Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, April 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : तरी उचितें कर्में आघवीं, तुवां आचरोनि मज अर्पावीं…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : तरी उचितें कर्में आघवीं, तुवां आचरोनि मज अर्पावीं…

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 28, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Eleven, अकरावा अध्याय, अध्याय अकरावा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय तिसरा

    प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥29॥

    एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥184॥ इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥185॥

    मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥30॥

    तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥186॥ हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसी ॥187॥ तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥188॥ आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इये रथीं । देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥189॥ जगीं कीर्ती रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं । मग भारापासोनि सोडवी । मेदिनी हे ॥190॥ आतां पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देईं । एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये ॥191॥

    ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवः । श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥31॥

    हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥192॥ तेही सकळ कर्मी वर्ततु । जाण पां कर्मरहितु । म्हणोनि हें निश्चितु । करणीय गा ॥193॥

    ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टानचेतसः ॥32॥

    नातरी प्रकृतिमंतु होउनी । इंद्रियां लळा देउनी । जे हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥194॥ जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखिती । कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥195॥ ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले । अज्ञानपंकी बुडाले । निभ्रांत मानीं ॥196॥ देखें शवाचां हातीं दिधलें । जैसें कां रत्न वायां गेलें । नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥197॥ कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥198॥ तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावें ना ॥199॥ म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगें पतंग काय साहती । प्रकाशातें ॥200॥ पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण । तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥201॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : तरी पुरतेपणालागीं, आणिकु दुसरा नाहीं जगीं…

    अर्थ

    प्रकृतीजन्य गुणांनी मोहित झालेले लोक गुणांच्या, कर्मांच्या ठिकाणी आसक्त होतात. सर्वज्ञ पुरुषाने त्या असर्वज्ञ पुरषांना चाळवू नये. ॥29॥

    या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो, तोच कर्मात बद्ध होतो. ॥184॥ गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात. त्या दुसर्‍यांनी (गुणांनी) केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपणाकडे घेतो (तो कर्मात बद्ध होतो.) ॥185॥

    चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेऊन सर्व (उचित) कर्मे समर्पण करून निरिच्छ आणि निरहंकार होऊन, संशयरहित असा तू युद्ध कर. ॥30॥

    तरी सर्व विहित कर्मे करून, ती मला तू अर्पण कर. परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. ॥186॥ हे विहित कर्म, मी त्याचा कर्ता अथवा अमुक कारणाकरिता मी त्या कर्माचे आचरण करीन, असा अभिमान कदाचित तुझ्या चित्तात येईल, तर तो येऊ देऊ नकोस. ॥187॥ तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस, सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. ॥188॥ आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. ॥189॥ या जगात तू आपली कीर्ती रूढ कर आणि आपल्या धर्माचा मान वाढव; आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. ॥190॥ आता अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस ॥191॥

    जे श्रद्धावान आणि निर्मत्सर मानव माझे हे मत नित्य अनुसरतील, ते देखील कर्मापासून मुक्त होतील. ॥31॥

    अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्यबुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ॥192॥ ते सर्व कर्मे करीत असले तरी, ते कर्मरहित आहेत, असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे. ॥193॥

    पण जे मत्सरी लोक हे माझे मत अनुसरत नाहीत, ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी आणि नष्ट आहेत, असे समज. ॥32॥

    नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन आणि इंद्रियांचे लाड करून जे लोक या माझ्या मताचा तिरस्कार करून, ते टाकून देतात ॥194॥ जे याला एक किरकोळ गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादराने पाहातात किंवा जे वाचाळपणे याला पुष्पित वाणी म्हणतात ॥195॥ ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत आणि विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत आणि अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत, असे नि:संशय समज. ॥196॥ पाहा प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही ॥197॥ किंवा, ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही; त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही. ॥198॥ अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील, त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. ॥199॥ ते या उपदेशाला तर मानीत नाहीतच आणि उलट त्याची निंदा देखील करू लागतात; म्हणून सांग, पतंग प्रकाशाला सहन करू शकतील? ॥200॥ ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण ठेवले आहे, त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो. ॥201॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : देखें पुढिलाचें वोझें, जरी आपुला माथां घेईजे…

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    By Team AvaantarApril 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो ।…

    Dnyaneshwari : माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त…

    April 12, 2026

    Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…

    April 11, 2026

    Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…

    April 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026

    Dnyaneshwari : हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड…

    April 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    शिव आणि आरूचं लग्न झालं, पण….

    April 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 266
    • अवांतर 181
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 383
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 551
    • शैक्षणिक 76
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आशा उद्याच्या, डोळ्यात माझ्या…

    April 13, 2026

    Ayush Shetty : फायनल हरला, पण इतिहास घडवला…

    April 13, 2026

    शेवटची महाराणी!

    April 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.