Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, October 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मायेचा ओलावा
    ललित

    मायेचा ओलावा

    अतुला प्रणव मेहेंदळेBy अतुला प्रणव मेहेंदळेOctober 5, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मी मराठी, अभिजात मराठी, अतुला प्रणव मेहेंदळे, अतुला मेहेंदळे, लेखिका अतुला प्रणव मेहेंदळे, मायेचा ओलावा, आई मुलीचे नाते, आई मुलीचा स्नेहबंध, भावाचा बहिणीशी अबोला, प्रॉपर्टीची वाटणी, आईचा मृत्यू, आईची माया, आईचे प्रेम, आईचे अनमोल प्रेम,
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आपलं आटोपून दिलीप नाश्ता करायला बसला. समोरच दामिनी बसली होती. अगदी शून्यात नजर लावलेली, प्लेटमधला नाश्ता थंड झालेला, चमच्याने इतरत्र फक्त घोटाळत राहिली होती… तिला भानच नव्हतं कशाचं! तिची अवस्था दिलीपला खरंतर बघवत नव्हती. पण काळ हेच औषध आहे, हे दिलीपला कळत होत. तो दमिनीला सध्यातरी फक्त सोबत करू शकत होता. काहीही झालं तरी ‘मी आहे’ ही जाणीवच तिला मानसिक बळ देईल, याची त्याला खात्री होती. म्हणून तो नाश्ता करून दामिनीला समजावत म्हणाला, “दामिनी, अगं नको एवढा विचार करूस. आलेल्या प्रत्येकाला जायचंच असतं ग! मला माहिती आहे, हे सांगणं सोपं आहे. मलाही खूप वाईट वाटतंय गं… तू सावर स्वतःला… मी उद्याची सुट्टी टाकली आहे, आपण जाऊ दोघे.” यावर दामिनीने कसनुसं तोंड करत एक मोठ्ठा उसासा सोडला. कसेबसे दोन घास पोटात ढकलून ती उठलीच…

    काही म्हणजे काही करवत नव्हतं तिला. थोड्या वेळाने दिलीप कामावर गेला. दामिनीने मात्र आज आणि उद्याची ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी टाकली. दिवस इकडे तिकडे करण्यात जात होता, पण रात्री आठवणींची दाटी व्हायची आणि पाणावलेले डोळे जराही किलकिले सुद्धा व्हायचे नाहीत. मग झोप तर दुसरीच गोष्ट होती. विचार करतच ती बाल्कनीत आली. आजूबाजूला सगळं रोजचंच होतं, पण आज तिला जास्तच अस्वस्थ वाटत होतं. तिची लाडकी आई जाऊन उणेपुरे 11 दिवस झाले होते. उद्या बारावं आणि तेरावं एकत्र करायचं, असं भावंडांनी ठरवून टाकलं आणि हिला फक्त सांगितलं… दामिनीच्या वहिनीने तेवढ्यापुरताच फोन केला. दामिनीला जास्त वाईट नाही वाटलं… कारण आताशा या सगळ्याची सवय झाली होती तिला. 10 वर्षांपूर्वी तिने दिलीप मेहता नावाच्या मुलाशी, घरच्यांचा विरोध होता म्हणून पळून जाऊन लग्न केलं आणि घरच्यांनी संबंध तोडले. तिच्याहून 8 वर्षांनी मोठा असलेला भाऊ आणि वहिनीने तर तिचं नावच टाकलं. तिची आई मात्र कधीमधी यायची तिच्याकडे.

    लग्नानंतर दोनच वर्षांनी बाबा गेले, त्यामुळे तिला आईचाच आधार होता. मैत्रिणी अशा तिच्या खूप काही नव्हत्या, पण होत्या त्याही आता त्यांच्या त्यांच्या संसारात रमल्या होत्या. हिच्या लग्नाला मात्र 10 वर्षं होऊनही अजून पाळणा हलला नाही म्हणून आईच्या जीवाला घोर लागला होता. तो घोर घेऊनच ती गेली.

