Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    September 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    September 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 सप्टेंबर 2026

    September 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती
    अध्यात्म

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    डॉ. शिरीष कुलकर्णीBy डॉ. शिरीष कुलकर्णीSeptember 3, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी साहित्य, मराठी आर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, मराठी कथा, मराठी लेख, अध्यात्म साहित्य, शिरीष कुलकर्णी, अध्यात्मिक शिरीष कुलकर्णी, माया, द्वैत अद्वैत, आद्य शंकराचार्य माया, स्वयंपूर्ण आत्मानंद, ज्ञानाचा प्रकाश, वैराग्य भावना, आत्मानंदाचा शोध
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माया भाग – 2

    भानूद्गमे यथा लोके

    दिङ्भ्रमो नश्यति ध्रुवम्।

    सत्यानुभूतौ तद्वद्धि

    अज्ञानं नश्यति ध्रुवम्॥

    – गीताव्रत

    रात्रीच्या घनदाट अंधारात आपण एखाद्या अनोळखी जंगलात रस्ता चुकलो आहोत अशी कल्पना आपण क्षणभर करूया. चारही बाजूंनी केवळ काळाकुट्ट अंधार पसरलेला आहे आणि आपल्याला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशांचा कोणताही बोध होत नाहीये. आपण दिशाभूल होऊन सैरावैरा धावत सुटलोय आणि दुर्दैवाने एकाच ठिकाणी गोल गोल फिरत राहिलोय. मनात प्रचंड भीती आहे आणि मार्ग न सापडल्याने आलेली हतबलता जाणवते आहे.  आपण आपल्या मर्यादित बुद्धीने रस्ता शोधण्याचा खूप प्रयत्न करतोय पण अंधारामुळे आपला गोंधळ अधिकच वाढत जातोय. अखेर रात्र संपतेय. पहाटे पूर्वेकडून सूर्याचा उदय होतोय आणि सूर्याची पहिली सोनेरी किरणे धरतीवर पडताहेत…

    आता काय होईल तर आपल्याला दिशा शोधण्यासाठी काही वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत. नक्कीच दिशा समजतील. सूर्याचा प्रकाश पडताच आपला तो दिशांचा भ्रम एका क्षणात आणि निश्चितपणे नष्ट होतोय. आता आपल्याला अंधाराशी युद्ध करावे लागत नाहीये. केवळ प्रकाशाची उपस्थिती पुरेशी ठरतेय. दिशा जिथे होत्या तिथेच होत्या. रस्ताही तिथेच होता. पण तो दिसत नव्हता, कारण आपल्या दृष्टीवर अंधाराचे सावट किंवा आवरण होते. अगदी याचप्रमाणे आपण या संसारात अज्ञानाच्या आणि मोहाच्या अंधारात पूर्णपणे दिशाहीन झालेले असतो. काय शाश्वत आहे आणि काय नाशवंत आहे, याचा आपल्याला कोणताही विसर पडलेला असतो. आपण नाशवंत गोष्टींमध्ये आनंद शोधत आयुष्यभर भरकटत राहतो. पण जेव्हा आपल्या अंतःकरणात सत्याचा म्हणजेच आत्मज्ञानाचा सूर्य उगवतो, जेव्हा आपल्याला ही प्रखर अनुभूती येते की, आपण केवळ हे नश्वर शरीर नसून एक अविनाशी चैतन्य आहोत! तेव्हा आपले सर्व अज्ञान आणि भ्रम एका क्षणात गळून पडतात. सत्य समजल्यानंतर अज्ञान हळूहळू जात नाही, तर ते प्रकाशात जसा अंधार नाहीसा होतो, तसे तत्काळ नष्ट होते आणि मग उरतो तो केवळ असीम प्रकाश आणि मार्ग सापडल्याची परम शांती.

