Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, September 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सर्वांनी हिणवल्यावर आराध्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि….
    ललित

    सर्वांनी हिणवल्यावर आराध्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि….

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यJanuary 9, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या प्रेमकहाणी, क्षितिज 9 प्रोजेक्ट हायजॅक, शर्वायला अन्वीचे स्थळ, शर्वायचा नवीन डाव, आराध्याची साशंकता, आराध्य शर्वायला दिवाकरांचा पाठिंबा,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 7

    प्राजक्ता (आराध्याची आई) सासरी आल्यानंतर अगदी घरात मिसळून गेली. कामांची रेलचेल, नणंदेचा हट्ट, मोठ्या वहिनीच्या नाजूक मनाचा समतोल… या साऱ्याचा भार तिच्या खांद्यावर अलगदपणे टाकला गेला. शांताबाई (सासू) तिचं कौतुक करत असल्या तरी, मुलीच्या वाढत्या अस्वस्थतेचा त्यांना अंदाज येत होता. पण मग एक दिवस, मोठ्या भावाने आपला संसार वेगळा केला. मुळातच त्याच्या बायकोला एकत्र कुटुंब नको होतं. भांड्याला भांडं लागत होतंच, हे निमित्त ठरलं.

    दुसरीकडे नणंद, सुमती. तिच्याही मनात ‘आपलं वेगळं घर’ हे स्वप्न होतंच. ती सतत कुरकुर करत होती. “मुलीचं घर असायला हवं… वडिलांकडे तर मी राहणार नाही.”

    शांताबाईंना तिच्या बाळांची तगमग पाहवत नव्हती. पैशांची चणचण होतीच, म्हणून त्यांनी प्राजक्ताकडचे दागिने मागितले, “सध्या दे. परत करू.” प्राजक्ताने काहीही न बोलता दागिने दिले. पण सुमतीने ते दागिने विकले… आणि स्वतःचं घर घेतलं.

    प्राजक्ताच्या अंगावरचं  फक्त मंगळसूत्र, कानातली कुडी राहिली. बाकी सगळं सोनं तिच्याकडे राहिलं नाही. ती मात्र, शांत राहिली. तिच्या अंतर्मन काहीसं दुखावलं होतं… पण अजूनही तिला वाटत होतं, हे सगळं ‘घरासाठी’ आहे.

    याच सुमारास सुशांतच्या (वडील) दुसऱ्या भावाचं, प्रसादचं लग्न ठरलं. तिथं पुन्हा एक नवीन वहिनी घरात आली. पुन्हा एकदा प्राजक्ताची सासरची वसुंधरा हलली. ती घरात रुळली होती, पण आता रोज नवं काहीतरी, नवा ताण, नवा अहंकार… यात ती गुदमरायला लागली.

    लग्नाला तीन वर्षं झाली होती… आणि अजूनही तिच्या पोटात जीव नव्हता. पण तिचं “आई होणं” ही गोष्ट आता केवळ तिची खासगी बाब उरली नव्हती. आता ती घराची चर्चा, कुटुंबाची चिंता आणि समाजाची खिल्ली बनली होती. तिची भावजय, निशाला दिवस गेले आणि प्राजक्ताचं दुःख अधिकच गहिरं झालं. सासरचं अंगण ज्यात तिच्या पावलांनी स्वप्नं पेरली होती, तिथं आता निशाच्या बाळंतपणाच्या तयारीचा गोंधळ सुरू झाला होता. बायकांची चर्चा, नणंदेच्या कौतुकाच्या गोष्टी आणि प्रत्येक वाक्यात लपलेला एक टोकदार टोमणा — हे सारं प्राजक्ताच्या काळजाला रोज जखमा करत होतं.

