Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!
    ललित

    अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!

    Team AvaantarBy Team AvaantarJune 1, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, मराठीलेख, मराठीकथा, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी लेखक, मराठी भाषा, अधिक महिन्याचे वाण, अधिक मासाचे वाण, जावयाकडून माईंना वाण, बंगल्याचा पुनर्विकास, बंगल्याचे रीडेव्हलपमेन्ट, बंगल्यावर बिल्डरची नजर, बंगल्याबाबत बिल्डरशी सौदा, माईंचा जावई समर, समरकडून माईंना गिफ्ट, समरकडून माईंना वाण,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अतुला प्रणव मेहेंदळे

    आज माई अगदी खूशश होत्या… लाडकी लेक आणि जावई येणार होते घरी बऱ्याच वर्षांनी अमेरिकेहून, तेही अधिक महिन्याच्या मुहूर्तावर! माई म्हणजे आमच्या नानांच्या अर्धांगिनी. नाना म्हणजे मधुकर कर्वे आणि माई म्हणजे मालती कर्वे. या सुखी दाम्पत्याला एक छानशी एकुलती एक कन्या म्हणजे ईरा कर्वे.

    तर, आज माई खूश होत्या आणि त्या सकाळपासून नुसती तयारीच्या लगबगीत होत्या. घराची आवरसावर म्हणू नका, रांगोळी म्हणू नका, गोडधोडाचं जेवण म्हणू नका… आता वयानुसार होत नव्हतं, पण जेवढं जमत होतं तेवढं करत होत्या टुकूटुकू…

    दुपारी जेवण झाल्यावर सुपारी खायला बंगल्यातल्या झोपाळ्यावर बसल्या आणि भूतकाळात हरवून गेल्या. दोन वर्षांपूर्वी नाना अचानक गेले हृदयविकाराच्या झटक्याने आणि त्या अगदी एकट्या पडल्या… सदाशिव पेठेत घर… घर कसलं मस्त बैठा बंगला होता. नानांनी कष्टाने अगदी पै पै जमा करून बांधला होता त्याकाळी! पण आता अगदी मोडकळीस आला होता. बिल्डरची नजर पडली आणि मागेच लागला! त्याबदल्यात भरघोस आमिष दाखवून हडपला होता त्याने तो. फक्त काही औपचारिकता बाकी होत्या. माई एकट्या त्यामुळे त्यांनी आपली आणि मुलीची सोय बघून एकेक मोठा फ्लॅट येईल, असं बघून देऊन टाकली जागा त्याला.

    हेही वाचा – शांत पूर्णत्व अन् सर्जनशील अपूर्णत्व!

    उगीच वाद कशाला, म्हणून ईराला हे काही सांगितलं नाही. कारण तिचा नानांशी, या घराशी किती किती लळा होता, हे माईंना माहीत होतं. नानांची शेवटची आठवण असलेलं हे घर आणि त्यांचा वाड्यातला, ते नसतानाचा वावर याने मात्र त्यांचा जीव अगदी गलबलून यायचा. नानांच्या फोटोपाशी तासनतास एकटक बघत बसायच्या, जणू काही खूप काही विचारत असायच्या त्यांना! पण आज काही सांगायचं नाही, ईराला. अजून बरेच दिवस राहणार आहे ती तेव्हा सांगू, असं ठरवून त्या पुन्हा उठल्या. आज तर आनंदाचा सोहळा होता अधिक महिन्याच्या प्रित्यर्थ. जावयाला वाण म्हणून काय काय द्यायचं, जुळ्याचं दुखणं म्हणून मुलीला पण काय काय द्यायचं सगळी तयारी काढून ठेवली होती त्यांनी. नंतर 2-4 दिवसांनी वेळ बघून सांगू तिला… ती काही माझ्या निर्णयाबाहेर नाही, असं मनात म्हणतच माई अगदी सुंदर साडी नेसल्या.

