Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 14
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!
    ललित

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    जितेंद्र अभ्यंकरBy जितेंद्र अभ्यंकरApril 14, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, भावनांपेक्षा व्यवहार महत्त्वाचा, गुलमोहराचे झाड, ग्रीष्म ऋतुतील गुलमोहर, पारिजातचा मांडव, प्राजक्ताचा मांडव, गुलमोहराचे विशाल झाड,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी (प्रातिनिधीक)
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सुमारे तीस वर्षांपूर्वी मी गणिताची ट्युशन घेणे आणि जन्मपत्रिका बघणे, असे दोन्ही व्यवसाय करत होतो. एक दिवस मला ट्युशनसाठी एक फोन आला. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर मी गेलो. त्या रस्त्याला मी फारसा कधी जात नसे. ती एक निसर्गरम्य अशी गल्ली होती. मुख्य रस्त्यावरून मी डाव्या हाताला वळण घेऊन त्या गल्लीत शिरलो आणि तो दिसला… फुललेला पारिजात! त्याचे आणि माझे जन्मांतरीचे नाते असावे… प्राजक्ताचा मांडव पाहिला की, माझ्या पायांना आपोआप ब्रेक लागतो. त्याला डोळे भरून पाहिल्याशिवाय पाऊल उचलले जात नाही. निसर्गाने आपले सर्व कौशल्य पणाला लावून प्राजक्ताचे फूल बनवले आहे. ते इतके नाजूक आहे की त्याला स्पर्श करायचीही भीती वाटते. गुलाब हा फुलांचा राजा असेल तर प्राजक्त ही फुलांची राणी आहे. गुलाबात पुरुषी रुबाब आहे तर प्राजक्तात स्त्रीची नजाकत आहे, अशा विचारांमध्ये मी गुंग असतानाच “परडी देऊ का तुम्हाला?”  या प्रश्नाने माझी तंद्री भंगली. समोर एक 13-14 वर्षांची चुणचुणीत मुलगी उत्तराच्या अपेक्षेने माझ्याकडे पाहात होती. मी म्हणालो, ” मला फुलं नको आहेत. ”

    ती आश्चर्याने बघत माझ्याजवळ आली आणि म्हणाली, “फुलं नकोत? मग मांडवाकडे का बघत होतात?”

    मी उत्तरलो, “निसर्गाच्या अजोड कलाकृतीला डोळ्यांत साठवत होतो. पण याचा अर्थ असा होत नाही की, मला ती कलाकृती घरी न्यायची आहे. निसर्गात असलेल्या गोष्टी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच शोभून दिसतात. सिमेंटकॉन्क्रिटच्या घरांमध्ये त्यांची विसंगतीच उठून दिसते. या फुलांचे आयुष्य फक्त संध्याकाळपर्यंत असते. ते त्यांना मुक्तपणे जगू द्यावे. ही फुलं सकाळी उमलतात म्हणजे त्यांचा जन्म होतो. मग काही वेळ त्यांचे शैशव असते. ती कुतूहलाने जगाकडे टुकूटुकू पहात असतात. नंतर एकदा ओळख पटली की, मुक्तपणे अंतरंगातला सुगंध उधळत स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. अशावेळी त्यांना तोडणं म्हणजे दुडूदुडू धावणाऱ्या गोंडस बाळाला आईपासून हिरावण्यासारखं आहे.”

    हेही वाचा – ही वाट एकटीची…

    माझं बोलणं संपताच ती अपराधी चेहरा करून म्हणाली, “मी पुन्हा कधीच फुलं तोडणार नाही.”

    तेवढ्यात आमचा संवाद ऐकून तिची आई बाहेर डोकावली. ती मला ओळखत होती. तिनेच मला त्या मुलीच्या ट्युशनसाठी फोन केला होता. तिने मला आत बोलावले आणि ट्युशनविषयी आमची चर्चा झाली. मला हे एकच नववीचं वर्ष तिला गणित शिकवायचं होतं. पुढच्या वर्षी दहावीसाठी तिची आई तिला मोठा क्लास लावणार होती. मी ट्युशनसाठी होकार दिल्यावर तिच्या आईने तिची जन्मपत्रिकासुद्धा मला दाखवली. मी ती खूप काळजीपूर्वक नजरेखालून घातली. त्या मुलीचं भविष्य खूप उज्ज्वल होतं. गुरूची पूर्ण कृपा असल्याने ती अतिशय बुद्धिमान होती. पंचम आणि नववं स्थान बळकट असल्याने तिचं उच्च शिक्षण विनाअडथळा पूर्ण होणार होतं. फक्त चंद्र अत्यंत मजबूत असल्याने ती खूप भावनाप्रधान होती. मी तिच्या आईला सगळं समजावून सांगितलं.

