Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, October 7
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक
    फिल्मी

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    सुरेखा मोंडकरBy सुरेखा मोंडकरOctober 6, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सुरेखा मोंडकर, लेखिका सुरेखा मोंडकर, दूसरा आदमी, विवाहबाह्य संबंधांवर भाष्य, ऋषी कपूर, नीतू सिंग, अभिनेत्री राखी, शशी कपूर, अच्छा है सँभल जाए, भुरळ घालणारे कथानक, दुसरा आदमी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी ‘दूसरा आदमी’ हा एक आहे. 1977मध्ये आलेल्या यश चोप्रांच्या या सिनेमात विवाहबाह्य संबंधांवर भाष्य केलेलं आहे. जास्त गुंत्यात न जाता, समाजमान्य मतांसमोर जटील, तापदायक प्रश्न उभे न करता केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित केलं आहे. दरीच्या काठावर उभी असणारी व्यक्ती दरीत कोसळली तर एक दु:खद घटना घडेल… निराळे विचार, भावना आणि परिणाम होतील आणि जर ती सावरली, तिथून परत फिरली तर; तिथपर्यंत ती ज्या कारणांमुळे पोहोचली ते व्रण राहतील; पण हळूहळू ते सुकतील! त्यावर खपली धरेल! नवी त्वचा येईल! कदाचित एक नवीन आयुष्य सुरू होईल.

    हा सिनेमा खोल दरीपर्यंत पोचलेल्या, पण योग्यवेळी तोल सावरून परत फिरलेल्या, दु:खाने सैरभैर झालेल्या निशाचा (राखी) आहे. दिग्दर्शक आहेत रमेश तलवार!

    ‘नज़रों से कह दो, प्यार में मिलने का मौसम आ गया…’ अशी एकमेकांबद्दल आतुरता असणारे दोघे – करण सक्सेना (ऋषी कपूर) आणि तिम्सी (नीतू सिंग) प्रेमात आकंठ बुडाले होते. दोन्ही कलाकार प्रत्यक्षात पण प्रेमात असल्याने, दोघांची अफलातून केमिस्ट्री जुळलेली  आहे. त्यांनी आधीचे प्रेमवेडे आणि नंतर विवाह झाल्यावर कृतार्थ दोघे खूप लोभसपणे व्यक्त केले आहेत.

    आँखों में काजल है, काजल में मेरा दिल है
    चलो दिल में बिठा के तुम्हें तुमसे ही प्यार किया जाए…

    हेही वाचा – माणूस नावाचं रसायन!

    या एकमेकांना दिलेल्या आणाभाका, त्यांच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त होतात. बर्फाळ काश्मीरमधील काकडणाऱ्या थंडीत एकमेकांच्या उबेत असणारे ते दोघे. त्यांच्या हनिमूनच्या वेळी खोलीत, टेबलावर साठलेले तीन-चार दिवसांचे अन्नपदार्थ आणि बंद दारावर खडूने लिहिलेले – ‘Please  do not  disturb…  हमें भूख नहीं है!’ यातून त्यांचं झोकून देऊन एकमेकांवर केलेलं तारुण्यसुलभ प्रेम कळतंच, पण नंतर कथेला मिळालेल्या कलाटणीमुळे; घरातल्या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता केलेल्या लग्नानंतर, एक जोडपं म्हणून दोन प्रेमिकांच्या आयुष्यात कशी वादळ येतात, त्यांच्या टवटवीत प्रेमाची कशी पानगळ सुरू होते; हा विरोधाभास आपल्याला भयचकित करतो

    विवाह झाल्यावर, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी करण एक Advertising  agency  सुरू करतो. तिथे एक designer  तो नोकरीवर ठेवतो. अत्यंत देखणी, बुद्धिमान, सौंदर्यदृष्टी आणि  कलात्मकता यांचा आकर्षक मिलाफ असणारी निशा (राखी) त्याच्या ऑफिसात आणि जीवनात प्रवेश करते. निशा आधीच पोळलेली असते. तिच्या प्रियकराच्या (शशी कपूर) अकाली मृत्यूच्या धक्यातून ती अजून सावरलेली नसते. इथे कलाकारांची निवड अत्यंत योग्य केलेली  आहे. शशी कपूर आणि ऋषी कपूर यांच्यामधील साम्य, कथेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरलंय.

