Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ऐसा भी होता है!

    September 19, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026

    आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब

    September 19, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, September 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ऐसा भी होता है!
    ललित

    ऐसा भी होता है!

    पराग गोडबोलेBy पराग गोडबोलेSeptember 19, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठीलेख, मराठी साहित्य, मराठी लेख, मी मराठी, अभिजात मराठी, पराग गोडबोले, लेखक पराग गोडबोले, नामसाधर्म्याचा घोळ, रक्कम 80,000, रक्कम 80 हजार, बँक फ्रॉड, बँक फसवणूक, डिजिटल फसवणूक, दोन पराग गोडबोले
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    असाच एक शुक्रवार, ऑफिसातला. साधारण अकराचा सुमार आणि सकाळची धामधूम संपवून, हातात कॉफीचा मग घेऊन मी निवांत बसलो होतो. लॅपटॉप झाकून ठेवला होता आणि थोड्याशा कडवट कॉफीचे घोट घशाखाली उतरवत होतो. साहेब सुट्टीवर होते, त्यामुळे जरा टंगळमंगळच सुरू होती सगळ्यांची, त्यातलाच मी एक.

    कॉफी संपतच येत होती, इतक्यात एक एसएमएस आला, Your account has been credited for Rs 40,000/-. मी चकीत! एवढे पैसे येणं नव्हतंच मला कोणाकडून. तेवढ्यात G pay notification पण आलं, 40,000 रुपये जमा झाल्याचं. महिलेचं नाव दाखवत होतं XXX भोसले.

    मी विचारात पडलो आणि फोन हातात असतानाच परत एकदा 40,000 जमा झाल्याचा मेसेज आला. एकाच महिलेकडून माझ्या खात्यात तब्बल 80,000 रुपये जमा झाले होते. मला काहीच उलगडत नव्हतं. ऐंशी हजार, ही काही कमी रक्कम नव्हती. काहीतरी घोळ होता हे निश्चित.

    बरं, या बाईंना मी ओळखतही नव्हतो, माझ्या फोनमध्ये त्यांचा नंबरही नव्हता, त्यामुळे हे काय गौडबंगाल आहे, याचा काहीच उलगडा होत नव्हता. मी माझ्या सहकाऱ्यांना हे मेसेज दाखवले आणि सगळ्यांचं म्हणणं पडलं, हा फसवणुकीचा प्रकार असणार, हे निश्चित. आता तुम्हाला नक्की फोन येईल,  पैसे परत करा सांगायला.

    अगदी तसंच झालं. दोनच मिनिटांत फोन वाजला. True Caller वर ‘XXX गोडबोले’ असं नाव दिसलं आणि अगदी घाबऱ्याघुबऱ्या आवाजात त्या बाईंनी विचारलं, आपण पराग गोडबोले बोलताय ना? मी हो म्हणाल्यावर, “अहो, माझ्याकडून तुमच्या बँक अकाऊंटला ना, चुकून ऐंशी हजार रुपये जमा झालेत, खूप मोठा घोळ झालाय. माझे पैसे प्लीज परत करा, मी चुकून तुमच्या अकाऊंटला जमा केलेत.”

    हेही वाचा – देखल्या देवा…

    च्यायला, मी नसत्या घोळात गुंतत चाललो होतो, माझ्या नकळत आणि माझी काहीही चूक नसताना!

    मी त्या बाईंवर भडकलो… “असे कसे चुकून पैसे जमा होतील? हा सगळा फ्रॉड वाटतोय मला. माझ्या अकाऊंटला ऐंशी हजार चुकून जमा केलेत? एवढी मोठी चूक कशी काय घडू शकते कोणाकडून?”

     

    “अहो, माझ्या नवऱ्याचं नाव पण ‘पराग गोडबोले’ आहे. मला त्याला पैसे पाठवायचे होते, पण चुकून तुम्हाला पाठवले गेले. प्लीज, माझे पैसे मला परत करा…” आवाजात कमालीची काकुळती!

    “अहो, पण माझा नंबर कसा आला तुमच्याकडे? आपलं कधी बोलणं झाल्याचं, किंवा संपर्क आल्याचं आठवत नाहीये मला.”

    “तुम्ही लोढामध्ये काम करता ना? आमचा ठाण्याला लोढामध्ये फ्लॅट आहे, त्यासंदर्भात कधीतरी बोलणं झालं असेल, कारण तुमचा नंबर saved आहे माझ्याकडे!”

    ‘कुछ तो गडबड है,’ असं मला वारंवार वाटत होतं. Gpay ला भोसले, true caller ला गोडबोले, हे काही पचनी पडत नव्हतं. पण त्या बाईच्या बोलण्यावरून तिची चूक झाली असावी, हे ही जाणवत होतं. काय करावं, काही उमगतच नव्हतं. गुरफटत चाललो होतो मी कुठल्यातरी अज्ञात जाळ्यात.

