Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आरू मुसमुसत उभी होती अन् शिव…
    ललित

    आरू मुसमुसत उभी होती अन् शिव…

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 1, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, लग्नाची खरेदी, आरूचे रडणे, रामचे आरूला समजावणे, सिया आरूची मैत्री, आरू आणि सिया,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शोभा भडके

    भाग – 16

    आरू आणि शिव एकमेकांच्या इतके जवळ होते… शिव अजूनही तिच्यावर झुकून तोंडावर हात ठेऊन, तिच्या डोळ्यांत हरवला होता. त्याला भानच राहिलं नव्हतं… आरुची अवस्था तर तिच्या समजण्यापलीकडे होती… त्याचा स्पर्श तिला रोमांचित करत होता… तिचं हृदय जोरजोरात धडधडत होत… जे होतंय ते सहन न होऊन, ती आता रडायच्या तयारीत होती. तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यांत पाणी जमा झालं होतं… पण शिवला याचं भानच नव्हतं… तिच्या त्या गहिऱ्या डोळ्यांत हरवला होता तो!

    त्याची ती रोखलेली नजर आणि त्याचा होणारा स्पर्श सहन न होऊन तिने एक दीर्घ श्वास घेत, डोळे मिटून, दोन्ही हात त्याच्या छातीवर दाबत, जोरात त्याला मागे लोटलं आणि गडबडून गाडीचं दार उघडून बाहेर आली.

    तिच्या असं अचानक मागे लोटल्याने शिव त्याच्या साइडच्या दरवाजाला येऊन टेकला आणि तो भानावर आला. त्याने खडबडून जागा झाल्यासारखे समोर बघितलं तर ती गाडीत नव्हती, दरवाजा उघडा होता… त्याने खोल श्वास घेत डोळे मिटून घेत अस्वस्थपणे तोंडावरून हात फिरवला… ‘शीट! काय केलं मी! ती गावातली एक साधी सरळ मुलगी आहे…” तो स्वतःशीच पुटपुटत गाडीतून बाहेर आला.

    ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली जाऊन उभी राहीली होती आणि रडत होती… त्याने तिच्याकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेत तिच्या दिशेने जाऊ लागला.

    इकडे सुधा आणि सिया आरूच्या आत्याच्या घरी आल्या होत्या आकाश सोबत होताच. घर जरा गल्लीत आत असल्यामुळे गाडी दूर रस्त्यालाच पार्क करावी लागली होती. सगळे खाली उतरले…

    “अं… इथून या गल्लीतून…” भावना पुढे चालत त्या तिघांना म्हणाली.

    तिच्या मागे हे तिघे चालू लागले. त्या गल्लीतून पुढे गेल्यावर मोकळं मैदान लागलं. त्याच्या समोरच शेजारी शेजारी घरे होती. त्यातलंच एक घर आरूच्या आत्याचं होतं. लग्नाची तयारी बाहेरूनच दिसत होती. कारण, घर लायटिंग आणि फुलांच्या माळांनी सजवल होतं. दारात मंडप घातला होता. लग्न चार दिवसांवर आलं होतं, पाहुण्यांची लगबग सुरू झाली होती. लग्नघर असल्याचं जाणवत होतं. सुधा, सिया आणि आकाशसाठी खरंतर हे सगळं नवीन होतं. मोठ्या लोकांचं सगळंच निराळ असतं. सियाच्या पाहिल्या लग्नात राजेशाही थाट होता. सगळं कसं ‘रीच अँड क्लासी’ होतं. मोजक्या लोकांत, पण थाटात लग्न लागलं होतं. राजकारणी, पाहुणे तसेच बिझनेस क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते…

    हेही वाचा – आरूबरोबर दागिन्यांची खरेदी करताना सियाचं लक्ष दरवाजाकडे होते…

    पण यावेळी असं काहीच नव्हतं! घरी तर कसलीच तयारी नव्हती. रामने सगळं मी करणार, तुमचं मोठेपण आणि पैसा दोन्ही गोष्टी बाजूला ठेवायची अटच घातली होती आणि तो त्याच्या परीने सगळं थाटातच करणार होता… त्याचीच तयारी तो करत होता.

    “हे उचला रे, हे सामान हॉलवर घेऊन जायचंय…” दारातच राम एका मुलाला तिथेच ठेवलेलं सामान गाडीत ठेवायला सांगत होता. उद्याच मेहंदी, हळद आणि परवा लग्न सगळं हॉलवर होणार होतं. त्यामुळे सगळं सामान आजच हॉलवर पोहचवायचं होतं.

