Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 ऑगस्ट 2026

    August 4, 2026

    सेल्फी अन् विकतचं दुखणं!

    August 3, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Bookshelf : बालकाण्ड… पूर्वग्रह, गृहितके गळून पडतात
    ललित

    Bookshelf : बालकाण्ड… पूर्वग्रह, गृहितके गळून पडतात

    डॉ. अस्मिता हवालदारBy डॉ. अस्मिता हवालदारDecember 30, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, पुस्तक वाचन, पुस्तकसंग्रह, Bookshelf, बालकांड, हनुची कहाणी, हनु आणि बाबल, विक्षिप्त मोरोबा, हनुचे शिक्षण, कादंबरीकार हनु, कथाकार हनु,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    लेखक ह. मो. मराठे यांची ओळख म्हणजे, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार, संपादक… त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी’ यासारख्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. अनेक नियतकालिकांचे संपादन त्यांनी केले आहे. ‘बालकाण्ड’मध्ये लेखकाने स्वतःची कहाणी सांगितली आहे. पुस्तक वाचताना मनाला वेदना होतात. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तुळतुळीत गोटा, शेंडी असलेल्या चेहऱ्यावर हरवलेले भाव असलेल्या लहान मुलाचे चित्र आहे. कोकणस्थी भाषेचा प्रयोग या पुस्तकात आहे. ही भाषा बोली भाषा आहे, मराठीची एक बोली भाषा… फारशी माहीत नसलेली!

    लेखक हनु (हनुमंत) सात-आठ वर्षांचा असतानाचा काळ यात आहे. या वयाच्या मुलाच्या नजरेतून कहाणी सांगितली आहे. त्याला इतक्या लहान वयात द्वेष, मत्सर, राग, करुणा या भावना असू शकत नाहीत किंवा त्याच्यावर ही परिस्थिती कोणामुळे ओढवली, याचे आकलन सुद्धा नाही. त्याला फक्त एकटेपणाची भावना आहे, भीती आहे, धास्तावलेपण आहे, आईची आठवण आहे, थोडे प्रेम आणि आपलेपणा हवा आहे. लेखकाने मोठ्या माणसाच्या नजरेतून न लिहिल्यामुळे त्यातला खरेपणा मनाला भिडतो. काहीशा अलिप्ततेने प्रसंग लिहिले आहेत.

    लेखकाच्या वडिलांचे, मोरोबांचे कोकणात झोळम्याला आणि सुर्ल्याला मोठे घर, शेतीवाडी होती. संपन्नता होती. हनुची मुंज थाटात झाली होती. पण रागीट स्वभावामुळे, विक्षिप्त वागण्यामुळे मोरोबांनी सर्व घरसंसार विकून टाकला. फक्त दोन पेटी भांडी घेऊन ते तीन मुलांसह  तीर्थाटनाला निघून गेले. जिथे त्यांची कोणाशी ओळख नव्हती. लेखक लिहितो इथून आमच्या देशोधडीला सुरुवात झाली. वडील मोरोबांचा, मुलांनी इंग्लिश शाळेत शिकायला विरोध होता. त्यांना बाबल आणि हनू या दोघांना कीर्तनकार करायचे होते. त्यांनी पत्नी मुलांसकट गावोगावी तीर्थयात्रेसाठी हिंडायला सुरुवात केली. धार्मिक स्वभावाचे असल्याने जे घडते ते रामरायच्या इच्छेने, असे ते म्हणत.

    हेही वाचा – Bookshelf : मनात खोलवर प्रभाव पाडणाऱ्या ‘चौघीजणी’

    या विक्षिप्त वागण्याचा आईच्या मनावर परिणाम झाला. ती आजारी राहू लागली, तेव्हा त्यांना तिला भूतबाधा झाली आहे, असं वाटलं. जवळचे पैसे संपल्यावर पोटापुरते अन्न मिळण्याची चिंता वाटू लागली, तेव्हा ते एका नातेवाईकाकडे गेले. तिथे काही दिवस राहून पुन्हा सुरल्याला आले. राहायला घर नव्हते. आईची पचनशक्ती बिघडल्यामुले सतत शौचाला जावे लागायचे. इतकी ताकद नसल्याने पानांच्या पोवळ्या करून त्यात ती शौच करीत असे आणि ते उचलण्याचे काम लहानग्या हनुचे होते. आई शेवटी शेवटी कुत्र्यासारखे चालत जाऊन  भुंकण्याचा आवाज काढत असे.

