Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, October 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarOctober 30, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 30 ऑक्टोबर 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 08 कार्तिक शके 1948; तिथि : पंचमी 19:24; नक्षत्र : मृगशीर्ष 09:03;
    • योग : शिव 20:41; करण : कौलव 08:45, गरज 30:08;
    • सूर्य : तुळ; चंद्र : मिथुन ; सूर्योदय : 06:36; सूर्यास्त : 18:07;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    लेखक, कवी सुकुमार रॉय

    टीम अवांतर

    लोकप्रिय आणि प्रतिभावंत बंगाली लेखक, कवी, नाटककार आणि मुद्रक सुकुमार रॉय यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1887 रोजी कलकत्ता येथे झाला. सुकुमार यांचे वडील, उपेंद्रकिशोर राय हे एक प्रसिद्ध बंगाली लेखक, चित्रकार, व्हायोलिनवादक, संगीतकार, तंत्रज्ञ, हौशी खगोलशास्त्रज्ञ आणि उद्योजक होते. उपेंद्रकिशोर हे रवींद्रनाथ टागोर यांचे जवळचे मित्र. त्यामुळे त्यांचा सुकुमारवर यांच्यावर मोठा प्रभाव होता. सूर्य सेन स्ट्रीटवरील सिटी कॉलेज स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले.  त्यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी ‘नदी’ ही आपली पहिली कविता लिहिली. सुमारे वर्षभरानंतर त्यांनी ‘हिकरी, डिकरी, डॉक’ या बालगीताचा अनुवाद असलेले ‘टिक, टिक, टोंग’ हे गीत लिहिले.

    1906 मध्ये सुकुमार यांनी तत्कालीन कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात दुहेरी पदवी प्राप्त केली. इंग्लंडमधील लंडन काउंटी कौन्सिल स्कूल ऑफ फोटोएन्ग्रेव्हिंग अँड लिथोग्राफी आणि मँचेस्टर म्युनिसिपल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी येथे त्यांनी छायाचित्रण आणि मुद्रण तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले. ते भारतातील छायाचित्रण आणि लिथोग्राफीचे प्रणेते होते. एक तंत्रज्ञ म्हणून, त्यांनी हाफटोन ब्लॉक बनवण्याच्या नवीन पद्धती देखील विकसित केल्या आणि याबद्दलचे तांत्रिक लेख इंग्लंडमधील नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले.

    हेही वाचा – गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    भारतात परतल्यानंतर त्यांनी वडिलांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक ‘संदेश’ या मुलांच्या मासिकाचे संपादन आणि छपाईचे काम सांभाळले. हे मासिक बंगाली लहान मुलांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.

    सुकुमार यांनी बंगाली साहित्यात ‘नॉनसेन्स व्हर्स’ म्हणजे ज्याला निरर्थक किंवा गमतीदार कविता म्हणता येईल असा साहित्यिक  प्रकार सुरू केला. त्यांच्या विनोदबुद्धी, सूक्ष्म निरीक्षण कौशल्ये, मार्मिक विनोदबुद्धी आणि शब्द निवडीवरील प्रभुत्वामुळे त्यांचे साहित्य लहान मुलांना आणि प्रौढांनाही आवडायचे. त्यांची तुलना अनेकदा जागतिक दर्जाचे लेखक लुईस कॅरोल यांच्याशी केली जाते. कारण त्यांच्याही साहित्यात बालसुलभ विनोद, उपरोध आणि अद्भुत कल्पनाशक्ती पाहायला मिळते.

    अबोल ताबोल हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध कवितासंग्रह आहे. यातील गमतीशीर कविता आणि त्यांनी स्वतः काढलेली चित्रे आजही बंगालमध्ये घराघरांमध्ये वाचली जातात. याखेरीज हजबराल ही त्यांची एक अत्यंत लोकप्रिय बालकादंबरी/नाटक असून यात अद्भुत आणि चमत्कारिक पात्रांची कथा मांडली आहे. पगला दाशूमध्ये ‘दाशू’ नावाच्या एका शाळकरी मुलाच्या विक्षिप्त आणि गमतीशीर कारनाम्यांवर आधारित कथा आहेत. शाळेमध्ये त्यांचा एक वर्गमित्र होता, ज्याच्यापासून त्यांना दाशू या प्रसिद्ध विनोदी पात्राची प्रेरणा मिळाली.

