Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें । जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥144॥ एऱ्हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ । परि तें जाणणेंचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥145॥ जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठीं घातु झाला तया हंसा । माजीं रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥146॥ सांगे गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ । काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी ॥147॥ हा निळयाचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा । कां रत्ने म्हणोनि गारा । वेंची जेविं ॥148॥ अथवा निधान हें प्रगटलें । म्हणोनि खदिरांगार…
दर्शन कुलकर्णी विजया एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरदारांकडील कामाचा ताण वाढू शकतो. पण सहकाऱ्यांच्या सहकार्याने कामाचा उरक राहील. व्यवसायात आपल्या योजनांवर विश्वास ठेवा. आर्थिक लाभासाठी व्यवसायाशी संबंधित प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांचा आज शैक्षणिक उपक्रमांमध्ये रस वाढेल. तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल. या सगळ्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे स्वतःकडेही लक्ष द्या. वृषभ – नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे विचारपूर्वक पावले उचला. कोणत्याही बाबतीत घाईघाईने निर्णय घेणे टाळा. भावनिक संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. त्यांचे कारण शोधून वेळेत उपाय करा. कुटुंबात एखाद्या सदस्याच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.…
मयुरेश गोखले आज सकाळपासून तिने श्रीरंगचं जाम डोकं खाल्लं होतं… फोनवर तिचा सारखा एकच विषय सुरू होता… “श्री सांग ना रे, आपलं काही चुकत तर नाहीये ना? तुझं ठीक आहे रे, पण माझ्यासारखी मुलगी अशी कशी तुझ्यात गुंतत चालली आहे! का आणि कसं होतंय हे सगळं काही कळत नाहीये! तुझी आठवण खेचतेय मला तुझ्याजवळ! श्री मी वाट तर चुकत नाहीये ना?” त्यांना भेटून जेमतेम वर्ष झाले असेल आणि ती श्रीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. श्रीरंगला सुद्धा ती आवडायला लागली होती. पण आज सकाळपासून तिला काय झालंय काही कळत नव्हतं. फोनवर प्रश्नांचा भडिमार श्रीवर सुरू होता. “मी तुझ्यासोबत वाट तर चुकत…
मानसी देशपांडे गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून साकारलेले अप्रतिम गीत म्हणजे ‘या सुखांनो या…’! गीतकाराचं, कवीचं वैशिष्ट्यच हे असतं की, अशा पद्धतीने लिखाण करणं, जे वाचताना, ऐकताना समोरच्या व्यक्तीला फक्त आणि फक्त सुखाची अनुभूती प्राप्त व्हावी… नेमकं हेच गदिमांनी या गीतातून मांडलं आहे. लेखाची सुरुवात करण्यापूर्वी मला प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचा हा विचार मनात येतो, “आनंदाच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण, परत परत भरण्याचे वरदान त्यांना मिळालेले असते…” आपल्या आयुष्यात दु:ख कितीही असले तरी सुखाला निमंत्रण हे प्रत्येकजण देतच असतं. म्हणून गदिमांनी ओळ लिहिली आहे, या सुखांनो या… सुख हे वाटलं की, जास्त आनंद मनाला…
मुरकूसाठी साहित्य कृती हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी… चिडे बनविण्याचे साहित्य हेही वाचा – Recipe : कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या! कृती (‘रुचिरा’ या पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
