Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
डॉ. प्रिया गुमास्ते (आयुर्वेदिक फिजिशियन आणि कॅन्सर कन्सल्टंट) सध्याच्या काळात नॅचरल, हर्बल हे शब्द वरचेवर कानावर पडत असतात आणि आयुर्वेद म्हणजे हर्बल औषधी हाच समज बहुतांश लोकांमध्ये आहे. पण आयुर्वेद फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही. मग काय आहे हे आयुर्वेद? आपल्या भारतात सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी अत्यंत विद्वान ऋषींनी अभ्यासपूर्ण असे वेद लिहिले. वेद म्हणजे ज्ञान देणारे ग्रंथ. त्यामधील एक उपवेद म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद या शब्दाची फोड केली तर ती होते आयुषो वेदः| यातील आयु म्हणजे जीवन तर, वेद म्हणजे विज्ञान. थोडक्यात सांगायचे झाले तर, आयुष्याविषयी माहिती देणारा, जीवनाचे विज्ञान उलगडून देणारा ग्रंथ म्हणजे ‘आयुर्वेद’! हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम्। मानं च…
यश:श्री पूर्वीच्या काळी लता, किशोर, रफी, मन्ना डे, आशा, मुकेश, तलत अशा एकापेक्षा एक गायकांबरोबरच योग्य शब्द वापरणारे गीतकारही होते. त्यामुळे या गाण्यांचे गारुण आजही कायम आहे. आताही चांगली गाणी बनतात, पण त्यातही गुणगुणण्यासारखी किती आहेत? हा खरा प्रश्न आहे. कधी कधी तर केवळ शब्दछल असतो. अलीकडेच एक व्हिडीओ पाहण्यात आला होता. अनुपम खेर यांनी ऋषी कपूर यांच्या घेतलेल्या इंटरव्ह्यूची ही क्लिप आहे. एकाहून एक सरस हिट चित्रपट देणाऱ्या ऋषी कपूर यांना अनुपम खेर यांनी आजकालच्या नवीन गाण्याबद्दल विचारले असता, ते लगेच म्हणाले, ‘आताची गाणी कुठे आहेत, नुसता गोंगाट आहे. कोणीही उठते, गाणे म्हणते… गाणे लिहिते. माझा मुलगा रणबीर याचं…
दर्शन कुलकर्णी आज भारतीय सौर : 07 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 28 जून 2025, वार : शनिवार, तिथी : तृतीया 09:53, नक्षत्र : पुष्य 06:35 योग : हर्षण 19:14, करण : वणीज 21:28 सूर्य : मिथुन, चंद्र : कर्क, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19 पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यावसायिक जीवनात बरेच चढ-उतार येतील. त्यामुळे कामात निष्काळजीपणा नको. करिअरच्या वाढीसाठी नवीन संधींचा पूर्ण लाभ…
लीना जोशी परुळेकर आपली त्वचा (Skin) आणि त्वचेची निगा याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. मग ती व्यक्ती कुठल्याही वयोगटातील असली तरी! आपली त्वचा कशी आहे? तिची काळजी कशी घ्यावी? असे असंख्य प्रश्न असतात. त्यामुळे सर्वप्रथम आपण आपल्या त्वचेची ओळख करून घेऊया. आपली त्वचा मुळात तीन स्तरांनी बनलेली असते. पहिल्या आणि सर्वात वरच्या स्तराचे नाव आहे – Epidermis. त्याच्या खालच्या आणि मधल्या स्तराचे नाव आहे – Dermis. त्याच्या खालच्या आणि सर्वात शेवटच्या स्तराचे नाव आहे – Hypodermis / subcutaneous Layer… हे माहीत असणे अशासाठी गरजेचे आहे, कारण आपण जी उत्पादने वापरतो ती त्वचेच्या कुठल्या स्तरापर्यंत पोहोचतात, हे कळण्यासाठी! आपण जी…