    आईचा सहवास तसा कमीच मिळाला तिला. बाविसाव्या वर्षीच लग्न केलं. आई तशी नेहमी हिच्या बाजूने असायची. पण आप्पांमुळे आईला कधीच उघड उघड हिला पाठिंबा देता आला नाही. हिला नेहमीच वाटायचं प्रेमविवाह केला म्हणून वडील आणि सख्ख्या मोठ्या भावांनी हिला पूर्ण वाळीत का टाकावं? खरंतर, घरातलं शेंडेफळ म्हणून खूप लाड केले हिचे सर्वांनी. आप्पांची तर दामिनी लाडकी होती. पण मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून त्यांनी पण तिचं नाव टाकलं. ते गेले आणि जणू हिच्या मागचा खंबीर आधारच गेला.

    हेही वाचा – आईचं वाण…

    दमिनीची मात्र पहिल्यापासूनच आई जवळची. सगळं येऊन आईला सांगणार. अगदी लग्न करतेय, हे सुद्धा फक्त तिने आईला सांगितलं होतं. आईने सुद्धा आपलं कमी नाही केलं. तिला आजही अगदी सगळं आठवत होतं. दर रविवारी रात्री तिच्या काळ्याभोर दाट आणि लांब केसांना आई ऊन-ऊन तेल लावून द्यायची आणि तेव्हाचा तो वेळ फक्त दोघींचा असायचा. खूप गप्पा, मनातली असंख्य वावटळ, हसरे कोमल क्षण तेव्हाच तर टिपायच्या त्या दोघी! लग्नानंतर पण इथे आली की, हा कार्यक्रम असायचाच फक्त दोघींचा. मग तेव्हा दिलीपही दोघींमध्ये येत नसत.

    असं म्हणतात की, ठराविक वयानंतर आई आणि मुलगी एकमेकींच्या मैत्रिणी होतात. ते मैत्रीचं अबोल, मुग्ध, नुसतं डोळ्यातून ही कळणार नातं त्या दोघींनी जपलं होतं. अगदी जातानाही आईने, “एकदा शेवटचं बघायचं आहे दमुला. बोलवा तिला…” अशी इच्छा व्यक्त केली म्हणून मोठ्या वहिनीने “भावांच्या नकळत हळूच येऊन जा एकदा, म्हणजे आई सुटतील.” असं सांगितलं आणि पायाखालची जमीनच सरकली आपल्या. इतका शेवट आल्यावर आपल्याला सांगितलं म्हणून खरंतर खूप रागावली ती. तसे आईचे फोन गेले काही दिवस कमी झाले होते. आपल्याला शंका येऊ नये म्हणून आई शांत राहिली, पण बाकीच्यांनाही आज आपण आठवावं, याचं तिला वाईट वाटलं.

    ती तशीच धावत धावत नाशिकहून मुंबईला आली. आईने तिला डोळे भरून बघितलं. रात्रभर न बोलताही खूप काही सांगणारी आई बघून दामिनीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबेना… आणि दुसऱ्याच दिवशी आई गेली. फोनची रिंग वाजली आणि विचारांच्या तंद्रीतून दामिनी बाहेर आली. पलीकडे फोनवर चक्क मोठा भाऊ होता… “उद्या येशील तेव्हा वेळ काढून ये. बोलायचं आहे वकीलसाहेबांना. त्यांनी निरोप द्यायला सांगितला म्हणून फोन केला.” इकडून दामिनी ‘हो’ ‘नाही’ काय म्हणतेय, हे ऐकून न घेताच त्याने फोन ठेवला. हिला मात्र कोण आनंद झाला. इतक्या वर्षांनी दादा निदान दोन वाक्य तरी माझ्याशी बोलला! तिला आता मात्र आईची अजूनच आठवण आली.

