Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख
    मैत्रीण

    तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख

    तृप्ती देवBy तृप्ती देवOctober 29, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, तृप्ती देव, लेखिका तृप्ती देव, तिची पेन्शन, स्वाभिमानाची नवी ओळख, अलकाताईंना पेन्शन, गृहिणीचा अधिकार, गृहिणीना सुट्टी, गृहिणींचे अस्तित्व, गृहिणीचा स्वाभिमान, आर्थिक ओळख, गृहिणींचे परावलंबित्व, pension for Housewife, self-respect
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सकाळचे साडेसात वाजले होते. स्वयंपाकघरातून कूकरच्या सलग तीन शिट्ट्या झाल्या, पाठोपाठ फोडणीचा खमंग वास घरभर दरवळत होता. घरात नेहमीसारखीच सकाळची लगबग सुरू होती…

    “आई, आता तुम्ही जरा बसा बरं. भाजी झालीच आहे. चपात्या मी लाटते. सकाळपासून धावताय, जरा आराम करा,” सून नेहा प्रेमाने म्हणाली.

    छप्पन्न वर्षांच्या अलकाताई हसल्या…

    “अगं, अजून राहुलचा डबा भरायचा आहे. तुझ्या दोघांचं दही ठेवायचं आहे… आणि हो, राहुलच्या आवडीची सुक्या खोबऱ्याची चटणी केली आहे आज.”

    तेवढ्यात बेडरूममधून राहुलचा आवाज आला…

    “आई… माझा निळा शर्ट कुठे आहे गं?”

    “कपाटात डाव्या बाजूला तिसऱ्या कप्प्यात बघ.”

    “मिळाला.”

    तिकडे डायनिंग टेबलवर बसलेले सुधीरराव वर्तमानपत्र वाचत होते…

    “अलका, चहात साखर जरा कमी घाल बरं का… डॉक्टरांनी सांगितलंय.”

    “हो, लक्षात आहे माझ्या.”

    “बाबा, मी आणते चहा,” नेहा म्हणाली.

    त्यावर सुधीरराव हसले… “अगं, तुझ्या हातचा चहा छान असतो. पण तुझ्या सासूबाईंच्या हातच्या चहाची मला पस्तीस वर्षांची सवय आहे.”

    घरात सगळं सुरळीत होतं. मुलगा, सून, नोकरीतून निवृत्त झालेले सुधीरराव आणि या सगळ्यांच्या मध्यभागी अलकाताई!

    कोणाला काय हवं, कोणाला काय आवडतं, कोणाची तब्येत कशी आहे, घरात काय संपलंय, कोणाचा वाढदिवस कधी आहे, या सगळ्याचं चालतं-बोलतं व्यवस्थापन म्हणजे अलकाताई. त्यांच्याशिवाय घरातलं पानही हलत नव्हतं. तिची घराला आणि तिला घरची सवय झाली.

    पण दुर्दैवाने त्यांच्या या कामाला ना पगार होता, ना रजा, ना पदोन्नती. कारण घरातल्या प्रत्येकाला वाटायचं… आई आहेत ना… त्या करतील.

    हेही वाचा – कार्यक्रम कांदेपोह्यांचा!

    राहुल आणि नेहा ऑफिसला निघून गेले. घरात शांतता पसरली. अलकाताईंनी शेवटचं आवरलं आणि दोन कप चहा घेऊन त्या सुधीररावांच्या शेजारी येऊन बसल्या. आज सुधीरराव खूप आनंदात दिसत होते. त्यांनी मोबाइल पुढे केला…

    “अलका, बघ.”

    मोबाइलवर बँकेचा मेसेज होता – ‘पेन्शन जमा करण्यात आली आहे.’

    सुधीरराव अभिमानाने म्हणाले, “आज पहिली पेन्शन आली. पस्तीस वर्षांच्या नोकरीचं फळ. आता आयुष्य निवांत जाईल.”