    ज्ञानचक्षुः समालोक्य

    विश्वं पश्यति यः सदा।

    सर्वमात्ममयं योगी

    नान्यत् पश्यति सः सदा॥

    – गीताव्रत

    आपण सर्वसामान्य माणसे या जगाकडे नेहमी आपल्या चर्मचक्षूंनी म्हणजेच बाह्य डोळ्यांनी पाहत असतो. हे बाह्य डोळे आपल्याला नेहमी केवळ भेद आणि विविधता दाखवतात. आपल्याला कोणी गोरा दिसतो, कोणी काळा दिसतो, कोणी आपला वाटतो, तर कोणी परका वाटतो. या भेदभावामुळेच आपल्या मनात आकर्षण किंवा तिरस्कार निर्माण होतो आणि तिथूनच सर्व दुःखांची सुरुवात होते. पण जो खरा साधक आहे, जो योगी आहे, तो या जगाकडे पाहण्यासाठी एक वेगळाच डोळा उघडतो आणि तो म्हणजे ज्ञानाचा डोळा. जेव्हा हा ज्ञानचक्षू उघडू, तेव्हा पाहण्याची संपूर्ण दृष्टीच बदलून जाते. तो योगी या अफाट विश्वाकडे पाहतो, पण त्याला आता तिथे वेगवेगळी माणसे किंवा वस्तू दिसत नाहीत तर त्याला प्रत्येक कणात आणि प्रत्येक जीवात स्वतःचाच आत्मा भरून राहिलेला दिसतो.

    सोनाराच्या दुकानात गेल्यावर आपण अनेक प्रकारचे दागिने पाहतो – जसे की बांगडी, अंगठी किंवा गळ्यातील हार. आपण आकाराला महत्त्व देतो, पण जो खरा सोनार आहे, तो त्या सर्व वेगवेगळ्या आकारांमध्ये केवळ शुद्ध सोने किती आहे, तेच पाहतो. तसेच, जर पाण्याने भरलेले शंभर माठ अंगणात ठेवले तर, आकाशातील एकच सूर्य त्या शंभर माठांमध्ये प्रतिबिंबित होतो. अज्ञानी माणसाला शंभर वेगवेगळे सूर्य दिसतील, पण ज्ञानी माणसाला माहिती असते की, पाण्यात दिसणारी केवळ रूपे आहेत, वेगळी वेगळी प्रतिबिंबे आहेत. मूळ सूर्य हा एकच आहे. जेव्हा आपण प्रत्येक प्राणिमात्रात तोच एक ईश्वरीय अंश पाहू लागतो, तेव्हा आपण कोणाचा द्वेष कसा करू शकणार? जिथे दुसरा कोणी उरलेलाच नाही तिथे मत्सर कोणाचा करायचा आणि राग कोणावर धरायचा? योग्याची ही अवस्था आहे. ही अवस्था अत्यंत उच्च असते. तो समाजात राहतो, सर्वांशी प्रेमाने वागतो, पण आतून त्याला संपूर्ण विश्व केवळ आत्मामय झालेले दिसते.

    श्रवणाद्यैः प्रदीप्ते हि

    ज्ञानाव्ह्नौ तापितो यदा।

    जीवदोषविनिर्मुक्तः

    स्वर्णवत् भासते तदा॥

    – गीताव्रत

    ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया ही काही अचानक घडणारी जादू नाही तर, ती एक अत्यंत शिस्तबद्ध आणि टप्प्याटप्प्याने केली जाणारी साधना आहे. वेदांतामध्ये या साधनेचे तीन मुख्य टप्पे सांगितले आहेत ते म्हणजे,

    श्रवण, मनन आणि निदिध्यासन!

    श्रवण म्हणजे गुरूंच्या मुखातून आणि शास्त्रांमधून सत्याचे अत्यंत श्रद्धेने आणि एकाग्रतेने ऐकणे. पण नुसते ऐकून काम होत नाही. त्यानंतर येतो मननाचा टप्पा! ज्यामध्ये ऐकलेल्या ज्ञानावर स्वतःच्या बुद्धीने अत्यंत सखोल विचार करायचा असतो. आपल्या मनातील सर्व शंकांचे निरसन करायचे असते आणि शेवटचा टप्पा म्हणजे निदिध्यासन ज्याचा अर्थ आहे त्या सत्य स्वरूपाचे अखंड आणि एकरूप होऊन ध्यान करणे!