    दुसऱ्या दिवशी दिलीप आणि दामिनी पोहोचले, तेव्हा सर्व विधी होत आले होते. विधी झाले. जेवणं झाली. इतर सर्व लोक आपापल्या घरी गेले आणि वकीलसाहेब आले. आईच्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे सगळं करायचं, असं दादाने सांगून टाकलं… ते वाचायच्या आधीच! कारण कदाचित त्याला दामिनीने तर, पळून जाऊन मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून आपल्यालाच सगळं मिळेल असं वाटत असेल… आणि मागाहून दामिनीने काही मागत बसायला नको, असा त्याचा सुप्त हेतू दामिनीने ओळखला होता. दामिनी आपली कोपऱ्यात काहीही न बोलता उभी होती. तिला मुळात आईच्या कशातच काही नको होतं. आईचं मिळालेलं प्रेमच तिच्यासाठी आयुष्यभराची कमाई होती. या दोघांमुळे आई कधी सलग महिनाभर आपल्याकडे रहायला सुद्धा येऊ शकली नाही. तिचं कोडकौतुक मनासारखं करता आलं नाही. बिचारी दादाला घाबरत घाबरत चार दिवस यायची, तेही दुसरीकडेच जातेय असं सांगून. मग आता ती गेल्यावर काय करायचा तिचा कष्टाने कमावलेला पैसा, सोनं घेऊन! अगदी काही काही नको आपल्याला. फक्त आईची आठवण म्हणून एखादी गोष्ट मिळाली तरी खूप होईल…

    अशा विचारात असताना वकील घोरपडेंनी वाचनाला सुरुवात केली. अख्खे वाचन होईपर्यंत हिचं लक्षच नव्हतं कशात. अशी कुठली एक वस्तू आपण घेऊ शकू, जी आजन्म आपल्याला आईची सोबत देईल, याचाच ती विचार करत होती… “अहो वन्स, तुमचं लक्ष कुठे आहे? आईंनी त्यांचे दोन हार आणि दोन गोठ तुम्हाला दिलेत. शिवाय एकूण संपत्तीपैकी 50% मालकीण केलं आहे तुम्हाला. काय बाई एकेकीचं नशीब. काहीही न करता तुम्हाला एवढं अर्ध कशाला दिलं सासूबाईंनी कोण जाणे? मी इतकी वर्षं करतेय त्याचं काही नाही. तुमच्यामुळे तर काही वर्षांपासून त्यांना नुसता डोक्याला ताप झाला होता.”

    हेही वाचा – अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!

    वहिनी तिला बोलून नुसतं हैराण करायला लागली, तेव्हा तिला शांत करत आणि स्वतःला त्याहीपेक्षा शांत ठेवत दामिनी म्हणाली, “वहिनी, काळजी करू नकोस. मला आईने दिलं आहे त्यातलं काहीही नको. अगं, माझा काही हक्क नाही गं त्यावर. तिने तिच्या आणि आप्पांच्या कष्टाने कमावलेलं आहे हे! आप्पा तर मनात राग ठेवूनच गेले, तीच बोच अजून मनातून जात नाहीये. त्यामुळे ते घेणारी मी कोण गं? वकीलसाहेब मला यातलं काहीही नको. त्यासंदर्भात जे काही कागदपत्र बनवायची आहेत, ती बनवा… मी स्वखुशीने सही करायला तयार आहे… आणि वहिनी, तुम्ही आईवरती किती कष्ट घेतलेत ते माहीत आहे मला. आईकडून कळायचं मला तुमच्याबद्दल. ती तुम्हाला न सांगता कित्येकदा माझ्याकडे यायची रहायला. कारण तुम्हाला सांगून येण्याची सोय नव्हती. साधं घरात धड खायला देत नव्हतात तुम्ही तिला. दादा, अरे माझ्याशी बोलणं टाकलंस तरी, निदान जन्मदात्रीला तरी सुखात ठेवायचंस. तिथे तरी तुमचा मायेचा ओलावा झिरपू द्यायचात. पण त्यासाठी आतून प्रेम आणि नात्याची जाण वाटायला आणि ठेवायला लागते. असो! तसं हे सगळं तुमचंही नाहीच आहे. पण तरी तुमचं नसूनही तुम्हाला मिळालेलं आणि मीही तुम्हाला देऊन टाकलेलं तुम्हाला लखलाभ.”

