Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 20
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 20, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः । शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥31॥

    तरी परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपें । जळीं जळें न लिंपे । सूर्यु जैसा ॥1093॥ कां जे जळा आदीं पाठीं । सूर्य असतुचि असे किरीटी । माजीं बिंबे तें दृष्टी । आणिकांचिये ॥1094॥ तैसा आत्मा देहीं । आथि म्हणिपे हें कांहीं । साचें तरी नाहीं । तो जेथिंचा तेथें ॥1095॥ आरिसां मुख जैसें । बिंबलिया नाम असे । देहीं वसणें तैसें । आत्मतत्त्वा ॥1096॥ तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जीव गोठी । वारिया वाळुवे गांठी । केंही आहे  ॥1097॥ आगी आणि पींसा । दोरा सुवावा कैसा । केउता सांदा आकाशा । पाषाणेंसी  ॥1098॥ एक निघे पूर्वेकडे । एक तें पश्चिमेकडे । तिये भेटीचेनि पाडें । संबंधु हा ॥1099॥ उजिवडा आणि अंधारेया । जो पाडु मृता उभया । तोचि गा आत्मया । देहा जाण ॥1100॥ रात्री आणि दिवसा । कनका आणि कापुसा । अपाडु कां जैसा । तैसाचि हा ॥1101॥ देह तंव पांचांचें जालें । हें कर्माचां गुणीं गुंथले । भंवतसे चाकीं सूदलें । जन्ममृत्यूचां ॥1102॥ हें काळानळाचां कुंडीं । घातली लोणियाची उंडी । माशी पांखु पाखडी । तंव हें सरे ॥1103॥ हें विपायें आगी पडे । तरी भस्म होऊनि उडे । जाहलें श्वाना वरपडें । तरी ते विष्ठा ॥1104॥ या चुके दोन्हीं काजा । तरी होय कृमींचा पुंजा । हा परिणामु कपिध्वजा । कश्मलु गा ॥1105॥ या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा । पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ॥1106॥ सकळु ना निष्कळु । अक्रियु ना क्रियाशीळु । कृश ना स्थुळु । निर्गुणपणें ॥1107॥ आभासु ना निराभासु । प्रकाशु ना अप्रकाशु । अल्प ना बहुवसु । अरूपपणें ॥1108॥ रिता ना भरितु । रहितु ना सहितु । मूर्तु ना अमूर्तु । शून्यपणें ॥1109॥ आनंदु ना निरानंदु । एक ना विविधु । मोकळा ना बुद्धु । आत्मपणें ॥1110॥ येतुला ना तेतुला । आइता ना रचिला । बोलता ना उगला । अलक्षपणें ॥1111॥ सृष्टीचां होणां न रचे । सर्वसंहारें न वेंचे । आथी नाथी या दोहींचें । पंचत्व तो ॥1112॥ मवे ना चर्चे । वाढे ना खांचे । विटे ना वेंचे । अव्ययपणें ॥1113॥ एवंरूप पैं आत्मा । देहीं जें म्हणती प्रियोत्तमा । तें मठाकारें व्योमा । नाम जैसें ॥1114॥ तैसें तयाचिये अनुस्यूती । होती जाती देहाकृती । तो घे ना सांडी सुमती । जैसा तैसा ॥1115॥ अहोरात्रें जैशी । येती जाती आकाशीं । आत्मसत्तें तैसीं । देहें जाण ॥1116॥ म्हणोनि इयें शरीरीं । कांहीं करवीं ना करी । आयताही व्यापारीं । सज्जु नव्हे ॥1117॥ यालागीं स्वरूपें । उणा पुरा न घेपे । हें असो तो न लिंपे । देहीं देहा ॥1118॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    अर्थ

    हे कौंतेया, अनादि आणि गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे; व तो  शरीराच्या ठिकाणी स्थित असला तरी (काही कर्मे) करीत नाही. (सर्व कर्मांपासून) अलिप्त असतो. ॥31॥

