Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 1 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 22 जून 2025, वार : रविवार, तिथि : द्वादशी 25:22, नक्षत्र : भरणी 17:38 योग : सुकर्मा 16:57, करण : कौलव 14:56 सूर्य : मिथुन, चंद्र : मेष 23:03, सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 योगिनी भागवत एकादशी अयन करी दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – गेले ते दिन गेले… दिनविशेष महानुभाव साहित्याचे संशोधक विष्णू कोलते प्रसिद्ध मराठी…

Read More

आराधना जोशी आयुष्याचा सूर महत्त्वाचा… म्हणूनच 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. तसं पाहिलं तर, शास्त्रीय संगीतापासून फिल्मी संगीतापर्यंत… भारतीयांचे जीवन त्यानेच व्यापलेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ज्या 64 कला मानल्या गेल्या आहेत, त्यात संगीत ही एक महत्त्वाची कला आहे. भारतीय संगीताने जागतिक पातळीवर स्वतःची ओळख तयार केली आहे. आज अनेक परदेशी तरुण, तरुणी भारतीय संगीत शिक्षणासाठी भारतात दाखल होत आहेत. तथापि, असा दिवस साजरा करण्याची प्रथा फ्रान्समध्ये आणि नंतर ती जगातील इतर देशांमध्ये सुरू झाली. खरंतर, संगीताचा हा कान आपल्याला जन्मजात मिळालेला असतो. आईच्या पोटात असताना तिच्या हृदयाचे ठोके हे बाळाचं पहिलं संगीत असतं. आज गर्भसंस्कारांना असणारं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 31 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 21 जून 2025, वार : शनिवार, तिथि : दशमी 07:18, नक्षत्र : अश्विनी 19:50 योग : अतिगंड 20:28, करण : बव 17:55 सूर्य : मिथुन, चंद्र : मेष, सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 दक्षिणायन प्रारंभ, योगिनी स्मार्त एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – वाढत्या खर्चावर लक्ष केंद्रित करा. हातात उपलब्ध असणारा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन काम करा. नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. एकाच वेळी अनेक…

Read More

आराधना जोशी शनिवारी जागतिक योग दिन साजरा केला जातोय. गेल्या काही वर्षांपासून आरोग्याबाबत बऱ्यापैकी जागृती झाली आहे. याबाबत तरुणाई देखील गंभीर असल्याचे दिसत आहे. विशेषत:, मुलांना सिक्स पॅक्स, बलदंड बायसेप्स यांचं आकर्षण तर मुलींना झीरो फिगरचं. वातानुकूलित जिममध्ये मशीनच्या सहाय्याने, सप्लिमेंटसच्या मदतीने शरीर संपदा कमावली तरी, मानसिक शांतता मात्र हरवलेलीच आहे. आयुष्यातील ताणतणावांना सामोरं जाताना लहान वयातच होणारा उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास, हृदयविकाराच्या झटक्याचा धोका यामुळे अस्थिरता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याचा नातेसंबंधांवरही परिणाम होऊ लागला आहे. या सगळ्याचा आपल्या जीवनशैलीशी खूप जवळचा संबंध आहे, हे लक्षात आल्यावर तरुणवर्ग योगाभ्यासाकडे वळू लागला आहे. दरवर्षी 21 जून रोजी जागतिक…

