Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    August 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    August 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026

    August 26, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 26
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…
    आरोग्य

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    डॉ. प्रज्ञावंत देवळेकरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरAugust 26, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, डॉ प्रज्ञावंत देवळेकर, डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर, लेखक प्रज्ञावंत देवळेकर, नैसर्गिक उपाय, घरगुती उपचार, कृत्रिम उपचार, आर्टिफिशअल उपाय, इंग्रजी औषधे,
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    सकाळीच ओपीडीत एक तरुण आई आपल्या सात-आठ वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती… म्हणाली, “डॉक्टर, खोकला आहे, पण औषध नको! प्लस तुमची फी देते, पण काही घरगुती उपाय असेल तर सांगा.”

    “का? औषधं का नको?” मी हसत विचारलं.

    “औषधांमध्ये केमिकल्स असतात ना! साइडइफेक्ट्स होतात प्लस सवय लागते… घरगुती उपाय, नैसर्गिक असतात तेच सेफ…”- माऊली पुटपुटली.

    इथं सुरू झाला एक परिचित, पण गुंतागुंतीचा विषय ‘Natural Fallacy’! ‘Natural Fallacy’ म्हणजे नैसर्गिक तर्कदोष; “जे नैसर्गिक आहे, तेच चांगलं आणि सुरक्षित आहे आणि जे औषध आहे ते कृत्रिम आणि त्यामुळं धोकेदायक” असा समज. हा विचार ऐकायला अत्यंत आकर्षक वाटतो, पण नेहमीच खरा असतो का?

    हेही वाचा – जगायला नेमका किती मेंदू लागतो?

    या मुलाला साधा विषाणूजन्य खोकला होता. थोडा त्रास होता, पण गंभीर काही नव्हतं. आईनं आधीच काही उपाय केले होते. जसे मध-दूध-हळद काढा, काही प्रमाणात आरामही झाला होता, पण खोकला पूर्णपणे जात नव्हता. आता ती ‘औषधं टाळून’ खोकला पूर्ण बरा होण्याची अपेक्षा करत होती.

    नैसर्गिक तर्कदोष रुजतो, कारण ‘नैसर्गिक’ म्हणजे ‘सुरक्षित’ हा समज – जसं झाडं, औषधी वनस्पती, आजीचे उपाय… दुसरीकडे, औषधांची भीती अर्थात साईडइफेक्ट्स, सवय लागण्याची चिंता…

    ‘नैसर्गिक’ म्हणजे नेहमी ‘निरुपद्रवी’ नसतं, काही वनस्पती Toxic असू शकतात, चुकीच्या डोसमुळे त्रास वाढू शकतो, फक्त घरगुती उपचार केल्यानं आजार लांबू शकतो – complications निर्माण होऊ शकतात आणि योग्य उपचार उशिरा सुरू होतो. तर, सर्व औषधं नेहमीच घातक असतात, हा गैरसमजही असतो.

    “तुम्ही जे घरगुती उपाय केले, त्यानं थोडा फायदा झाला ना?” मी त्या आईला शांतपणे विचारलं.

    ‘हो.’ – ती.

    “म्हणजे उपाय चुकलेत असं नाही, पण कमी पडलेत का?” – मी.

    त्या थोड्या विचारात पडल्या. त्यांना जे सांगितलं तेच तुम्हालाही सांगतो,

    ”घरगुती उपचार कधी कधी आराम देतात, पण बरं होण्यासाठी अनेकदा औषधांची मदतही आवश्यक असते.” यात संतुलन आवश्यक आहे. जसे, जुजबी औषधासोबत घरगुती उपचार सुरू ठेवायला हरकत नाही; पण Warning signs (धोक्याचे संकेत) माहीत हवेत! दोन्ही उपाय करू शकतो… पण योग्य तिथं -योग्य तितके!

    हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!

    “नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम” हा वाद नाही. दोन्हींचा योग्य वापर हवा. त्यासाठी कितपत, कधी, काय उपयुक्त आहे, याची माहिती स्वत:कडे हवी. औषधं म्हणजे शत्रू नाहीत, पण योग्यपणे वापरली तरच मित्र आहेत, डॉक्टरचं काम फक्त औषधं देणं नव्हे, तर रुग्णाच्या विश्वासाचा आदर करत त्याला योग्य दिशा देणं, हे देखील आहे.

    सोमवारी तीच आई परतेल आणि तेव्हा हाच मुलगा हसत-खेळत असेल.

    थोडक्यात ‘नैसर्गिक’ असणं हा एक गुण असू शकतो, पण ‘उपयुक्त’ असणं हे अधिक महत्त्वाचं! कारण निसर्ग आणि विज्ञान हे एकमेकांचे विरोधक नाहीत, ते योग्य प्रकारे एकत्र आले तेव्हाच ‘खरा’ उपचार घडतो!

    Avatar photo
    डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

    पेशानं वैद्यकीय व्यावसायिक. आरोग्यशिक्षक. माणसं जाणून घेण्याची जिज्ञासा आणि त्यांच्या दुःखावर चिंतन करत निराकरण करण्याची आवड असल्यानं पुण्यातील ‘होप मेडिकेअर फाऊंडेशन’ इथं गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत. मानवी जीवन हे शरीर विज्ञानाच्या सोबत भौतिक-रासायनिक-खगोल आदी साऱ्याच उपयोजित विज्ञानाशी जोडलं गेलंय, त्यातले शोध-शोधकर्त्यांची धडपड, त्यामागच्या रम्य कथा हे सारं समजावून घेणं आणि देणं हे मनापासून आवडत असल्यानं आपल्या आत आणि आजूबाजूला असलेलं ‘विज्ञान’ सर्वांमध्ये रुजावं यासाठी सदैव प्रयत्नरत!

    Related Posts

    भूक लागत नाही?

    August 19, 2026 आरोग्य

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026 आरोग्य

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    भूक लागत नाही?

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरAugust 19, 2026

    “डॉक्टर, भूकच लागत नाहीये,” ओपीडीत आल्या आल्या बसण्याआधीच पेशंटनं तक्रार केली. आपल्याकडं हे असं मोघम…

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    August 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    August 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026

    August 26, 2026

    मोकळीक

    August 25, 2026

    हनी ट्रॅप… आयुष्यातून उठवणारा!

    August 25, 2026

    गणेश सर्वांसाठी बाप्पा बनला…

    August 25, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 409
    • अवांतर 206
    • आरोग्य 141
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 550
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 251
    • मैत्रीण 24
    • ललित 876
    • शैक्षणिक 86
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कृत्रिम आणि नैसर्गिक उपाय…

    August 26, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बेडूक सापाचां तोंडीं, जातसे सबुडबुडीं

    August 26, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 26 ऑगस्ट 2026

    August 26, 2026
    Most Popular

    केतू म्हणजे निर्व्याज भक्ती

    August 25, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.