Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, September 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सार्थ ज्ञानेश्वरी : वांचूनि हस्त नेत्र पाये, हें भाष तेथ कें आहे
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : वांचूनि हस्त नेत्र पाये, हें भाष तेथ कें आहे

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 5, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, Dnyaneshwari, ज्ञानेश्वरी, अध्यात्म, महाभारत, व्यास, Mahabharat, Vyas, भगवद्गीता, Bhagavadgita, Krishna, Arjuna, Duryodhana, Chapter Thirteen, तेरावा अध्याय, अध्याय तेरावा, विश्वरूप दर्शन, चतुर्भुज रूप
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अध्याय तेरावा

    सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखम् । सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥13॥

    आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे ॥873॥ तयातें याकारणें । विश्वबाहू ऐसें म्हणणें । जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी ॥874॥ आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया । आलें असे म्हणोनि जया । विश्वांघ्री नांव ॥875॥ पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगवेगळे । तैसें सर्वद्रष्टे सकळें । स्वरूपें जें ॥876॥ म्हणोनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूचां ठायीं पक्षु । बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥877॥ जें सर्वांचिया शिरावरी । जे नित्य नांदे सर्वांपरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ॥878॥ पैं गा मूर्ति तेंचि मुख । हुताशनी जैसें देख । तैसें सर्वपणें अशेख । भोक्ते जे ॥879॥ यालागीं तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था । आली वाक्पथा । श्रुतीचिया ॥880॥ आणि वस्तुमात्रीं गगन । जैसें असे संलग्न । तैसें शब्दजातीं कान । सर्वत्र जया ॥881॥ म्हणोनि आम्हीं तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें । एवं जें सर्वांतें । आवरूनि असे ॥882॥  एऱ्हवीं तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुती । तयाचिये व्याप्ती । रूप केलें ॥883॥ वांचूनि हस्त नेत्र पाये । हें भाष तेथ कें आहे । सर्व शून्यत्वाचा न साहे । निष्कर्षु जें ॥884॥ पैं कल्लोळातें कल्लोळें । ग्रसिजत असे ऐसें कळे । परि ग्रसितें ग्रासावेगळें । आहे काई ॥885॥ तैसें साचचि जें एक । तेथ कें व्याप्यव्यापक । परि बोलावया नावेक । करावें लागे ॥886॥ पैं शून्य जैं दावावें जाहलें । तैं बिंदुलें एक पाहिजे केलें । तैसें अद्वैत सांगावें बोलें । तैं द्वैत कीजे ॥887॥ एऱ्हवीं तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा । आडळु पडे सर्वथा । बोल खुंटे ॥888॥ म्हणोनि गा श्रुती । द्वैतभावें अद्वैतीं । निरूपणाची वाहती । वाट केली ॥889॥ तेंचि आतां अवधारीं । इये नेत्रगोचरें आकारीं । तें ज्ञेय जयापरी । व्यापक असे ॥890॥

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    अर्थ

    त्याला हातपाय सर्वत्र आहेत, त्याला डोळे-मस्तक-मुख सर्वत्र आहेत, त्याला कान सर्वत्र आहेत, (याप्रमाणे)  ते विश्वामधे सर्वाला व्यापून राहिले आहे. ॥13॥