    मग दुसऱ्या दिवसापासूप तिची ट्युशन सुरू झाली. तिची अभ्यासखोली गच्चीवर होती. तिच्या खिडकीजवळ आम्ही बसायचो. तिथूनच तो दिसायचा… तिचा लाडका गुलमोहर! इतका विशाल  गुलमोहोराचा वृक्ष मी कधीच पाहिला नव्हता.

    ती जात्याच हुशार होती. धडा आत्मसात करून दिलेली गणिते फटाफट सोडवायची. मग राहिलेली पाच- दहा मिनिटं आम्ही गप्पा मारायचो. तिने मला विचारलं, “हा गुलमोहर उन्हाळ्यातच का फुलतो?” मी म्हणालो, ” हलाहल पिऊन भगवान शंकरांचा कंठ जसा निळा झाला, तसंच काहीसं या गुलमोहोराचं आहे. तो ग्रीष्म ॠतूतील प्रचंड उष्णता शोषून घेतो आणि मग तीच उष्णता त्याच्या अंगांगातून लालभडक फुलांच्या रुपाने बाहेर पडते.”

    हेही वाचा – झाले मोकळे आकाश…

    हे उत्तर बहुधा तिला पटले असावे. एप्रिलमध्ये तिची वार्षिक परीक्षा झाली आणि ट्युशन संपली.

    मी फारसा कधी त्या रस्त्याने जात नसे. पण काही कामानिमित्त साधारण दीडएक महिन्याने मी त्या रस्त्याने जात होतो. ती तिथेच कुठेतरी असावी. मला बघून धावतच आली. सूर्य अक्षरशः आग ओकत होता. एका क्षणात उन्हामुळे तिचा चेहरा लालबुंद झाला. ती धपापत्या उराने म्हणाली, “तो गुलमोहर किती मस्त फुलला आहे. चला, मी तुम्हाला दाखवते.” मग आम्ही थेट तिच्या खिडकीपाशी गेलो. तिचं म्हणणं अगदी खरं होतं. तो गुलमोहर चहूअंगाने बहरला होता. निसर्गाने कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. प्रत्येक पानागणिक एक फूल उमललं होतं. असं वाटत होतं जणू ग्रीष्म ॠतूच्या होमकुंडातून अग्निज्वाला उसळत आहेत…

    मी तिच्याकडे बघितले. तिचे टपोरे डोळे पाण्याने भरले होते. अचानक काय झाले मला कळेना. ती म्हणाली, ” दहावीसाठी आईने मोठा क्लास लावला आहे. पण मी जाणार नाही. मला तुम्हीच शिकवा… प्लीज.” बोलता बोलता ती रडायला लागली. मी थोडावेळ तिला रडू दिलं. मग समजावणीच्या सुरात म्हणालो, “आई-वडील मुलांसाठी नेहमी चांगलंच करत असतात. तुझ्या आईने योग्य निर्णय घेतला आहे. माझ्या शिकवण्याने तुला खूप आनंद मिळेल, पण मार्कांचं स्कोअरिंग होणार नाही. जसजशी तू मोठी होत जाशील तसतसं तुझ्या लक्षात येईल की, या जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त आहे. त्यामुळे तुलाही या गुलमोहोरासारखं बनावं लागेल. अंतःकरणात वणवा बाळगत ओठांवर हसू फुलवावं लागेल.”

    माझं बोलणं तिला कितपत समजलं माहीत नाही, पण ती शांत झाली. मी गुलमोहोराला डोळ्यांत भरून घेतलं. आता तो मला परत कधीच दिसणार नव्हता…

    Avatar photo
    जितेंद्र अभ्यंकर

    नाव - जितेंद्र अभ्यंकर गाव - सोलापूर. व्यवसाय - Astrologer मोबाईल नंबर - 8605396156 व्हाॅटसअप नंबर - 8605396156 शिक्षण - इंजिनियर. वैशिष्ट्ये - संपूर्ण स्वतंत्र विचारसरणी , समस्येकडं बघण्याचा समतोल दृष्टिकोन. छंद - समाजमाध्यमांवर व्यक्त होणे व लेखन करणे.

    Related Posts

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026 ललित

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026 ललित

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    By दिलीप कजगांवकरApril 14, 2026

    कंपनीचा ई-मेल आणि चक्क पर्सनल मेल आयडीवर! राजला आश्चर्य वाटले. “तुम्हाला कामावरून कमी केलं असून…

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026

    एक थी बुलबुल…

    April 12, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    नावात तर सर्वकाही आहे, पण सांगायचं कसं?

    April 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 267
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 384
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 553
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026
    Most Popular

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.