Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 02 नोव्हेंबर 2025
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 02 नोव्हेंबर 2025

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 2, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 02 नोव्हेंबर 2025; वार : रविवार
    • भारतीय सौर : 11 कार्तिक शके 1947; तिथि : एकादशी 07:31, द्वादशी 29:07; नक्षत्र : पूर्वा भाद्रपदा 17:03
    • योग : व्याघात 23:10; करण : बव 18:24
    • सूर्य : तुळ; चंद्र : कुंभ 11:26; सूर्योदय : 06:38; सूर्यास्त : 18:05
    • पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन
    • संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127

    भागवत एकादशी

    तुलसी विवाह आरंभ

    चातुर्मास समाप्ती

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660

    हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!


    दिनविशेष

    गांधीवादी नेत्या इला भट

    टीम अवांतर

    प्रसिद्ध भारतीय समाजसेविका, वकील आणि गांधीवादी नेत्या इला भट यांचा जन्म 7 सप्टेंबर 1933 रोजी अहमदाबाद येथे झाला. वडिलांप्रमाणे त्यांनीदेखील कायद्याचे शिक्षण घेतले. 1954 साली त्या वकील झाल्या. ‘हिंदू लॉ’ या विषयात त्यांनी सुवर्णपदक पटकावले. त्याकाळी टेक्सटाइल इंडस्ट्रीमध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते; पण या क्षेत्रात स्वयंरोजगार करणाऱ्या स्त्रियांना तर कायद्याचेदेखील संरक्षण नव्हते. या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी इला भट यांनी अहमदाबादमधील ‘टेक्सटाइल लेबर असोसिएशन’मध्ये प्रवेश केला. 1972 साली त्यांनी प्रथम ‘सेवा’ (सेल्फ एम्लॉयड वुमेन्स असोसिएशन) ही संघटना स्थापन केली. इला भट यांच्या मते ही नुसती संघटना नसून एक चळवळ  होती. त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी नवीन कायदे तयार करणे आणि प्रगतीच्या आड येणारे प्रश्न कायदेशीर मार्गाने दूर करणे याबरोबरच महिलांना सक्षम करण्यावर भर दिला. देशातील 18 राज्यांत आणि 7 दक्षिण आशियाई देशांत ‘सेवा’चे कार्य आहे. 4 हजार 813 स्वयंसहाय्यता गट, 160 व्यवसायांनुसार सहकारी संस्था, 15 आर्थिक महासंघ आणि 3 उत्पादक कंपन्या, असा ‘सेवा’चा विस्तार आहे. याशिवाय ‘सेवा’तर्फे महिलांसाठी बँक, आरोग्य सेवा, लहान बालकांसाठी वसतिगृह, विमा, कायदेशीर मदत, गृहनिर्माण आदी गोष्टी उपलब्ध केल्या जातात. श्री सेवा महिला सहकारी बँकेची 1974 मध्ये स्थापना करण्यात आली. भारतातील महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही पहिलीच बँक आहे. 1986 पासून याच संस्थेच्या अंतर्गत ‘इको टुरिझम’ ही नवीन संकल्पना राबवण्यात येते. दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या इला भट यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हली हूड पुरस्कार तसेच पद्मश्री, पद्मभूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते ‘ग्लोबल फेअरनेस इनिशिएटिव्ह अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले.  नेल्सन मंडेला यांच्या पुढाकाराने 2007 मध्ये स्थापन झालेल्या ‘दि एल्डर्स’ या जागतिक नेत्यांच्या गटामध्येही इला भट यांचा समावेश करण्यात आला होता. हा गट खास करून मानवी हक्क आणि जागतिक शांतता यासाठी कार्यरत आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना इला भट यांनी `अनुबंध’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. ग्रामीण भागातील लोकांना लागणाऱ्या जीवनावश्यक गरजा (अन्न, निवारा, कपडे, प्राथमिक शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य) त्या परिसराच्या शंभर मैल परिघात उपलब्ध करून देणे, हे त्यामागचे उद्दीष्ट होते. त्यांना त्या `शंभर मैलाचा समुदाय’ असे म्हणत. 2 नोव्हेंबर 2022 रोजी अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

    हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी दिनचर्या : आहाराच्या वेळा आणि प्रमाण


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com/ या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026 वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026 वास्तू आणि वेध

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026 वास्तू आणि वेध
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    वास्तू आणि वेध

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    By Team AvaantarMarch 24, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 मार्च 2026; वार : मंगळवार भारतीय सौर :  03…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविषय; 23 मार्च 2026

    March 23, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 22 ते 28 मार्च 2026

    March 22, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष, 22 मार्च 2026

    March 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    संस्कार… माणुसकी आणि सहिष्णुतेचे!

    March 24, 2026

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 174
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 185
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn