Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, July 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 17 ऑक्टोबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 17 ऑक्टोबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 17, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 17 ऑक्टोबर 2025; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 25 आश्विन शके 1947; तिथि : एकादशी 11:11; नक्षत्र : मघा 13:56
    • योग : शुक्ल 25:47; करण : कौलव 23:41
    • सूर्य : कन्या; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:32; सूर्यास्त : 18:16
    • पक्ष : कृष्ण; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127

    वसुबारस / गोवत्स द्वादशी

    रमा एकादशी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष –  दिवस यश आणि उत्तम कामगिरीने भरलेला असेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. काही प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल, मात्र त्यामुळे अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. आज आत्मविश्वास उंचावलेला असेल.

    वृषभ – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम बाळगावा लागेल; घाईघाईने निर्णय घेणे महागात पडू शकते. नोकरदार जातक आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. काही आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जास्त काळजी घ्या. आरोग्य देखील बिघडण्याची शक्यता आहे.

    मिथुन – कला आणि साहित्याकडे कल वाढेल. तुमच्या कल्पनांनी इतर प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, इतरांच्या जाळ्यात अडकू नका. लांबचा प्रवास करत असाल, तर काळजीपूर्वक गाडी चालवा. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना लक्षणीय यश मिळेल.

    कर्क – आज एखाद्या विषयावर कुटुंबात चर्चा होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी मदत मिळेल. आर्थिक बाबींमध्ये नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात असे काहीतरी नवीन सापडेल ज्यामुळे करिअर आणि व्यवसायात मोठी उंची गाठाल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नही वाढेल, परंतु खर्चही वाढतील.

    सिंह – आजचा दिवस यश मिळण्याचा आणि इच्छापूर्तीचा ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील, ज्यामुळे येणारा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र, बोलणे आणि राग नियंत्रित करावा लागेल. वैवाहिक नातेसंबंधांमध्ये खूप प्रामाणिक आणि संयमी राहावे लागेल.

    हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : मुलांची सुरक्षितता

    कन्या – कामाच्या ठिकाणी खूप धावपळ असेल. मात्र आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मोठा खर्च सहन करावा लागू शकतो. बेरोजगार जातकांना आज नोकरीच्या संधी चालून येतील. विवाहोत्सुकांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही मतभेद उद्भवू शकतात, संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे संयमाने वागा. प्रलंबित कामे पूर्ण होतील.

    तुळ – दिवस आत्मविश्वास आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, आर्थिक निर्णय काळजीपूर्वक  घेण्याची आवश्यकता आहे. करिअर आणि व्यवसायात सामान्य दिवस असेल, परंतु कामाशी संबंधित धावपळ आणि दगदग कायम असेल. आज कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडून पाठिंबा मिळेल.

    वृश्चिक – आर्थिक स्थिती मजबूत असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतांचे कौतुक केले जाईल. नवीन कामांमध्ये आवड वाढेल. नोकरी किंवा व्यवसायात काही चांगल्या संधी येऊ शकतात, ज्यापैकी काही खूप फायदेशीर ठरतील. मात्र त्याचवेळी आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. आज कुटुंबात शांती आणि आनंद कायम राहील.

    धनु – दिवस अनुकूल असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते, कारण यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. अनावश्यक ताण टाळा. नोकरी करणाऱ्यांना अनेक स्रोतांकडून चांगल्या ऑफर मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करारांना आज अंतिम रूप मिळू शकेल, ज्यामुळे प्रगतीच्या संधी वाढतील.

    मकर – आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. फक्त धीर धरावा लागेल. आज एखाद्या कामामुळे आदर आणि सन्मान मिळू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणाचा तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. नातेसंबंध गोड राहतील.

    कुंभ – आज ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढताना दिसतील. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. गुंतवणुकीचे निर्णय खूप काळजीपूर्वक घ्या. बऱ्याच वर्षांनी एखादा जुना मित्र भेटू शकतो, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जोडीदाराकडून एखादी  भेट मिळू शकते.

    हेही वाचा – हेरोडेस अटिकस येथील संगीतमय रात्र

    मीन – आज जुन्या वादावर समाधानकारक तोडगा निघू शकेल. सर्जनशील कामात तुमची आवड वाढेल. कामाच्या निमित्ताने अनेक लोकांना भेटाल. मात्र आज बोलणे आणि राग नियंत्रित ठेवावा लागेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. नोकरदार जातकांना आणखी चांगल्या ऑफर मिळू शकतात. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.


    दिनविशेष

    अव्वल मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर

    टीम अवांतर

    अव्वल मराठी  व्याकरणकार, ग्रंथकार आणि धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबई येथे झाला. संस्कृत आणि इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी सिद्ध केले. या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही 1881 साली प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी  ही गद्य टीका त्यांनी लिहिली. या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्‌मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे ‘1846 पर्यंतचे आत्मचरित्र’ याचेही एक वेगळेच महत्त्व आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. याशिवाय त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. याशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक, इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका, धर्मविवेचन, पारमहंसिक ब्राह्मधर्म आणि शिशुबोध  अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी यांच्या यमुनापर्यटन  या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या ‘अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्‌स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग’ या ग्रंथाची युरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता होती. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले. मुंबई येथे 17 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांचे निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026 पंचांग आणि भविष्य

     ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती

    July 25, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    By प्राजक्ता काथेJuly 26, 2026

    मेष या आठवड्यात विसराळूपणावर मात करा, सतर्क रहा. नोकरदारांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन जोडधंदा सुरू…

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

     ज्योतिषशास्त्र… शुभ-अशुभ ग्रहांची माहिती

    July 25, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 25 जुलै 2026

    July 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 26 जुलै 2026

    July 26, 2026

    एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    July 25, 2026

    थायरॉइड विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    July 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 373
    • अवांतर 199
    • आरोग्य 133
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 506
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 241
    • मैत्रीण 24
    • ललित 805
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चिकनी चमेली अन् रोहन

    July 26, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 26 जुलै ते 01 ऑगस्ट 2026

    July 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा

    July 26, 2026
    Most Popular

    कान्होपात्रेचे समर्पण

    July 23, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.