Author: Team Avaantar

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. माझी एक मैत्रीण होती, सखी. मी तिला बरेचदा सखुबाई म्हणायचे. तशी ती तोंडात चांदीचा नाही तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली. सासर सुद्धा श्रीमंत. नवऱ्याचा मोठा उद्योग. एकुलती एक मुलगी. खूप शिकलेली. हुशार, सुंदर. तशी मी आणि सखी खूप उशिराने भेटलो. मैत्री व्हायला पण उशीरच झाला. सखीची मुलगी माझ्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठी. सखीला वयोमानाप्रमाणे विस्मरण व्हायला लागलं होतं. माझ्यावर खूप जीव तिचा. त्यामुळे तिची मुलगी तिला ब्लॅकमेल करायची… ‘तू जेवलीस तर, तुला हर्षाकडे घेऊन जाईन…’ ‘तू औषधं घेतलीस तर हर्षाला फोन लावून देईन…’ म्हणजे एवढ झालं की, सखी मला सगळ्यांच्या नकळत…

Read More

रश्मी परांजपे मागील तीन लेखांत आपण बालशाळेच्या अभ्यासक्रमातील भाषा शिक्षण या विषयाची सविस्तर माहिती घेतली. आता आपण बालशाळेतील गणित या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. वास्तविक, गणित हा अवघड विषय म्हणूनच प्रसिद्ध आहे. काही अंशी ते खरंही आहे. विशेषतः, माध्यमिक शाळेच्या अभ्यासक्रमातील गणित विषय अवघड वाटू शकतो. पण खरं पाहिलं तर गणित हा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे. गणित विषयातील संकल्पना सुरुवातीपासूनच स्पष्टरीत्या समजावून सांगितल्या आणि विद्यार्थ्यांनी समजावून घेतल्या तर, गणित विषयासारखा सोपा विषय नाही. यावरूनच गणित विषयाचे प्रगतीपुस्तकातील सर्वाधिक गुण मिळवून देणारा विषय म्हणून महत्त्व अधोरेखित होते. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी बालपणापासूनच लागायला हवी… आणि बालशाळेतील शिक्षिकांनी…

Read More

सतीश बर्वे भाग – 3 माझा मित्र सुबोधने त्याच्या हस्ताक्षरातील मजकूर आणि जोशी काकूंची डायरी मला आणून दिली. जोशी काकूंच्या डायरी वाचत असताना त्यांच्या मनाचे हिंदोळे समजले… अरविंदचं जाणं अतिशय धक्कादायक आणि वेदनादायी होतं. मी पुण्याला जायला नको म्हणत असताना देखील हट्टाने गेला तो आणि शेवटी परत आला, तो शांतपणे झोपलेल्या चिरनिद्रा अवस्थेत! सुबोधच्या एका फोनवर सारे मित्र आमच्या घरी जमा झाले होते. त्यांनी आपापसात कामं वाटून घेतली आणि शक्य तितक्या लवकर ते अरविंदचा देह घेऊन आमच्या घरी परतले. अरविंदला बघून अजूनही वाटत होतं की, तो नकळत डोळे उघडेल आणि म्हणेल मला की, ‘आई तुझं ऐकून घरीच थांबलो असतो तर,…

Read More

पराग गोडबोले आबा आणि आम्ही म्हणजे एक वेगळंच समीकरण. आबा घोळ घालणार आणि मग तो आम्ही निस्तरत बसणार, हा आमचा उंदरा-मांजराचा खेळ अव्याहत सुरू असतो. आबा कधी कुठे काय करतील आणि आम्ही गोत्यात येऊ… याचा नेम नसतो, कधीच. खूप सावध राहावं लागतं आम्हाला, नाहीतर, ‘नजर हटी, दुर्घटना घटी‘ याचा प्रत्यय कधी येईल, हे सांगणं कठीण! तसं तर अगदी शहाणे असतात ते. नीट विचार करून बोलतात आणि कृती करतात, फार विवेकाने वागतात. सकाळी फिरून येताना रिक्षावाले, सोसायटीचे रखवालदार, गाडी पुसणारे यांच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय त्यांचे पाय घराकडे वळतच नाहीत मुळी… प्रत्येकाला आवर्जून फराळाचे जिन्नस दिल्याशिवाय त्यांची दिवाळी साजरी होतच नाही कधी. चार…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥7॥ जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती । एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरूपा ॥98॥ हा प्रकृतीविखो आघवा । तुंवा मागां परिसिलासे पांडवा । म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती ॥99॥ तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंतीं । सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासी येती ॥100॥ ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं । मागुती भूमीसी । सुलीनें होती ॥101॥ कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे । तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं ॥102॥ नातरी आकाशाचिये खोंपे । वायु निवांतुचि लोपे…