    निशा, बोलण्यात मधाळ, वागण्यात शिताफी — सगळ्यांवर गारूड करत होती. तिचा नवरा तिच्या इशाऱ्यावर चालणारा… नणंद तर तिची ‘ताई’ झालेली. आणि प्राजक्ताचं? तिचं अस्तित्व जणू घरात केवळ कामासाठी होतं. डोहाळ जेवणाच्या दिवशी तर कहरच झाला. आरास सजली होती, घर बायकांनी भरलं होतं, पण प्राजक्ताकडे पाहात एक बाई पुटपुटली, “वांझोटी आहे ही… तिच्याकडून ओटी भरू नकोस!”

    …आणि त्या एका वाक्यानं प्राजक्ता आतून तुटून गेली. डोळ्यातून पाणी आलं, पण तिनं पुसलं नाही. तिला वाटलं, मी इतकं काय पाप केलं? किती नवस, किती डॉक्टर, किती अंगारे धुपारे केले… पण काहीच झालं नाही.

    शेवटी सुशांतचं मनही डळमळलं. एक मित्र त्याला म्हणाला, “आमच्या गावी विश्वेश्वराचं एक प्राचीन मंदिर आहे. नवस केल्यावर तिथं पाळणा हललेले मी पाहिलेत.”

    हेही वाचा – आराध्या या जंगलात का आली होती?

    शेवटचा प्रयत्न म्हणून सुशांत आणि प्राजक्ता त्या गावात गेले. त्या लहानशा पण पवित्र वाटणाऱ्या देवळात, दोघांनी दोन्ही हात जोडले… “हे विश्वेश्वरा, आम्हाला मूल झालं, तर त्या बाळाच्या वजनाच्या इतकी घंटा मी तुझ्या देवळात बांधीन.” त्या संकल्पाच्या क्षणी, प्राजक्ताच्या डोळ्यात पाण्याऐवजी आशेचा किरण होता… शेवटी तिनं देवासमोर हात जोडले…

    विश्वेश्वराच्या देवळात मागितलेला नवस खरा ठरला! काही दिवसातच प्राजक्ताच्या आयुष्यात नवीन जीवाची चाहूल लागली.

    “प्राजक्ता आई होणार!” हे शब्द तिच्या कानात वाऱ्यासारखे घुमले आणि एक क्षणात तिचं आयुष्य उजळून गेलं… आजवर जिच्यावर वांझोटीचा शिक्का लावला होता, तिच्यासाठी आता लोक डोहाळे पुरवायला घरी येऊ लागले. ओळखीपाळखीच्या बायका खास तिच्यासाठी  पदार्थ,  वेगवेगळ्या फळांचे ताट घेऊन यायच्या. त्या त्या क्षणाला प्राजक्ताच्या डोळ्यात नकळत पाणी साठायचं… हे सगळं माझ्यासाठी?

    तिच्या डोहाळ जेवणाला फार मोठा थाट नव्हता. नणंदेला एक शब्दही बोलायचा नव्हता, ती फक्त भावजय म्हणून हसत उभी होती. सासूबाई काही वेळा थोड्या काळजीने तिला हात लावत होत्या, तेवढाच आधार होता.

    तो क्षण आला… प्राजक्ताचं ऑपरेशन झालं. बाळाच्या पहिल्या रडण्याचा आवाज आला, आणि त्या रडण्याने ती सगळं विसरली… दुःख, टोमणे, अंगारे धुपारे, नवस, अपमान…

    नर्सनं बाळ दाखवलं. ती मुलगी होती… पण तिला बघताच प्राजक्ताच्या मनात काहीसं हललं… त्या नवजात बाळाचा रंग, हलकासा राखाडी! …आणि डोकं इतर शरीराच्या मानाने किंचित मोठं. एक आई म्हणून तिच्या हृदयात जो पहिलाच आनंद उसळला होता, त्यावर शंकेचा पडदा पसरला. प्राजक्ताच्या डोळ्यांत एक अनाम भीती भरली… ‘हे असं का? सगळं ठीक आहे ना?’

    सगळे सावरत होते, पण तिच्या मनात एक विचित्र ओझं घर करत होतं.