    स्वतःचं आवरलं… नानांनी सांगितलेलं, ‘मी गेलो तरी माझ्या मागे मी रोज जसा तुला गजरा आणून माळायचो, तसाच माळायचा नंतरही माझ्यासाठी.’ म्हणून सुंदर मोगऱ्याचा गजरा माळला त्यांनी. अगदी सत्तरीच्या असल्या तरी अजूनही तोच श्रीमंती थाट होताच त्यांच्या राहण्यावागण्यात…

    दुपारी 4च्या सुमारास ईरा आणि समर आले. अमेरिकेहून आल्यामुळे माईंनी औक्षण करून भाकरतुकडा ओवाळून त्यांना आत घेतलं. ईराला कधी एकदा आईला कडकडून मिठी मारतेय, असं झालं होतं. पण प्रत्यक्षात आज तिचा नूर काही वेगळाच होता. तिचे डोळे काही वेगळंच सांगत होते. माईंना वाटलं जेटलॅगमुळे असेल. म्हणून त्यांनी सोडून दिलं. ईरा बंगल्यात अगदी अवखळ मुलीसारखी बागडत होती. माईंनी विचारलंही, “काय गं? हे काय जावईबापूंसमोर? असं बरं नाही दिसत.” पण तिने दुर्लक्ष केलं. समर पण म्हणाला, “आई, अहो असू दे, तेवढीच मला मोकळीक!” एकच हशा पिकला.

    मालतीबाई थोड्या वेळाने सांजवात करून ईरा आणि समरला म्हणाल्या, “चला, आपले चांगले कपडे आहेतच, तोच मी अधिक महिन्याचं वाण देऊन घेते.” ईरा तयारच होती. माईंनी समरला ओवाळले आणि सगळ्या वस्तू आणि अनारसे असं त्याच्यासमोर धरलं. समर मात्र ते घ्यायला तयार नव्हता. माई म्हणाल्या, “अहो घ्या, हा तुमचा मान आहे!” समरने ते सगळं बाजूला ठेवलं आणि काही कागदपत्रं माईंसमोर धरली आणि म्हणाला, “माई, मला हे तुम्ही दिलेलं काहीच नकोय, पण एक प्रॉमिस हवंय”. माई आधी विचारात पडल्या आण नंतर म्हणाल्या, “काय हो? आज हवं ते मागा मला जमणार असेल तर, नक्की देईन.”

    हेही वाचा – बीपी आणि शुगरच्या गोळ्या सुरू आहेत…

    समर म्हणाला, “माई, आजपासून तुम्ही आमच्यापासून काहीच लपवणार नाही, हे वचन आम्हाला द्या. बास… आणि हे उघडून बघा बरं.”

    माईंनी ते कागदपत्रं उघडले, वाचले आणि तत्क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते त्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणचे आणि बंगला कुणालाही देत नसल्याचे पेपर्स होते. समर म्हणाला, “माई ज्याला तुम्ही ही जागा हृदयावर दगड ठेवून दिलीत, तो माझा शाळेतला मित्र आहे. आम्हाला आधीच कळलं आहे सगळं.” माईंना खूप आनंद झाला. मान वरती करून बघतात तो काय, बाजूला झोपाळ्यावर नाना बसलेत ….आणि समोर जावई आणि मुलीच्या रुपात खरोखरच ‘लक्ष्मी नारायण’ उभे आहेत, असा भास झाला त्यांना…

    आपण समरला अधिक महिन्याचं वाण देण्याऐवजी मुलीनेच आपली अधिक महिन्याची अशी आगळी वेगळी भेट दिली याने माई अगदी कृतकृत्य झाल्या..

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026 ललित

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026 ललित

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    प्रीत परी तुजवरती…

    By डॉ. विवेक वैद्यJune 12, 2026

    कॉलेजच्या फायनल इअरला होतो. क्लासमध्ये नवीनच मुलगी आलेली. धारदार नाक, गोरीपान, सडपातळ… सगळ्या मुलांच्या नजरा…

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026

    संवाद… पती अन् पत्नीमधला…

    June 11, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026

    दान… गरज फक्त सत्पात्राची!

    June 12, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल लबाड वांगी किंवा फसवी वांगी!

    June 12, 2026

    Dnyaneshwari : वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लगतां काठी

    June 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 326
    • अवांतर 190
    • आरोग्य 119
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 452
    • फिल्मी 52
    • फूड काॅर्नर 221
    • मैत्रीण 20
    • ललित 699
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जून 2026

    June 13, 2026

    प्रीत परी तुजवरती…

    June 12, 2026

    शर्वायने बोलावलेल्या समारंभात आराध्या पोहोचली अन्…

    June 12, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.