Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, May 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आरूबरोबर दागिन्यांची खरेदी करताना सियाचं लक्ष दरवाजाकडे होते…
    ललित

    आरूबरोबर दागिन्यांची खरेदी करताना सियाचं लक्ष दरवाजाकडे होते…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 15, 2026No Comments8 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रेमकथा, शिव आराधना, राम आराधना, राम सिया, शिव सिया, राम सिया विवाह, शिव आराधना विवाह, शिव आरू विवाह, लग्नाची खरेदी, आरूचे रडणे, रामचे आरूला समजावणे, सिया आरूची मैत्री, आरू आणि सिया,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    शोभा भडके

    भाग – 14

    रामने भावना आणि आरूला एका ज्वेलरी शॉपसमोर आणून सोडलं. तेथे अगोदरच जीवन गाडी घेऊन उभा होता. राम त्या दोघींना सोडून परत गेला, कारण त्याला घरी जाऊन बाकीच्या तयारीत पवनला मदत करायची होती.

    “मॅडम निघायचं? सर आत तुमचा वेट करत आहेत…” आल्यापासून आरू कधी जीवनकडे तर कधी गाडीकडे बघत होती. जीवनला अवघडल्यासारखं झालं होतं आणि भीती पण वाटत होती… लेट झाल्यावर बॉसचा ओरडा खाण्याची!

    “आरू, अगं चल काय बघतेस?” भावना वैतागून म्हणाली.

    “आलं लक्षात…” ती कसला तरी विचार करत होती. अचानक तिच्या लक्षात आलं, तशी तिच्या चेहऱ्यावर चमक आली.

    “अगं, काय लक्षात आलं?” भावना.

    “ओ दादा, त्या दिवशी तुमच्याच गाडीच्या समोर ते कुत्र्याचं पिल्लू आलं होतं ना? ज्याला दवाखान्यात घेऊन जा म्हटलं तर, नाही म्हणत होतात… हां?” आरु त्याच्यावर आवाज चढवत म्हणाली.

    “हो. ते मी… म्हणजे…” तिच्या बोलण्याचा पवित्रा बघून जीवन गडबडून गेला. त्या दिवशी तर, तो पण ‘अरे’ला ‘कारे’ करत होता. पण आज सिच्युएशन वेगळी होती.

    “हां, तुम्हीच होता माझ्या लक्षात आहे… काय हो, त्या पिल्लाला दवाखान्यात घेऊन गेलात की नाही?” आरू.

    “हो मॅडम! ते… मी… ते सरांकडे…” जीवन अडखळत होता.

    ” ओ बोला, काय विचारतेय मी? कसं आहे ते पिल्लू आता?” ती जीवनला पूर्ण बोलू न देता स्वतःच बोलत होती.

    “आरू काय चाललंय? कुठलं पिल्लू? कशाचं पिल्लू?” भावना पण गोंधळून गेली होती.

    “अगं ताई ते… तू थांब! ओ बोला नं… तुम्ही… नाही, मी तुमच्या त्या काळा चष्मावाल्या साहेबांनाच विचारते…. कुठं आहेत ते?” ती बोलतच सुटली होती.

    “तू बोलू देशील तर, तो बोलेल ना!” शिव त्यांच्याजवळ येत म्हणाला.

    बराच वेळापासून शिव ज्वेलरी शॉपमध्ये त्यांची वाट पाहात होता. त्याने जीवनला त्यांना घ्यायला पाठवलं होतं. पण बराचवेळ झाला ते आले नाहीत म्हणून तोच बाहेर आला… तर त्याने बघितलं, आरू त्याच्यावर ओरडत होती.

    हेही वाचा – …म्हणून सियाच्या लग्नासाठी बाबा झाले तयार!

    शिवला पाहून जीवनने मात्र सुटकेचा निःश्वास सोडला. त्या दिवशी तिच्याशी बोलताना त्याला काही वाटलं नव्हतं. कारण तेव्हा ती अनोळखी होती. पण आज त्याच्या बॉसची होणारी बायको होती. अर्थात, त्याची पण लेडी बॉस होती. आज तिला काही बोलून त्याला बॉसचा राग ओढावून घ्यायचा नव्हता आणि त्यात मॅडम काही बोलूही देत नव्हत्या.

    “तुम्ही… तुम्ही तर बोलूच नका! खोटं बोललात ना तुम्ही? मी सांगितलं होतं तरी ऐकलं नाहीत तुम्ही…” शिव समोर दिसताच लगेच बोलून मोकळी झाली ती! आता जीवन आणि कुत्र्याचं पिल्लू बाजूलाच राहिलं.