    करणच्या प्रत्येक हालचालीत निशाला शशी दिसतो. ती त्याच्यात गुंतत जाते. आपल्या अधुऱ्या प्रेमकहाणीची स्वप्नं ती करणच्या सहवासात बघायला लागते. या प्रगल्भ, परिपूर्ण, बुद्धिमान निशाच्या प्रेमपाशात करण पूर्णपणे अडकतो…

    आओ मनाये जश्न-ए-मोहोब्बच त मोहब्बत, जाम उठाये जाम के बाद
    शाम से पहलो कौन सोचे, क्या होना है शाम के बाद…

    आयुष्यातील आनंदाचे चषक दोघेही बेधुंद होऊन चाखतात. निशाने करणची उष्टी सिगरेट ओढणं, त्याच्या उष्ट्या चषकामधून वारुणीचा स्वाद घेणे… हे सर्व निशाच्या मित्राला (परीक्षित सहानी) अस्वस्थ करतं… हे संबंध लपून राहण्यासारखे नसतात आणि कोणाला मान्य होण्यासारखे पण नसतात, करणच्या वैवाहिक आयुष्यात आगडोंब उसळतो. तम्सी पण सहजासहजी हार मानणारी नसते. निशाच्या आयुष्यात उलथापालथ घडते. अपमान, मानहानी, तिरस्कार तिच्या वाट्याला येतो.

    करणच्या गद्धे पंचविशीला हा उतावीळपणा शोभेसा होता, पण निशाच्या वयानुरूप आलेल्या प्रगल्भतेला हा उतरणीचा रस्ता कुठे नेणार आहे, ते कळत होतं. करण तिच्यावर प्रेम करत असतो, पण ती करणवर प्रेम करीत नसते तर, त्याच्यात दडलेल्या शशीवर प्रेम करत असते… करण असतो, ‘दूसरा आदमी’ शशी नसतोच!

    हेही वाचा – कालातीत कलाकृती…

    धुक्याने गच्च भरलेल्या जंगलात, कुणालाही न जुमानता करण तिला पुन्हा पुन्हा साद घालतो,  आमंत्रण देतो…

    क्या मौसम है, ऐ दीवाने दिल
    अरे, चल कहीं दूर निकल जाए…

    अत्यंत विचारपूर्वक,  अतीव वेदनेने मनाला लगाम घालून… भावनांना बांध घालून निशाने कठोर निर्णय घेतलेला असतो,

    अच्छा है सँभल जाए…

    त्याच्या आर्त हाकेकडे अत्यंत उदासपणे दुर्लक्ष करून ती धुक्यात हरवलेल्या वाटेवरून निराशेच्या अंधारात नाहीशी होते.

    राखीला उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून नॉमिनेशन मिळालं होतं. करण जोहरचा ‘ए दिल है मुश्कील’ हा सिनेमा याच कथानकावर आधारित आहे. यात रणबीर  (पुन्हा कपूर) ऐश्वर्या आणि अनुष्का यांनी या भूमिका केल्या आहेत. कोणाच्याही मनाला भुरळ घालेल असंच हे कथानक आहे. ‘महाजाला’त सापडला तर नक्की बघा! पण जरा सांभाळून, ‘दूसरा आदमी’  नावाचा रामसेचाही एक सिनेमा आहे! तेव्हा जरा काळजी घ्या!

    Avatar photo
    सुरेखा मोंडकर

    लेखिका सुरेखा मोंडकर या M A, B Ed, माजी मुख्याध्यापिका (मराठी माध्यम हायस्कूल) आहेत. याशिवाय, समाजकार्यकर्ती, Rotarian, आकाशवाणी कलाकार, हौशी नाट्यकर्मी (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), कथाकथनकार, समुपदेशक (मानसशास्त्र), निसर्ग/ बागप्रेमी, यूट्यूबर आणि दोन इंजिनीअरिंग कंपनीच्या संचालिका देखील आहेत.

    Related Posts

    एका नदीची गोष्ट…

    October 4, 2026 फिल्मी

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026 फिल्मी

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    एका नदीची गोष्ट…

    By विशाल कुलकर्णीOctober 4, 2026

    बंगाली चित्रपटसृष्टी ही एक निराळेच जग आहे. सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक, तपन सिन्हा,…

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026

    Movie : ‘The Intouchable’… जगावेगळी कहाणी

    September 14, 2026

    ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा

    September 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026

    उंबऱ्यापलीकडचा सातबारा

    October 6, 2026

    दूसरा आदमी… मनाला भुरळ घालणारे कथानक

    October 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बंधु कां न बंधिजे, हें जाणणें मज माझें

    October 6, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 460
    • अवांतर 216
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 617
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 975
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 07 ऑक्टोबर 2026

    October 7, 2026

    फूल ना फुलाची पाकळी

    October 6, 2026

    पुण्यकर्म

    October 6, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.