Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, May 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पडू आजारी मौज हीच वाटे भारी…
    ललित

    पडू आजारी मौज हीच वाटे भारी…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 14, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, मराठी लघुकथा, मुलांचे आजार, स्पर्धेचे युग, पालकांची चिंता, मुलांवरील ताण, मुलांवरील दडपण, मुलांच्या आजारपणाची चिंता, मुलांवरील अभ्यासाचे दडपण, शाळेमधील उपस्थिती,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    डॉ. विवेक वैद्य

    “डॉक्टर, त्याला लवकर बरे करा. आज त्याचा क्लास बुडला. उद्या शाळा नको बुडायला…”

    “डॉक्टर, दोन दिवस झाले शाळेत जात नाहीये. त्याच्या टीचर ओरडतील. पाहिजे तर इंजेकशन द्या… उद्या शाळेत्त जायलाच पाहिजे!”

    “डॉक्टरसाब, कल इसकी युनिट टेस्ट है. कैसा भी कर के खडा करो इसको…”

    हे संवाद आता माझ्यासाठी नवीन राहिलेले नाहीत. कोणाला या संवादात काही वेगळंही वाटणार नाही. कारण बहुतेकांना वाटले असणार, ही आजारी मुले मोठी असावी. दहावी, बारावीची… किमान आठवीच्या पुढची! …नाही, ही सगळी मुले आहेत, बालवाडी, ज्युनिअर, सीनियर केजी किंवा पहिलीतली!

    मी कोणी बालरोगतज्ज्ञ नाही शिक्षणतज्ञ् नाही, तरीही काही गोष्टींबाबतीत माझे विचार नक्कीच सांगू शकतो.  इथे मुलांना होणारे जे आजार आहेत, ते साधे, कोणतीही गुंतागुंत नसलेले आजार आपण विचारात घेत आहोत. कोणताही ताप,  खोकला, पातळ संडास हे साधारण दोन ते चार दिवस राहते. अगदी कोणतेही औषध न घेता आपोआप जाणारी सर्दीही तितकेच दिवस राहते. ज्याच्या-त्याच्या प्रतिकारशक्तीवर आजाराचे दिवस अवलंबून असतात. लहान मुलात ते एखादा दिवस जास्त असू शकतो.

    हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?

    रोगाबद्दल काही महत्तत्वाच्या गोष्टी समजावून घेऊ.

    1) अचूक निदान, 2) योग्य औषधीची निवड आणि मात्रा (doses), 3) पुरेशी विश्रांती, 4) पथ्य (diet), 5) तपासण्या (साध्या आजारांना रक्त किंवा इतर तपासण्यांची गरज पडत नाही.)…

    यातल्या तीन आणि चार गोष्टी रुग्णाच्या (म्हणजेच मुलांच्या आईवडिलांच्या) हातात आहेत. साध्या आजारांसाठी जास्तीचे किंवा महागडे प्रतिजैविके न देणे, हे डॉक्टरांच्या हातात असते. आजारपणात पुरेशी विश्रांती आवश्यक असतेच. त्याचप्रमाणे घरातील कोणी जवळची व्यक्ती (खासकरून मुलाची आई) जर त्याच्या निकट असली तर, भावनिकदृष्टया मुलाला एक आधार असतो. अशावेळी लहान मुलाला वा मुलीला लवकर बरे वाटावे म्हणून डॉक्टरांना हेवी ॲन्टिबायोटिक्स (प्रतिजैविके) देण्याचा आग्रह करणे (तेही जरूर नसताना) हे कितपत बरोबर आहे? शिवाय, आजारी असताना पुरेशी विश्रांती न देता त्याला शाळा किंवा क्लासला पाठवणे, याला काय म्हणावे? उलट, आता डिसेंबर आणि जानेवारी या थंडीच्या दिवसांत चौथीपर्यंतच्या शाळा, ज्या सकाळी साडेसातला सुरू होतात, त्यांची वेळ नऊ वाजता करण्यात यावी, असे अनेक बालरोगतज्ज्ञांचे मत आहे. जेणेकरून या लहान मुलांमध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होईल.

    आता शिक्षणाबद्दल

    ज्युनिअर केजीत जाणारा मुलगा दोन दिवस शाळेत न गेल्याने तो किती मागे पडणार आहे? सीनिअर केजीची मुलगी एक दिवस ट्युशनला गेली नाही तर, तिचा किती अभ्यास बुडणार आहे?  पहिलीतला किंवा फर्स्टमध्ये असलेल्या विद्यार्थ्याने जर आजारपणामुळे एक युनिट टेस्ट दिली नाही तर, असे कोणते आभाळ कोसळून पडणार आहे?

    हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!

    कबूल आहे, सध्या स्पर्धेचे युग आहे. नववी, दहावी, अकरावी, बारावी परीक्षांसाठी खूप अभ्यास करावा लागतो. बारावीनंतरही…! पण तो निकष पाच-सात वर्षांच्या मुलाला कशाला? त्यांचे वय खेळायचे, बागडायचे… त्यांच्या डोक्यावर अभ्यासाचे बर्डन कशाला? उलट, हसत-खेळत शिक्षण ही पद्धत सरकार अवलंबत आहे… त्यामागे काही विचार असेलच ना? मुलांना खेळू द्या, बागडू द्या, फुलू द्या…

    आमच्या लहानपणी एक गाणे होते –

    पडू आजारी मौज हीच वाटे भारी…

    यातली मौज म्हणजे शाळेला सुट्टी हीच होती….!

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026 ललित

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026 ललित

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    By सतीश बर्वेMay 30, 2026

    ध्यानीमनी नसताना त्याने व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला. “मिसिंग यु अ लॉट…” ते वाचून मी मनातल्या मनात…

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 मे 2026

    May 30, 2026

    शर्वायने आराध्याला सांगितले, त्या गूढ बॉक्सचे महत्त्व!

    May 30, 2026

    स्मृतीगंध… मुंबईचा अस्सल कॅफे ‘बी मेरवान’!

    May 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 313
    • अवांतर 187
    • आरोग्य 114
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 436
    • फिल्मी 49
    • फूड काॅर्नर 217
    • मैत्रीण 20
    • ललित 664
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सावली… शेवटपर्यंत साथ देणारी!

    May 30, 2026

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    Dnyaneshwari : तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें

    May 30, 2026
    Most Popular

    मैत्रिणींचे प्लॅनिंग… पुण्याला जायचे अन्…

    May 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.