Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeआरोग्यHomeopathy : कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार नव्हे तर, एक चेतावणी 

Homeopathy : कोलेस्ट्रॉल वाढणे हा आजार नव्हे तर, एक चेतावणी 

डॉ. सारिका जोगळेकर

होमिओपॅथिक तज्ज्ञ

आपण अनेकदा “माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय!” असं ऐकतो आणि लगेचच घाबरतो. पण खरं पाहिलं तर, कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील एक अत्यावश्यक घटक आहे, जे प्रत्येक पेशीच्या निर्मितीत आणि अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये सहभागी असते. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं, तर ते हृदयविकारासारख्या अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतं; पण योग्य प्रमाणात असलेलं कोलेस्ट्रॉल आपलं आरोग्य टिकवून ठेवतं. म्हणूनच, कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?  त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? ते कशामुळे वाढते? ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?  हे जाणून घेणे आजच्या काळाची गरज आहे. 

कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील एक प्रकारचा लिपिड (चरबीसारखा पदार्थ) आहे, जो यकृतात (liver) तयार होतो. शरीरातील पेशींच्या भिंती, हार्मोन्स आणि व्हिटामिन डी तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते. मात्र, याचे प्रमाण नियंत्रणा बाहेर जाते, तेव्हा हृदयाला धोका निर्माण होतो. 

कोलेस्ट्रॉल कसे तयार होते?

आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल दोन मार्गांनी तयार होते :

1. शरीरातच बनते (मुख्यत्वे यकृतात)

  • आपण जे अन्न खातो त्यातून शरीराला चरबी, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने मिळतात.
  • यकृत या पोषकद्रव्यांपासून कोलेस्ट्रॉल तयार करते.
  • शरीराला हार्मोन्स, पेशींच्या भिंती मजबूत करणे आणि पित्त (bile )तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉल लागतो.

2. आहारातून मिळते

  • काही अन्नपदार्थात थेट कोलेस्ट्रॉल असते – जसे अंड्याचा पिवळा बलक, मांस, लोणी, तूप, चीज इत्यादी.
  • हे पदार्थ खाल्ल्यावर ते थेट रक्तात शोषले जाते.

हेही वाचा – स्त्रीआरोग्य : मासिक पाळीपासून मानसिक शांततेपर्यंत होमिओपॅथी

तीन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात 

1. LDL- low density lipoprotein – याला ‘वाईट कोलेस्ट्रॉल’ म्हणतात. हे रक्तवाहिन्यांमध्ये साठते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. 

2. HDL- high density lipoprotein – याला ‘चांगले कोलेस्ट्रॉल’ म्हणतात. हे LDL कमी करण्यात मदत करते. 

3. Triglycerides – ट्राय ग्लिसराइड नावाचे लिपीड वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो, त्यामुळे हे वाढणे सुद्धा वाईटच.

कोलेस्ट्रॉल वाढले की शरीरावर काय परिणाम होतात?

  • हृदयविकाराचा धोका 
  • उच्च रक्तदाब (high blood pressure) 
  • मेंदूत रक्तपुरवठा कमी होणे (stroke)
  • रक्तवाहिन्यांचे आकुंचन 
  • पायांमध्ये ब्लॉकेज होणे (peripheral artery disease) 

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?

  • अधिक प्रमाणात तेलकट किंवा तळलेले खाणे 
  • व्यायामाचा अभाव 
  • मानसिक ताणतणाव 
  • धूम्रपान आणि मद्यपान 
  • अनुवांशिक कारणे 

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

  • संतुलित आहार : ताज्या फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, ओमेगा थ्री-युक्त अन्न, जसे की बदाम, अक्रोड, मासे. 
  • व्यायाम : रोज किमान 30 मिनिटे चालणे, सायकलिंग किंवा योगासने करावीत 
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळणे
  • नियमित तपासणी : रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणी आवश्यक आहे, बरेच वेळेला ती वाढलेली आपल्याला समजत नाही. 
  • तणाव टाळा : सतत मानसिक ताण कोलेस्ट्रॉल वाढवू शकते.

हेही वाचा – Homeopathy : चिमुकल्यांची निरोगी वाढ झाली तर, उज्वल भविष्य घडतं…

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर होमिओपॅथीची भूमिका 

होमिओपॅथिक औषध द्यायच्या आधी पेशंटची जीवनशैली, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, भावनिक संवेदनशीलता आणि त्यावर त्या व्यक्तीची असलेली प्रतिक्रिया, विविध प्रकारचे ताणतणाव या सगळ्यांचा सखोल अभ्यास केला जातो. प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक प्रकृती लक्षात घेऊन त्याला औषध दिले जाते. कोलेस्ट्रॉल हे एका दिवसात वाढत नाही, ते हळूहळू वाढते तसेच होमिओपॅथिक औषधे दिल्यानंतर हळूहळू कोलेस्ट्रॉल कमी व्हायला लागते आणि काही महिन्यातच कोलेस्ट्रॉल नॉर्मलला आणण्याची क्षमता होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे. विशेष म्हणजे, औषध बंद केल्यानंतर सुद्धा कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते, कारण ते ज्या कारणामुळे कोलेस्ट्रॉल वाढलेले असते, ते कारण आपण मुळापासून नष्ट करतो. कुठल्याही इतर औषधांसोबत आपण होमिओपॅथिक औषधे देऊ शकतो. 

होमिओपॅथिक औषधे लिव्हरचे कार्य नैसर्गिकरीत्या सुधारतात. ती औषधे शरीरातील अंतर्गत संतुलन पुन्हा प्रस्थापित करतात आणि यकृतावर होणारा ताण कमी करतात. त्यामुळे चरबीचे (फॅट) योग्य प्रकारे विघटन होते, पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्याची क्षमता वाढते. याचबरोबर ताण-तणाव हाताळण्याची आपल्या मनाची क्षमता देखील होमिओपॅथिक औषधांमुळे वाढते आणि बऱ्याच वेळेला ताण-तणाव हे कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी मुख्य कारण असते.

जीवनशैलीतला बदल, संतुलित आहार आणि शांत मन ही कोलेस्ट्रॉलची गुरुकिल्ली आहे आणि सोबत होमिओपॅथी असेल तर, वाढणारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. 

HOLISTIC HOMOEOCURE CLINIC

https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr

https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!