Read More

यश:श्री खूप दिवसांनी लिहायला बसले आहे. जर लिहायचेच झाले, तर काय लिहायचे? अवतीभोवती तसेच विषय भरपूर असतात, पण प्रत्येक विषय हा लिहिण्यासाठी ‘चार्ज’ करणारा नसतो. काही वेळेस एखादी अशी लहानशी घटना असते, पण ती दिवसभर नव्हे तर, काही दिवस तरी डोक्यात पिंगा घालत राहते. त्याच्या अनुषंगाने येणारे विचार लेखाच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न मी करते. जसे सुचत जाते, तसे लिहिते. ते अभ्यासपूर्ण किती होते, वैचारिक किती होते, गंभीर विषयांना हात घालणारे किती होते, हे माहीत नाही. एखाद्या गोष्टीचे किंवा घटनेचे विश्लेषण करणारी किंवा त्यावर आपले ‘वैचारिक’ मत मांडणारी मी कुणी फार मोठी लेखिका नाही. सर्वसामान्यांप्रमाणे मनात येणाऱे विचार मांडण्याचा हा प्रामाणिक…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 30 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 20 जून 2025, वार : शुक्रवार, तिथि : नवमी 09:49, नक्षत्र : रेवती 21:44 योग : शोभन 23:46, करण : वणिज 20:37 सूर्य : मिथुन, चंद्र : मीन 21:44, सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. इतरांच्या सांगण्यावरून गुंतवणूक केली तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक समस्या सोडविणे, ही प्राथमिकता असली पाहिजे. आत्मविश्वास उंचावेल. वैवाहिक जीवन सुधारण्याच्या प्रयत्नांचे फळ मिळेल.…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते. आणखी एक आठवण सांगायला तुमच्या भेटीला. साधारणपणे 1984पासून मी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. अर्थात, सुरुवात बालनाट्यापासून झाली. पण आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक नाटकाची वेगळी आठवण आहे… मी एका विनोदी नाटकात काम केलंय, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ हे नाटक! त्यात लक्ष्मीकांत बेर्डे, राजा गावडे आणि खूप सारे दिग्गज होते अन् मी एकटीच मुलगी. (तेव्हा 16-17 वर्षांची मुलगीच होते.) विनोदी नाटक आणि सोबत हे रथीमहारथी म्हणून मला धडकीच भरली होती. त्यात विनोदी नाटक करणं खूप कठीण असतं. कारण, त्यात टायमिंग खूप महत्त्वाचं असतं. बरं, मी तशी नवखीच आणि समोर लक्ष्यादादा आणि राजाभाऊ… केव्हा काय addition घेतील आणि त्या…

Read More

उमा काळे श्रीमंती ही नात्याची असते. पण, खरं नातं म्हणजे केवळ रक्ताचं बंधन नसतं, तर ते दोन मनांना जोडणारा एक अदृश्य धागा असतो. पण कोणतंही नातं जपताना, समोरच्याच्या मनात आपली खरी जागा काय आहे, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. उगाचच एखाद्या नात्यात स्वतःला झोकून देऊन, विनाकारण भावूक होण्यात काहीच अर्थ नसतो. मन हळवं असणं चांगलं, पण ते दुबळं नसावं. नात्यातली आपली जागा ओळखणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं नव्हे, तर ती एक प्रकारची वास्तववादी जाणीव आहे. जेव्हा आपल्याला कळतं की, समोरच्या व्यक्तीसाठी आपण किती महत्त्वाचे आहोत, तेव्हा आपण त्या नात्यात अधिक सजगतेने वागतो. नाहीतर, अपेक्षाभंगाचं दुःख पदरी पडतं. अनेकदा आपण…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 29 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 19 जून 2025, वार : गुरुवार, तिथि : अष्टमी 11:55 नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा 23:16, योग : सौभाग्य 26:45, करण : तैतील 22:55 सूर्य : मिथुन, चंद्र : मीन, सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:18 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : उत्तरायण, संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरदार वर्गाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कामगिरी सुधारेल. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. पैशाचा ओघ पूर्वीपेक्षा चांगला असेल, परंतु खर्चही त्याच प्रमाणात असेल. मार्केटिंग, मीडिया किंवा सार्वजनिक व्यवहाराशी संबंधित…

Read More

अजित गोगटे गेल्या आठवड्यात मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. काहीजण या संदर्भात आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात की, रेल्वे सरकारची म्हणजे लोकांचीच आहे. लोकांनीच महसूल बुडविला तर, सरकारचा गाडा कसा चालणार? त्यामुळे सरकारला प्रामाणिकपणे महसूल देणे, हे नागरिक म्हणून लोकांचे कर्तव्य आहे. पण प्रश्न असा आहे की, स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल? रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी खाली काही अनुभव देत आहे. यातील काही अनुभव प्रत्यक्ष माझ्याबाबतीत घडलेल्या घटना आहेत. बच्चों…

Read More