    अलकाताईंनी मोबाइलकडे पाहिलं, मग त्यांच्या चेहऱ्याकडे. चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफेसोबत त्यांच्या डोळ्यांसमोर पस्तीस वर्षांचा संसार तरळून गेला…

    राहुल लहान असताना तापाने फणफणत होता, तेव्हा सलग तीन रात्री जागून काढलेले दिवस… सासूबाईंच्या आजारपणात केलेली सेवा… सुधीररावांच्या बदल्यांमुळे पुन्हा पुन्हा उखडलेलं घर… मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवलेले क्षण… या सगळ्यात साडी घ्यायची राहिली, मैत्रिणींसोबत फिरायला जायचं राहिलं, अगदी स्वतःकडे लक्ष द्यायचंही राहून गेलं.

    त्या हळूच म्हणाल्या, “अभिनंदन हो.”

    “धन्यवाद.”

    काही क्षण शांतता पसरली. मग अलकाताईंनी विचारलं, “एक विचारू?”

    “विचार ना.”

    “तुम्ही आता रिटायर झालात ना?”

    “हो.”

    “मग माझं रिटायरमेंटचं वय किती?”

    सुधीररावांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं…

    “म्हणजे?”

    अलकाताई शांतपणे बोलू लागल्या,

    “तुमची नोकरी पस्तीस वर्षांची होती. वयाची साठ वर्षं झाली आणि तुम्ही निवृत्त झालात. मीही पस्तीस वर्षांपासून या घरात काम करते आहे. लग्न झालं तेव्हा मी एकवीस वर्षांची होते. आज छप्पन्न वर्षांची आहे. माझी नोकरी कधी संपणार?”

    सुधीरराव काही बोलले नाहीत. अलकाताईंचा आवाज आता जरा भरून आला होता…

    “मी पैशांचा हिशेब मागत नाहीये हो! हा संसार मी प्रेमाने केला. पण मला एक सांगा… मला कधी रविवार मिळाला का? मला कधी रजा मिळाली का? मी आजारी असताना मला कोणी म्हणालं का, आज तू आराम कर?”

    सुधीरराव शांत होते. अलकाताई पुढे म्हणाल्या,

    “परवा शेजारच्या काकूंसोबत कीर्तनाला जायचं होतं. तिथे गरीब मुलांना खाऊ वाटायचा होता. पण माझ्याकडे जास्तीचें शंभर रुपयेही नव्हते. तुमच्याकडे मागायला संकोच वाटला. राहुलकडे मागावंसं वाटलं नाही… मग मी गेलेच नाही.”

    त्यांच्या डोळ्यात अश्रू आले…

    “अहो, मला पैशांचा मोह नाही. पण नातवासाठी एखादं चॉकलेट घ्यायचं असेल… स्वतःसाठी एखादं पुस्तक घ्यायचं असेल… एखादी साधी साडी आवडली असेल… तर प्रत्येक वेळी मी कोणासमोर हात पसरावा का? माझ्या हक्काचे चार पैसे माझ्या हातात असू नयेत का?”

    असं म्हणत त्या उठल्या. डोळे पुसले आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या. कारण दुपारच्या जेवणाची तयारी बाकी होती. गृहिणीचं काम कधीच संपत नसतं.

    त्या रात्री सुधीररावांना झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्यांनी अलकाताईंच्या आयुष्याचा इतक्या जवळून विचार केला.

    आपल्याला पगार मिळाला.

    बोनस मिळाला.

    आता पेन्शनही मिळते आहे.

    पण अलकाला काय मिळालं?

    फक्त जबाबदाऱ्या?

    दुसऱ्या दिवशी ते सकाळीच बँकेत गेले. तिथून एक फॉर्म घेऊन त्यावर अलकाताईंच्या सह्या घेतल्या. अलकाताईंनीही फार चौकशी न करता सह्या केल्या. पुन्हा बँकेत जाऊन सुधीररावांनी एक नवीन खाते उघडलं. आपल्या पेन्शनमधून दर महिन्याला ठराविक रक्कम त्या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था केली. दुपारी ते घरी आले. अलकाताईंना त्यांनी एक नवीन कोरे पासबुक आणि एटीएम कार्ड दिलं. अलकाताईंनी आश्चर्याने विचारले,

    “हे काय आहे?”

    “उघडून बघ.”

    त्यावर नाव लिहिलं होतं.

    अलका सुधीर देशपांडे. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं…

    “हे माझं? पण कशासाठी?”

    सुधीररावांनी त्यांचा हात हातात घेतला.