    “काय… काय खोट बोललो मी? आणि काय नाही ऐकलं?” शिवने गोंधळून विचारलं. त्याला कळलंच नाही, ती नेमक कशाबद्दल बोलत आहे.

    “मला नाही माहीत… बघा तुम्हीच!” असं म्हणून ती पुढे गेली. कारण शॉपमधून सुधा बाहेर आल्या होत्या. त्यामुळे ती तशीच त्यांच्याकडे गेली. भावना पण त्यांच्याकडे गेली.

    “काय होतं हे? द शिवराज सरपोतदार यांना  एक मुलगी तोंडावर ओरडून गेली… चक्क शिवराज सरपोतदार यांना!” आकाश त्याच्याजवळ येत खूप मोठं आश्चर्य घडल्यासारखे भाव ठेवत डोळे मोठे करून म्हणाला.

    “ड्रामा बंद कर आणि आत चल… एक तर ती काय बोलून गेली, ते मला काही कळलं नाही… आणि जीवन घरी गेल्यावर त्या पपीला अजून एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा चेकअपसाठी,” त्याने जीवनला ऑर्डर दिली.

    “पिल्ल्याचं काय चक्कर आता?” आकाशने चालत चालत विचारलं.

    “नंतर सांगेन… बरं, मीटिंग कशी झाली. मॉममुळे मला मीटिंग सोडून इकडे याव लागलं” शिव.

    “मीटिंग व्यवस्थित झाली, तू काळजी करू नकोस. तू फक्त लग्न एन्जॉय कर,” आकाश म्हणाला. त्यावर शिवने त्याला असा काही लूक दिला की, तो एकदम चुपचाप चालू लागला…

    इकडे सुधा आरूला घेऊन आत आल्या तर, सिया दाराकडेच पाहत होती. सुधासोबत आरू आणि भावनाला पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माइल आली. आरूने पण तिच्याकडे पाहून स्माइल केलं. पण सियाची नजर अजूनही दाराकडे होती… ती रामला शोधत होती. त्याच्यावर राग जरी असला तरी, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी त्याची ओढ पण होती…

    “हॅलो  वहिनी, मी भावना…” भावना म्हणाली.

    “अं… हाय!” सिया दाराकडेच पाहात म्हणाली. पण शिव आणि आकाश आत येत होते… तिला वाटलं तो शिवसोबत येत असेल. पण ते दोघंच आत आले आणि तिचा चेहरा पडला…

    “काय झाल वहिनी… तुम्ही उदास का झालात?” आरू तिचा पडलेला चेहरा पाहून म्हणाली.

    “नाही काही… ते असंच. तू कशी आहेस? त्या दिवशी आपलं बोलणंच झालं नाही… आय ॲम सॉरी. तुझ्यासोबत जे झालं…” सिया तिच्या गालावर हात ठेवत बोलतच होती की… “दिदी, ज्वेलरी पाहूया मला ऑफिसमध्ये परत जायचंय,” तो डोळ्यांनीच सुधाकडे इशारा करत, “काही बोलू नकोस,”  असं म्हणाला.

    “अं… हो हो…” ती पण सावरासारव करत म्हणाली आणि काऊंटरकडे वळली.

    पण तिचं बोलणं ऐकून आरू मात्र उदास झाली. तिला परत ते सगळं आठवलं. तिच्या डोळ्यातून पाणी आलं, पण तिने ते लपवलं. पण शिवच्या नजरेतून मात्र सुटलं नाही.

    सुधा आरूसाठी दागिने पाहू लागल्या… एक एक दागिना तिला विचारत होत्या, कसा वाटतोय… एवढे भारी भारी दागिने पाहून आरू आणि भावना दोघी पण अवघडून गेल्या होत्या. ते खूप मोठ ज्वेलरी शॉप होतं. या अगोदर कधीच त्या एव्हढ्या मोठ्या दुकानात खरेदीसाठी गेल्या नव्हत्या.

    शिव आणि आकाश तिथेच सोफ्यावर बसून त्यांचं ऑफिसचं काम करत होते लॅपटॉपवर… “शिव तुला जर इथे येऊन ऑफिसचं काम करायचं होतं तर इथं यायचंच कशाला?” आकाश जरा चिडूनच म्हणाला.

