Tuesday, March 3, 2026

banner 468x60

Homeफूड काॅर्नरKitchen Tips : भज्यांची भाजी अन् सँडविच टोस्टरमधली भरली कारली…

Kitchen Tips : भज्यांची भाजी अन् सँडविच टोस्टरमधली भरली कारली…

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. जून भाज्यांचा वापर, भज्यांची भाजी आणि भरली कारली बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा.

  • बाजारातून आणलेल्या भाज्या जून निघाल्या तर आपण त्या टाकून देतो. पण त्याचा उपयोग असा करा – नवलकोल, मुळा, गाजर जून निघाल्यास जाड किसणीवर किसा. गवार, दुधी, फरसबी, वांगी वगैरे भाज्या बोटाएवढ्या उभ्या पातळ चिरा, (तुकडे करा). जून तोंडली, भेंडी यांचे गोल पातळ काप करा. आले, मिरच्या, मीठ बारीक वाटा, त्यावर लिंबू पिळून वरील भाज्यांना चोळा आणि कडक उन्हात वाळवा. आयत्या वेळी भाजी नसल्यास तव्यावर तेलात मंद आचेवर तळा. छान तोंडीलावणे होते. जेवणाची लज्जत वाढते.
  • पालेभाज्या हिरव्या राहण्यासाठी त्या शिजायला टाकण्यापूर्वी त्यात एक चिमूटभर मीठ टाकावे.

हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळ्याचे रायते, कोफ्ता करी, आलू-मटर करताना…

  • भाजी शिजल्यावर अर्धा ते एक चमचा शुद्ध खोबरेल तेल घालावे. खोबऱ्याची चव भाजीला वेगळीच लज्जत आणते. ओले खोबरे नसले तरी तेलाने भाजीला चव येते. काही भाज्यांना विशेषतः घेवडावर्गीय आणि भोपळा यांनाच फोडणीत ओवा (अज्वान) घालावा. मोहरी नको. वेगळी चव येते. या भाज्या दुधात शिजविल्यास न्यारीच खुमारी प्राप्त होते.
  • लग्नप्रसंगी खूप प्रमाणात भजी उरतात. तेव्हा ही भजी फोडणी दिलेल्या उकळत्या पाण्यात टाकावी आणि त्यामध्ये थोडी सांबार पावडर टाकावी. आवडत असल्यास यामध्ये चिंचगूळ टाकावा. वेगळीच चवदार भाजी होते.
  • सीझनमध्ये स्वस्त झालेली कोथिंबीर निवडून, धुऊन चिरावी. ती चिरलेली कोथिंबीर ताटात पसरून उन्हात वाळवावी. एका दिवसात कुरकुरीत झालेली ही कोथिंबीरीची पावडर घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास नंतर तीन-चार महिन्यांत आयत्या वेळी केव्हाही भाजी-आमटीत वापरल्यास त्यास चांगली चव येते.
  • बटाट्याच्या रश्शात पुदिना घातला, तर छान चव येते.

हेही वाचा – Kitchen Tips : फ्रोजन मटार, टोमॅटोचे सार, वांग्याचे काप बनविताना हे करू पाहा

  • भरली कारली आपण तव्यावर अगर कढईत केली, तर आतला मसाला सांडतो आणि करपतो. त्याऐवजी कारली भरून सॅण्डविच टोस्टरमध्ये ठेवल्यास अधिक चविष्ट होतात. मसाला सांडत अगर करपत नाही आणि तेलही कमी लागते.
  • उकडलेल्या बीटाचे पाणी आपण सार, सूप इत्यादींसाठी वापरतोच, पण यात लिंबू, पादेलोण, जिऱ्याची पूड आणि थोडे मीठ घालून पुरेसे पाणी मिसळावे. प्यायला देताना बर्फाचा तुकडा टाकावा. हे रंगीत, स्वादिष्ट पेय दिसायला तर आकर्षक दिसतेच पण पौष्टिकही असते.

तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

(‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!