    साधक या तीनही टप्प्यांमधून अत्यंत निष्ठेने जातो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा एक प्रचंड आणि तेजस्वी अग्नी प्रज्वलित होतो. या ज्ञानाग्नीमध्ये साधक स्वतःला पूर्णपणे झोकून देतो आणि स्वतःला तावून सुलाखून घेतो. जसे खाणीतून काढलेले कच्चे सोने अनेक अशुद्धींनी माखलेले असते, त्याला शुद्ध करण्यासाठी सोनार ते सोने अत्यंत प्रखर अग्नीत टाकतो. तो अग्नी सोन्याला जाळत नाही तर, सोन्याला चिकटून असलेली माती आणि इतर धातूंची अशुद्धी जाळून टाकतो. अगदी तसेच हा ज्ञानाचा अग्नी आपल्या आत्म्याला जाळत नाही तर, आपल्यावर साचलेले काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे सर्व जीवदोष समूळ जाळून भस्मसात करतो. जेव्हा हे सर्व दोष जळून जातात तेव्हा तो साधक त्या शुद्ध सुवर्णासारखा अत्यंत तेजस्वी आणि मूल्यवान होऊन चमकू लागतो. त्याचे संपूर्ण अस्तित्व लोकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आणि प्रकाशमान होते.

    उपाधिनाशे जाते तु

    पूर्णज्ञानं यदा भवेत्।

    जीवात्मब्रह्मणोरैक्यं

    तत् ज्ञानं परमं भवेत्॥

    – गीताव्रत

    आपण माणसांनी स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःभोवती अनेक कृत्रिम आवरणे किंवा लेबले लावून घेतली आहेत. मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी सुशिक्षित आहे, मी अमुक जातीचा आहे किंवा मी तमुक धर्माचा आहे… या सर्व कृत्रिम आवरणांना वेदांतामध्ये उपाधी असे म्हणतात. या उपाधींमुळे आपण स्वतःला एका अत्यंत लहान आणि मर्यादित चौकटीत बंदिस्त करून घेतो आणि अथांग विश्वापासून वेगळे समजतो. हे समजून घेण्यासाठी आपण मातीच्या घटाचे म्हणजे माठाचे उदाहरण घेऊया. माठाच्या आत जी पोकळी असते तिला आपण घटाकाश म्हणतो आणि माठाच्या बाहेर जे अफाट आणि अनंत आकाश असते त्याला आपण महाकाश म्हणतो. आपल्याला वाटते की, माठातले आकाश वेगळे आहे आणि बाहेरचे आकाश वेगळे आहे. पण जेव्हा तो माठ फुटतो तेव्हा काय होते. माठातले आकाश बाहेरच्या आकाशाला जाऊन मिळते का, नाही! मुळीच नाही. ते आकाश नेहमी तिथेच आणि एकच होते केवळ त्या मातीच्या आकारामुळे म्हणजेच उपाधीमुळे ते वेगळे वाटत होते. जेव्हा पूर्ण ज्ञानाचा उदय होतो, तेव्हा आपल्या अहंकाराची आणि देहभावाची ही मातीची उपाधी पूर्णपणे नष्ट होते. ती उपाधी गळून पडली की, आपल्याला अत्यंत स्पष्टपणे जाणवते की, ज्याला आपण आपला छोटासा जीवात्मा समजत होतो तो आणि हे संपूर्ण विश्व व्यापून उरणारे परब्रह्म हे दोन वेगळे नसून ते पूर्णपणे एकच आहेत. जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील हे अद्वैत आणि अतूट ऐक्य अनुभवणे, हेच मानवी जीवनातील सर्वात सर्वोच्च आणि परम ज्ञान मानले गेले आहे. तिथे मग साधक आणि साध्य असा कोणताही भेद उरत नाही.

