Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    मोहोर

    September 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 1
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » मोहोर
    ललित

    मोहोर

    सतीश बर्वेBy सतीश बर्वेSeptember 30, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, सतीश बर्वे, लेखक सतीश बर्वे, प्रेमाचा मोहोर, मायेचा मोहोर, संस्कारांचा मोहोर, थकलेली माई, माईंचे प्रेम, प्रेमळ माई, माईंचे संस्कार,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कोकणातल्या आमच्या घरातून निघायचा दिवस जसजसा जवळ येत होता, तसतसा मी अस्वस्थ होत चाललो होतो. मनाची घालमेल वाढली होती. दरवर्षी हे असंच होतं. पण यावर्षी ते जास्त गंभीर झाले होते. माई जरा जास्तच थकलेली वाटली यावर्षीच्या मे महिन्यात…

    माई म्हणजे बाबांची दूरची बहीण. अकाली वैधव्य आल्याने बाबांनी तिला कायमची आमच्या घरी आणली होती. तिचा कामाचा उरक दांडगा होता. पहाटे उठून गोठा साफ करायचा, गाई म्हशींना वैरण आणि पाणी द्यायचं, पुढचं आणि मागचं अंगण सारवायचं. आंघोळ उरकून आईला स्वयंपाकघरात लागेल ती मदत करायची, दुपारी कपडे भांडी उरकून जरा आडवं होऊन वामकुक्षी घेईपर्यंत बाबा कोर्टातून यायचे. माईमुळे आईला खूप मदत झाली आजवर.

    आमचा दामल्यांचा गोतावळा मोठा. पै-पाहुणा, आला गेला असे रोजचे 10-12 जण आमच्या घरी जेवायला असायचे. बाबांची वकील म्हणून पंचक्रोशीत ख्याती होती. बाबांनी एखाद्या दाव्याचे काम स्वीकारले की, विजय निश्चित याची खात्री अशिलांना असायची.

    माझी अस्वस्थता माईने अचूक हेरली आणि दुपारच्या जेवणानंतर तिने मला तिच्या खोलीत बोलावून घेतले…

    हेही वाचा – माणुसकीची फुले

    “वसंता, अरे हे अकाली गेल्यावर दादा इथे घेऊन आला म्हणून माणूस म्हणून जगता तरी आले मला, नाहीतर सासरी मिंध्यासारखं राहावे लागते असते मला तुरुंगातील कैद्यासारखे. अरे, आल्यादिवसापासून या घरची झाले. कामात झोकून दिले. तुम्हा सगळ्यांना अंगाखांद्यावर खेळवत वाढवले. पोटच्या पोरासारखी माया दिली. तुम्ही सर्वांनी देखील मला आईप्रमाणे मान दिला. गेल्या जन्मीचे ऋणानुबंध आहेत हे, बाकी काही नाही.

    आयुष्याच्या पंढरीत कष्टांची वारी आजवर न थकता करत आले. पण आता मात्र गात्रं थकली रे माझी. मी काय किंवा तुझी आई काय स्वतःसाठी नाही रे जगलो कधी… या घराच्या सुखासाठी चंदनापरी झिजत गेलो. यंदा मात्र तुझ्या डोळ्यांत माझी काळजी दिसली मला.

    जगण्याचा हिशोब नाही ठेवता आला मला, पण इथून जाण्याची वेळ मात्र जवळ येत चालली आहे, एवढं निश्चित! वसंता, मला आज एक वचन दे की, मी कायमचे डोळे मिटल्यावर तू मला अग्नी देऊन माझं पुढचं सगळं कार्य करशील.”

    माईच्या या अशा अचानक बोलण्याने मी क्षणभर अवाक् झालो. सुरकुतलेले तिचे हात माझ्या हातात होते आणि तिचे शुष्क डोळे माझ्या उत्तराची वाट बघताना लुकलुकत असल्याचा भास मला झाला. पुढे काय झाले मला काहीच कळलं नाही पण मी मोठ्या आवाजात माईला म्हणालो,

    “माई, तू आता बोलून दाखवलेली इच्छा मी पूर्ण करीन. आज मी तुला तसं वचन देतो.”

    हेही वाचा – वेटिंग लिस्ट

    माई अतीव समाधानाने माझ्याकडे बघत म्हणाली,

    “दादाने लावलेल्या आंब्याच्या कलमांना दरवर्षी भरभरून फळ लागायचं. दादाला खूप पैसा मिळायचा आणि आम्ही दरवर्षी आंब्याच्या मोहराची वाट बघायचो. आंबे उतरवून घ्यायचे. वेगळे करायचे. बंद खोलीत गवतावर पसरवून ठेवायचे. मजुरांकडून पेट्यांत भरून व्यापाऱ्यांना सुपूर्द करायचे. काही आंबा स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध व्हायचा विक्रीसाठी.

    माझ्या आयुष्याच्या कलमांना मात्र आता नव्याने जगण्याचा मोहोर येण्याची शक्यता फार कमी आहे. नवीन काही येण्याची शक्यता नसताना जुन्या शुष्क खोडाला सांभाळत जगणं एवढंच काम उरले आहे.”

    माईचा हात हातात घेऊन मी सद्गदित होऊन म्हणालो,

    “माई, अगं नव्याने येणारा मोहोर नसेना का, पण आजवर आमच्या आयुष्यात असलेला तुझ्या अस्तित्वाचा, तुझ्या प्रेमाचा, मायेचा, संस्कारांचा आणि शिकवणीचा मोहोर मात्र सदैव टवटवीत आणि बहरलेला रहाणार आहे. त्या मोहोराच्या सुगंधात आमच्या आयुष्याची कलमं मात्र अखेरपर्यंत आम्हाला सुख-समृद्धीची फळं देत रहाणार यात शंकाच नाही.”

    हे ऐकून माईचे डोळे भरून आले आणि तिच्या ओघळलेल्या अश्रूंच्या कुशीत मी तिला देलेले वचन हळूवारपणे सामावले गेले.

    Avatar photo
    सतीश बर्वे

    वय वर्षे 65. Adhesive क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा असणाऱ्या भारतीय कंपनीच्या कायदा विभागात प्रदीर्घ काळासाठी काम करून निवृत्त. लेखनाचा वारसा आईकडून आलेला आहे. फेसबुकवरील 7-8 वाचक समुहात विपुल लेखन करून अल्पावधीतच लोकप्रिय होऊन स्वतःचा वाचक वर्ग तयार केला आहे. प्रवासाची आवड. डोळे आणि कान उघडे सतत उघडे ठेवल्याने माझ्या कथेतील बरीच पात्रं आणि प्रसंग मला सापडत गेले. मनमोकळ्या स्वभावाने मी सतत माणसं जोडत गेलो आणि त्यांच्या आयुष्यात मिसळून गेलो.

    Related Posts

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026 ललित

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026 ललित

    नकारातून साकार

    September 29, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    By दीपक तांबोळीSeptember 30, 2026

    भाग – 1 “कुलकर्णी, अहो कुलकर्णी…” चव्हाणांनी गेटवर उभं राहून हाक मारली, तसं कुलकर्णींनी दार…

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    मोहोर

    September 30, 2026

    घरातील देवघरात पूजा करताना तोंड कोणत्या दिशेला असावे?

    September 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अर्जुना तयापरी, सरली द्वैताची वारी 

    September 30, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 454
    • अवांतर 214
    • आरोग्य 152
    • पंचांग आणि भविष्य 606
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 961
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    चव्हाण आणि कुलकर्णी…

    September 30, 2026

    राधाची कबुली अन् मी…

    September 30, 2026

    मोहोर

    September 30, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.