    “अलका, हा तुझ्या त्यागाचा मोबदला नाही. कारण तुझ्या त्यागाची किंमत मी कधीच मोजू शकत नाही. पण हा तुझा हक्क आहे. आजपासून माझ्या पेन्शनचा एक हिस्सा दर महिन्याला तुझ्या खात्यात जमा होईल. हा पैसा फक्त तुझा असेल. तुला कोणाकडेही मागावं लागणार नाही. पस्तीस वर्षे तू या घरासाठी जगलीस. आता थोडंसं स्वतःसाठी जग.”

    हेही वाचा – पोळी बदलली… आणि विचारही!

    अलकाताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या हळूच म्हणाल्या,

    “मला पैशांबद्दल आनंद नाही झाला हो.”

    “मग?”

    सुधीररावांनी विचारलं. अलकाताई हसल्या…

    “आज पहिल्यांदा असं वाटलं… या घरात मी फक्त जबाबदारी नव्हते. माझं अस्तित्वही आहे.”

    सुधीररावांनी त्यांचा हात घट्ट धरला. त्या दिवशी अलकाताईंना पैसे मिळाले नव्हते. त्यांना मिळाला होता सन्मान… स्वाभिमान… आणि आयुष्यभर दिलेल्या योगदानाची दखल!

    नोकरी करणाऱ्या माणसाला पेन्शन मिळते… पण घर उभं करणाऱ्या गृहिणीला किमान स्वाभिमानाची आर्थिक ओळख तरी मिळायला नको का?

    अनेक स्त्रियां स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःचं अस्तित्व विसरतात. त्यांचं पूर्ण आयुष्य संसारासाठी जातो. त्यांचा हक्क बनतो, पण त्याकडे दुर्लक्ष होतं. ‘सगळं तुझंच आहे,’ असं म्हणणं असतं. पण तसे अधिकार तिला मिळावे, हाच कथेचा उद्देश.

    आज गरज आहे प्रत्येक घरात सुधीररावांसारखा विचार रुजण्याची. जोपर्यंत घर उभं करणाऱ्या ‘तिचा’ हा अधिकार तिला मिळत नाही, तोपर्यंत घराला खऱ्या अर्थाने घरपण येणार नाही. चला, आजच सुरुवात आपल्या घरापासून करूया आणि प्रत्येक गृहिणीला तिचा हक्क अन् स्वाभिमान मिळवून देऊया!”

    Avatar photo
    तृप्ती देव

    मी भिलाई (छत्तीसगड) येथे वास्तव्यास असलेली गृहिणी आणि हौशी लेखिका आहे. मला स्वयंपाक, वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे. खाद्यसंस्कृती, सामाजिक विषय, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील अनुभवांवर मी ब्लॉग लेखन करते. कथाविश्व तसेच इतर विविध व्यासपीठांवर माझे लेख प्रकाशित होत असतात. एखादा विषय मनाला भिडला की, त्यावर सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून लिहिण्याचा मी प्रयत्न करते. भिलाई वनवासी महिला संघटनेची सदस्य म्हणून सामाजिक कार्यातही माझा सहभाग आहे. शब्दांच्या माध्यमातून सकारात्मक विचार, संस्कार आणि जीवनमूल्ये वाचकांपर्यंत पोहोचवणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे.

    Related Posts

    माहेर… जिथे लेकीचं वय वाढतं, पण मन लहानच राहतं!

    October 24, 2026 मैत्रीण

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026 मैत्रीण

    अष्टमी

    October 12, 2026 मैत्रीण
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    मैत्रीण

    माहेर… जिथे लेकीचं वय वाढतं, पण मन लहानच राहतं!

    By प्रणाली मंगेश महाशब्देOctober 24, 2026

    माहेर म्हणजे नेमकं काय असतं? चार भिंतींचं घर? आईच्या हातचं जेवण? बाबांची माया? भावाची साथ?…

    जब जिद पे आ गई पार्वती!

    October 15, 2026

    अष्टमी

    October 12, 2026

    तीन पिढ्या आणि ज्येष्ठा गौरी

    September 18, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026

    तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख

    October 29, 2026

    सत्याचा विजय होतोच, पण…

    October 29, 2026

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 488
    • अवांतर 217
    • आरोग्य 165
    • पंचांग आणि भविष्य 654
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 34
    • ललित 1027
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.