Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, September 30
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » नकारातून साकार
    ललित

    नकारातून साकार

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरSeptember 29, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मी मराठी, अभिजात मराठी, दिलीप कजगांवकर, लेखक दिलीप कजगांवकर, नकारातून साकार, बाबांचा नकार, नकाराचे महत्त्व, राजचे आईबाबा, पुत्रासाठी नकार, मुलाचे सुख, मुलाच्या सुखासाठी नकार, राजचे स्वप्न, राजची स्वप्नपूर्ती, राजची स्कूटी
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    राजने आई-बाबांना शिवाजीनगर बसस्थानकावर लाल परीमध्ये बसवलं आणि तो घरी परतला. घरी येताना त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं…

    “हे प्रत्येक गोष्टीला नाहीच का म्हणतात?”

    कपडे घ्यायचे म्हटलं की, ‘नाही’… सिनेमा बघू म्हटलं की, ‘नाही’… बाहेर खायला जाऊ म्हटलं की, ‘नाही’…. आइस्क्रीम… ‘नाही’, कॉफी… ‘नाही’, एवढंच काय, लक्झरी बसने/ स्लीपर कोचने जायचं म्हटलं, तरी ‘नाही’… लाल परीच हवी आणि तीही दिवसाची!

    सारखं नाही… नाही… नाही… जणू काही त्यांच्या तोंडात नकारघंटाच बसवली होती.

    खरं तर आई-बाबा आणखी दोन महिन्यांनी पुण्याला येणार होते; पण दोन दिवसांपूर्वी अचानक फोन करून त्यांनी लवकरच येणार असल्याचं सांगितलं आणि ते दोघं आले.

    ते पुण्याला प्रथमच येत होते म्हणून राजने त्यांच्यासाठी कितीतरी गोष्टी मनात ठरवल्या होत्या. सिनेमा, हॉटेल, आइस्क्रीम, स्टारबक्स कॉफी, मॉलमध्ये खरेदी, बागेतील भेळ आणि पाणीपुरी, पुणं फिरणं… असं बरंच काही. पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीला त्यांचा नकार!

    हेही वाचा – मनावरचा घाव

    आठ-दहा दिवस राहणार होते, पण चार दिवसांतच परत जाण्याचा त्यांचा निर्णयही राजला खटकला होता. त्यामुळे तो चिडला होता आणि ते स्वाभाविकही होतं…

    “आता त्यांना पुन्हा काही विचारायचंच नाही,” त्याने मनाशी ठरवलं.

    घरी पोहोचले का? प्रवास कसा झाला? असे विचारायलाही त्याने आई-बाबांना फोन केला नाही. दुसऱ्या दिवशी आईचा फोन आला.

    “राज, आम्ही पोहोचलो रे…”

    “हं… बरं.”

    “काय करतोस?”

    “कामात आहे,” म्हणत राजने फोन ठेवला. त्यानंतर राजने स्वतःहून फोन केला नाही आणि आई-बाबांनीही फोन केला नाही.

    आठ दिवसांनी राजच्या दारावरची बेल वाजली. पोस्टमन होता आणि त्याच्या हातात स्पीड पोस्टचं पाकीट होतं. पाकिटावर बाबांचं नाव होतं.

    “बाबांनी चक्क स्पीड पोस्ट केलं?” राजला आश्चर्य वाटलं.

    त्याने पाकीट उघडलं. आत एक पत्र होतं, सुवाच्य अक्षरात लिहिलेलं. राजने वाचायला सुरुवात केली…

    बेटा,

    तू आमच्यावर रागावलास, हे आम्हाला समजतंय. तू विचारलेल्या प्रत्येक गोष्टीला आम्ही दिलेल्या ‘नाही’चा तुला राग आला असेल. पोरा, आमच्या या नकारघंटेला एक कारण आहे… जे तुला माहीत नाही.

    ऐक आता…

    आम्ही चार भाऊ आणि चार बहिणी. तुझे आजोबा एका छोट्या कंपनीत नोकरीला होते. पगार तुटपुंजा होता. सकाळ-संध्याकाळ अर्धी भाकरी खाऊन मी दिवस काढायचो. आईने कधी मला ‘अजून घे’ असं म्हटलं नाही.

    म्हणणार तरी कशी?

    उरलेल्या दोन-तीन भाकऱ्या अजून सात जणांना खायच्या असायच्या. एखादा तुकडा उरलाच तर तो आईसाठी.

    मी मोठा होतो म्हणून नवीन कपडे मला मिळायचे. माझे जुने कपडे लहान भावाला… त्याचे त्याच्यापेक्षा लहान भावाला… असं करत करत धाकट्याला अगदी जीर्ण झालेले… मी कसेबसे ग्रॅज्युएशन केलं. नोकरी लागली; पण पगार हातात पडला की, भावंडांचं शिक्षण, कपडे, वह्या-पुस्तकं… हे सगळं आधी डोळ्यासमोर यायचं. ते खर्च भागवून जे उरेल ते आमच्यासाठी. भावांना शिकवलं… बहिणींची लग्नं केली.

