Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : नाम…? जिलेबी बाई!
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : नाम…? जिलेबी बाई!

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 26, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, जिलेबीची पंगत, जिलेबीची चव, लग्नसराईतील जिलेबी, पाकातील जिलेबी, जिलेबीचा पाक,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    मला आठवत त्याप्रमाणे 1980-90च्या काळात लग्न समारंभात जिलेबी हा पदार्थ नव्याने रुजू झाला होता. नव्याने मी याकरता म्हणते आहे, कारण 1960 ते 70मध्ये जिलेबी हा पदार्थ बहुतेक लग्नकार्यांमध्ये प्रमुख पाहुणा असेलही, परंतु क्वचितच! त्या काळात जी लग्नकार्य व्हायची त्यामध्ये बुंदीचा लाडू, रवा-बेसनाचे लाडू हे गोडाचे पदार्थ म्हणून पंगतीमध्ये दिसायचे. नुसतेच दिसायचे नाहीत तर, पाहुण्यांमध्ये स्पर्धा लावून हे लाडू खाल्ले जायचे. त्या काळात डायबेटीसचे एवढे प्रस्थ कदाचित नव्हते. एकेका वेळेस वीस-वीस लाडू खाणारे लोक होते. ही स्पर्धा जिंकणाऱ्याला बक्षीसही दिलं जायचं! आश्चर्य वाटलं ना ऐकून? असो, मूळ विषय हा आहे की, लग्न समारंभात जेव्हापासून जिलेबीने आपले ठाण मांडायला सुरवात केली, तेव्हापासून हे रवा-बेसनाचे लाडू मागे पडायला लागले. जिलेबीने मात्र लग्नात आपली सत्ता आजतागायत कायम ठेवली आहे. आता फक्त ती एकटी न येता सोबतीला रबडी घेऊन येते. रबडी आणि जिलेबी या दोघींचा मिलाफ असा काही जमतो की, ते पाहून सर्वच त्यांच्या प्रेमात पडतातच!

    पूर्वी लग्नात पाहुण्यांचे स्वागत गुलाबी कागदात गुंडाळलेल्या पेढे किंवा बत्तासे देऊन होत असे. त्या लग्नांची मजा हल्लीच्या काळातील लग्नांना येऊच शकत नाही. आता बडेजावपणा खूप वाढला आहे. अगदी साधारण परिस्थिती असलेल्या लग्नात देखील तीन-चार भाज्या, कमीत कमी गोडाचे दोन आणि पाणीपुरी, चाट, चायनीज नुडल्स, मंचुरियन असे अनेक पदार्थ असतात… त्याशिवाय, लोकांना आपली श्रीमंती दाखवल्यासारखी वाटत नाही. जमाना बदलला त्यानुसार जीवनशैली बदलली, लोकांचे खानपानपण बदलले, परंतु या सर्वात जिलेबी बाई आपले नाव आणि लोकांच्या हृदयातील तिचे स्थान मात्र आजही राखून आहेत. रंग, रूप गुणवत्ता याबाबतीत जिलेबी बाई आजही अव्वल आहेत. आयुर्वेदात देखील ‘जिलेबी बाई’चे महत्त्व आहे.

    मला आठवतं, मी लहान असतांना आम्ही ज्या भाड्याच्या घरात रहायचो, त्या परिसरात उत्तर प्रदेशातून आलेले एक म्हातारे आचारी काका होते. त्यांना सगळे महाराज म्हणूनच बोलवायचे. ते एक मिठाईचे दुकान चालवत असत. त्यांच्या दुकानात खव्याचा पेढा आणि जिलेबी खूपच सुरेख मिळायची. ते काका एका मोठ्या लोखंडी कढईत मलई दूध घोटून घोटून त्याचा खवा तयार करत असत आणि नंतर त्याच खव्याचे पेढे तयार करत असत. एका लाकडी छाप्याने त्यांच्या दुकानाचे नाव त्यावर छापत असत. तसंच, जिलेबीचे पीठ नारळाच्या करवंटीत घेऊन त्याला असलेल्या छिद्रातून गोलाकार जिलेब्या, त्यांच्या भल्यामोठ्या कढईत ते तळून काढत असत आणि नंतर त्या हिंडालियमच्या गंजातील साखरेच्या पाकात सोडत असत. त्या जिलेब्या कधी केशरी रंगाच्या असायच्या तर कधी पिवळ्या रंगाच्या! अशा या ‘जिलेबी बाई’ नावारूपास आणि रंगात कशा येतात, ते आपण जाणून घ्यायला हवे.

    हेही वाचा – Recipe :  मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण

    साहित्य

    • मैदा – 1 कप
    • दही – अर्धा कप
    • बेकिंग पावडर –  पाव चमचा
    • वेलची पावडर – पाव चमचा
    • खाण्याचा केशरी रंग – पाव चमचा
    • पाणी – अर्धा कप

    पाकाचे साहित्य

    • साखर – 1 कप
    • पाणी – 1 कप
    • वेलची पावडर – पाव चमचा
    • केशर – पाव चमचा

    हेही वाचा – Recipe : तुपातील तुरीचे दाणे आणि वाणीचा हुरडा!

    कृती

    1. एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, दही, बेकिंग पावडर, वेलची पावडर आणि केशरी रंग मिसळावा. यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून याचा घट्ट घोळ तयार करावा.
    2. हा मैद्याचा घोळ दोन ते तीन तास सेट व्हायला ठेवावा.
    3. दोन ते तीन तासांनी एका कढईत तेल गरम करायला ठेवावे.
    4. जिलेबी तयार करण्यासाठी एखादी पायपिंग बॅग किंवा प्लास्टिकच्या पिशवीला मेंदीच्या कोनासारखा आकार देऊन त्यात हा घोळ भरावा.
    5. नंतर त्यामधून जिलेब्या गरम तेलात तळून घ्याव्यात, गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
    6. जिलेब्या थंड झालेल्या साखरेच्या पाकात बुडवून ठेवाव्यात.

    साखरेच्या पाकेची कृती

    1. साखरेचा पाक तयार करण्यासाठी एका कढईत साखर घेऊन त्यात एक कप पाणी घालावे.
    2. त्यामध्ये वेलची पावडर आणि केशर टाकून पाक चांगला उकळून घ्यावा आणि थंड होऊ द्यावा.
    3. गरम तळलेल्या जिलेब्या या साखरेच्या थंड पाकातच टाकाव्यात.
    4. गरम पाकात जिलेब्या टाकल्या तर त्या जमणारच नाहीत.

    टिप्स

    • जिलेबीला स्वादिष्ट करण्यासाठी पिस्ता आणि बदामाचे काप साखरेच्या पाकात टाकू शकता.

    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn