Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 24, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्रें सिंधु भरे । तैसा मातुला रसु आदरें । श्रोतयांचेनि ॥1151॥ आतां आनंदमय आघवें । विश्व कीजेल देवें । तें रायें परिसावें । संजयो म्हणे ॥1152॥ एवं जे महाभारतीं । श्रीव्यासें आप्रांतमती । भीष्मपर्वी शांती । म्हणितली कथा ॥1153॥ तो कृष्णार्जुनसंवादु । नागरीं बोलीं विशदु । सांगोनि दाऊं प्रबंधु । वोवियेचा ॥1154॥ नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा । जे शृंगाराचां माथां । पाय ठेविती ॥1155॥ दाऊं वेल्हाळे देशी नवी । जे साहित्यातें वोजावी । अमृतातें चुकी ठेवी । गोडिसेंपणें ॥1156॥ बोल वोल्हावतेनि गुणें । चंद्रासि घे उमाणे । रसरंगीं भुलवणें । नादु लोपी ॥1157॥ खेचराचियाही मना । आणी सात्त्विकाचा पान्हा । श्रवणासवें सुमना । समाधि जोडे ॥1158॥ तैसा वाग्विलास विस्तारू । गीतार्थेंसी विश्व भरूं । आनंदाचें आवारूं । मांडूं जगा ॥1159॥ फिटो विवेकाची वाणी । हो कानामनाची जिणी । देखो आवडे तो खाणी । ब्रह्मविद्येची ॥1160॥ दिसो परतत्त्व डोळां । पाहो सुखाचा सोहळा । रिघो महाबोधसुकाळा- । माजीं विश्व ॥1161॥ हें निफजेल आतां आघवें । ऐसें बोलिजेल बरवें । जें अधिष्ठिला असें परमदेवें । निवृत्तीं मी ॥1162॥ म्हणोनि अक्षरीं सुभेदीं । उपमा श्लोक कोंदाकोंदी । झाडा देईन प्रतिपदीं । ग्रंथार्थासी ॥1163॥ हा ठावोवरी मातें । पुरतया सारस्वतें । केलें असे श्रीमंतें । श्रीगुरुरायें ॥1164॥ तेणें जी कृपासावायें । मी बोलें तेतुलें सामाये । आणि तुमचिये सभे लाहें । गीता म्हणों ॥1165॥ वरि तुम्हा संतांचे पाये । आजि मी पातलों आहें । म्हणोनि जी नोहे । अटकु काहीं ॥1166॥ प्रभु काश्मिरीं मुकें । नुपजे हें कौतुकें । नाहीं उणीं सामुद्रिकें । लक्ष्मीयेसी ॥1167॥ तैसी तुम्हां संतांपासीं । अज्ञानाची गोठी कायसी । यालागीं नवरसीं । वरुषेन मी ॥1168॥ किंबहुना आतां देवा । अवसरु मज देयावा । ज्ञानदेव म्हणे बरवा । सांगेन ग्रंथु ॥1169॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    अर्थ

    अनुकूल वार्‍याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात, अथवा जशी (पौर्णिमेच्या) चंद्राने समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्याच्या (अर्जुनाच्या) ऐकण्य़ाच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरितपणास भरते आले आहे. ॥1151॥ संजय म्हणतो, आता देवांकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, ते महाराजांनी (धृतराष्ट्र राजांनी) ऐकावे. ॥1152॥ (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) याप्रमाणे विशालबुद्धि व्यासांनी महाभारतात भीष्मपर्वामधे शांतरसाने भरलेली कथा सांगितली ॥1153॥ तो कृष्णार्जुनांचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट करून दाखवू. ॥1154॥ केवळ शांतरसाची कथा शब्दांनी सांगितली जाईल. परंतु ती शृंगाररसावर ताण करील, अशी सांगितली जाईल. ॥1155॥ ज्या रीतीने देशी भाषा अलंकाराला सजवील व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारील, अशा रीतीने अपूर्व सुंदर मराठी भाषा उपयोगात आणू. ॥1156॥ माझे शब्द, त्यांची शांत करणारी शक्ति पाहिली तर, चंद्राच्यावर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसांतील रंगांच्या मोहक शक्तीने नादब्रह्मास लोपवतील ॥1157॥ पिशाच्चादि अज्ञानी योनी आहेत, पण त्यासही माझे शब्द सत्वगुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंत:करणाच्या लोकांना तर, माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधि लागेल. ॥1158॥ याप्रमाणे  वाणीच्या विलासाचा विस्तार करू. व गीतार्थाने विश्व भरून टाकू. व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. ॥1159॥ आत्मानात्मविवेकाचा कमीपणा नाहीसा होवो, कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक होवो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येवो. ॥1160॥ परब्रह्म (सर्वांच्या) डोळ्यांना दिसो, सुखाचा उत्सव उदयास येवो व सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. ॥1161॥ श्रेष्ठ देव जे निवृत्तिनाथ, त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे, हे (वर सांगितलेले) सर्व आता घडून येईल, असे मी चांगले बोलेन. ॥1162॥ एवढ्याकरिता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी, उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीताग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन. ॥1163॥ माझ्या श्रीमंत गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे. ॥1164॥ महाराज, त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन, तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संतमंडळींमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. ॥1165॥ शिवाय तुम्हा संतांच्या चरणांजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण राहिली नाही. ॥1166॥ महाराज, सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहजदेखील उत्पन्न होणार नाही, (व तसेच) लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो. ॥1167॥ त्याचप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली? म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन. ॥1168॥ फार काय सांगावे! देवा (श्रीगुरुराया), मला बोलण्याला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥1169॥

    ॥तेरावा अध्याय समाप्त॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी

    September 23, 2026 अध्यात्म

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    September 22, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    By डॉ. शिरीष कुलकर्णीSeptember 24, 2026

    माया / भाग – 5 सर्वेषु भूतमात्रेषु आत्मभावो यदा भवेत्। शत्रुं मन्येत को तत्र वह्नौ…

    सार्थ ज्ञानेश्वरी : स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी

    September 23, 2026

    अवतीभवतीचा अनमोल आनंद

    September 22, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : याचिलागीं सुमती, जोडिती शांतिसंपत्ती

    September 22, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026

    सुधाकररावांचा सन्मान

    September 23, 2026

    सुमन आणि राधा…

    September 23, 2026

    पहिली आरती

    September 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 447
    • अवांतर 214
    • आरोग्य 149
    • पंचांग आणि भविष्य 596
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 257
    • मैत्रीण 30
    • ललित 941
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आत्म्याचा खरा साक्षात्कार

    September 24, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा

    September 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 सप्टेंबर 2026

    September 24, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.