    तिच्या मृत्यूने हनु आणि बाबलचे बालपण संपले. वडिलांचा संताप, चिडचिड वाढली. हनुला आत्याकडे राहायला ठेवले. तिथेही त्याच्या वाट्याला दूषणं आली. परक्या घरी राहायचे तेव्हा अपमान सोसावे लागणारच! त्याला कपडे नसल्याने गार वारा अंगाला झोंबत असे. सगळे जण जत्रेला गेले तरी, याला कोणी नेत नसे. याचा उद्रेक होऊन हनु एक दिवस शापवाणी उच्चारतो, जी खरी होते. यानंतर त्याच्याशी घरातले लोक बोलणे टाकतात. हे वर्णन वाचताना मनाला क्लेश होतात. सात-आठ वर्षाच्या मुलाला काय काय सोसावे लागले! पण त्याला आता परिस्थितीशी झगडायचे आहे, हे समजले आहे. तो विरोध करू लागला आहे.

    नंतर वडील त्याला घेऊन पुन्हा गावी येतात. तिथे त्यांच्याकडे तांदूळ, डाळ विकत घ्यायचे पैसे नसतात, त्यातच कोर्टात दावा लावलेला असतो. कंदमुळे, फळे खाऊन दिवस काढावे लागतात. मोरोबांच्या हलगर्जीपणामुळे सगळी संपत्ती नातेवाईक लुटतात. त्यांच्या मनमौजी वागण्यामुळे, कधीही उठून तीर्थयात्रेला जाण्यामुळे पैसे बुडतात. लिलावात घर जाते. कफल्लक अवस्थेत फिरावे लागते. यामुळे संताप, चिडचिड, दात-ओठ खाणे, उगीच भांडण करणे, मारामाऱ्या करणे वगैरे होऊ लागते.

    तीन गुरे आणि हे तिघे पायीपायी गावोगावी चालत जाताना मधेच थांबून तीन दगडांची चूल करून भात शिजवून खातात आणि पुढे चालू लागतात. कुठल्याही झाडाखाली राहायचे, उघड्यावर राहायचे. लेखकाच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा पुऱ्या होत नाहीत. ते लिहितात, काका (वडील) पायताण आणि कपडे घालून, बाबल पंचा नेसून आणि मी फक्त लंगोटी लावून चालत होतो. दोघे अनवाणी, डोक्यावर टोपी नाही. पायाखाली गरम माती, डोक्यावर आग ओकणारा सूर्य, पोटात भूक, दमलेले पाय… डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि पोटात कालवाकालव होते. रानात झाडाखाली रात्रंदिवस एकटा राहून दिवस काढणारा तो लहान मुलगा डोळ्यासमोर येतो.

    बाबलला मोरोबांच्या मारण्याचा, त्रागा करण्याचा वैताग येतो आणि एक दिवस रागावून मालवणला एकटाच निघून जातो आणि तिथे भिक्षुकी करून परिचितांच्या घराच्या मांगरात राहात असतो. मोरोबा हनुला घेऊन तिथे गेल्यावर मात्र हनुला थोडे स्थैर्य येते. त्याची शाळा सुरू होते. बोलीभाषेऐवजी मराठी बोलायला सुरुवात होते. बाबल त्याला सातवीपर्यंत शिकवायचे ठरवतो. मोरोबांची चिडचिड पुन्हा सुरू होते, मालवण सोडून जायची तयारी होते; पण यावेळी बाबल हनुला त्यांच्याबरोबर जाऊ देत नाही.

    हेही वाचा – भारतीय तत्वज्ञानाची झलक… पवनाकांठचा धोंडी!