मनोज जोशी फेरीवाले आणि पाऊस यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘असून अडचण, नसून खोळंबा’! मे महिन्यात उत्तरोत्तर उन्हाची काहिली वाढू लागल्यावर आपण सारेच जून महिना सुरू होऊन ‘पाऊस कधी येणार?’ याची वाट पाहू लागतो. पण पावसाला सुरुवात होऊन दोन महिने झाल्यावर तिसऱ्या महिन्यातच ‘पाऊस कधी जाणार?’ असं होतं. कारण, एकतर रोज छत्री घेऊन जाणं हे एक ओझंच होऊन जातं, त्यात सर्वकडे चिखल आणि सणावारातील हौसेवर ‘पाणी’ पडू नये, असंच सर्वांना वाटत असतं. फेरीवाल्यांच्या बाबतीतही असंच काहीसं असतं. जेव्हा फेरीवालाविरोधी सूर लागतो, तेव्हा ते कसे रस्ता अडवून बसलेले असतात, जाताना-येताना अडचण…, इथपासून ते कशी अडवणूक करतात… इथपर्यंत सर्व विषय चघळले जातात.…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 06 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 27 जून 2025, वार : शुक्रवार, तिथि : द्वितीया 11:19, नक्षत्र : पुनर्वसू 07:21 योग : व्याघात 21:09, करण : तैतील 22:31 सूर्य : मिथुन, चंद्र : कर्क, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19 पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 जगन्नाथ रथ यात्रा वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरदार व्यक्तीची काम करण्याची शैली आणि नेतृत्व पाहून प्रत्येकजण प्रभावित होईल. व्यवसायात नवीन भागीदारीचा…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आले… गोष्ट आहे एका ‘दिदी’ची एक सिनेमा आला होता, म्हणजे तो आला कधी अन् गेला कधी कोणाला कळलंच नाही. ‘आमरस’ त्याचं नाव होतं. माझी मोठी मुलगी नमीता तिथे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. तीन-चार दिवसांचं शूटिंग झालं आणि ती रीमा लागू (ज्यांना मी दिदी म्हणायचे) यांच्यासोबत काहीतरी बोलावं म्हणून हिम्मत करून पुढे गेली. तिनं दिदींना विचारलं की, ‘तुम्ही हर्षा गुप्तेला ओळखता का?’ त्या म्हणाल्या, ‘हो…’ आमचं लाजरं बुजरं त्यांना म्हणाली की, ‘ती माझी आई आहे.’ झालं…! आमच्या दिदी अशा ओरडल्या ना तिला! ‘कार्टे, अगं हे तू मला तीन-चार दिवसांनी सांगतेयस?’…
गायत्री वैशंपायन साधारणतः कुठल्याही लेखाची सुरुवात ही catchy, attractive अशा शीर्षकाने करतात, तरच पुढला लेख वाचला जाईल, ही शक्यता वाढते. पण आज ज्या जगात मी तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे, तिथे चमचमणारं, झगमगीत असं काहीच नव्हतं. म्हणूनच साधं शीर्षक ‘आमच्या मराठी शाळा’… माझी शाळा एक व्यक्ती असती तर कशी असती? फार make-up न करणारी, बडेजाव नसणारी, स्वच्छ नीटनेटकी रहाणारी, चटपटीत, आपला विषय शिकवण्यात तरबेज, ठामपणे मतं मांडणारी एखादी पन्नाशीची प्रौढा असावी, अशा रुपात शाळा माझ्यासमोर येते. कदाचित खूप शिक्षकांना (बाईंना) मी तसं पाहिल्यामुळे शाळेची अशी इमेज माझ्या मनात ठसली असेल. अर्थात, हे माझे अनुभव साधारण 80-90च्या दशकातील शहरी भागातील…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 05 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 26 जून 2025, वार : गुरुवार, तिथि : प्रतिपदा 16.01, नक्षत्र : आद्रा योग : ध्रुव, करण : बालव सूर्य : मिथुन, चंद्र : मिथुन, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:19 पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 आषाढ मास आरंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरीच्या ठिकाणी काम करण्याच्या शैलीने आणि नेतृत्वाने प्रत्येकजण प्रभावित होईल. उत्पन्नात वाढ होण्याची संधी चालून येईल, गुंतवणुकीचे पर्याय…
अजित गोगटे मागील दोन लेखांमध्ये मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. त्यानंतर माझे स्वत:चे अनुभव सांगितले. कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल? रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी माझे…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