Read More

दर्शन कुलकर्णी कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात आर्थिकदृष्ट्या तुम्हाला यश मिळेल, परंतु अनावश्यक खर्च वाढू शकतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात पैसे खर्च होतील. प्रियजनांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मन अस्वस्थ असेल. तुमच्या वागण्यातून समोरच्याला त्याच्याबद्दलचा राग दिसून येऊ शकतो, ज्यामुळे संबंध बिघडू शकतात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. वृषभ – कामात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. नवीन प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरेल. एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी व्हाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. शुभकार्यचा योग आहे, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. मुलांशी चांगला संवाद होईल. सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. गाडी चालवताना काळजी…

Read More

शोभा भडके भाग – 13 “मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचंय…” राम सगळ्यांवर एक नजर टाकून म्हणाला. दादाचं बोलणं ऐकून घरचे कसे रिॲक्ट होतील, याच विचाराने पवन आणि आरूची बेचैनी वाढली होती. कारण, दोघांना कल्पना होती तो काय बोलणार त्याची! पवन आणि राम यांच्यात रात्रीच या विषयावर बोलणं झालं होतं. लवकरात लवकर सियाच्या पाहिल्या लग्नाबद्दल घरच्यांना सांगायला हवं… त्यांचं हेच बोलणं आरुने पण ऐकलं होतं आणि तिलाही असंच वाटत होतं… लग्न आठ दिवसांवर आलं तरीही दादाने अजून घरी का नाही सांगितलं? म्हणून आता आपणच त्याच्याशी बोलायला हवं, असा विचार करून ती त्याच्या रूमकडे येत होती, तेव्हा दोघांचं बोलणं तिने ऐकलं. आता…

Read More

संगीता भिडे ‘वही’ ही तर माझी सगळ्यात पहिली आणि जीवा-भावाची मैत्रीण. अगदी अंधुक आठवण आहे… मी आईजवळ हट्ट केला, ‘मला तात्यांसालखी (तात्या माझे वडील) मोट्टी मोट्टी वही हवी.’ ‘तू त्यांच्याशालकी खूप मोट्टी हो, मग आणू तुला अश्शीच वही हं. आत्ता तू पाटीवर लिही खडूनं हं…’ इति आई. ‘नाई, मला आत्ताच हवी मोSSSट्टी वही. मी आता खूप मोSSSट्टी हाए. मला पण तात्यांशालका खूप खूप अभ्यास कलायचा हाए.’ इति अस्मादिक. खरंतर, अस्मादिकांना अक्षर ओळखही नव्हती तेव्हा. पण बालहट्ट! आईने माझ्यासाठी लगेच एक वही आणली. मग काय? आमची स्वारी एकदम खूश! काय लिहिलं नाही त्यात! उभ्या, आडव्या, तिरप्या-तारप्या कोणत्याही आकाराच्या रेघोट्या… कुठे कुठे…

Read More

माधवी जोशी माहुलकर साहित्य हेही वाचा – Recipe :  मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण कृती हेही वाचा – Recipe : उपवासाचे दहीवाले आलू करून पाहिले आहेत का? तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

मेष या आठवड्याच्या सुरुवातीला थोडी चिंता राहील. नोकरदार नवीन संकल्प हाती घेतील आणि ते ठरलेल्या वेळेत पूर्ण करू शकतील. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती करू शकाल. जास्त अधिकार प्राप्त होतील. व्यावसायिक वर्गाने व्यवसायात भागीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे; ते व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. महिलांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही. वृषभ या आठवड्यात सकारात्मक घटना घडतील. नोकरदारांना अनपेक्षित प्रमोशन मिळण्याची आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या स्वरुपात बदल घडेल. व्यावसायिक वर्गाला भांडवलासाठी आर्थिक मदतीची गरज भासेल; बँकेकडून ती मदत मिळेल. नवीन करार होतील, व्यवसायात वाढ होईल. महिलांच्या बाबतीत घरात मंगलकार्य ठरण्याचे योग…

Read More