Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पाणीपुरी आणि फक्त पाणीपुरी

    October 24, 2026

    ब्रेड आवडतो? मग विकत घेताना ‘या’ गोष्टी नक्की तपासा…

    October 24, 2026

    माहेर… जिथे लेकीचं वय वाढतं, पण मन लहानच राहतं!

    October 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पाणीपुरी आणि फक्त पाणीपुरी
    ललित

    पाणीपुरी आणि फक्त पाणीपुरी

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेOctober 24, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, पराग गोडबोले, लेखक पराग गोडबोले, चाट प्रकाराची महाराणी, पाणीपुरी, गोलगप्पेत, पाणी पुरी, टेस्टी पाणीपुरी, पाणीपुरीचा आस्वाद, पाणीपुरीची गाडी, पाणीपुरीचा आनंद, घरची पाणीपुरी
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    वेळ कुठलीही असावी, कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा कंपू असावा, सगळे हसत खिदळत असावेत, समोर पाणीपुरीची गाडी दिसावी आणि कोणीतरी म्हणावं, “चला, पाणीपुरी खाऊया…”

    रम्य संध्याकाळ असावी, सोबत प्रेयसी असावी, हातात हात गुंफलेले असावेत आणि समोर पाणीपुरीची गाडी दिसताच तिने म्हणावं, “चल, पाणीपुरी खाऊया…”

    पुन्हा रम्य संध्याकाळ असावी, लग्न नुकतंच झालेलं असावं, नातं अगदी नवथर असावं आणि समोर पाणीपुरीची गाडी दिसताच तिने म्हणावं, “चल, पाणीपुरी खाऊया…”

    तशीच एक संध्याकाळ असावी, लग्नाला थोडी थोडकी नव्हे, तर पंचवीस वर्षं झालेली असावीत. नुकतंच कडाडून भांडण झालेलं असावं आणि समोर पाणीपुरीची गाडी दिसताच त्याने म्हणावं, “चल, पाणीपुरी खाऊया…”

    पुन्हा तशीच एक संध्याकाळ असावी, कातर नाही म्हणणार मी, पण लग्नाला पन्नास वर्षं झाली असावीत, दोघांनाही कवळ्या आणि हातात काठी असावी, समोर पाणीपुरीची गाडी दिसावी आणि दोघांनीही म्हणावं, “चल, पाणीपुरी खाऊया…”

    हेही वाचा – मनात घर करू बसलेली ‘सुशीला’!

    आयुष्याच्या कुठल्याही वळणावर असताना जिच्यासाठी ‘नाही’ किंवा ‘नको’’ हे शब्द शब्दकोषातून पार पुसून टाकले जावेत, अशी सखी म्हणजे पाणीपुरी. महती फार थोर तिची. उत्तरेत तिला ‘गोलगप्पा’ म्हणतात म्हणे, पण हे नाव काही आपल्याला रूचत नाही आणि पचत तर त्याहून नाही! अगदी ‘पानीपुडी’ असं कोणी म्हणलं तरी टाळकं सटकतं!!!

    हृदयाच्या कप्प्यात या ‘पाणीपुरी’ नामक परीची एक खास जागा असते, सगळ्यांच्याच! पाणीपुरी म्हणजे जीव ओवाळून टाकावी, अशी नजाकत!! गोल गरगरीत पुरी अंगठ्याने फोडून, त्यात थोडासा रगडा घालून, चरचरीत, आंबट, तिखट आणि काहीशा गोड अशा पाण्याच्या हंड्यात किंवा पातेल्यात डुबकी घेऊन नखशिखांत ओली होऊन,  उत्सुकतेने हाती धरलेल्या ताटलीत आली, की अर्धी लढाई जिंकली जाते…

    मग ती हळुवार उचलून, फुटणार नाही याची काळजी घेत मोठ्ठा ‘आ’ करत,  तोंडात सोडली की, भयंकर विस्फोट होतो तोंडात, डोळे मिटलेच जातात आणि आपण आपले राहातच नाही. तिचेच होऊन जातो पूर्णपणे! पहिली पूर्ण खाऊन व्हायच्या आधीच ताटलीत दुसरी आलेली असते आणि मग हातघाई सुरू होते. हात कानावर घट्ट दाबला जातो आणि तनामनावर सुखाच्या लहरी उमटत राहतात… एका पाठोपाठ एक, निरंतर. वडवानल ग्रासून आणि वेढून टाकतो अवघ्या शरीराला. खाऊन झाल्यावर मग एक सुकी पुरी मागितली जाते, मुखशुद्धीसाठी आणि तेव्हा कुठे आत्मा सुखावतो.