    (श्रीकृष्ण) म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला, तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात, तो प्रकृतीत असूनही, प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही. अशा स्वरूपाचा तो आहे, असे समज. ॥1093॥ कारण की, अर्जुना, जळाच्या आधी आणि नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामधे तो प्रतिबिंबित होतो, ते दुसर्‍याच्या दृष्टीने. ॥1094॥ त्याप्रमाणे आत्मा देहात आहे, असे जे म्हटले जाते, ते काही खरे नाही, तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे. ॥1095॥ आरशात मुख बिंबले असता त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे देहामधे आत्मतत्त्वाचे राहणे आहे. (देहात आत्मतत्त्व प्रतिबिंबरूपाने असते). ॥1096॥ त्याचा व देहाचा संबंध आहे, असे जे म्हणतात, ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे. वार्‍याची व वाळूची गाठ बांधणे, हे कोठे आहे काय? ॥1097॥ अग्नि आणि पीस यांना दोरा कसा घालावयचा? आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडावयचा? ॥1098॥ एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला. त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे. ॥1099॥ उजेड आणि अंधार यात जे सादृश्य, अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य, तेच सादृश्य अर्जुना, आत्मा व देह यामधे आहे, असे समज. ॥1100॥ रात्र व दिवस, सोने व कापूस, यामधे जितके अंतर आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामधे आहे. ॥1101॥ हा देह तर पंचमहाभूतांचा बनला आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे. ॥1102॥ कालरूपी अग्नीच्या रूंडात हा (देह) लोण्याचा गोळा घातलेला आहे. व माशी आपले पंख फडफडावते तितक्या कालातच हा (देह) नाश पावतो. ॥1103॥ हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला, तर त्याची विष्ठा होते. ॥1104॥ वरील या दोन परिणामांना जर तो चुकला, तर तो (देह) किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम, अर्जुना, वाईट आहे. ॥1105॥ या देहाची अशी अव्यवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो (आत्मा) स्वभावत: नित्य व सिद्ध आहे. ॥1106॥ तो (आत्मा) निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही, अथवा भागरहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही वा लठ्ठही नाही. ॥1107॥ तो (आत्मा) अरूप असल्यामुळे दृश्य नाही, अथवा अदृश्यही नाही, तो प्रकाशयुक्त नाही किंवा प्रकाशरहित नाही, थोडा नाही अथवा पुष्कळ नाही. ॥1108॥ तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही, अथवा भरलेला नाही, तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने सहित नाही. तो प्रकट (साकार) नाही अथवा अप्रकट (निराकार) नाही. ॥1109॥ तो (आत्मा) असल्यामुळे आनंद (सुख) नाही अथवा आनंदरहित (दु:ख) नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही, तो मुक्त नाही अथवा बद्ध नाही. ॥1110॥ तो (आत्मा) कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही, अथवा तितका नाही, स्वत: सिद्ध नाही, अथवा तयार केलेला नाही, बोलणारा नाही अथवा मुका नाही. ॥1111॥ सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा (आत्मा) आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे. ॥1112॥ तो (आत्मा) अव्यय असल्यामुळे, तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही व खर्च होत नाही. ॥1113॥ हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे, असे जे म्हणतात, ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे. ॥1114॥ त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात, (पण) अर्जुना, तो आत्मा देहाकृति घेत नाही अथवा टाकीत नाही, तर जसाच्या तसाच असतो. ॥1115॥ आकाशामध्ये जसे दिवस व रात्र येतात व जातात, त्याप्रमाणे आत्मसत्तेवेर देह (येतात व जातात) असे समज. ॥1116॥ म्हणून या शरीरात आत्मा काही करीत नाही व करवीत नाही व सहज घडून येणार्‍या व्यापाराच्या ठिकाणी, ‘तो व्यापार मी केला’ असे म्हणत नाही. ॥1117॥ याकरिता तो (आत्मा) स्वरूपाने उणेपणास अथवा पुरेपणास वश होत नाही, हे असो. तो (आत्मा) देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही. ॥1118॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं

    September 19, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026 अध्यात्म

    अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    September 17, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं

    By Team AvaantarSeptember 19, 2026

    अध्याय तेरावा प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः । यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥29॥ आणि…

    सार्थ ज्ञानेश्वरी : मोक्षासकट गती, जेथें येती विश्रांती

    September 18, 2026

    अज्ञानाची रात्र संपते, तेव्हा…

    September 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : पैं नानाप्रयोजनशीळें, दीर्घें वक्रें वर्तुळें

    September 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 20 ते 26 सप्टेंबर 2026

    September 20, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा

    September 20, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 20 सप्टेंबर 2026

    September 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 441
    • अवांतर 208
    • आरोग्य 149
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 590
    • फिल्मी 69
    • फूड काॅर्नर 256
    • मैत्रीण 30
    • ललित 931
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    गौरीमायला निरोप…

    September 20, 2026

    माझ्या पोतडीतला मदन मोहन…

    September 20, 2026

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओ आख्यान

    September 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.