    नंतर ती आत गेली आणि आईच्या कपाटातून एक साडी घेऊन आली. “मी ही आईची नव्हे, आमच्या आजीने आईला आई-आप्पांच्या लग्नाला 25 वर्षं झाली, तेव्हा आईला दिलेली साडी घेऊन जातेय. नव्हे, पिढ्यनुपिढ्या लाभलेली मोठी संपत्ती घेऊन जात आहे. बाकी आता या घराशी माझा तसूभर असलेला ऋणानुबंध आता आईबरोबरच संपला. चला दिलीप… आता आपलं इथे काहीही राहिलं नाही.”

    असं म्हणून ती रडतच आईच्या फोटोला शेवटचा नमस्कार करून जराही मागे वळून न बघता निघून गेली आणि भाऊ-वहिनी तोंड आ वासून फक्त बघत राहिले. वकीलसाहेबही हे सगळं बघतच बसले. त्यांच्याही नकळत ते अस्फूट शब्दांत पण दोघांना ऐकू जाईल असं बोलले, “खऱ्या श्रीमंत तर ताईच! पैसा काय हो आज आहे उद्या नाही… पण जो मायेचा ओलावा त्या घेऊन चालल्यात त्याची तुलना कशाशीच नाही.”

    Avatar photo
    अतुला प्रणव मेहेंदळे

    अतुला प्रणव मेहेंदळे या ठाणे स्थित प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत. त्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ या क्षेत्रात आहेत. शिवाय, त्या LLB शिकलेल्या आहेत. मराठी लेखनही गेली काही वर्ष करत आहेत. वाचन, जुनी गाणी ऐकणे, फिरणे असे इतर छंदही जोपासले आहेत. त्यांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्या बऱ्याच कथांचं अभिवाचन वेगवेगळ्या ठिकाणी, Social media, You Tube इत्यादींवर केलं जातं. तसेच, दिवाळी अंक, वर्तमानपत्रात विविध कथा छापून येतात. त्यांना राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पुरस्कार मिळाला आहे. काही ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणूनही बोलावले जाते. जे त्यांचा अनुभव अजूनच संपन्न करून जाते. आतापर्यंत 60हून अधिक कथा लिहून आणि प्रसिद्ध करून झाल्या आहेत. व्यावसायिक कथालेखन न करता समाजाला आवडेल, रुचेल आणि कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, या हेतूने लघुकथा लिहिल्या आहेत. वय कमी असूनही लिखाणाचा सुरू झालेला हा प्रवास असाच पुढेही सुरू राहो.

    Related Posts

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026 ललित

    ‘कुब्जा’… कृष्णप्रेम माझ्यास्तव!

    October 5, 2026 ललित

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    By हर्षा गुप्तेOctober 5, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. गणपती बाप्पा गावाला गेले. आता पुढचा…

    ‘कुब्जा’… कृष्णप्रेम माझ्यास्तव!

    October 5, 2026

    Bookshelf : ‘सावित्री’… वैचारिक खाद्य पुरवणारी लहानशी कादंबरी

    October 4, 2026

    रोजच परीक्षा…

    October 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026

    ‘कुब्जा’… कृष्णप्रेम माझ्यास्तव!

    October 5, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं उंचानीचा डाहाळिया, विषमा वेगळालिया

    October 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 05 ऑक्टोबर 2026

    October 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 459
    • अवांतर 215
    • आरोग्य 155
    • पंचांग आणि भविष्य 615
    • फिल्मी 70
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 973
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    पितरांना मनापासून नमस्कार, पण…

    October 5, 2026

    मायेचा ओलावा

    October 5, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – सुप्त गुण, आध्यात्मिक गुरू

    October 5, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.