Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, October 10
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026
    पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 23 ते 29 ऑगस्ट 2026

    प्राजक्ता काथेBy प्राजक्ता काथेAugust 23, 20261 Comment4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठी साहित्य, मराठीलेखक, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, राशीभविष्य, बाराराशी, राशीफळ, राशीअंदाज, Weekly horoscope, horoscope, राशी, साप्ताहिक राशीभविष्य, प्राजक्ता काथे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मेष

    • हा आठवडा मेष राशीसाठी उत्तम आहे. नोकरदारांच्या बाबतीत जागेत बदल संभवतो. नव्या कामाच्या ठिकाणी रुळायला थोडा वेळ लागू शकतो. वाहन खरेदीचा योग आहे. जागेची खरेदी-विक्री करताना व्यावसायिक वर्गाने कागदपत्रे तपासून घ्यावीत. नवीन योजना सफल होतील. व्यवसायासंदर्भातील कामे पटापट होतील. महिलांना परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी मोबाइलच्या मोहजालापासून लांब राहावे.

    वृषभ

    • हा आठवडा सामान्य स्वरूपाचा आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी थोडा त्रास संभवतो. कामाचा ताण जाणवेल. नवीन जबाबदारीही मिळू शकते. शनी लाभस्थानी असल्यामुळे पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला मिळू शकतो. व्यावसायिक वर्गाचे कामानिमित्त छोटे-मोठे प्रवास होतील. घरची जबाबदारी तसेच व्यवसाय यांच्यात संतुलन राखताना कसरत करावी लागू शकते. महिलांना माहेरी जाण्याचा योग आहे, भावंडांकडून सहकार्य मिळू शकते. विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवून अभ्यास करावा, मेहनत घ्यावी लागेल.

    मिथुन

    • या आठवड्यात ग्रहांची उत्तम साथ मिळेल. नोकरदारांनी वायफळ गप्पा टाळाव्यात. मोजकेच, पण विषयाला धरून बोललात, तर कामे पटापट होतील. व्यावसायिक वर्गासाठी शनी कर्मस्थानी असल्यामुळे केलेल्या कामाचे फळ मिळून फायदा होईल. प्रवास निष्फळ होण्याची शक्यता आहे, म्हणून लांबचा प्रवास टाळा. महिलांना नवीन गोष्टी शिकता येतील. स्वास्थ्यासाठी सात्विक आहार घ्या. विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती मिळेल.

    कर्क

    • या आठवड्यात आयुष्यात परिवर्तन होईल. नोकरदारांनी नशिबावर अवलंबून राहू नये. मेहनत आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. धोक्याच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका, अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता आहे. राहू अष्टमात असल्यामुळे व्यावसायिक वर्गाने कोर्ट-कचेरी आणि वडिलोपार्जित जमिनीचे प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. महिलांच्या दृष्टीने घरात आनंदी वातावरण असेल, मुलांच्या आवडी जपा. क्रीडा आणि कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात.

    सिंह

    • हा आठवडा आव्हानात्मक असेल. नोकरदारांसाठी रवी स्वतःच्या राशीत असून केतूबरोबर आहे. तब्येतीची काळजी घ्या. मानसिक चिंता राहू शकते. फाजील आत्मविश्वास नको. महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात घेऊ नका. व्यावसायिक वर्गाला भविष्याची चिंता राहील. प्रॉपर्टीचे वाद वेळेत मिटवा. जुनी दुखणी त्रास देऊ शकतात; वेळीच उपाय करा. मोठे निर्णय घेताना महिलांनी घरच्यांना विश्वासात घ्यावे. विद्यार्थ्यांनी प्रवास करताना ट्रेकिंग किंवा लांबचा प्रवास करू नये.

    हेही वाचा – I Love You अन् अव्यक्त भावना…

    कन्या

    • हा आठवडा संमिश्र स्वरूपाचा असेल. नोकरदारांना पूर्वी केलेल्या कामाचा मोबदला मिळू शकतो. कामाचे नियोजन योग्य पद्धतीने करा, वेळ वाया घालवू नका. व्यावसायिक वर्गाला योग्य वेळी, योग्य व्यक्तीची साथ मिळेल. यालाच भाग्य म्हणतात. इच्छापूर्ती होईल. व्यापार उत्तम सुरू राहील. महिलांचा धार्मिक कार्यात वेळ जाईल. तथापि, आजार अंगावर काढू नका. विद्यार्थ्यांनी मित्रांबरोबरचे वाद विकोपाला जाऊ देऊ नयेत.

    तुळ

    • हा आठवडा व्यावसायिक उन्नतीचा आहे. नोकरदारांनी मित्रांना पैसे उधार देऊ नयेत, तसेच गॅरेंटर किंवा जामीन राहू नका. काही कामे मोबदला न घेता करावी लागतील. व्यावसायिक वर्गाच्या बाबतीत जागेत बदल संभवतो. वास्तू आणि वाहन खरेदी-विक्रीचा योग आहे. शक्यतो नवीन कर्ज घेऊ नका. महिलांना नोकरीत बढतीचे योग आहेत. विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

    वृश्चिक

    • हा आठवडा खूप धावपळीचा असेल. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांना सांभाळून घ्यावे लागू शकते. काही कामे मनाविरुद्ध करावी लागतील. व्यावसायिक वर्गासाठी शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर राहील. नशिबाची साथ मिळेल. महिलांनी एकटीने प्रवास टाळावा, नको ते धाडस करू नये. प्रेमप्रकरणात विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होऊ शकतो. त्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे इष्ट.