    वासनात्यागतो ज्ञानं

    वैराग्यं जायते यदा।

    आत्मानन्दमनुप्राप्य

    शान्तिर्भवति वै तदा॥

    – गीताव्रत

    आपले सगळे आयुष्य हे मृगजळामागे धावण्यातच संपून जाते. आपल्याला नेहमी असे वाटत असते की, एखादी बाह्य वस्तू मिळाली, म्हणजे गाडी, बंगला, मोबाइल, ऑफिस, सोने, किंवा भरपूर संपत्ती मिळाली किंवा मोठे पद मिळाले की, आपल्याला खरे सुख मिळेल. बाह्य जगात सुख शोधण्याच्या या अदम्य आणि कधीही न संपणाऱ्या इच्छेलाच वासना असे म्हणतात. पण आपला अनुभव आपल्याला नेहमी हेच सांगतो की, एक इच्छा पूर्ण झाली की, त्यातून दहा नवीन इच्छा जन्म घेतात. आगीत जसे तूप टाकले की, आग विझण्याऐवजी अधिकच भडकते तसाच हा इच्छा आणि वासनांचा खेळ आहे. जेव्हा माणसाला या व्यर्थ धावपळीचे सत्य समजते आणि तो अत्यंत आनंदाने आणि स्वेच्छेने या सर्व बाह्य वासनांचा त्याग करतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात खऱ्या वैराग्याचा जन्म होतो.

    वैराग्य म्हणजे संसाराचा तिरस्कार करणे नव्हे. वैराग्य म्हणजे संसारात राहूनही संसारातील कोणत्याही गोष्टीची आपल्या मनावर पकड नसणे. जेव्हा मन बाहेरच्या विषयांकडे धावणे थांबवते, तेव्हा साहजिकच ते मन आतल्या बाजूला म्हणजेच स्वतःच्या स्वरूपाकडे वळते आणि तिथे अंतरंगात त्याला जो शुद्ध आत्मानंद प्राप्त होतो, तो अवर्णनीय असतो. हा आनंद कोणत्याही बाह्य व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसतो तर, आनंद हा आपला  मूळ स्वभाव असतो. स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती झाली की, मग मनाची सर्व तडफड थांबते आणि त्याला जी शाश्वत आणि चिरंतन शांती मिळते ती जगातील कोणतीही संपत्ती किंवा सत्ता देऊ शकणार नाही. ही शांती मिळवणे हेच या ज्ञानमार्गाचे अंतिम ध्येय आहे.

    आपण हळूहळू शंकराचार्यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाच्या अगदी गाभाऱ्यात पोहोचत आहोत.

