Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, June 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!
    अवांतर

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 4, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, डॉक्टर लिऑन रोशे, रोशे आणि शापित सुरी, रोशेची शापित स्कॅल्पेल, रोशेचे शापित स्कॅल्पेल, शल्यविशारद लिऑन रोशे, पॅरिसचे लिऑन रोशे, शल्यविशारद डॉक्टर रोशे,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    ओपीडीत आलेले एक काका तक्रारी सांगितल्यानंतर माझ्या बाजूच्या एक्झामिनेशन टेबलवर पडायचं सोडून पलीकडच्या टेबलकडं गेले, त्यामुळं मला उठून पलीकडं जावं लागलं…

    “काय काका तिकडं होती की, रिकामी जागा इकडं का आलात?” मी सहज त्यांना विचारलं.

    “नको.. छ्याऽऽ अजिबात नको!” असं म्हणत काकांनी आधी तोंडावर बोट ठेवत नंतर दोन्ही कानाच्या पाळ्या पकडल्या…

    “का ओ?” मी कुतूहलानं त्यांना विचारलं.

    “मागं एकदा तिकडं चेक केलं, तुम्ही ही एवढी लंबीचौडी तपासणीची यादी लिहून दिली. नंतर पुन्हा एकदा आलो होतो तेव्हा सलाइन लावावं लागलं होतं… इथं बरंय. इथं तपासलं की, दोन डोसमध्येच बरं वाटतंय…” काका उत्तरले आणि त्यांचं अजबगजब तर्कट ऐकून मला मात्र हसू आवरलं नाही. नंतर त्यांना तपासत लक्षणजन्य औषधं देऊन रवाना केलं. योगायोग असतात, पण कसले कसले सुपरस्टिशन्स असतात एकेकाचे! पण… पण कधीकधी योगायोग असतातच असं नव्हे!

    हेही वाचा – कर्तव्य, करुणा आणि बलिदानाचं प्रतीक… डॉ. कार्लो उर्बानी

    मला डॉक्टर रोशेंची ‘शापित सुरी’ आठवली…

    साल असावं 1872चं. पॅरिस शहरातल्या सुप्रसिद्ध शल्यविशारदांपैकी एक डॉक्टर लिऑन रोशे होते. त्यांच्या विलक्षण शल्यकौशल्यासाठी ते नावाजलेले होते; स्थिर हात, शांत मन, तीक्ष्ण बुद्धिमत्त यांचा अलौकिक संगम त्यांच्या ठायी होता… आणि हो त्यांच्याकडं एक खास वस्तू देखील होती, एक लांब, पातळ, नाजूक पण अत्यंत धारदार असा त्यांचा स्कॅल्पेल! चमकदार स्टीलची… अनुभवी जर्मन कारागीरानं बनवलेली… आणि हातात घेताच बर्फासारखी थंड…

    रोशे तिला ‘माझं भाग्य’ म्हणत… पण काही महिन्यांतच काही अनपेक्षित घटनाक्रम झाले, ज्यामुळं रोशेंसह सारेच चक्रावून गेले. त्या दिवशी रोशे एका साधी ॲपेंडिक्सची शस्रक्रिया करत होते. अशा शस्त्रक्रिया त्यांच्यासाठी फार नियमित आणि सहजसोप्या होत्या. नेहमीप्रमाणं यथोचित तयारी झाली, मात्र, शरीराला चिरा देताच इतका जबरदस्त रक्तस्राव झाला की, तिथं उपस्थित इतर डॉक्टरही थबकले…!

    रुग्णाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. रोशे हादरले… अशाप्रकारे त्यांच्या हातून कुणीच गेलं नव्हतं. या धक्क्यातून सावरले न सावरले तोच काही दिवसांनी आणखी एका रुग्णाची शस्त्रक्रिया पार पडली. अतिशय व्यवस्थित… अन् या वेळी रक्तस्त्राव वगैरेही झाला नव्हता, पण शस्त्रक्रियेपश्चात रुग्णाला भीषण संसर्ग झाला. कुठलीच औषधं दाद देत नव्हती, ताप वाढत गेला आणि सरतेशेवटी रुग्ण दगावला.

