Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, June 23
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Dnyaneshwari : भोगीं अवस्था एकी उठी, ते अंहकाराचा अचळु लोटी…
    अध्यात्म

    Dnyaneshwari : भोगीं अवस्था एकी उठी, ते अंहकाराचा अचळु लोटी…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 3, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Twelve, बारावा अध्याय, अध्याय बारावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.

    अध्याय पाचवा

    शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः सुखी नरः ॥23॥

    ज्ञानियाचां हन ठायीं । यांची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥129॥ जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरीं सुख । एक आथी ॥130॥ परी तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे । तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥131॥ भोगीं अवस्था एकी उठी । ते अंहकाराचा अचळु लोटी । मग सुखेंसि आंठी । गाढेपणें ॥132॥ तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी । तेथ जळ जैसें जळी । वेगळें न दिसे ॥133॥ कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैसे सुखचि उरे स्वरुपें । सुरतीं तिये ॥134॥ ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एकचि होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणतें जें ॥135॥

    योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः । स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥24॥

    लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः । छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥25॥

    म्हणोनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें । ते खुणाचि पावेल स्वभावें । आत्माराम ॥136॥ जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले । ते मी जाणें निखळ वोतले । सामरस्याचे ॥137॥ ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । की महाबोधें विहार । केले जैसे ॥138॥ ते विवेकाचे गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥139॥ ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक । हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥140॥ तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळी बोल देखसी । सनागर ॥141॥ परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं । करीं साधुहृदयराउळीं । मंगळ उखा ॥142॥ ऐसा श्रीगुरूचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥143॥

    हेही वाचा – Dnyaneshwari : तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरीं…

    अर्थ

    इहलोकी मरणाचे अगोदर जो मनुष्य काम आणि क्रोध यांचा वेग सहन करू शकतो, तोच योगी आणि तोच सुखी होय ॥23॥

    आत्मज्ञान्यांच्या ठिकाणी तर, या दु:खरूपी विषयांची गोष्टसुद्धा नाही. कारण त्यांनी देहात असतानाच काम-क्रोधादी वृत्ती आपल्या आधीन ठेवल्या आहेत. ॥129॥ त्यांना अंत:करणात एक ब्रह्मसुख अनुभवाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत. ॥130॥ परंतु पक्षी जसे फळ खातो (म्हणजे खाणारा पक्षी, खाण्याचा विषय फळ आणि क्रिया ही त्रिपुटी स्पष्ट भासते) तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने (भोक्ता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी कायम ठेऊन) भोगण्यासारखे नाही. तर, तेथे भोक्तेपणही विसरले पाहिजे. (म्हणजे हे भोगणे त्रिपुटीविरहित म्हणजेच तद्रूपतेचे असते). ॥ 131॥ त्या भोगांमध्ये वृत्तीची अशी एक स्थिती उत्पन्न होते की, ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते आणि मग तो जीव सुखाला गाढ आलिंगन देतो ॥132॥ पाण्यात पाणी मिळाल्यानंतर जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो. (म्हणजे आपलेच आपल्याशी सहज ऐक्य होते.) ॥133॥ अथवा आकाशात वायूचा लय झाला की ,आकाश आणि वायू हे दोन आहेत, असे म्हणता येत नाही; तसे या भागामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने रहाते. ॥134॥ अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते, असे जर म्हणावे तर, तसे ऐक्य जाणून ,‘ऐक्य आहे’ असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे? ॥135॥

    जो अंत:सुखी (आत्मस्वरूप बनल्यामुळे स्वत:च सुखरूप बनलेला), अंतराराम (आत्मरूप बनून तेथेच क्रीडा करणारा), याप्रमाणे अंतर्ज्योती (ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे) असा जो योगी, तो ब्रह्मच होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते. ॥24॥ ज्यांचे दोष नष्ट झालेले आहेत, ज्यांचे संशय तुटले आहेत, ज्यांनी मन ताब्यात ठेवले आहे आणि प्राणिमात्रांच्या हितांविषयी जे रत आहेत, असे ऋषी मोक्ष मिळवितात. ॥25॥

    म्हणून हे मागील सगळे असू दे. जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे? जो ब्रह्मनिष्ठ आहे, तोच हे मर्म सहज जाणील. ॥136॥ जे अशा सुखाने धुंद झाले आहेत आणि आपल्या ठिकाणीच ते आपण रममाण झाले आहेत, ते पूर्णपणे साम्यरसाचे (ब्रह्मैक्य भावाचे) ओतलेले पुतळेच आहेत, असे मी समजतो. ॥137॥ ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत किंवा जणू काही महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत. ॥138॥ ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत. ॥139॥ ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. यावर श्रीगुरु निवृत्तिनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर. तू एक एक वर्णन कोठवर करणार ? ॥140॥ तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस, तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला राहात नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस. ॥141॥ परंतु हा रसाचा विस्तार आवरता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर आणि सज्जनांच्या अंत:करणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रात:काल कर. ॥142॥ याप्रमाणे श्रीगुरूंची सूचना निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाली. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले, तेच ऐका. ॥143॥

    क्रमश:

    हेही वाचा – Dnyaneshwari : …म्हणोनि विषयभोगीं जें सुख, तें साद्यंतचि जाण दुःख

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026 अध्यात्म

    Dnyaneshwari : नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु 

    June 21, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    By Team AvaantarJune 23, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥20॥…

    Dnyaneshwari : कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी

    June 22, 2026

    Dnyaneshwari : नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु 

    June 21, 2026

    Dnyaneshwari : वोखटें कां गोमटें, हें काहींचि तया नुमटे

    June 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026

    मेहनत करने वालों की…

    June 22, 2026

    बेटर हाफ

    June 22, 2026

    संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली

    June 22, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 337
    • अवांतर 191
    • आरोग्य 122
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 464
    • फिल्मी 53
    • फूड काॅर्नर 226
    • मैत्रीण 23
    • ललित 725
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आजची ती…

    June 23, 2026

    Dnyaneshwari : आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन

    June 23, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 23 जून 2026

    June 23, 2026
    Most Popular

    बेटर हाफ

    June 22, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.