दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 15 फेब्रुवारी 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 26 माघ शके 1947; तिथि : त्रयोदशी 17:04; नक्षत्र : उत्तराषाढा 19:47
- योग : व्यतिपात 26:46; करण : विष्टी 29:23
- सूर्य : कुंभ; चंद्र : मकर; सूर्योदय : 07:08; सूर्यास्त : 18:37
- पक्ष : कृष्ण; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
महाशिवरात्री
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
हेही वाचा – पडू आजारी मौज हीच वाटे भारी…
दिनविशेष
प्रसिद्ध विज्ञाननिष्ठ गॅलिलियो
टीम अवांतर
प्रायोगिक विज्ञानाचा पाया घालणाऱ्या गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 रोजी इटली येथील पीसा येथे झाला. गॅलिलिओ हे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी डॉक्टर व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळेच गॅलिलिओ यांनी पिसा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि अनिच्छेनेच गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. 1585 साली पैशाभावी त्यांना शिक्षण सोडावे लागले.
लंबकाच्या सहाय्याने कालमापन करता येते, हा त्यांनी लावलेला सर्वात महत्त्वाचा शोध आहे. 1581 साली त्यांनी एकदा चर्चेमध्ये टांगलेला दिवा हलत असताना त्याच्या आंदोलनांचे निरीक्षण केले आणि एका आंदोलनाला किती काळ लागतो, हे नाडीचे ठोके मोजून पाहिले. झोका लहान असो किंवा मोठा तसेच, लंबकाचे वजन कमी किंवा जास्त असले तरी, त्याच्या एका दोलनाला सारखाच वेळ लागतो, हा त्यांच्या प्रयोगाचा निष्कर्ष होता. याच लंबकाच्या आधारे त्यांनी ‘गतीचे नियम’ मांडले. त्या चर्चमध्ये अजून एक दिवा आहे आणि तो ‘गॅलिलियोचा दिवा’ म्हणून ओळखला जातो. तर, 1639 साली त्यांनी गतीसंबंधी हा महत्त्वाचा शोध लावल्यावरच लंबकाचा घड्याळात उपयोग होऊ लागला.
कोपर्निकस यांची सूर्यकेंद्रीय विश्वाची (सूर्य विश्वाच्या केंद्राशी असल्याचे गृहीत धरणारी) कल्पनाच योग्य असल्याचे गॅलेलिलियो यांनी सुचविले होते. त्यामुळे धर्मसत्ता आणि परंपरावादी विद्वान यांचा राग त्यांनी ओढवून घेतला. रोम येथे धार्मिक न्यायालयात त्यांच्यावर खटला चालून सूर्याभोवती पृथ्वी आणि ग्रह फिरत असतात ही कल्पना गुडघे टेकून शपथेवर मागे घेण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. त्यांना शिक्षाही झाली होती.
हेही वाचा – ओंकार साधनेतून निरामय मानसिक आरोग्य
1609 मध्ये गॅलिलिओ यांनी स्वतः दुर्बीण तयार केली. 7 जानेवारी 1610 रोजी गुरू ग्रहाचे निरीक्षण करून गुरूचे चार मोठे आणि तेजस्वी उपग्रह शोधून काढले.. तर, चंद्र गुळगुळीत आणि स्वयंप्रकाशी असल्याचे ॲरिस्टॉटल यांचे मत होते. परंतु गॅलिलीओ यांनी चंद्रावर डोंगर आणि दऱ्या असून तो सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने प्रकाशतो, असे दाखवून दिले. अशा या विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञाचा, गॅलिलिओ यांचा 8 जानेवारी 1642 रोजी मृत्यू झाला.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


