Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    September 11, 2026

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरी पुरुष अनादि आथी, आणि तैंचि लागोनि प्रकृति

    September 11, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, September 11
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 सप्टेंबर 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 सप्टेंबर 2026

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 11, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 11 सप्टेंबर 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 20 भाद्रपद शके 1948; तिथि : अमावस्या 08:56; नक्षत्र : पू. फाल्गुनी 13:15;
    • योग : साध्य 17:01; करण : किंस्तुघ्न 20:17;
    • सूर्य : सिंह; चंद्र : सिंह 19:07; सूर्योदय : 06:24; सूर्यास्त : 18:46;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    जरा-जिवंतिका पूजन

    अमावस्या समाप्ती सकाळी 08:56

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    स्वतंत्र भारताचे पहिले क्रिकेट कर्णधार लाला अमरनाथ

    टीम अवांतर

    भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक, फलंदाज, गोलंदाज आणि स्वतंत्र भारताचे पहिले कसोटी क्रिकेट कर्णधार लाला अमरनाथ भारद्वाज यांचा जन्म पंजाबमधील कपूरथला येथे 11 सप्टेंबर 1911 रोजी झाला. लाहोर येथील प्रसिद्ध हनीफ मुहम्मद कुटुंब खेळत असलेल्या मुस्लिम क्लबने लाला यांची प्रतिभा ओळखून, त्यांना मुंबईत खेळण्याची संधी मिळाली. 1933 साली ते आपला पदार्पणाचा सामना दक्षिण मुंबईतील बॉम्बे जिमखाना मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळले.

    1933 मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यात लाला अमरनाथ सर्वाधिक धावा करणारे फलंदाज होते. त्या मालिकेत त्यांनी मुंबईत भारतीय फलंदाजाने केलेले पहिले कसोटी शतक झळकावून इतिहास रचला. त्यानंतर ते बॉम्बे क्वाड्रँग्युलरमध्ये हिंदू संघाकडूनही खेळले.

    हेही वाचा – हो, मी आहे मध्यमवर्गीय!

    1933-34 मधील मालिकेमध्ये चेन्नई येथे त्यांनी 4 बळी घेतले आणि गोलंदाजीत आपले नैपुण्य सिद्ध केले. मात्र 1936 च्या इंग्लंड दौऱ्यात कर्णधारासोबत झालेल्या मतभेदामुळे त्यांना दौऱ्यातून परत पाठवण्यात आले. त्याआधी या दौऱ्यात 12 सामन्यात 3 शतकांसह त्यांनी 613 धावा केल्या होत्या तर 32 बळी घेतले होते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी भारत फार कमी कसोटी सामने खेळला असतानाही त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास 10 हजार धावा आणि 30 शतके झळकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली.

    पुढे 1946 मधे लॉर्डसवर, 118 धावा देऊन 5 बळी घेतले व स्वतः 50 धावा पण केल्या. 1946च्या इंग्लंड दौऱ्यात सॉमरसेटविरुद्धच्या सामन्यात अमरनाथ गोलंदाजीत धाव रोखणारे प्रभावी गोलंदाज ठरले.

    लाला अमरनाथ हे 1947-48 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे कर्णधार होते. या दौऱ्यात डोनाल्ड ब्रॅडमन यांना हिट विकेटवर बाद करणारे ते एकमेव गोलंदाज होते. 1947 ची फाळणी झाल्यावर पाकिस्तान आणि भारत यांच्यात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू आणि चाहते यांच्यात निर्माण झालेली दरी मिटवण्यासाठी अमरनाथ यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर आदर केला जातो.

    त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1952 साली दिल्ली येथे झालेला पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना जिंकला आणि पुढे जाऊन मालिका देखील 2-1 ने जिंकली. 1954-55 साली जेव्हा भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता, तेव्हा अमरनाथ संघाचे व्यवस्थापक होते. तर 1982 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावेळी ते पीटीआयसाठी रिपोर्टर म्हणून गेले होते.

    निवृत्तीनंतरही त्यांनी क्रिकेटची सेवा सुरू ठेवली. ते भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष, समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ म्हणून कार्यरत राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळाली. त्यांच्या क्रिकेट परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांचे पुत्र सुरिंदर अमरनाथ आणि मोहिंदर अमरनाथ हे देखील भारतासाठी क्रिकेट खेळले.

    भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविले. तसेच त्यांना पहिला सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय क्रिकेटला आत्मविश्वास, नेतृत्व आणि जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या महान खेळाडूचे 5 ऑगस्ट 2000 रोजी निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आज व्यवसायासाठी पैशांची मोठी गरज भासू शकते. अर्थात उत्पन्नाचे स्रोत मजबूत असल्याने चिंतेचे कारण उरणार नाही. गुंतवणूक करण्याची तुम्ही आज विचार कराल, मात्र घाई न करणे शहाणपणाचे ठरेल. वैवाहिक जीवन सामान्य असेल. संततीशी संबंधित एखाद्या आनंदाच्या बातमीमुळे घरात खुशीचे वातावरण असेल. व्यवसायाच्या दृष्टीने चांगला दिवस असेल. आरोग्यही उत्तम असेल.

    वृषभ – आज तुम्हाला थोडा अशक्तपणा जाणवू शकतो, मात्र  तो कोणत्याही मोठ्या शारीरिक समस्येचे मूळ ठरणार नाही. तुमच्या प्रियजनांचा सुखद सहवास लाभेल. संततीसोबत आता मित्रत्वाचे नाते तयार व्हायला सुरुवात होईल. व्यवसाय आणि कामाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप सकारात्मक ठरेल. आर्थिक परिस्थिती चांगली असेल.