    “तुला काय झालंय चिडायला? आणि मला इथे येण्यात काहीच इंट्रेस नव्हता. मॉमने फोर्स केला म्हणून यावं लागलं. आता तू तुझं काम कर आणि मलाही करू दे…” तो कठोरपणे म्हणाला आणि पुन्हा नजर लॅपटॉपवर वळवली.

    “याचं काय चाललंय तेच कळत नाही…” आकाश मनात म्हणाला.

    शिवची नजर जरी लॅपटॉपवर असली तरी अधून-मधून त्याचं लक्ष आरूवर पण होतं. पण ते तो कोणाला कळू देत नव्हता.

    “अं… हे खूप मोठं आहे आणि खूप महागही असेल.., मला नको,” आरू म्हणाली. सुधा यांनी आरूसाठी मोठं गंठन टाईप मंगळसूत्र निवडलं होतं आणि तिच्या गळ्याला लावून त्या पाहात होत्या…

    “अगं, हे काही रोज नाही घालायचं! विशेष समारंभ प्रसंगी घालायचं. एरवीसाठी आपण छोटं नाजूक पाहू. तू हे बाकीचे बघ… तुला जे आवडेल ते…” त्या तिला समजावत म्हणाल्या.

    ती अवघडत होती, हे सगळ घ्यायला! एरवी खूप बडबड करणारी… मनात आहे, ते स्पष्ट बोलून दाखवणारी आरू आज मात्र एकदम शांत होऊन गेली होती. कारण, तिला आता दडपण येत होतं, अस्वस्थ वाटत होत. खऱ्या अर्थाने आता तिला जाणीव होत होती की, तिचं लग्न होतंय… बाकी गोष्टी तर बाजूलाच सरल्या होत्या. तिचं शिक्षण, तिचं फॅशन डिझायनर बनायचं स्वप्न तर तिने जसं काय कुलूपबंद पेटीत ठेऊन दिलंय… जी आता ती कधीच उघडणार नाही!

    या सगळ्या गोंधळाने तिच्या डोळ्यांत पाणी आलं. पण ते तिने कोणाला दिसून न देता ओढणीने पुसून टाकलं. पण तिच्याकडे टक लावून पाहणाऱ्या शिवने मात्र ते पाहिलं… का कोणास ठाऊक, पण तो आता बचैन झाला. त्याने लॅपटॉप बंद केला आणि उठून त्यांच्याकडे गेला…

    “सिया तुला हा सेट कसा वाटतोय? हा बघ मी तुझ्यासाठी सिलेक्ट केलाय…” सुधा सियाला एक सेट दाखवत म्हणाल्या. सिया आल्यापासून स्वतःसाठी काहीच पाहात नव्हती. वरवर त्यांच्यासोबत होती, पण मन मात्र ‘राम का नाही आला?’ म्हणून उदास झालं होतं. त्याचा राग जरी असला तरी तिला वाटत होतं, त्याने तिला मनवावं… तिचा रुसवा घालवावा… तिच्याशी बोलावं…

    चार दिवसांत लग्न होतं. जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा किती स्वप्न पहिली होती त्यांनी लग्नाची! भलेही आज त्यांच लग्न होतं, पण परिस्थीती बदलली होती. एका तडजोडीतून हे नातं सुरू होणार होतं आणि याची आठवण तिनेच करून दिली होती… भेटले तेव्हा! पण तेव्हा राग होता… त्याने अर्ध्यात सोडलेली साथ… तिचं दुसऱ्यासोबत लग्न… त्या लग्नातून मिळालेल्या यातना… या सगळ्याचा राग त्याच्यावरच निघाला होता! त्यावेळी सगळं सोडून त्याच्यासोबत जायला तयार होती ती, पण त्याने माघार घेतली होती… त्याला असं मान्य नव्हतं. सगळ्यांच्या आशीर्वादाने सन्मानपूर्वक तिला आपली अर्धांगिनी बनवायचं होत… तो या पद्धतीने तिला घेऊन गेला नसता तर, त्याच्या घरी आणि गावात तो मानसन्मान कधीच मिळाला नसता तिला! आणि या गोष्टी इथपर्यंत थांबल्या नसत्या… तिला आयुष्यभर चटके सोसावे लागले असते.

    हेही वाचा – रामने सियाच्या घटस्फोटाबद्दल सांगितले अन्…

    ती मात्र काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि त्याच रागात तिने तिच्या बाबांनी आणलेल्या स्थळाला होकार दिला होता. एवढंच काय तर, लग्नानंतर जेव्हा नवऱ्यासोबत मंदिरात गेली होती, तेव्हा तिने पण रामला मंदिरात पाहिलं होतं आणि म्हणूनच आपल्या नवऱ्यासोबत हसून बोलत होती, त्याला जळवण्यासाठी!

