Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » जेवणाचा डबा…
    ललित

    जेवणाचा डबा…

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 22, 2025No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, जेवणाचा डबा, पोळी भाजी, भुर्जी, अंडा ऑम्लेट, अंडा करी, चवळीची भाजी, Lunch box, poli bhaji, bhurji, egg omelette, chavli bhaji, egg curry
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    पराग गोडबोले

    शाळेत असताना एक नियम होता, डब्यात रोज पोळी-भाजीच हवी असा! कोण हे नियम बनवतात कोणास ठाऊक? पण होता. मधेच कधीतरी बाई डबा तपासायच्या आणि पोळी भाजी नसेल तर रट्टा मिळायचा. कधीकधी डबा न तपासतासुद्धा बाई हाक मारायच्या आणि विचारायच्या. आज डब्यात काय होतं?

    च्या मारी, त्या दिवशी नेमका डबा नसायचा आणि आईने वडापाव खायला पैसे दिलेले असायचे…

    ‘खरं सांग. खोटं बोललास तर, दोन पट्ट्या आणखी खाव्या लागतील…’

    नक्कीच कोणीतरी बाईंकडे चुगली केलेली असायची… “बाई बाई, आज ना त्याने डबा नव्हता आणला… गपचूप वडापाव जाऊन खाऊन आला…” बाईंचे ‘चष्मिष्ट’ खबरी बाईंना बित्तंमबातमी पोहोचवायचे. असे तीन-चार होते, त्यामुळे कोणाला धरून धोपटावे कळत नसे.

    “डबा नव्हता बाई…,” कबूल करण्याव्यतिरिक्त पर्याय नसायचा. दोन पट्ट्या खाऊन, मारापेक्षा जास्त, अपमानाने डोळ्यात आलेलं पाणी शर्टाच्या बाहीला पुसत जागेवर जाऊन बसायचो.

    कधीकधी कोणीतरी डब्यात बोंबिल किंवा सुकट किंवा तत्सम काहीतरी घेऊन यायचा आणि मग आम्हा ‘अदृश्य शेंडीधारी’ पोरांची पळापळ व्हायची. वास असा सुटायचा की, नाकावर रुमाल दाबला तरी, तो पार मेंदूला झिणझिण्या आणायचा. मधली सुट्टी संपल्यावर सुद्धा तो दर्प दरवळत राहायचा… हे असलं काही आणायचं नाही, असा काही नियम नव्हता त्यामुळे बाईंना पण काही बोलता यायचं नाही!

    ऑफिसमध्येही असे काही नियम नसतात, पण तरीही रोज आपली पोळीभाजीच असते. कधी-कधी बदल म्हणून भाकरी, घावन, थालीपीठ हे प्रकार असतात… पण पोळीभाजीवर भर जास्त.

    हेही वाचा – पावसाची रिपरिप अन् रिक्षावाला…

    बुधवार होता. माझ्या डब्यात चवळीची उसळ… व्यवस्थित गूळ वगैरे घालून केलेली! मला पूर्वी लोक विचारायचे, ‘तुमची बायको गुजराती आहे का हो?’ नाही सांगितल्यावर चकित व्हायचे… ‘नाही, तुमच्या भाज्या स्वीट डिश सारख्या असतात म्हणून विचारलं…’

    आता त्यांना कसं सांगू की, आमच्याकडे सगळ्यातच गूळ घालतात म्हणून! आणि खरं आहे हो ते!! गुळाची चिमूट अर्पण केल्याशिवाय आमच्याकडे भाजी आणि चिंचेशिवाय आमटी पूर्णत्वाला जातच नाही. परंपरा आहे ती आमची…

    तर, बुधवार असल्यामुळे एकाच्या डब्यात झणझणीत अंडा करी, दुसऱ्या दोघांच्या डब्यात अंडा भुर्जी, एका मुलीच्या डब्यात अंड्याचा पोळा, म्हणजे ऑम्लेट आणि मी आपला चवळी घेऊन… गुळयुक्त. सात्विक!

    बसलो जेवायला आणि माझ्या उसळीला कोणी वालीच नाही हो… सगळे जण मला म्हणाले, “सर, ठेवा तुमचा डबा झाकून आणि या आमच्यात…”

    मी आपला, ‘अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी’ म्हणत त्यांच्या डब्यांवर ताव मारला आणि माझी भाजी तशीच राहिली राव!!