    1922 मध्ये त्यांची रॉयल फोटोग्राफिक सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. त्यावेळी फेलो होणारे ते केवळ दुसरे भारतीय होते. सुकुमार रॉय यांचे वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी ‘लेशमॅनियासिस’ या संसर्गजन्य आजारामुळे 10 सप्टेंबर 1923 रोजी निधन झाले. ते आजारी असतानाही बेडवर पडून त्यांनी त्यांच्या अनेक प्रसिद्ध कविता लिहिल्या, तसेच मासिकाचे कामही सुरू ठेवले होते. त्यांचा हाच समृद्ध साहित्यिक आणि कलात्मक वारसा त्यांचे सुपुत्र सत्यजित रे यांनी पुढे नेला.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजचा दिवस नवीन आशा आणि संधी घेऊन येणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, मात्र वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. मालमत्तेच्या बाबतीत घाईने निर्णय घेणे टाळा. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. नवीन लोकांना भेटल्याने भविष्यातील प्रगतीसाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील आणि तुम्ही कामे उत्साहाने पूर्ण करू शकाल.

    वृषभ – आज नशीबाची मोठी साथ असेल. शिवाय तुमच्या मेहनतीला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये प्रगती होईल. संपत्तीसोबत तुमची प्रतिष्ठाही वाढू शकते. एखादे प्रलंबित काम पूर्ण होण्यासाठी ओळखीच्या व्यक्तीची मदत मिळेल. कामाच्या दबावामुळे दिवस व्यस्त असेल, मात्र कामाचा उरका आणि समजूतदारपणा यामुळे प्रत्येक जबाबदारी नीटपणे हाताळू शकाल.

    मिथुन – बऱ्याच काळानंतर आज एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये दिलासा मिळेल. दीर्घकाळापासून सुरू असणाऱ्या समस्या हळूहळू नाहीशा होतील, ज्यामुळे मानसिक पातळीवर शांतता अनुभवता येईल. बुद्धिमत्ता आणि कल्पकता यामुळे अवघड कामेही सहजपणे पूर्ण करण्यास तुम्ही सक्षम असाल. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींवर खर्च करण्याची इच्छा होईल. जुने आर्थिक प्रश्न सुटल्याने सुटकेचा निःश्वास सोडाल.

    कर्क – आज अचानक मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या कामाला गती मिळेल, त्यामुळे ते पूर्ण होण्याची आशा बळकट होईल. फक्त इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करणे टाळा, लहानसहान गोष्टींचेही आज वादात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा. शासकीय बाबींमध्ये संयम बाळगणे आवश्यक आहे. मालमत्तेसंबंधीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम आणि समजूतदारपणाने आजचा दिवस तुमचाच असेल.

    सिंह –  सार्वजनिक ठिकाणची तुमची वागणूक, आत्मविश्वास आणि गोड बोलणे इतरांना आज प्रभावित करेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल, ज्यामुळे भविष्यात प्रगतीच्या संधी मिळू शकतील. नोकरदारांना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसायातही सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्ही कठीण परिस्थितीला सामोरे जाल. आज आरोग्यात सुधारणा होईल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

    कन्या – आज, कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि जबाबदारीचे कौतुक होईल. वेळेवर कामे पूर्ण केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. संततीशी संबंधित कोणत्याही गोष्टीकडे वेळेत लक्ष द्या. बदलत्या हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, म्हणून काळजी घ्या. व्यवसायात काही मोठे बदल करण्याची योजना आखत असाल, तर आधी प्रत्येक पैलूचा विचार करा. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण कठोर परिश्रमाने चांगले परिणाम मिळू शकतात.

