Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 नोव्हेंबर 2025
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 27 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 27, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 27 नोव्हेंबर 2025; वार : गुरुवार
    • भारतीय सौर : 06 अग्रहायण शके 1947; तिथि : सप्तमी 24:29; नक्षत्र : धनिष्ठा 26:31
    • योग : ध्रुव 12:08; करण : गरज 12:20
    • सूर्य : वृश्चिक; चंद्र : मकर 14:06 ; सूर्योदय : 06:51; सूर्यास्त : 17:59
    • पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    आजचे राशीभविष्य

    मेष – उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राहील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. भावंडांकडून एखाद्या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारी राहतील. इतरांना आपणाकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा राहतील. मात्र कोणालाही शब्द देण्यापूर्वी आपल्या कामावर परिणाम होत नाही ना, याकडे लक्ष द्या.

    वृषभ – सोपी पद्धत आणि समन्वय यामुळे कामात प्रगती कराल. कुटुंबीयांच्या गरजांना प्राथमिकता द्या. सुसंवाद साधण्याचे प्रयत्न फायदेशीर ठरतील. समाजात तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासामुळे दीर्घकालीन परिणाम मिळतील. कामातील अडथळे दूर कराल. एकंदर आरोग्य चांगले असेल.

    मिथुन – नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. कामात  सुलभतेने प्रगती करता येईल. प्रवासाचे फलदायी परिणाम मिळतील. परस्पर संवादातून काम साध्य करण्याचे प्रयत्न फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांचा मोठा पाठिंबा मिळेल. तथापि, अतिखर्चिक जीवनशैलीमुळे घरात तणावाचा सामना करावा लागेल.

    कर्क – वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. सौदेबाजी करून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणे, हा पर्याय योग्य नाही. नैतिक मर्यादांमध्ये राहा. योग्य वेळेची वाट पाहा. सरकारी कामामुळे फायदा होईल. तुम्हाला भूतकाळातील चुकांबद्दल पश्चात्ताप होईल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. नफ्याचा मार्ग हळूहळू मोकळा होईल.

    सिंह – चांगले उत्पन्न मिळेल. संततीच्या प्रगतीची शक्यता आहे. जोडीदार आणि मुलांकडून पाठिंबा मिळेल. जुन्या सवंगड्याची  भेट होईल. विवेकाने वागा. शत्रूंपासून सावध राहा. आत्मविश्वास वाढेल. इच्छित कामे यशस्वी होतील. प्रवासाची शक्यता आहे. कला आणि नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील.

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    कन्या – आज नशीबाची मोठी साथ मिळणार आहे. कुटुंबाचा पाठिंबा आणि समन्वय यामुळे कामाचा डोंगर हातावेगळा करणे सोपे जाईल. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य विकसित करा. गोड बोलणाऱ्यांपासून मात्र सावध रहा. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो.

    तुळ – आज जोडीदारासोबत किंवा मित्रांसोबत एकत्र काम करणे फायदेशीर ठरेल. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण होतील. जोखीम टाळणे शहाणपणाचे ठरेल. सौदेबाजी करून कामाच्या वाटाघाटी करणे सध्याच्या काळात योग्य नाही. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे उत्तम. वरिष्ठांच्या मर्जीमुळे कामच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील.

    वृश्चिक – नफ्यात अनपेक्षित वाढ निश्चित आहे, परंतु नकारात्मक दृष्टिकोन टाळा. आशा आणि उत्साहामुळे तुमची क्षमता वाढेल. आरोग्य ठीक राहील. समाजात आदर वाढेल. उत्पन्न आणि खर्च समान राहतील. व्यवसायाकडे लक्ष दिल्याने यश मिळेल. आज महत्त्वाच्या व्यक्तींशी भेटीगाठी होतील.

    धनु – आज आर्थिक स्थिती मजबूत राहील. जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहतील. चांगल्या कृतींचे सकारात्मक परिणाम मिळतील. भरपूर कामे होतील. व्यावसायिक समृद्धी शक्य आहे, त्यामुळे आनंद वाढेल. आरोग्य उत्तम राहील. धार्मिक कार्यांमध्ये रस निर्माण होईल.

    मकर – अतिकामाचे वेळापत्रक तुमच्या आराम आणि विश्रांतीवर परिणाम करेल. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. मान्यवरांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल. योग्य लोकांसमोर तुम्ही तुमची कौशल्ये आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवलीत तर, सार्वजनिक प्रतिमा अधिक चांगली बनेल. प्रवासाचे फलदायी परिणाम होतील.

    कुंभ – सावधगिरीने काम करा. शक्य होईल तितकेच काम हाती घ्या. सध्या व्यवसायाशी संबंधित प्रवास पुढे ढकला. उत्पन्न आणि खर्च तेवढाच राहील. तथापि, काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. हितचिंतक मानले जाणारे लोक पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. आज आरोग्याच्या तक्रारी राहतील.

    हेही वाचा – नावात काय आहे?

    मीन – वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा मिळेल. व्यावसायिक प्रवास पुढे ढकलू नका. शैक्षणिक कामे सहज पूर्ण होतील. व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळेल. कष्ट घेऊन केलेल्या कामांची योग्य दखल घेतली जाईल. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ होईल. तथापि, एखादी मोठी  इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.


    दिनविशेष

    ख्यातनाम मराठी कथाकार दि. बा. मोकाशी

    टीम अवांतर

    ख्यातनाम मराठी कथा-कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण म्हणजेच दि. बा. मोकाशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1915 रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे झाला. विविध अनुभूतींतून माणूस शोधण्याचा, व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न हे त्यांच्या कथालेखनाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. रहस्यकथा, पिशाच्चकथा असे कथाप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. याखेरीज, कादंबरी लेखन, प्रवास वर्णने, बालसाहित्य, अनुवादित लेखन अशा क्षेत्रांमध्ये देखील त्यांनी मुशाफिरी केली. ‘लामणदिवा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. यात त्यांची प्रयोगशीलता जाणवते. त्यानंतर आलेल्या कथामोहिनी या कथासंग्रहातील कथांनी खूपच पुढचा टप्पा गाठला आहे, हे लक्षात येते. याशिवाय, आमोद सुनासि आले, वणवा, चापलूस, एक हजार गायी, आदिकथा, माऊली, तू आणि मी  हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. व्यक्तीच्या अंतर्मनाचा वेध घेण्याचे त्यांचे सामर्थ्य गोष्टीची मोहिनी, रहस्यकथेचा एक दिवस यासारख्या कथांमधून दिसून येते. स्थलयात्रा, पुरुषास शंभर गुन्हे माफ, देव चालले, आनंद ओवरी, वात्स्यायन या  कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. पालखी आणि  अठरा लक्ष पाऊले ही त्यांची प्रवासवर्णनपर पुस्तके आहेत. पण त्यांत प्रवासवर्णनापेक्षा समाजजीवनाचा शोध घेण्यावर अधिक भर दिसतो. अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या फॉर व्हूम द बेल टोल्स ह्या प्रसिद्ध कादंबरीचा घणघणतो घंटानाद या नावाने त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. संध्याकाळचे पुणे हे त्यांचे अखेरचे पुस्तक. मोकाशी यांना संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रूपे दिसली, त्यांचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी या पुस्तकात घडविले आहे. 29 जून 1981 रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    By Team AvaantarApril 16, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 एप्रिल 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 26…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य;13 एप्रिल 2026

    April 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 195
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026
    Most Popular

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.