    धनु

    • या आठवड्यात काही गोष्टी अचानक घडतील. नोकरदारांना कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. वरिष्ठ खूश राहतील. वास्तूचे नूतनीकरण करू शकाल. व्यावायिक वर्गाला टक्केवारीच्या व्यापारात फायदा होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी राहील. महिलांचे भावंडांशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी मित्रांच्या वादावादीत पडू नये. तसेच, आपले वाहन कोणालाही देऊ नका.

    मकर

    • या आठवड्यात आयुष्यात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या दृष्टीने कामाच्या ठिकाणी सुलभता असेल. व्यक्तिमत्त्व सकारात्मक राहील. संततीबाबत चिंता राहील. व्यावसायिक वर्गाने आर्थिक व्यवहार जपून करावेत. दूरचे प्रवास करू नका. भागीदारीच्या व्यवसायात उत्तम यश मिळू शकते. महिलांनी मौन राखणे इष्ट, सोबतच प्राणायाम करावा. त्यामुळे मनातील चिंता आणि भय दूर होतील. विद्यार्थ्यांनी पाण्यापासून लांब राहावे, अनोळखी ठिकाणी पोहण्यासाठी जाऊ नका.

    कुंभ

    • या आठवड्यात नातेसंबंधांमध्ये आपले खरे कोण, याची जाणीव होईल. नोकरदारांना नवीन जबाबदारी मिळेल. वरिष्ठ खूश राहतील. आर्थिक नियोजन करून मग गुंतवणूक करा. व्यावसायिक वर्गाला व्यवसायासाठी नवीन कर्ज हवे असल्यास ते मंजूर होईल. त्यामुळे पुढील कामांना वेग येईल. वाहन किंवा नवीन जागेसाठी खर्च होईल. महिलांच्या बाबतीत कुटुंबात मतमतांतरे होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी वायफळ गप्पा टाळाव्यात, कृती करावी. मेहनत घेतल्यास यशस्वी होऊ शकाल.

    हेही वाचा – ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    मीन

    • हा आठवडा संयम ठेवण्याचा आहे. नोकरदारांनी आजचे काम उद्यावर टाकू नये. हाताखालील सहकाऱ्यांकडून योग्य प्रकारे कामे करून घ्या, त्यांच्या कामावर स्वतः जातीने लक्ष ठेवा. व्यावसायिक वर्गाने आळस सोडून कामाला लागावे. कामानिमित्त परदेश प्रवास होईल. जपून पैसे वापरा, अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करा. महिलांनी अपशब्द वापरू नयेत, उलट क्षमाशीलता दाखवावी. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळू शकते, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.

    prajaktakathe3970@gmail.com

    प्राजक्ता काथे

    वाणिज्य शाखेत पदवी (1991), ज्योतिष शास्त्री (2003), हस्तसामुद्रिक प्रवीण (2004), कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर (2008), होरा मार्तंड (2016) या पदव्या प्राप्त. 2005पासून पत्रिकेच्या आधारे अभ्यासकरून लोकांच्या अडचणीबाबत मार्गदर्शन करीत आहेत. हस्तसामुद्रिक शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धती आणि होरा शास्त्र यांचा एकत्रित सखोल अभ्यास असून, जीवनातील प्रश्न आणि आव्हानांचे अचूक विश्लेषण करून, व्यवहार्य मार्गदर्शन देण्याचा दीर्घ अनुभव.

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026 पंचांग आणि भविष्य

    मिथुनेचा शुक्र… सोशल बटरफ्लाय

    October 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 ऑक्टोबर 2026

    October 9, 2026 पंचांग आणि भविष्य

    1 Comment

    1. Anand on August 23, 2026 8:07 pm

      मीन राशि बद्दल सविस्तर माहिती सांगितल्या तर बरी आपल्या भविष्य जुळते राहते आपले भविष्य राहते

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    By Team AvaantarOctober 10, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 10 ऑक्टोबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 18…

    मिथुनेचा शुक्र… सोशल बटरफ्लाय

    October 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 09 ऑक्टोबर 2026

    October 9, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑक्टोबर 2026

    October 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026

    शर्वाय-आराध्याबाबत आनंदी अनभिज्ञच!

    October 9, 2026

    सासू आणि आई… दोघी सारख्याच!

    October 9, 2026

    Recipe : ढाबा स्टाईल लसुणी पालक!

    October 9, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 465
    • अवांतर 216
    • आरोग्य 157
    • पंचांग आणि भविष्य 622
    • फिल्मी 71
    • फूड काॅर्नर 258
    • मैत्रीण 30
    • ललित 982
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    ताई-माई-अक्का स्वत:ला किती छळणार?

    October 10, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अविवेकमहामंत्र, जें मौढ्यमद्याचें पात्र

    October 10, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 10 ऑक्टोबर 2026

    October 10, 2026
    Most Popular

    Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!

    October 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.