    मी नेट बँकिंगमध्ये जाऊन, खात्यात खरंच पैसे जमा झाले आहेत का ते बघावं, म्हणून  प्रयत्न केला, तर लॉगिनच होईना!

    माझ्या Gpay अकाऊंटचं नेट बँकिंग मी फार कधी वापरलंच नव्हतं, त्यामुळे असावं कदाचित… पण तो मार्गही बंद झाला होता. काय करावं, हे खरंच कळत नव्हतं. त्यातून बँक होती सरकारी, म्हणजे तर आनंदी आनंद. कोणाला काही विचारायची सोय नाही.

    मी विचार करतच होतो, तेवढ्यात फोन वाजला. आता ‘True Caller’ वर नाव दाखवत होतं ‘पराग गोडबोले’. मी उचलला फोन आणि एक ‘पराग गोडबोले’, दुसऱ्या ‘पराग गोडबोलें’शी बोलायला लागले. अकल्पितच सगळं!

    “तुम्ही पराग ‘हरी’ गोडबोले ना? मी पराग **** गोडबोले, मुंबईतच अमुकअमुक ठिकाणी राहतो आणि अमुकअमुक ठिकाणी नोकरी करतो. सारख्या नावांमुळे तिचा घोळ झाला आणि चुकून पैसे पाठवले गेले तुम्हाला. मला माहिती आहे, तुम्हाला हा नक्कीच फ्रॉड वाटत असेल, पण हे खरंच तसं काही नाहीये. तुम्ही लगेच नका करू पैसे परत, वेळ घ्या. हवं तर आम्ही दोघेही तुम्हाला भेटायला येतो, आमची आधार आणि पॅन कार्डस घेऊन… खात्री करा आणि मगच पैसे परत पाठवा.”

    “भोसले, गोडबोले हा काय प्रकार?” मी चाचरत प्रश्न केला. ते गोडबोले हसतच म्हणाले, “आमचा प्रेमविवाह आहे, ती माहेरची भोसले आणि आता गोडबोले, पण बँकिंगचं नाव अजून जुनंच आहे.”

    एका प्रश्नाचं ठोस उत्तर सापडलं होतं मला. माणूस बोलायला फार चांगला होता. स्वच्छ, शुद्ध आणि संयत बोलत होता. कुठल्याही प्रकारची अरेरावी किंवा वाईटसाईट बोलणं नव्हतं… त्यामुळे काय खरं, काय खोटं, यात मी पार भंजाळून गेलो होतो. त्यातच सगळेच जण वेगवेगळे सल्ले देत होते आणि मी बिचारा, काय करावं हे न सुचून पार मेटाकुटीला आलो होतो. गर्तेत रुतत असलेला…

    अशावेळी एकच आधार असतो, तो म्हणजे बायको. लावला फोन तिला आणि सगळी कर्मकहाणी ऐकवली. पहिले उद्गार म्हणजे…

    “हे असं सगळं नेहमी तुझ्याच बाबतीत का घडतं?”

    आता हे मी कसं सांगणार ना? तिचा भडिमार ऐकून घेत होतो मुकाट.

    “मला पाठव नंबर त्या बाईचा, बघतेच तिच्याकडे म्हणत,” तिने रणशिंग फुंकलं आणि माझा जीव आणखीनच कासावीस झाला…

    “असे कोणी चुकून एवढे पैसे पाठवतं का? काहीतरी उगाचच आपलं. एक सांगते, कुठल्याही परिस्थितीत, मी सांगितल्याशिवाय पैसे परत पाठवायचे नाहीयेत.”

    मी आपली अगतिकपणे मान डोलावून सूत्रं तिच्या ताब्यात दिली.

    “काहीतरी असतंच तुझं नेहमी. कधी काय तर कधी काय! सुधारणार नाहीस तू या जन्मात…”

    आता माझ्या अकाऊंटला कोणीतरी पैसे पाठवले, काही संबंध नसताना, यात माझा काय दोष, हे मला कळेचना! पण ती वेळ तलवारीला तलवार भिडवण्याची नव्हती, म्हणून मी फक्त झेलले ते वार सफाईने.

    मी नंबर पाठवून दिला आणि कामाकडे वळलो, पण लक्षच लागेना माझं. हे प्रकरण कुठपर्यंत ताणलं जाणार, याचा अंदाजच येत नव्हता. चाचपडत होतो नुसता अंधारात… असाच काही वेळ गेला आणि परत फोन वाजला. आता सौ होत्या पलीकडे…

    “मी बोलले तिच्याशी. चांगली आणि प्रामाणिक वाटली, पण एवढ्यात काहीही गरज नाहीये पैसे परत करायची. मी बँकेत जाऊन बघून येते… घोळ तुझे आणि निस्तरणार मी! कायमचं झालंय हे,” असं पुटपुटत तिने फोन ठेवला.

