Author: Team Avaantar

डॉ. किशोर महाबळ एक व्यक्ती एकदा आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासण्या झाल्यावर आजाराचे गंभीर स्वरूप लक्षात आले. पेशंट फार काळ जगण्याची शक्यता नगण्य होती. डॉक्टरांनी पेशंटला कोणतीही लपवाछपवी न करता तब्येतीची माहिती दिली. ऐकल्यावर पेशंटला वाईट वाटणे स्वाभाविक होते. तरीही, त्याने डॉक्टरांनी दिलेल्या सूचना आणि सल्ला अतिशय काळजीपूर्वक ऐकला. काही दिवसांनी त्या पेशंटला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. फॉलोअपसाठी हॉस्पिटलच्या पुढच्या भेटीदरम्यान पेशंटने डॉक्टरांना त्याने लिहिलेले पुस्तक आणि फावल्या वेळात तयार केलेल्या ओरिगामी फुलांचा पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला आणि डॉक्टरांचे आभार मानले. हा प्रकार बघून डॉक्टर आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी पेशंटला “माझे आभार’ का मानले?” असे विचारले.…

Read More

सतीश बर्वे भाग 1 “आई, अगं एवढं काय निरखून बघतेयस त्या पेंटिंगमध्ये?” माझा मुलगा सौरभ हॉटेलच्या चेक-इनची औपचारिकता पूर्ण करत असताना मी तिथल्या भिंतीवर बाजूबाजूला एक लावलेली पेंटिंग बघत होते. खरंतर, मला तसं पेंटिंगमधून काही अर्थबोध होत नव्हता. पण तितक्याच माझी नजर एका पेंटिंगच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात गेली. पेंटरचं तिथे लिहिलेलं नांव मी निरखून बघत असतानाच सौरभने मला प्रश्न विचारला. “काही नाही रे, एवढं अवाढव्य पेंटिंग ज्याने कोणी काढलंय, त्याचं नाव वाचण्याचा प्रयत्न करत होते…” मी सौरभला म्हणाले. “आई तू पण अशी निरखून बघत होतीस, जसा काही तुझा कोणी मित्रच आहे तो पेंटर! चल, आता मी बॅगा घेतोय आपल्या दोघांच्या.…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष या आठवड्यात ठरवलेली कामे अजून काही दिवस रेंगाळतील. तब्येतीच्या कुरबुरी राहतील. साडेसाती सुरू असताना आपली खरी माणसे कोण आहेत, ते समजू शकेल. अडचणी आल्या तरी स्वतः प्रयत्न करणे सोडू नका. काम मार्गी लागण्याचे संकेत मिळू शकतील. वाहन सौख्य चांगले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागू शकते. महिलांनी संततीशी बोलताना जपून बोलावे, अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी नवीन आव्हाने स्वीकारावीत. अडचणी येतील पण मार्ग निघू शकेल. वृषभ या आठवड्यात कामाचे नियोजन न केल्याने धावपळ होऊ शकते. वरिष्ठ खूश राहतील. घरात धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते, त्या निमित्ताने पाहुणे येतील.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥1॥ मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥1॥ तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥2॥ जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥3॥ म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 ऑगस्ट 2025; वार : रविवार भारतीय सौर : 26 श्रावण शके 1947; तिथि : नवमी 19:24; नक्षत्र : रोहिणी 27:17 योग : व्याघात 25:39; करण : तैतील 08:28, वणिज 30:21 सूर्य : सिंह; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:05 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 आदित्य पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – Unethical values of journalism : व्यवसायाची लाज घालविणारे वर्तन! दिनविशेष थोर हुतात्मा मदनलाल धिंग्रा टीम अवांतर भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील थोर हुतात्मा मदनलाल…

Read More

डॉ. प्रिया गुमास्ते वसंत (Spring) हा शिशिर ऋतूनंतर येणारा आदान काळातील दुसरा ऋतू. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत! शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा – त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा म्हणजे वसंत ऋतू. महिने – चैत्र  आणि  वैशाख (Mid March to Mid May) भारतासारख्या अतिविशाल देशात, नैसर्गिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ-फाल्गुन, काही ठिकाणी फाल्गुन-चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र-वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. ऋतू वर्णन वसन्ते च समागत्य नराः कुसुमोत्सवम्। कुर्वन्ति परमां प्रीतिं, वनं दृष्ट्वा मनोहरम्॥ अर्थ – वसंत ऋतूच्या आगमनामुळे सर्व मनुष्यगण फुलांचे उत्सव साजरे करतात. सुंदर जंगले बघून सर्वजण…

Read More

रविंद्र परांजपे मागील लेखात आपण मानसिक ताणतणावांचे शरीर-मनावर होणारे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती घेतली. या लेखात आपण मानसिक ताणतणाव निवारणार्थ काय करायला हवे, याबाबत जाणून घेणार आहोत. मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन मानसिक ताणतणाव हे सर्व मनोकायिक समस्यांचे मूळ कारण आहे. मानसिक ताणतणावांमुळे व्यक्तीचे जीवन वेदनामय होते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन ताणतणावमुक्त असावे, असे वाटत असते. यासाठी ताणतणावांचे सुव्यवस्थापन करणे नितांत आवश्यक आहे. ताणतणाव सुव्यवस्थापन मानसिक ताणतणाव येऊ नये आणि काही कारणास्तव आलाच तर, त्यास यशस्वीरीत्या कसे तोंड द्यायचे, यासाठी आपण केलेला विश्लेषणात्मक अभ्यास आणि प्रयत्नपूर्वक उचललेली पावले, यांचा समावेश मानसिक ताणतणावांचे सुव्यवस्थापन या प्रक्रियेत करता येईल. हेही वाचा – Mental Health…

Read More

परिणिता रिसबूड आजकाल मी आयुष्य आजकाल मी आयुष्य वाईंडप करायला घेतलंय खूप झाले जमा खर्च, खूप झाल्या रीतीभाती नको त्या गोष्टींनी जीवन वेढलंय आजकाल मी आयुष्य वाईंडप करायला घेतलंय एकदा मनसोक्त झोप काढायची आहे सकाळची न्याहारी दुपारी करायची आहे काहीही न करता दिवस घालवायचा आहे रुटीनच्या नावा खाली जीवन बांधलंय आजकाल मी… एकदा नुसते विनाकारण हिंडायचे आहे मैत्रिणीच्या घोळक्यात रमायचे आहे हातावरचे घड्याळ बाजूला ठेवायचे आहे काळवेळेचे चक्र जीवन पोखरत बसलंय आजकाल मी… पाहायचा राहिलाय निसर्गाचा सोहळा पानाची पानगळ आणि फुलांचा बहर आत दडलेले फुलपाखरु मोकळे सोडायचे आहे शोभेल का हे असे वागणे या विचारताच जीवन अडकलंय आजकाल मी… काय…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला देवा हें विविध कानीं ऐकिजे । परि अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारी पां ॥262॥ अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ॥263॥ जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेकुलें । घडले आम्हा ॥264॥ यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः । धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन् मे क्षेमतरं भवेत् ॥46॥ आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 ऑगस्ट 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 25 श्रावण शके 1947; तिथि : अष्टमी 21:34; नक्षत्र : कृत्तिका 28:38 योग : वृद्धी 07:20, ध्रुव 28:27; करण : बालव 10:41 सूर्य : सिंह; चंद्र : मेष 11:43; सूर्योदय : 06:19; सूर्यास्त : 19:05 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 अश्वत्थमारुती पूजन गोपाळकाला कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. आरोग्य सुधारण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. कामाचा…

Read More