    चरित्र वाचताना दारिद्रय किंवा भूक या दोन्ही गोष्टी काय असतात याची जाणीव होते. हे सगळे अनुभव खरे असल्यामुळे गांभीर्य अधिकच जाणवते. हनुच्या वडिलांचा प्रचंड राग येतो, पण दयाही येते. ते मानसिकरुग्ण असल्याने पूर्ण कुटुंबाची होरपळ होते. ही कहाणी अतिशय करूण आहे, पण लेखकाने वृत्तांत सांगितल्यासारखी, कुठेही आक्रस्ताळी मत न देता, भडकपणा न आणता, लिहिले आहे. यात संवाद आहेत… काही लांबलचक आहेत, पण कंटाळवाणे होत नाहीत. अनावश्यक शब्दांचा वापर करून विनाकारण लालित्य आणण्याचा अट्टाहास न धरल्यामुळे प्रखर सत्य समोर येते, जे वाचकाला विषण्ण करते.

    ‘बालकाण्ड’ म्हटल्यावर रामायणाची आठवण होते. रामाचे बालपण त्याच्या आयुष्यातला सगळ्यात सुखकारक काळ होता, पण हनुच्या बाबतीत तसे घडले नाही. रम्य ते बालपण किंवा बालपण देगा देवा वगैरे म्हणणारे किती भाग्यवान असतात, ते ही कहाणी वाचून समजते. बालपण रम्य वगैरे असण्यासाठी नशीब लागते, अन्यथा असा रखरखीत उन्हाळा वाट्याला येतो. या विषम परिस्थितीवर मात करून ते प्रसिद्ध कादंबरीकार, संपादक झाले याचे आश्चर्यमिश्रित कौतुक वाटत राहाते!

    एका वेगळ्या जगाचा, समाजाच्या उच्च जातीवर्गाचा जवळून परिचय करून देताना कितीतरी पूर्वग्रह, गृहितके गळून पडतात. रश्मीरथी काव्यात ‘कृष्ण कि चेतावनी’मध्ये कवी म्हणतो,

    वर्षों तक वन में घूम-घूम,
    बाधा-विघ्नों को चूम-चूम,
    सह धूप-घाम, पानी-पत्थर,
    पांडव आये कुछ और निखर।
    सौभाग्य न सब दिन सोता है,
    देखें, आगे क्या होता है।

    हनुचे पुढे काय झाले? याची पुरेशी उत्सुकता मनात निर्माण होताना चरित्र संपते आणि मनात रेंगाळत राहते… बालकांड यासाठी वाचायला हवे.

    Avatar photo
    डॉ. अस्मिता हवालदार

    डॉ. अस्मिता हवालदार नायर दंत रुग्णालयातून BDS. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून MA Indology; Diploma in Archeology Mumbai University. 27 वर्षे इंदूरमध्ये प्रॅक्टिस करते. विविध मासिक, दिवाळी अंकातून कथा आणि लेख प्रसिद्ध होतात. ‘विजयनगर हृदयस्थ साम्राज्य’, ‘विजयनगरचे शिल्प काव्य’, ‘विजयनगरचे लेपाक्षी मंदिर’ ही पुस्तके आणि ‘आव्हानांचे लावून अत्तर’ हा कथासंग्रह प्रकाशित.

    Related Posts

    सार्थक

    August 3, 2026 ललित

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026 ललित

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सार्थक

    By अतुला प्रणव मेहेंदळेAugust 3, 2026

    “नमू, अगं चल नाश्ता करून घे. तुला आवडतात ते डिंकाचे दोन लाडू आणि अळीवाची खीर…

    Bookshelf : परदेशस्थ भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे… नेमसेक

    August 2, 2026

    कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीची

    August 2, 2026

    फ्रेंडशिप डे

    August 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 ऑगस्ट 2026

    August 4, 2026

    सेल्फी अन् विकतचं दुखणं!

    August 3, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026

    सार्थक

    August 3, 2026

    सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू द्या

    August 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : भलतेथ बुद्धी बळी, रजे आरिसा उजळी

    August 3, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 382
    • अवांतर 200
    • आरोग्य 135
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 519
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 244
    • मैत्रीण 24
    • ललित 825
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 ऑगस्ट 2026

    August 4, 2026

    सेल्फी अन् विकतचं दुखणं!

    August 3, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – गुंतवणूक, विवाह, सुसंवाद

    August 3, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईत साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.