानात बऱ्याच वेळा दिसे आणि कारण नसताना त्याच्याशी हसत बोलत असे. त्यामुळे माझ्यासकट सर्वाना वाटतं होते, विनायक नीलाशी लग्न करेल, पण अचानक एक दिवस बातमी आली, विनायकचे लग्न ठरले… पण नीलाशी नाही तर तालुक्याच्या गावातील कुणा दुसरीबरोबर! माझी पत्नी पण आश्चर्यचकित झाली. तिला ही बातमी समजली तेंव्हा ती मला म्हणाली, “काय चल्ला तुमच्या मित्राचा? एका मुलीक फिरवल्यानं आणि दुसऱ्याबरोबर पाट धरता?” “आसता बाये एखाद्याचा नशीब… तेंका होयो तितके बायलो…

Read More

उत्तरार्ध पंधरा दिवसात पांडूच्या लग्नाची पत्रिका आली, पांडूचा फोन पण आला. लग्न कोलगांवला होते. मी आणि दाजी लग्नाला गेलो. पांडूकडून लग्नाला फक्त मित्र नंदू आणि पत्नी तसेच आम्ही दोघे. सगळे मिळून 20 ते 25 माणसे. लग्न लागले, आम्ही आहेर केला. पांडूची चेष्टामस्करी केली आणि निघालो. पांडू आज गृहस्थाश्रमाला लागला. आता निदान दोनवेळचे जेवण मिळेल. त्याच्या बर्‍यावाईट प्रसंगात त्याच्या सोबत राहणारी धर्मपत्नी मिळाली, चला चांगले झाले… पंधरा दिवसांनंतर नंदूचा फोन आला, म्हणाले – “तुमच्या मित्राचे काहीतरी बिघडले आहे. काही बोलत नाही. परवा दुकानात आला, तो पाच-सहा सिगारेटी ओढत बसला. तुम्ही येऊन जा.” मी म्हटले “अजून याच्यामागचे कष्ट, हाल संपत नाहीत काय?”…

Read More

पूर्वार्ध इयत्ता तिसरीचा वर्ग सुरू होता. गुरुजी हजेरी घेत होते. एवढ्यात दरवाज्याकडे एक मुलगा पाठीवर दप्तर घेऊन उभा असलेला दिसला. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिले आणि ‘आत ये’ म्हणाले. तो मुलगा आत आला, जुनी ठिगळं मारलेली खाकी पँट आणि सदरा, बारीक केस आणि थोडीशी शेंडी असा अवतार होता. कदाचित एक-दोन महिन्यांपूर्वी त्याची मुंज झालेली असावी. गुरुजी आम्हा मुलांना म्हणाले, “हा एक नवीन विद्यार्थी आपल्या वर्गात आला आहे.” त्याच्याकडे बघून म्हणाले, “हं! काय नाव तुझे? कुठून आलास? या आधी कुठल्या शाळेत होतास?” तो मुलगा मान वर करुन म्हणाला, “मी पांडुरंग वसंत दामले. गाव कलंबिस्त, ता. सावंतवाडी.” गुरुजी म्हणाले, “बरं, बरं, म्हणजे बांद्याजवळ. मग…

Read More