    या सगळ्या गोष्टी ती आठवत होती… पण आता जसं जसं लग्न जवळ येत होतं, तिचा रागही निवळत चालला होता आणि आता तिला तो सोबत असावा, असंच वाटत होतं. पण तो आहे की, तुटक वागत होता. त्या भेटीनंतर रामने एका शब्दानेही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नव्हता…

    “दिदी काय झालं?” शिव आला होता आरूशी बोलायला, पण त्याची नजर सियावर गेली तर, तिचा पडलेला चेहरा पाहून त्याला तिची काळजी वाटली… म्हणून तिच्याजवळ येत त्याने प्रश्न केला.

    “अं… नाही, काही नाही… ते थोडं डोक दुखत आहे… मॉम, झालं असेल तर मी घरी जाऊ?” सिया.

    “अगं, मग आधी सांगायचं ना? बरं जाऊ आपण…” सुधा काळजीने म्हणाल्या.

    “दिदी, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, जास्त त्रास होत असेल तर!” शिव.

    “नाही, नको दवाखाना नको. गोळ्यांनी थोडा वेळ बरं वाटतं, पण पुन्हा डोक दुखतं… आणि मग गोळ्यांची सवय लागते. वहिनी तुम्ही खूप जास्त विचार करताय म्हणून डोक दुखतंय तुमचं! पण वहिनी जास्त विचार नका करू सगळं ठीक होईल…” आरु मधेच सियाच्या समोर येत म्हणाली.

    “हो, पण तिला त्रास होत असेल डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे, सो हॉस्पिटलला जातोय. दिदी चल…”  आरुचं बोलणं त्याला तर्कहीन वाटलं म्हणून त्याला तिचा राग आला होता.

    आरूला त्याचं असं उर्मट बोलण्याने वाईट वाटलं. आपण असं बोलायला नको होतं, असं तिला वाटलं… तिचा चेहरा पडला आणि ती गप्प बसली. पण तिचं अस गप्प बसणं भावनाला शॉक देऊन गेलं. कारण, आरू समोरच्याला आपलं म्हणणं पटवून दिल्याशिवाय शांत बसत नव्हती! तिला नवल वाटलं आणि वाईटही! त्या प्रसंगानंतर ती शांत शांतच झाली होती.

    “शिव मी ठीक आहे, जास्त नाही काही आणि आरू बरोबर म्हणाली. मी जास्तच विचार करत होते म्हणून जरा डोकं जड झाल बाकी नाही… आणि आरू  तू चहा खूप छान बनवतेस, त्याने डोकं असं चुटकी सरशी दुखायचं थांबतं म्हणे. राम म्हणाला होता मला…” आरुचा पडलेला चेहरा पाहून, तिला छान वाटावं म्हणून सिया म्हणाली.

    “हां, मस्त आलं घालून चहा करते मी लगेच डोकं दुखायचं थांबतं… दादाला खूप आवडतो. तुम्हालाही बनवून देऊन लगेच डोकं दुखायचं थांबेल,” तिचा चेहरा लगेच खुलला आणि ती उत्साहात म्हणाली.

    ” आरु तू इथे कुठे चहा बनवणार?” भावना तिला आपण बाहेर आहोत, याची जाणीव करून देत म्हणाली.

    “अरे हो, आता वहिनी?” आरू बारीक तोंड करून म्हणाली.

    “असू दे, आता ठीक आहे मी. नंतर कधी तुझ्या हातचा चहा घेईन,” आता सियाला पण बरं वाटत होतं. आरूच्या बडबडीने तिचा मूड फ्रेश झाला होता…

    क्रमश:

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026 ललित

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026 ललित

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    By सतीश बर्वेMay 30, 2026

    ध्यानीमनी नसताना त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. “मिसिंग यु अ लॉट…” ते वाचून मी मनातल्या मनात…

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026

    विपश्यनेतून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 30, 2026

    बटाटा वडा ते फ्रेंच फ्राइज… ‘किमयागार’ बटाट्याची गोष्ट!

    May 30, 2026

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 314
    • अवांतर 188
    • आरोग्य 115
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 438
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    Dnyaneshwari : हें रूप जरी घोर, विकृति आणी थोर…

    May 31, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 31 मे 2026

    May 31, 2026
    Most Popular

    साप्ताहिक राशीभविष्य : 31 मे ते 06 जून 2026

    May 31, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.