    “दादा…” भावनाने आवाज दिला तसं रामने तिच्याकडे पाहिलं… तोच त्याची नजर सियावर गेली… बरोबर सुधा आणि आकाशही होते. पण त्यांच्यासोबत आरू दिसली नाही म्हणून, त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.

    सियावरची नजर हटवत समोर येऊन तो सुधा यांच्या पाया पाडला.

    ” नमस्कार, तुम्ही इथे… म्हणजे ते असं…” राम बोलत होता.

    “आरं रामा, ते आरू कधी येणार?” रामला विचारत कलावती बाहेर आल्या…

    “नमस्कार… ताई!” सुधा यांनी हात जोडत नमस्कार केला.

    “अगं बाई, तुम्ही! आवं, अशा दारात का उभ्या? आत या… येगं बाय तू पण…” आधी कलावती गोंधळल्या अन् नंतर समोर विहीणबाई असल्याचं ध्यानात आल्यावर त्यांनी सावरून घेतलं… “हो” म्हणत सुधा त्यांच्या मागे आत जाताना सिया आणि आकाशलाही चालण्याचा इशारा केला.

    सिया अवघडून गेली होती. एक तर रामचा राग येत होता. कारण तो दुर्लक्ष करत होता तिच्याकडे आणि आता सासरच्या लोकांसमोर जायचं तिच्यावर दडपण आलं होतं… पहिल्या लग्नाचा अनुभव तिच्या डोळ्यासामोर यायचा अन् त्यामुळे दडपण वाढायचं…

    “भावना…” रामने पुढे जाणाऱ्या भावनाला आवाज देत थांबवलं बाहेरच…

    “हां दादा?” भावना.

    “आरू कुठंय?” त्याने जरा दरडावून विचारलं.

    “दादा ते… ती जिजूंसोबत कपड्यांची खरेदी करायला गेलीय… तिच्या सासूबाई म्हणाल्या म्हणून,” भावनाने एका दमात सांगितलं.

    त्याला आधी राग आला आणि नंतर काळजी पण वाटली. म्हणून त्याने खिशातून मोबाइल काढून शिवला फोन लावला. पण उचलला गेला नाही!

    “तू जा आत…” तो भावनाला म्हणाला.

    “दादा तू पण चल ना आत, वहिनी आलीय रे… तुला माहितीय, खूप उदास होती ती…” भावना सियाचा उदास चेहरा आठवत म्हणाली.

    ते ऐकून रामला पण वाईट वाटलं. पण त्याने ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. शिव आणि त्याच्या वडिलांवरचा राग, तर दुसरीकडे सियावर असलेल प्रेम तो दडवत होता.

    “जा तू आत… येतो मी…” तो सुस्कारा सोडत म्हणाला आणि तिथलं सामान उचलून गाडीत ठेवू लागला.

    “सॉरी…” अचानक जवळून आवाज आला आणि तिने दचकून मागे वळून पाहिलं आणि त्यातच तिचा तोल गेला.

    “आता  मी पडणार,” या भीतीने तिने डोळे मिटून घेतले, पण ती पडली नाही… पण तिला कमरेवर हातांचा स्पर्श जाणवला आणि तिला तिच्या शरीरात करंट लागल्यासारखं वाटलं… भीतीने तिच्या शरीराची थरथर वाढली…

    शिवने ती पडेल म्हणून तिला कमरेत दोन्ही हात घालून जवळ ओढलं होतं…. तिने डोळे मिटून घेतले होते आणि तो तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती.

    आपण पडलो नाही.. हे लक्षात आल्यावर आरूने हळूच डोळे उघडले आणि त्याचा चेहरा एकदम जवळ दिसला! तिच्याकडे पाहणारा तो… अंग थरथत करत होत तिचं… पोटात काहीतरी खवळल्यासारखं वाटत होतं तिला… तिला काहीच समजत नव्हतं, नेमकं काय होतंय ते! हवं हवंस वाटणारं… पण त्याच वेळी नको असलेलं… असं काही तरी… गोंधळून, घाबरून गेली बिचारी.