डॉ. किशोर महाबळ प्रत्येक बालक अगदी लहान वयापासून, शक्य ते ते स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करते. त्याचे आई-वडील सुशिक्षित तसेच पालक म्हणून जबाबदारी ओळखणारे असले तर त्या बालकाचे शिक्षण अधिक चांगले आणि लवकर होते. अतिशय सोप्या पद्धतीने, रंजकतेने हसतखेळत शिकविल्यामुळे शिकलेल्या बाबी बालकाच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, हे जसे खरे तसेच शिकण्याचा प्रयत्न करणाऱ्या बालकाला, पालकांनी सातत्याने योग्य वेळी आणि योग्य त्या पद्धतीने प्रोत्साहन दिल्यामुळेही हे शक्य झालेले असते. बालकाला शिकविलेली एखादी कृती, मूळाक्षरे, पशूपक्षी तसेच वस्तूंची माहिती बालकाने नीट आत्मसात केली आहे, हे पालकांच्या – आजी-आजोबा, बहीण-भाऊ यांच्याबरोबरच बालवाडीतील शिक्षिका इत्यादींच्या जेव्हा लक्षात येते, तेव्हा सहसा त्या बालकाचे टाळ्या वाजवून, खाऊ…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें । जे माझां ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥133॥ अथवा भूतें ना माझां ठायीं । आणि भूतांमाजि मी नाहीं । या खुणा तूं कहीं । चुकों नको ॥134॥ हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड । आतां इंद्रियां देउनि कवाड । हृदयीं भोगीं ॥135॥ हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारेपण पार्था । न संपडे गा सर्वथा । जेविं भुसीं कणु ॥136॥ एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें । परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ॥137॥ जे जाळ जळीं…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरदारांना कामाचा ताण फारसा जाणवणार नाही. सहकारी आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आज दुपारनंतर कामाला गती मिळेल. मार्केटिंगमध्ये सहभागी असलेल्यांना मोठा फायदा होऊ शकतो. महत्त्वाच्या करारांविषयीची चर्चा तूर्तास पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल. आज आरोग्यात सुधारणा होईल. पालकांशी होणारे संभाषण सकारात्मक असेल. वृषभ – आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य द्या. भावनिक संबंधांवर अवलंबून राहणे कमी करा, त्याचा तुम्हालाच फायदा होईल. भागीदारी व्यवसायातील संवाद सकारात्मक असतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, नव्या ओळखी होतील. समाजात तुमचा प्रभाव वाढू शकतो. फक्त रागावर नियंत्रण ठेवा. मिथुन – वरिष्ठांना प्रभावित करण्यासाठी, तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी…
राजीव जोशी गेल्या सहा महिन्यांपासून आमची भेट झाली नव्हती मीच जाणूनबुजून तिला भेटणं टाळत होतो. त्या दिवशी अचानक तिचा कॉल आला… फोनवर तिची आई होती… मला बोलली, “आत्ताच्या आत्ता तुला आमच्या घरी यायला जमेल? नको येच ताबडतोब.” आठवतोय मला तो दिवस… इच्छा नसताना तिच्या घरी गेलो. नेहमीप्रमाणे खुर्चीत बसली होती. कसला विचार करत होती देवाला माहीत. पण तिच्या डोळ्यात माझी ओळख नव्हती. ज्या डोळ्यांमुळे आमची मैत्री झाली, त्या डोळ्यांत माझ्यासाठी नजर नव्हती. मी जवळ गेलो, तिचा हात हातात घेतला आणि विचारलं, “कशी आहेस?” शून्य नजरेने माझ्याकडे बघत तिने हातातला हात काढून घेतला आणि क्षणार्धात मला सगळं आठवलं… एकेकाळी एवढी बडबडी…
दीपक तांबोळी भाग – 3 कामावरून आलेली तेजलचा पाय, मयूरने टाइल्सवर सांडलेल्या सरबतावरून घसरला आणि ती जोरात कमरेवर आपटली. “आई गंSSS” ती किंचाळली तशी तन्वी धावत आईजवळ गेली. टीपॉयजवळ सांडलेलं सरबत तिला दिसलं, तशी मयूरची आता काही खैर नाही, हे तिच्या लक्षात आलं आणि ती थरथर कापू लागली. तेजलच्या हाताला ते चिकट सरबत लागलं. त्याचवेळी मयूरच्या हातातल्या सरबताच्या ग्लासकडे तिचं लक्ष गेलं आणि आपण कशावरून घसरलो, हे तिच्या लक्षात आलं. संतापाने तिचा चेहरा वाकडा झाला. “कार्ट्या तू सांडलं ना हे सरबत?” तेजल जोरात किंचाळली. ती उठून उभी मयूर घाबरून थरथर कापू लागला. तेजलने समोरची स्टिलची पट्टी उचलली अन् मयूरला डाव्या…