    मी तोपर्यंत बँकेत काम करणाऱ्या एक-दोन मित्रांशी पण बोलून घेतलं. त्यांचा सल्ला असा होता, की असं होऊ शकतं, पण निदान चोवीस तास तरी पैसे परत पाठवू नकोस. कधीकधी  ‘Transaction reverse’  होऊ शकतं, त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे. खरं खोटं राम जाणे!

    या दरम्यान बायको बँकेत पोहोचली आणि खात्यात पैसे खरंच जमा झालेत, याची तिने खात्री करून घेतली. पासबुकमध्ये तशी नोंद झाली आहे, याची पण खातरजमा केली आणि तसं मला कळवलं. हे सगळं होईस्तोवर त्या बाईचे आणि तिच्या नवऱ्याचे चार फोन येऊन गेले. ते पण घायकुतीला आले होते दोघे…

    त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं की, “निदान चोवीस तास तरी मी पैसे पाठवणार नाही, पण तुमचे पैसे परत मिळतील हे नक्की.” आता निदान उद्यापर्यंत फोन येणार नव्हते.

    घरी गेल्यावर फटाके फुटलेच, पण सकाळच्या सुतळी बॉम्बचं परिवर्तन आता लवंगी फटाक्यात झालं होतं. तेवढ्याच कमी कानठळ्या, आणखीन काय! ‘न खाया, न पिया, गिलास तोडा, बारा आना’ अशी एकंदरीत परिस्थिती माझी.

    दुसरा दिवस उजाडला. पैसे परत वगैरे काही गेले नव्हते. खात्यात ही रक्कम धरून, एकूण रक्कम दाखवली जात होती G pay वर आणि मग मी नि:श्वास सोडला. तरीही, संध्याकाळपर्यंत मी पैसे पाठवणारच नव्हतो.

    चोवीस तास उलटून गेल्यावर, त्या दोघांचे मेसेज आले. मी त्यांना संध्याकाळपर्यंत थांबायला सांगितलं, पण पैसे निश्चित परत मिळतील याची हमीही दिली.

    त्या दिवशी संध्याकाळी, मी पैसे जिथून आले तिथे परत पाठवले, त्या दोघांनाही स्क्रीन शॉट पाठवून तसं कळवून टाकलं आणि सुटकेचा नि:श्वास सोडला. एका जंजाळातून सुटका झाली होती, सही सलामत. त्यांचा आभार मानणारा फोन आला आणि प्रकरण संपुष्टात आलं एकदाचं.

    हेही वाचा – स्कूटी, बायको आणि मी…

    तरीही मनात एक विचार येऊन गेला. मी प्रामाणिकपणे ही एवढी मोठी रक्कम परत केली. माझ्या जागी एखादा लबाड असता आणि त्याने कानावर हात ठेवले असते, तर काय झालं असतं त्या दोघांचं? तक्रार, पोलीस या सगळ्या जंजाळात गुरफटून, कधी परत मिळाले असते त्यांचे हक्काचे पैसे?

    अगदी उलटही शक्य होतं. माझी फसवणूक व्हायची शक्यता पण खूप होती, पण निभावून गेलं सगळं थोडक्यात.

    नामसाधर्म्यामुळे असे घोळ होणं हे अगदीच अशक्य नाही, पण आजच्या या फसवाफसवीच्या युगात सगळ्यांनीच किती काळजीपूर्वक व्यवहार करायला हवेत, याची ही झलक होती. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणे, ‘ताकही फुंकूनच पिणे’ हेच केव्हाही श्रेयस्कर. तरी, या निमित्ताने, एका नाव आणि आडनाव बंधूंचा अवचितच परिचय झाला, हेही नसे थोडके!

    पराग गोडबोले

    मोबाइल - 9323277620

    Related Posts

    अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद

    September 18, 2026 ललित

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 18, 2026 ललित

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद

    By प्रणाली वैद्यSeptember 18, 2026

    भाग – 43 शर्वाय आणि आराध्या — आता केवळ प्रेमात नव्हते, ते दोघं  आता एका…

    उमा महेशरावांवर होती नाराज

    September 18, 2026

    लग्न – आकड्यांमध्ये अडकलेली भावना!

    September 17, 2026

    नातं भाऊ बहिणीचं…

    September 17, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ऐसा भी होता है!

    September 19, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026

    आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब

    September 19, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : लहरी जैसिया जळीं, परमाणुकणिका स्थळीं

    September 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 सप्टेंबर 2026

    September 19, 2026

    अमृतसिद्धी योगावर गुरुजींचा शर्वाय-आराध्याला आशीर्वाद

    September 18, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 440
    • अवांतर 208
    • आरोग्य 148
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 588
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 256
    • मैत्रीण 30
    • ललित 929
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ऐसा भी होता है!

    September 19, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल… टुट्टुमियाच्या शेंगांचे लोणचे!

    September 19, 2026

    आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब

    September 19, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.