    मी आणि तुझी आई… आम्ही कधी नवीन कपडे घेतले नाहीत. सिनेमा पाहिला नाही. अनेकदा पोटभर जेवलोसुद्धा नाही. आइस्क्रीम नाही, अगदी वडा-पावही नाही; पण तुला मात्र आम्ही कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. तुला लाडात वाढवलं, शिकवलं… तुला नोकरी लागली. तू भाड्याचं छोटंसं घर घेतलंस.

    आम्ही दोन महिन्यांनी पुण्याला येणार होतो; पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की, बसला गर्दी वाढेल, बसचं रिझर्व्हेशन मिळालं नाही, तर प्रायव्हेट बसचं महागडं तिकीट घ्यावं लागेल म्हणून दोन दिवस आधीच ठरवलं आणि तुझ्याकडे आलो.

    मनात एक ठरवलं होतं, आयुष्यात पहिल्यांदाच थोडी हौस करायची. तुझ्यासोबत सिनेमा पाहायचा, हॉटेलमध्ये जेवायचं, आइस्क्रीम खायचं, पुणं फिरायचं, काही दिवस मनसोक्त जगायचं. पण पुण्यात आलो त्या रात्री तुझ्या मित्राचा फोन आला. तू त्याला सांगत होतास —

    ‘मला कामासाठी खूप फिरावं लागतं. स्कूटी घ्यायची आहे. दहा हजार रुपये डाऊन पेमेंटसाठी जमवलेत. बाकी चाळीस हजार कर्ज घेणार आहे. पण आई-बाबा पहिल्यांदाच पुण्यात आलेत. त्यांच्यासाठी हे दहा हजार वापरतो. तू 10,000 रुपये उसने देतोस का?’ मित्राने नकार दिला तेव्हा तू म्हणालास, ‘हरकत नाही. मी स्कूटी दोन-तीन महिन्यांनी घेईन.’

    मी झोपलो होतो, पण तुझी आई जागी होती आणि हे सगळं तिने ऐकलं. तिला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी तिने मला शेजारच्या मंदिरात नेलं आणि सगळं सांगितलं. तेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं… तुला कर्जात टाकून आमची हौस करायची नाही.

    म्हणून तू विचारलं, ‘सिनेमा?’

    आम्ही म्हणालो, ‘नाही.’

    ‘हॉटेल?’

    ‘नाही.’

    ‘आइस्क्रीम?’

    ‘नाही.’

    ‘पुणं फिरू?’

    ‘नाही.’

    ‘स्लीपर कोच लक्झरी बस?’

    ‘नाही. दिवसाची लाल परी.’

    आणि तुझा खर्च वाढू नये म्हणूनच आम्ही चार दिवसांनी परतलो. तू बाजूला काढून ठेवलेले ते दहा हजार रुपये आम्हाला आमच्या हौसेपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटले तुझ्या स्कूटीसाठी.

    पोरा, तुला कर्ज घेण्याची गरज नाही. या पत्रासोबत पन्नास हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट पाठवला आहे. स्कूटी घे. सायकल चालवून थकू नकोस.

    आम्ही आयुष्यभर आमच्या हौशींना ‘नाही’ म्हणालो. पण तुझ्या गरजेला ‘नाही’ म्हणू शकत नाही. आम्ही श्रीमंत नाही, पण पोटच्या गोळ्याच्या आवश्यक गरजेच्या वेळी पुढे न येता मागे राहावं, इतके गरीबही नाही.

    तुझाच बाबा

    पत्र वाचताना राजचे डोळे पाणावले. आज पहिल्यांदाच त्याला आई-बाबा समजले होते. ज्या ‘नाही’चा त्याला राग आला होता, तो त्याला दिलेला नकार नव्हता… तो त्याच्या सुखासाठी त्यांनी स्वतःला दिलेला नकार होता.

    हेही वाचा – दहावी नापास

    राजने लगेच बाबांना फोन लावला. बाबांनी फोन उचलला.

    “हॅलो?”

    राज काहीच बोलला नाही. फक्त रडत राहिला.

    “राज?”

    “बाबा…”

    “काय झालं?”

    “काही नाही… तुमचं ‘नाही’ आज मला समजलं.”

    काही दिवसांनी राजने स्कूटी घेतली. स्कूटीच्या मागच्या बाजूला त्याने फक्त दोन शब्द लिहिले—

    “नकारातून साकार”

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026 ललित

    तो भेटलाच नसता तर…

    September 29, 2026 ललित

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    By किरण कृष्णा बोरकरSeptember 29, 2026

    दोघेही एकाच बोगीतून प्रवास करीत होते. पहिला शांत बसून एकटक बाहेरील दृश्य पाहत होता… तर…

    तो भेटलाच नसता तर…

    September 29, 2026

    गणेशोत्सव अन् बालपणीच्या आठवणी

    September 28, 2026

    मॅग्नोलिया

    September 28, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026

    तो भेटलाच नसता तर…

    September 29, 2026

    केतू… आपला आतला आवाज

    September 29, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अनादि जे मुक्तता, आपुली असे पंडुसुता

    September 29, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 453
    • अवांतर 214
    • आरोग्य 152
    • पंचांग आणि भविष्य 605
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 958
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 सप्टेंबर 2026

    September 30, 2026

    नकारातून साकार

    September 29, 2026

    गोष्ट दोन प्रवाशांची…

    September 29, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.