Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माणुसकीची फुले

    August 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    August 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Kitchen Tips : बिटाचे कटलेट आणि परोठे, भरली वांगी करताना…
    फूड काॅर्नर

    Kitchen Tips : बिटाचे कटलेट आणि परोठे, भरली वांगी करताना…

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, बिटचे कटलेट, बिटचे परोठे, पालकाची भाजी, भरली वांगी, दोडक्याची भाजी, सुरकुतलेले टोमॅटो, कारल्याची भाजी,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बिटचे कटलेट आणि परोठे, पालकाची भाजी, भरली वांगी करताना या टिप्स वापरून पाहा.

    • कारल्याची भाजी करताना कारली चिरल्यावर त्यांना मीठ आणि लिंबूरस चोळून पंधरा मिनिटे ठेवावे. कडूपणा कमी होतो.
    • पालकाच्या भाजीमध्ये कोवळी पाने खूप असतात. ती निवडून घेता येत नाहीत. तेव्हा ती पाने न काढता तशीच ठेवावीत आणि ते बुडखे जमिनीत लावावेत. थोडे दिवसांत ती पाने मोठी होतात आणि त्यांचा भाजीसाठी उपयोग होतो.
    • पातळभाजीसाठी शिजवायच्या पालेभाज्या धुऊन घेऊन तशाच कुकरमध्ये शिजवाव्यात. त्यामुळे चिरण्याचा वेळ वाचतो आणि क्लोरोफिल उडून किंवा निघून जाण्याची शक्यता कमी होते. नंतर चटकन चिरल्या जातात. उलथन्याणे सुद्धा भांड्यातल्या भांड्यात बारीक करू शकतो आणि त्यामुळे भाजीही चांगली मिळून येते. चिरताना काढलेले पाणी भाजीसाठी वापरल्याने सत्व कायम राहते. भाजी रुचकर होते.

    हेही वाचा – Kitchen Tips : भाज्यांच्या सत्वयुक्त सालींचा वापर अन् टोमॅटोचे सार करण्याच्या टिप्स

    • दोडक्याची, भरल्या वांग्याची, पडवळाची किंवा कोणत्याही फळभाजीची भाजी करताना त्यात ‘दाण्याचे कूट’ थोडे वापरून भिजवलेली मसुराची डाळ वापरल्यास भाजी मिळून येते. शिवाय भाजी स्वादिष्ट आणि रसरशीत दिसते.
    • सुरकुतलेले टोमॅटो फेकून देण्यापेक्षा 20 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवल्यास सुस्थितीत येतात.
    • बाजारातून बीट आणल्यानंतर ते स्वच्छ धुऊन कुकरमध्ये उकडून घ्यावे. बीटचे चार तुकडे केल्यास ते लवकर आणि चांगले उकडले जातात. थंड झाल्यानंतर थोडा मिठाचा हात लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. पाच-सहा दिवस तरी चांगले राहतात. किसून त्यामध्ये फोडणी, मीठ, साखर, आवडत असल्यास कांदा घालून कोशिबीर करता येते किंवा किसून त्यात ब्रेड भिजवून घातला आणि आले-लसूण पेस्ट वगैरे घालून आयत्या वेळी कटलेट करता येतात. बीटच्या चकत्या काढून सॅलड डिश सजवता येते किंवा पुलावच्या डिशच्या कडेला लावून त्याची शोभा वाढविता येते. किसून त्यात कणीक मळून लसूण पेस्ट, कोथिंबीर वगैरे घालून परोठे करता येतात. यातील कोणताही पदार्थ आयत्या वेळी करता येतो.

    हेही वाचा – Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना…

    • वालाच्या शेंगा, डिंगऱ्या, मुळा या भाज्यांना एक प्रकारचा उग्र वास असतो. तो कमी व्हावा म्हणून भाजीला फोडणी दिल्यानंतर त्यात एक चिमूटभर ओव्याची पूड टाकावी आणि मग भाज्या शिजवाव्यात. वास तर जातोच, पण चवही सुंदर येते.

    तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    August 7, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : स्वादिष्ट खवा जिलेबी अर्थात मावा जिलेबी अन् ब्रोकोली- मटार पुलाव!

    August 4, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : उपवासाचे खमंग मिनी थालिपीठ!

    July 31, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : स्प्राऊटेड मूग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स!

    By माधवी जोशी माहुलकरAugust 7, 2026

    स्प्राऊटेड मुग आणि स्वीट कॉर्न चीज बॉल्स हा पदार्थ म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेल्या साहित्याचा हा मेकओव्हर…

    Recipe : स्वादिष्ट खवा जिलेबी अर्थात मावा जिलेबी अन् ब्रोकोली- मटार पुलाव!

    August 4, 2026

    Recipe : उपवासाचे खमंग मिनी थालिपीठ!

    July 31, 2026

    Recipe : चटपटीत व्हेजिटेबल्स-सोया पॅटिस आणि खाकरा भेळ!

    July 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माणुसकीची फुले

    August 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    August 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026

    Movie : One Life… प्रत्येक आयुष्य महत्त्वपूर्ण

    August 9, 2026

    प्रेमाचे झाड

    August 9, 2026

    पल भर में ये क्या हो गया…

    August 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 390
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 527
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 839
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माणुसकीची फुले

    August 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला

    August 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑगस्ट 2026

    August 10, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.