    मिथुन – आज मनात अनावश्यक चिंता निर्माण होऊ शकतात. या अस्वस्थतेमुळे डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. वैवाहिक आयुष्य आणि संततीशी संबंधित बाबींमध्ये परिस्थिती अनुकूल असेल. व्यवसायातही चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम बघायला मिळतील.

    कर्क – आज सकाळपासूनच तुम्हाला सुस्ती जाणवू शकते आणि मन देखील उदास असेल. त्यामुळे स्वतःवर जास्त दबाव आणणे टाळा. आर्थिकदृष्ट्या दिवस आश्वासक आहे, कारण उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. तसेच जुन्या स्त्रोतांकडूनही पैशांचा ओघ सुरू राहील. प्रवास शक्य आहे. जोडीदार आणि  मुलांचा सहवास यामुळे मनाला शांतता मिळेल.

    सिंह – आज, कामाच्या आणि व्यवसायाच्या आघाडीवर स्थिती मजबूत राहील. एखाद्या जुन्या कायदेशीर किंवा न्यायालयीन खटल्यात दिलासा किंवा विजय मिळण्याची शक्यता आहे.  आरोग्यात सुधारणा होईल. प्रियजन, जोडीदार आणि मुलांकडून मोठा पाठिंबा मिळेल. आरोग्याच्या लहानसहान समस्या उद्भवू शकतात. योग्य जीवनशैली आत्मसात करा.

    कन्या – आज तुम्हाला न्यायालयीन प्रकरणात मोठे यश मिळू शकते. भाग्य तुमच्या बाजूने असेल. व्यवसायासाठी प्रवास घडण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांना बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आज जोडीदारासोबतची जवळीक वाढेल, त्यामुळे जुने गैरसमज किंवा समस्या दूर होऊ शकतात. आरोग्य सर्वसाधारण असेल. योगासनांचा अभ्यास फायदेशीर ठरू शकेल.

    तुळ – आज सावधगिरीने पावले उचलली पाहिजेत. परिस्थिती पूर्णपणे अनुकूल नाही, त्यामुळे घाई आणि निष्काळजीपणा टाळा. दुखापत किंवा अनपेक्षित त्रासाचा धोका असल्याने स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. वैवाहिक जीवन, संतती नोकरी आणि जोडीदार यांच्याशी संबंधित बाबी दिलासादायक ठरतील. आर्थिक परिस्थिती मजबूत बनेल.

    वृश्चिक – आजचा दिवस आनंदाने भरलेला असू शकतो. आज जोडीदाराच्या सोबतीने एखादा मोठा निर्णय घ्याल. कामाच्या ठिकाणी किंवा नोकरीमध्ये परिस्थिती अनुकूल राहील. विवाहोत्सुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. आरोग्य, प्रेम आणि व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर आजचा दिवस उत्तम असेल असे संकेत आहेत. आरोग्यही उत्तम असेल.

    हेही वाचा – मुंबई मेरी जान

    धनु – आज, तुम्ही  विरोधकांवर आणि शत्रूंवर दबाव कायम ठेवण्यात यशस्वी व्हाल. तर दुसरीकडे काही चिंता आणि तणाव यांचा सामना करावा लागेल. स्वतःच्या आरोग्याबाबत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. डायबिटीस आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी आणि पथ्य पाळण्याची आवश्यकता आहे. संततीकडून एखादी मोठी आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायातही तुम्हाला उत्कृष्ट परिणाम दिसू शकतात. नफ्याचे प्रमाण देखील वाढेल.

    मकर – आज भावनेच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. आरोग्य चांगले राहील, परंतु बाहेरील खाणेपिणे टाळणे उत्तम. संततीशी संबंधित काही बाबी चिंता उत्पन्न करणाऱ्या असू शकतात. व्यवसायासाठी दिवस खूप चांगला आहे. व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसू शकतात.

    कुंभ – आज जमीन, घर किंवा वाहन यांच्याशी संबंधित खरेदी व्यवहार अथवा एखादी चांगली बातमी मिळू शकते. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरासाठी काही मोठी खरेदी होण्याची दाट शक्यता असून, कुटुंबातही उत्सवाचे, आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. वैवाहिक जीवन, संतती आणि व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील.

    मीन – आज तुमच्या मेहनतीचे आणि धैर्याचे फळ मिळेल. नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच व्यावसायिकांसाठीही यशाची प्रबळ चिन्हे आहेत. आरोग्य चांगले राहील. संततीच्या परीक्षेतील उत्तम यशाची बातमी घरात आनंदी वातावरण निर्माण करेल. एकूणच, आजचा दिवस काम आणि व्यवसायासाठी अत्यंत शुभ असेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 सप्टेंबर 2026

    September 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती

    September 9, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    पत्रिका गुणमिलन करताना

    By अस्मिता दीक्षितSeptember 11, 2026

    || श्री स्वामी समर्थ || आज मुलाकडून त्याला पसंत पडलेल्या एका मुलीची पत्रिका गुणमिलनासाठी आली…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 सप्टेंबर 2026

    September 10, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंध, पैसा, प्रगती

    September 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 सप्टेंबर 2026

    September 9, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    September 11, 2026

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरी पुरुष अनादि आथी, आणि तैंचि लागोनि प्रकृति

    September 11, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 11 सप्टेंबर 2026

    September 11, 2026

    शार्वीने अखेर टोकाचे पाऊल उचललेच!

    September 10, 2026

    हो, मी आहे मध्यमवर्गीय!

    September 10, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 430
    • अवांतर 208
    • आरोग्य 145
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 576
    • फिल्मी 66
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 28
    • ललित 910
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मुलांची स्वप्नं जपणारी आई!

    September 11, 2026

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तरी पुरुष अनादि आथी, आणि तैंचि लागोनि प्रकृति

    September 11, 2026
    Most Popular

    पत्रिका गुणमिलन करताना

    September 11, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.