    क्रमश:
    Avatar photo
    डॉ. शिरीष कुलकर्णी

    डॉ. शिरीष कुलकर्णी M.J. M.B.A.B.A. GDC&A., P.HD.... सहकार प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा. कथा, कादंबरी, कविता, गझल, आध्यात्मिक चिंतन अशा विविध विषयावर 51 पुस्तके लिहिलेली आहे. कर्णधार हे व्यवस्थापनावरील पुस्तक, चौथा स्तंभ हे पत्रकारितेतील अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेले पुस्तक, यासोबत संतसम्राज्ञी, संत सत्संग, विश्वाराधन, सजल, गीताव्रत साधना - 3 भाग प्रसिद्ध, हिंदोळा, अमात्र, नामसाधना, नासदीय, ईशोवास्य, कबीराऽ रे, संपादकीय, माया, ब्रह्मजिज्ञासा, Editorials, luminous thoughts हे इंग्रजी संपादकीय लेखा़चे पुस्तक, किंचितरेषा, साधनारंभ, खराखुरा कर्मयोग, संत मीराबाईंच्या जीवनावर सखोल अभ्यास करून लिहिलेली संत मीराबाईंवरील पहिलीच कादंबरी 'संतसम्राज्ञी'. या कादंबरीचे हिंदी, इंग्रजीतून अनुवादही झालेले आहेत. स्वर्गोपनिषद, वीणा आणि वाणी, गीताव्रत साधना ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. संशोधन हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा मुख्य आत्मा आहे. सजल या गझल संग्रहास अरुण दाते यांनी प्रस्तावना दिली. बायबल, कुराण आणि भगवद्गीता यावर अभ्यासपूर्ण लेखमाला आणि पुस्तके प्रकाशित झाली. ‘मुस्लिम धर्म आणि अहिंसा’, ‘संत कबीर’, ‘येशू ख्रिस्त आणि अहिंसा’, ‘रूमी आणि अद्वैत सिद्धांत’ या विषयावर लेखन आणि व्याख्याने. 2016नंतर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेऊन साहित्यिक आणि अध्यात्मिक संशोधनासाठी पूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय. महाराष्ट्र पत्रकार संघाचे, मुख्य राज्य संघटक म्हणून सलग पंधरा वर्षं सेवा. चित्रपट कथा-पटकथा, संवाद आणि गीतलेखन. काही चित्रपटासाठी त्यांची गाणी रवींद्र साठे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत कोसंबी, वैशाली चितळे, यांनी गायलेली आहेत. 14 चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या भूमिका. ब्रह्मचैतन्यसाठी कथा-पटकथा आणि संवाद लेखन. कथालेखन, कादंबरी लेखन, कविता लेखनाच्या 40पेक्षा जास्त विनामूल्य कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून वीस वर्षं अविरोध सेवारत. लायन्स क्लब योगा आणि मेडिटेशन टेरिटरी चीफ म्हणून सेवा. दोन मंदिरे, अनाथ आश्रम, शाळा, ग्रंथालये, टेक्सटाइल मिलची उभारणी निरपेक्ष भावनेने विनामूल्य केली. लोकव्रत प्रकाशनाचे मानद सचिव म्हणून वीस वर्षे विनामूल्य सेवा. त्या माध्यमातून आजवर हजारो पुस्तके प्रसिद्ध केली. आजवर 1600हून अधिक मुखपृष्ठे तयार केली आहेत. 1500पेक्षा जास्त संपादकीय लेख आणि वृत्तपत्रासाठी तितकेच लेख लिहिलेले आहेत. अनेक वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन केलेले आहे. स्त्री मुक्ती, समस्या निवारण केंद्र आणि कामगार चळवळीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण, भाऊ फाटक आणि सर्वोदय चळवळीचा प्रदीर्घ सहवास. भारतातील पहिल्या शासकीय पोलीस ठाण्यातील समस्या निवारण केंद्राचा सेक्रेटरी म्हणून सलग पंधरा वर्षे सेवा. अनेक साहित्य संमेलने, आणि ग्रामीण साहित्य संमेलनाची संकल्पना मांडून ती साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडली. स्त्रीभ्रूण हत्या, नकूसा नामबदल चळवळ, स्वयंसहायता बचत गट चळवळ यासाठी पाचशेहून अधिक बचत गट स्थापनेच्या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन आणि व्याख्याने. पन्नासहून अधिक सामाजिक आणि साहित्यिक पुरस्कार. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, दिल्ली यांच्या शुभहस्ते आणि पू. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत 'अक्षर वाड्.मय' पुरस्कार. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहीत. त्यांच्या सजल या पेजला 75 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

    Related Posts

    सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    September 3, 2026 अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता

    September 2, 2026 अध्यात्म

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026 अध्यात्म
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अध्यात्म

    सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    By Team AvaantarSeptember 3, 2026

    अध्याय तेरावा म्हणोनि इया वाहणीं । केली म्यां उपलवणी । वांचूनि दुधा मेळऊनि पाणी ।…

    सार्थ ज्ञानेश्वरी : ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता

    September 2, 2026

    शुक्राचे अध्यात्म

    September 1, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे

    September 1, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    September 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    September 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 सप्टेंबर 2026

    September 3, 2026

    एक्झिट

    September 2, 2026

    सौरभला भेटला देव!

    September 2, 2026

    वास्तुशास्त्र आणि नातेसंबंधातील ऊर्जा

    September 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 420
    • अवांतर 206
    • आरोग्य 143
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 563
    • फिल्मी 65
    • फूड काॅर्नर 253
    • मैत्रीण 28
    • ललित 891
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    स्वयंपूर्ण आत्मानंदाची प्राप्ती

    September 3, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त

    September 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 सप्टेंबर 2026

    September 3, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.