    सर्व देशांमध्ये व सर्व कालांमध्ये देशकालाहून जी वस्तु वेगळी न होता, जी क्रिया स्थूलाकडून व सूक्ष्माकडून (देहाकडून व अंत:करणाकडून) होते, तेच (ती क्रियाच) ज्याचे (ब्रह्माचे) हात आहेत. ॥873॥ या कारणास्तव या वस्तूला ‘विश्वबाहु’ असे म्हटलेले आहे. कारण की, ती वस्तु सर्व होऊन सर्व काळ सर्वच करते. ॥874॥ आणि सर्व ठिकाणी एकाच काली ते (ब्रह्म) आहे, म्हणून अर्जुना, त्यास ‘विश्वांघ्रि (ज्याचे चरण सर्वत्र आहेत असा) हे नाव आहे. ॥875॥ जसे सूर्याला अंग व डोळे हे वेगळे वेगळे नाहीत, तशी जी वस्तु, ही पदार्थाच्या स्वरूपाने असल्यामुळे ती सर्वास पाहणारी आहे. ॥876॥ म्हणून ‘विश्वतचक्षु’ (ज्याला सर्वत्र नेत्र आहेत) असा हा प्रकार, नेत्ररहिताच्या ठिकाणी, बोलण्य़ास वेद तयार झाला. ॥877॥ जे सर्वांच्या मस्तकावर नित्य सर्व प्रकाराने नांदत आहे अशी स्थिती असल्यामुळे त्यास ‘विश्वमूर्धा’ (सर्वत्र मस्तके असलेला) असे म्हटले जाते ॥878॥ अर्जुना, असे पहा की अग्नीच्या ठिकाणी जसे अग्नीचे स्वरूप तेच मुख असते, तसे जे (ब्रह्म) सर्व अंगाने सर्व भोगीत आहे, ॥879॥ या कारणाने अर्जुना, त्याला विश्वतोमुख’ (म्हणजे ज्याला सर्वत्र मुखे आहेत असा) हा प्रकार श्रुतीच्या बोलण्यात आला. ॥880॥ आणि जसे आकाश सर्व वस्तूत मिळून आहे, त्याप्रमाणे ज्याला शब्दमात्राच्या ठिकाणी कान आहेत ॥881॥ म्हणून आम्ही त्यास सर्व ठिकाणी ऐकणारा, असे म्हणतो. याप्रमाणे जे सर्व पदार्थमात्रास व्यापून आहे ॥882॥ हे बुद्धिमान अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ‘विश्वतचक्षु’ या श्रुतीने त्या वस्तूच्या व्याप्तीचे वर्णन केले. ॥883॥ एरवी ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे, हाही सिद्धांत ज्या ठिकाणी सहन होत नाही, त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी हात, पाय, डोळे हे बोलणे कोठे आहे? ॥884॥ एका लाटेने दुसर्‍या लाटेला गिळून टाकले असे कळते (वाटते), परंतु तेथे ग्रासणारे हे, ग्रासले जाणार्‍याहून वेगळे आहे काय ? ॥885॥ त्याप्रमाणे खरोखर जे एक आहे तेथे व्यापले जाणारे व व्यापणारे कोठे आहे? परंतु बोलण्याकरिता व्याप्य व व्यापक असा भेद क्षणभर करावा लागतो. ॥886॥ शून्य (काही नाही) हे जेव्हा दाखवावयाचे असते, तेव्हा एक बिंदुले (पूज्य म्हणजे काही नाही, हे दाखवणारी आकृति) काढावे लागते, त्याप्रमाणे अद्वैत जेव्हा शब्दांनी सांगावयाचे असते तेव्हा द्वैत करावे लागते. ॥887॥ अर्जुना, अव्दैताचे वर्णन करण्याकरता द्वैत अंगीकारले नाही तर गुरुशिष्यांच्या संप्रदायाला पूर्णपणे अडथळा येईल व बोलणेच खुंटेल. ॥888॥ अर्जुना, म्हणून श्रुतीने द्वैताच्या साहाय्याने अद्वैताच्या ठिकाणी वर्णन करण्याचा मार्ग मोकळा करून दिला. ॥889॥ ते ज्ञेय (ब्रह्म) ज्या प्रकाराने या सर्व दृश्य आकारामात्रामध्ये व्यापून आहे, तोच प्रकार आता ऐक. ॥890॥

    क्रमश:

    हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रूप वर्ण व्यक्ती, नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती

    (साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : रूप वर्ण व्यक्ती, नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती

    September 4, 2026 अध्यात्म

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    September 3, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    By Team AvaantarSeptember 6, 2026

    अध्याय तेरावा सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् । असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥14॥ तरी तें गा किरीटी…

    सार्थ ज्ञानेश्वरी : रूप वर्ण व्यक्ती, नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती

    September 4, 2026

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    September 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    September 3, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    मैत्रीण

    September 5, 2026

    नातवाचा ‘ध चा मा’ अन् आबा!

    September 5, 2026

    HbA1c… मधुमेह नियंत्रणाचं प्रतिबिंब

    September 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 423
    • अवांतर 206
    • आरोग्य 144
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 568
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 254
    • मैत्रीण 28
    • ललित 899
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साप्ताहिक राशीभविष्य : 06 ते 12 सप्टेंबर 2026

    September 6, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कर्पूरत्वें कापुरीं, सौरभ्य असे जयापरी

    September 6, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 06 सप्टेंबर 2026

    September 6, 2026
    Most Popular

    जातकांचे ज्योतिष ज्ञान

    September 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.