    तुळ – नात्यांमध्ये गोडवा आणि जीवनात आनंद घेऊन येणारा असा आजचा दिवस आहे. एखादा जुना व्यवहार पूर्ण केल्याने आर्थिक किंवा मानसिक दिलासा मिळू शकतो. शासकीय बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात गुंतलेल्यांनी आपल्या शब्दांकडे आणि निर्णयांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. संततीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील मेहनतीचे सकारात्मक परिणाम हळूहळू दिसू लागतील. धीर धरा, प्रयत्न सुरू ठेवा.

    वृश्चिक – आज संयम आणि समजूतदारपणा दाखविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरासाठी काहीतरी नवीन खरेदी करण्याचा विचार करू शकता. घराची सजावट करण्याच्या किंवा त्यात काही बदल करण्याच्या योजनाही पुढे जाऊ शकतात.  संततीसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगा. घाईने निर्णय घेणे टाळा. कोणाशीही वैयक्तिक बाबी शेअर करू नका. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांमुळे अनावश्यक मनस्तापातून सुटका होईल.

    हेही वाचा – बिस्किटं म्हणजे एका आरोग्यक्रांतीची चव!

    धनु – आजचा दिवस व्यस्त आणि काहीसा धावपळीचा असेल, पण मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी निर्माण होतील आणि तुम्ही त्या उत्साहाने स्वीकाराल.  कामाच्या ठिकाणी लहान-सहान तपशिलांकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. घाईगडबडीत काम करण्याऐवजी नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास यशाची शक्यता अधिक वाढेल. दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या आरोग्य समस्येतून आराम मिळण्याची शक्यता आहे.

    मकर – आज संपूर्ण दिवस सतर्कतेने आणि संयमाने काम करावे   लागेल. थोडासा निष्काळजीपणासुद्धा कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण करू शकतो. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी परिणामांचा विचार करा. विद्यार्थ्यांवरील ताण कमी होईल आणि अभ्यासात त्यांची एकाग्रता वाढेल. कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. फक्त स्वतःची समज आणि विवेकबुद्धी वापरा. ​सकारात्मक मानसिकतेने पुढे वाटचाल करा.

    कुंभ – आज प्रगती आणि उन्नतीच्या नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्यांमुळे आत्मविश्वास वाढेल, तिथे स्वतःची कौशल्ये दाखवण्याची संधी मिळेल. सरकारी नोकरीसाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागू शकते, पण संयम ठेवणे फायदेशीर ठरेल. भविष्यासाठी नवीन योजना आखाल आणि त्या पूर्ण करण्यासाठी गंभीर प्रयत्न कराल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेचा फायदा घेण्यासाठी तयार रहा.

    मीन – नवी ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे जाण्याचा आजचा दिवस आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संवाद साधताना गैरसमज टाळण्यासाठी आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचा प्रभाव वाढू शकतो. त्यांच्या प्रतिष्ठेत वाढ होण्याची चिन्हे आहेत. संततीला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑक्टोबर 2026

    October 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    घराचे मुख्य प्रवेशद्वार, पितृपद आणि दरवाजाचा रंग

    October 28, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    By अस्मिता दीक्षितOctober 30, 2026

    || श्री स्वामी समर्थ || संथ असणाऱ्या पाण्यात खडा टाकला तर जे होते, तेच राहू…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 ऑक्टोबर 2026

    October 29, 2026

    घराचे मुख्य प्रवेशद्वार, पितृपद आणि दरवाजाचा रंग

    October 28, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 ऑक्टोबर 2026

    October 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026

    तिची पेन्शन… स्वाभिमानाची नवी ओळख

    October 29, 2026

    सत्याचा विजय होतोच, पण…

    October 29, 2026

    गुरूमंत्र… शिष्याची श्रद्धा आणि गुरूंची व्याकुळता

    October 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 488
    • अवांतर 217
    • आरोग्य 165
    • पंचांग आणि भविष्य 654
    • फिल्मी 76
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 34
    • ललित 1027
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtra

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू

    October 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा

    October 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 ऑक्टोबर 2026

    October 30, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.