    प्राजक्ताच्या हातात ती लहानशी मुलगी आली आणि एक क्षणासाठी तिचं काळीज थांबलं. नव्या आयुष्याचा तो सुगंध, त्या पंखासारख्या बोटांनी तिला स्पर्श करणारी ती गोजिरी जाणीव… पण त्या राखाडी वर्णावरून आणि डोक्याच्या आकारावरून मन कातरणारी भीतीही पसरली… “ही… ही माझीच मुलगी आहे?” प्राजक्ताने स्वतःला विचारलं.

    ती अजूनही तंद्रीत होती. बाहेर सगळे “अभिनंदन, मुलगी झाली!” असं म्हणत होते, पण तिच्या मनात एक वादळ उठलं होतं… तिच्या मनातलं शांत आकाश ढगांनी भरून आलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं, “बाळ सुदृढ आहे, काळजीचं काही नाही.” पण समाजाचं, घरच्यांचं आणि स्वतःच्या मनाचं – या तिन्ही आघाड्यांवर प्राजक्ताचं मन तुटायला लागलं.

    ती बाळाला घट्ट कवेत घेते… “तू वेगळी आहेस, पण तू माझीच आहेस. आता तूच माझं सर्वस्व आहेस!”

    त्या क्षणी तिने ठरवलं – ती आराध्याला इतकं प्रेम देईल… असं घडवेल की, कुठल्याही सावलीत तिचं तेज लपणार नाही.

    आराध्याच्या मनात तो प्रत्येक क्षण खोलवर कोरलेला होता — जणू तिच्या अस्तित्वावर कायमचं व्रण उमटवून गेला होता. ती म्हणत होती, “मी राखाडी रंगाची होते… हे ऐकूनसुद्धा कोणी नॉर्मल रिअ‍ॅक्ट केलं असतं का? मी जन्माला आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांनी मला वेगळं समजायला सुरुवात केली होती. कुणी ‘चुकून आली’ असं म्हटलं, कुणी ‘कसली विघटित रचना’ असं… आणि मग सुरू झाला माझा प्रवास – एकटेपणाचा, तिरस्काराचा, आणि एका वेगळ्या अस्तित्वाचा.”

    लहानपणीच आराध्या वेगळी ठरली होती – केवळ रंगासाठी. चुलत बहिणींची गोरी त्वचा, त्यांचं उंची राहणीमान  ही तिच्याविरोधातली तुलना ठरली.

    “आई-बाबा आणि आजी यांनी मला कधी दूर केलं नाही, हे खरंय. पण त्यांचं अबोल असणं, त्यांच्या डोळ्यांतली असहाय्यता, ती अपमान गिळण्याची सवय… हे सगळं मला आतून पोखरत होतं.”

    मोठी काकी माझ्यावरचा राग, माझी त्वचा आणि अस्तित्वावर काढायची… आईला तर सततच कामावरून बोलणं, घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी तिची अवस्था होती. पण त्याहून अधिक वेदना मला देणारी होती, ती आईची शांतता. ती विरोध करत नव्हती. तिने हे स्वीकारलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा ताण, तिचं आतल्या आत रडणं… हे मला आतून तोडत होतं.

    “माझं लग्न होईल का?” या प्रश्नाने आईचं मन सतत बेचैन असायचं.

    “कोण स्वीकारेल हिला?” हे शब्द आराध्याने घरात अनेकदा ऐकले होते — कधी थेट, कधी तिला पुसटसे भिडणारे.

    शेवटी, तिला वाटलं, “मी नाही राहिले, तर कदाचित आईचं टेन्शन संपेल. लोक काही दिवस बोलतील, पण विसरून जातील. पण माझ्या अस्तित्वाने जर तिचं दुःख वाढत असेल, तर मी निघून जाणंच योग्य… या निर्णयामागे कुठलाही वाईटपणा नव्हता. फक्त एक हळव्या मनाची, वेगळेपणाच्या बोचेतून उगम पावलेली मूक क्रांती होती.”