    “भाजी न संपवता डबा घरी गेला तर मला घेरी येईल, असं वातावरण घरात तयार होईल…” असं मी काळजीयुक्त स्वरात म्हटल्यावर सगळा सहानुभूतीचा ओघ माझ्याकडे वळला. एक जण म्हणाला, “जाता जाता भिकाऱ्याला देऊन टाका.” मी झटकला तो विचार… बायकोने केलेल्या सुंदर भाजीचा अंत भिकाऱ्याच्या वाडग्यात? अशक्य!!

    दुसरा म्हणाला, “हल्ली भिकारीपण देत नाहीत शिळ्यापाक्याला किंमत. तुम्ही हिंमत करून भाजी घरीच घेऊन जा परत. जे काही होईल त्याला धीराने तोंड द्या…”

    पर्याय काय होता माझ्याकडे?

    हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!

    डबा तसाच बॅगेत भरला परत आणि गेलो घरी. डब्यात भाजी आहे, हे साफ विसरलो! रात्री पानं घेतल्यावर आठवला दुपारचा डबा आणि घाम फुटला. आता शिव्या-शाप दिसत होत्या समोर… डबा काढलाच नाही बॅगेतून! जेवण झाल्यावर झाकपाक करून बायको निवांत झाल्यावर हळूच बॅगेतून डबा काढला आणि आत न्यायला लागलो. पटकन ओल्या कचऱ्याच्या बादलीत तो उपडा केला की, माझं काम फत्ते होणार होतं. सकाळी केर मीच देतो, त्यामुळे तिला कळण्याचा प्रश्न नव्हता…

    कोणीतरी म्हणालं होतं की, माझ्या राशीला साडेसाती आहे म्हणे सध्या! लगेचच प्रत्यय आला. घाईघाईत आत जाता जाता डबा निसटला माझ्या हातून आणि चवळ्यांचा सडा पडला लादीवर. निवांत बसलेल्या बाईसाहेब खडबडून उठल्या…

    आतलं विहंगम दृश्य पाहून तिला कळेचना काय प्रकार ते!

    “आधी पुसून घे सगळं आणि मग बोल…”

    पंधरा मिनिटं तो सगळा राडा निपटण्यात गेला.

    “अगं…” म्हणून सुरुवात केली आणि सगळी कहाणी ऐकवली अन् गोळीबार झेलायला तयार झालो.

    “हात्तिच्या, एवढंच ना? त्यासाठी एवढी लपवाछपवी?”

    साडेसाती अचानक संपुष्टात आली, असं वाटायला लागलं. हरखलो नुसता!

    “पुढच्यावेळी ऑफिसमधल्या लोकांना सांगून ठेव. असं काही आणणार असाल तर आधीच सांगा, म्हणजे माझे डबा करायचे कष्ट तरी वाचतील. विश्रांती एक दिवस… जमलं तर थोडी भुर्जी घरी पण घेऊन ये. मीही चव पाहीन!”

    आई शप्पथ, कानशीलांवर बोटं मोडून ‘इडा पीडा टळो’ असं म्हणावंसं वाटलं.

    रात्री झोप छान लागणार होती.


    मोबाइल – 9323277620

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026 ललित

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026 ललित

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पाप आणि पुण्य

    By प्रदीप केळुस्करApril 16, 2026

    गाडी पुण्याच्या दिशेने धावत होती. ड्रायव्हर जयदेव सोडून बाकी तिघेजण भयंकर तणावाखाली होती. ड्रायव्हरच्या बाजूला…

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026

    Ayurveda : वसंताचे ‘ब्रह्मास्त्र’ – वासंतिक वमन पंचकर्म

    April 17, 2026

    पाप आणि पुण्य

    April 16, 2026

    Kitchen Tips : दाल फ्राय, टेस्टी ताक, शिळ्या भाताचा नाश्ता करताना…

    April 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 270
    • अवांतर 182
    • आरोग्य 102
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 387
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 196
    • मैत्रीण 18
    • ललित 558
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…

    April 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 17 एप्रिल 2026

    April 17, 2026
    Most Popular

    जगाचा नकाशा आणि इतिहास बदलणारा ‘सुगंधी’ प्रवास!

    April 17, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.