    हेही वाचा – शोध कळणाच्या भाकरीचा!

    चाट या प्रकाराची महाराणी म्हणजे पाणीपुरी! बाकी शेवपुरी, दहीपुरी, रगडा पॅटिस वगैरे पण तितकेच मातब्बर… पण या सगळ्यांचं नेतृत्व करावं ते पाणीपुरीनेच. तिने पुढं चालावं आणि या सगळ्यांनी चवऱ्या ढाळाव्यात, तिने पालखीत बसावं आणि बाकीच्यांनी भोई व्हावं… अशी तिची महती.

    बाहेर खाताना चाळीस, पन्नास रुपये मोजून पाच-सहा पुऱ्या खाणं हा मात्र आतबट्याचा व्यवहार असतो. नुसतीच जीभ चाळवली जाते आणि मन काही भरत नाही. मग बायकोला लग्गा लावला जातो. शंभर पुऱ्याचं पाकिट आणून रगडा, खारी बुंदी, उकडलेले मूग आणि तिच्या हातचं चविष्ट पाणी असं सगळं घेऊन जमिनीवर ठाण मांडून बसावं लागतं. पंचवीस तीस पुऱ्या खाल्यावर मध्यंतर होतं आणि संपलेला रसद पुरवठा सुरळीत करून, परत एकदा आडवा हात मारल्यानंतरच या व्रताची सांगता होते. जाता जाता,  वाटीभर पाणी पिऊन मगच मी हात धुवायला उठतो.

    एवढं सगळं यथासांग होऊनसुद्धा शेवटी ‘घर की मुर्गी दाल बराबर’ या उक्तीला जागत, बोलावू लागते चाटची गाडी आठवड्याभरातच! भय्याने त्याचा हात यथासांग बुडवून ताटलीत ठेवलेल्या पाणीपुरीला सन्मान देण्यासाठी… एकच प्यालासारखी ती एकच पुरी व्यसनाधीन करण्यासाठी पुरेशी असते. तो काय वापरतो, कुठे तयार करतो हे सगळं नजरेआड करून पाय वळतातच चाटच्या गाडीकडे परत परत, माझे तरी! तुमचं मला ठाऊक नाही…

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    October 23, 2026 ललित

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026 ललित

    ‘म्युट’ नवरा

    October 22, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    By प्रणाली वैद्यOctober 23, 2026

    भाग – 48 “शर्वाय!” आराध्या त्याच्याकडे बघत म्हणाली, “तुमचं स्थान… तुमचा प्रभाव… कदाचित तुमचं आयुष्य……

    शरयूच्या प्रश्नाने उमाला चिंता

    October 23, 2026

    ‘म्युट’ नवरा

    October 22, 2026

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पाणीपुरी आणि फक्त पाणीपुरी

    October 24, 2026

    ब्रेड आवडतो? मग विकत घेताना ‘या’ गोष्टी नक्की तपासा…

    October 24, 2026

    माहेर… जिथे लेकीचं वय वाढतं, पण मन लहानच राहतं!

    October 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : येवढे गा प्रतीती, तो देहा आलासे वस्ती

    October 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 ऑक्टोबर 2026

    October 24, 2026

    माधवसोबतची ती अज्ञात व्यक्ती कोण?

    October 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 481
    • अवांतर 217
    • आरोग्य 163
    • पंचांग आणि भविष्य 644
    • फिल्मी 75
    • फूड काॅर्नर 262
    • मैत्रीण 33
    • ललित 1013
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पाणीपुरी आणि फक्त पाणीपुरी

    October 24, 2026

    ब्रेड आवडतो? मग विकत घेताना ‘या’ गोष्टी नक्की तपासा…

    October 24, 2026

    माहेर… जिथे लेकीचं वय वाढतं, पण मन लहानच राहतं!

    October 24, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.