    हेही वाचा – आराध्याने सांगितली, आपल्या आईवडिलांची कहाणी

    आराध्याच्या या वेदनांनी शिवा हादरला होता. ही मुलगी बरीच मोठी झाली होती — समाजाच्या घाणेरड्या नजरेने. शिवाच्या मनात आराध्याबद्दलचा आदर अनोख्या पातळीवर पोहोचला होता. जी मुलगी समोर उभी होती, तिच्या डोळ्यांतून झरणाऱ्या वेदना, तिच्या शांत शब्दांमधली तगमग… हे सगळं त्या दिवशी त्याला खूप काही शिकवून गेलं.

    त्याने सावधपणे तिच्या शेजारी बसत विचारलं, “पण तू निघालीस… आणि एकटीने इतका मोठा निर्णय घेतलास, त्यावेळी घाबरली नाहीस?”

    आराध्याने थोडसं हसून मान हलवली.

    “खरं सांगायचं तर, खूप घाबरले होते. पण मग मी एक गोष्ट ठरवली –जगायचं, पण माझ्या अटींवर. मी माणसं परत शोधेन, पण जी मला माझ्या रंगासकट स्वीकारतील. मी घर बनवेन, पण जिथे अस्तित्व लपवावं लागणार नाही.”

    शिवा तिच्या या विचारांमध्ये गढून गेला होता. एक मन आराध्याला परत तिच्या आई-वडिलांकडे नेण्याचं म्हणत होतं… तर दुसऱ्या मनात, “तिने जे गमावलंय, ते परत देणं आपल्या हातात नाही… पण जे ती शोधतेय, ते द्यायला मी पुरेसा आहे का?” हा विचार होता.

    ते दोघं त्या रात्री अगदी शांत बसून राहिले. गाभ्यात चंद्रप्रकाश, झाडांची सळसळ आणि त्यांच्यामधल्या अव्यक्त पण गहिऱ्या संवादाने भरलेली ती रात्र…

    शिवाला हेही कळून चुकलं होतं की, आराध्या ही कोणत्याही सहानुभूतीची भिकारी नव्हती. ती लढलेली होती, आणि अजूनही लढतेय — एकटी. पण कदाचित आता एकटी नसेल!

    “आराध्या,” त्याने हलक्याच आवाजात म्हटलं, “आपण उद्या जिथे त्या तळ्यावर बसतो, तिथे तुला काही दाखवायचंय…”

    तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं.

    “काय?”

    तो फक्त हसला, “तुझ्यासारख्या एखाद्या लढवय्याला काय दिलं जाऊ शकतं, ते सांगणं अवघड आहे… पण प्रयत्न करतो.”

    …आता ही कहाणी एक नवीन दिशा घेणार होती. नातं, जे दया किंवा सवयीवर नव्हे, तर समजुतीवर उभं राहात होतं.

    काय असेल शिवाच्या मनात काय सांगेल तो?

    क्रमशः

    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    अविघ्न

    September 14, 2026 ललित

    गणपती बाप्पाच्या मनातलं…

    September 14, 2026 ललित

    माझी गौरी माय

    September 13, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अविघ्न

    By अतुला प्रणव मेहेंदळेSeptember 14, 2026

    आज नमिताचं कशात लक्षच लागत नव्हतं. शिवाय, हातही अगदी यंत्रवत चालत होते. करणार काय? तीन-चार…

    गणपती बाप्पाच्या मनातलं…

    September 14, 2026

    माझी गौरी माय

    September 13, 2026

    गणेशा मला तुझा छंद…

    September 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – आरोग्याच्या समस्या, मैत्रीची गुणवत्ता

    September 14, 2026

    गणपती बाप्पाच्या मनातलं…

    September 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : विदळ बहु चोखा, मीनलिया वाला एका

    September 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 433
    • अवांतर 208
    • आरोग्य 146
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 582
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 919
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 सप्टेंबर 2026

    September 15, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    अविघ्न

    September 14, 2026
    Most Popular

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.