पडवळाच्या आमटीसाठी…
साहित्य
- तुरीची डाळ – पाऊण वाटी
- पडवळ – तीन वाट्या (बारीक चिरलेले)
- ओल्या मिरच्या – 4
- सुक्या मिरच्या – 4
- खोवलेले खोबरे – एक वाटी
- धणे – एक चमचा
- जिरे – एक चमचा
- चण्याचे पीठ – दोन चमचे
- दाण्याचे कूट – पाव वाटी
- अमसुले – 2
- मीठ – चवीपुरते
- गूळ – चवीपुरते
- कढीलिंब – 7-8 पाने
- फोडणीचे साहित्य
कृती
- प्रथम डाळ शिजवावी.
- फोडणी करून त्यात पडवळाच्या फोडी, सुक्या मिरच्या आणि कढीलिंब टाकून वाफ आणावी आणि नंतर त्यात शिजलेली डाळ घालावी. त्यात, हवे असेल, तेवढे पाणी घालून उकळी आणावी.
- धणे, जिरे, ओले खोबरे आणि ओल्या मिरच्या वाटून घ्याव्या. हा वाटलेला गोळा तसेच अंदाजाने मीठ, गूळ आणि अमसुले उकळत असलेल्या आमटीत टाकावी.
- नंतर दाण्याचे कूट आणि चण्याचे पीठ पाण्यात कालवून आमटीला लावावे, म्हणजे आमटी मिळून येते.
हेही वाचा – Recipe : गोळ्यांचे सांबार अन् गोळ्यांची आमटी करून पाहिले आहे का?
टीप्स
- पडवळाऐवजी कोबी, दूधभोपळा अथवा काकडी घालूनही ही आमटी करता येते.
- त्या त्या भाज्यांप्रमाणे निरनिराळा स्वाद येतो आणि चवही निराळी लागते.
दोडके भातासाठी…
साहित्य
- तांदूळ – दोन वाट्या
- कोवळे दोडके – अर्धा किलो
- हिरव्या मिरच्या – 6
- आलं – एक इंच लांबीचे दोन तुकडे
- धण्याची पूड – 2 चमचे
- जिऱ्याची पूड – 1 चमचा
- मीठ – चवीनुसार
- ताक – एक वाटी
- कोथिंबीर – मुठभर (बारीक चिरलेली)
- ओले खोबरे – अर्धी वाटी
- फोडणीचे साहित्य
कृती
- प्रथम तांदूळ भाजून चार तास गरम पाण्यात भिजत घालावेत. नंतर उपसून ठेवावेत.
- दोडके जून असल्यास, त्यांच्या शिरा काढून टाकून ते किसणीने किसून घ्यावेत.
- एका पातेल्यात फोडणी करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे (चवीप्रमाणे), आल्याचा किस आणि दोडक्याचा किस घालून चांगले परतावे.
- नंतर त्यात तांदूळ घालून पुन्हा परतावेत आणि एक वाफ आणावी.
- नंतर त्यात धण्या-जिऱ्याची पूड आणि चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर भात शिजत ठेवावा.
- थोड्या वेळाने त्यावर थोडे ताक शिंपडावे आणि झाकण ठेवावे.
- भात झाल्यावर वाढावयाच्या वेळी त्यावर खोबरे आणि कोथिंबीर घालून वाढावे.
हेही वाचा – Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!
टीप्स
- हा भात शिजण्याकरिता वेगळे पाणी घालावे लागत नाही. दोडक्यातल्याच पाण्यावर आणि वाफेवरच शिजल्यामुळे त्याला एक निराळाच रुचकरपणा येतो. या भाताला रंगही चांगला येतो.
- मिरच्यांचे तुकडे घालण्याऐवजी मिरच्या वाटून घातल्यासही चालते आणि त्यामुळे रंगही आणखी चांगला येतो.