    तो मात्र तिच्या चेहऱ्याच निरीक्षण करण्यात गुंतला होता. हळूहळू तो तिच्याजवळ झुकत चालला होता. बिचारी आरू घाबरून त्याच्याकडे पाहात होती. तो तिच्या एकदम जवळ होता… आता आरू खूप घाबरली आणि त्याच्या छातीवर दोन्ही हात ठेऊन त्याला जोरात धक्का दिला अन् बाजूला केलं…

    “प्लीज, लांब रहा माझ्यापासून… मला कसंतरी होतंय…” ती रडतच म्हणाली.

    तिच्या धक्क्याने तो मागे लोटला गेला आणि भानावर आला. त्याने तिच्याकडे पाहिले तर, ती गालावर आलेलं डोळ्यातलं पाणी पुसत होती…

    त्याने स्वतःच्याच मूर्खपणाबद्दल डोक्यावर हात मारून घेतला. तिच्याकडे पाहून आता त्याला स्वतःचाच राग येऊ लागला…

    तिचं अजूनही मुसमुसत रडणं सुरूच होतं. त्याने तिच्याकडे पाहात डोळे मिटून दीर्घ श्वास घेत, तिला आवाज दिला आणि पुन्हा तिच्याजवळ येऊ लागला…

    “ओ… ओ… तुम्हाला सांगितलं ना जवळ येऊ नका… मला कसंतरी होतंय…” ती रडकुंडीला येत पुन्हा त्याच्यापासून लांब होत म्हणाली.

    “ओके… ओके… नाही येत. पण तू रडायचं थांबव… आपण जाऊया…” तो तिला म्हणाला.  सोबत तिच्या भोळेपणाचं हसायलाही येत होतं.  

    त्याच्या जवळ येण्याने तिच्या अंगावर आलेला शहारा त्याला जाणवला होता… तिच्या हृदयाची वाढलेली  धडधड त्याने ऐकली होती… त्याच्याजवळ येण्याने तिच्या मनात निर्माण झालेल्या या अनोळखी हव्या हव्याशा वाटणाऱ्या, त्याचवेळी अचानक घडललेल्या घटनांचा तिला होणारा त्रास त्याला समजला होता.

    हेही वाचा – गाडी थांबवून शिवने आरूचे तोंड दाबून धरलं…

    ती मात्र हे सगळं कळायला, तेवढी समजदार नव्हती. नवीनच उमलत असलेलं कोवळं फूल होती ती आणि आता त्या फुलला हळूवारपण उमलू द्यायची जबाबदारी आपली आहे, याची जाणीव त्याला झाली होती.

    भलेही बहिणीसाठी त्याने तिच्याशी लग्न करायचा घाट घातला होता. पण आता जाणवत होतं की, ही तीच आहे, जिच्या येण्याने त्याच्या रागीट आणि अस्थिर मनाला शांतता मिळत होती. तिचा नाजूक आवाज कितीही तो अस्वस्थ असताना हळुवार फुंकर घालत होता…

    एरवी त्याला जर कोणी असा धक्का दिला असता तर, त्याचे हात जागेवर राहिले नसते. पण ही जी समोर होती ती आरू होती. त्याची आरू… शिवची आराधना! हो, त्याच्या मनाने हे कबूल केलं होतं की, तो प्रेमात पडला आहे त्याच्या आरुच्या…!

    त्याने पुढे होऊन गाडीचा पुढचा दरवाजा उघडला आणि तिला बसायचा इशारा केला… ती घाबरत रडत गाडीजवळ आली आणि त्याच्याकडे न बघताच मागचा दरवाजा उघडून आत जाऊन बसली… त्याने सुस्कारा सोडत दार बंद केलं आणि पलीकडे जाऊन ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. ती दिसेल असा आरसा ॲडजस्ट केला आणि गाडी सुरू केली.

    अधून मधून तो आरशातून तिच्याकडे कटाक्ष टाकत होता… तिची अस्वस्थपणे चुळबूळ सुरू होती… हाताच्या बोटात ओढणीचं टोक गुंडाळत बाहेर बघत कसला तरी विचार करत होती… क्रमशः

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    By रेवती निलेश पांडेApril 15, 2026

    दवाखान्यातून बाहेर पडताना कवीशने एक दीर्घ श्वास घेतला आणि जड पावलांनी तो तिथून निघाला. हातातल्या…

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Dnyaneshwari : एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं…

    April 15, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 15 एप्रिल 2026

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 268
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.