    सगळीकडं कुजबुज सुरू झाली… “सरांचं काहीतरी चुकतंय…”

    “जणू सरांच्या स्कॅल्पेलला रक्ताची चटकच लागलीय…”

    कुजबूज थांबते न थांबते, तोच यावेळी एका पेशंटच्या गुडघ्याची लहानशी शस्त्रक्रिया ठरली. रोशे नेहमीप्रमाणं शांत होते, पण स्कॅल्पेल हातात घेताच आज त्यांचा हात आज आयुष्यात पहिल्यांदाच किंचित थरथरला… शरीराला चिरा नीट बसेना, जखमेच्या कडा तुटक दिसू लागल्या. रुग्णाची अवस्था खालावत गेली अन् त्या रात्री त्याचाही अंत झाला!

    आता संपूर्ण परिसरात चर्चांना उधाण आलं… ही सुरी शापित आहे! ती जिच्या अंगावर लागते त्याचं मरण ठरलेलं… लोकं काहीबाही बोलू लागले!

    इकडं रोशे स्वतः हादरले होते. अपराधगंडानं त्यांना जणू विळखा घातला. त्यांची यात काहीही चूक नव्हती, पण काहीतरी नक्कीच गंडलं होतं… राग, अपराधीपणा आणि भीतीच्या या सगळ्या कोलाहलात रोशेनं स्कॅल्पेल स्वतःच्या प्रयोगशाळेत तपासायला घेतलं… धार स्वच्छ, स्टील अखंड… कोणताही डाग नाही… कुठल्याही ठिकाणी गंज नाही… मग चुकतंय कुठं?

    हेही वाचा – विषाची परीक्षा…

    शेवटी त्यांनी ब्लेडचा अतिसूक्ष्म स्क्रॅप घेऊन रासायनिक चाचणी केली आणि त्यांचं हृदय अक्षरशः गोठलं! स्टीलमध्ये एक अतिशय सूक्ष्म आर्सेनिक मिश्रधातूचा थर होता… डोळ्यांना न दिसणारा, पण ऊती चिरताना पेशींमध्ये मिसळणारा… तो शरीरात गेल्यावर अकस्मात रक्तस्राव, अनियंत्रित संसर्ग आणि अवयव निकामी होणं अशी लक्षणं निर्माण होत असे.

    चौकशीअंती कळलं, ज्या जर्मन कारागीरानं ही सुरी बनवली, त्यानं स्टीलला विशिष्ट चमक आणण्यासाठी जुनी आणि अत्यंत धोकादायक अशी झिंक अन् आर्सेनिक असा मिश्रधातू वापरला होता. या पठ्ठ्याला सुतराम कल्पना नव्हती की, वैद्यकीय उपकरणासाठी हा धातू किती घातक आहे ते! विज्ञान सरळ सांगत होतं की, हा स्कॅल्पेल ‘विषारी’ आहे; पण त्या काळातील लोकांसाठी हे काही कमी नव्हतं… ही सुरी मृत्यूचा हुकूम देणारी दुष्ट वस्तू बनली होती!

    रोशेनं ती स्कॅल्पेल ताबडतोब आगीच्या ताब्यात देत वितळवून नष्ट केली, पण नष्ट होण्याआधीही एक अजब घटना घडली… धातू वितळताना त्यातून निळसर धूर उठला आणि बघ्यांना किंचित चक्कर आली… शेवटी ती सुरी वितळून गेली आणि त्याच क्षणापासून रोशेच्या शस्त्रक्रियांची अपयशी मालिका पूर्णपणे थांबली…

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    June 2, 2026 अवांतर

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026 अवांतर

    पालक शाळा…. एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम

    May 22, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज

    By Team AvaantarJune 2, 2026

    सुरेखा मोंडकर ‘लहान मुलं म्हणजे ओल्या मातीचा गोळा; आकार द्यावा तसा देता येतो,’ एका प्रतिभावान…

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    पालक शाळा…. एक स्तुत्य आणि आवश्यक उपक्रम

    May 22, 2026

    शहाण्यांनाही शहाणं करून सोडणारा ‘आनंद’यात्री

    May 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026

    Dnyaneshwari : जी विश्वरूपाचां सागरीं, होतों तरंग मवित वांवेवरी

    June 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 जून 2026

    June 3, 2026

    Bookshelf : तुंबाडचे खोत… काळ कोणताही असो माणूस तोच!

    June 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 317
    • अवांतर 189
    • आरोग्य 116
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 441
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 218
    • मैत्रीण 20
    • ललित 673
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मृत्युपत्र… वाटणी करणारे नव्हे, जोडणी करणारे!

    June 3, 2026

    त्यानं विचारलं, ‘डॉक्टर, काही सीरियस आजार तर नाही ना?’

    June 3, 2026

    Recipe : स्वादिष्ट पंचरस आमटी अन् खमंग दही बुत्ती!

    June 3, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.