Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, August 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » चमचम
    ललित

    चमचम

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यAugust 21, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, डॉ विवेक वैद्य, डॉक्टर विवेक वैद्य, लेखक विवेक वैद्य, नवीन आणि अवनी, अवनीचे वैद्यकाकांचे चमचम, कॉर्पोरेट ऑफिस, वैद्यकाकांचे टक्कल, वैद्यकाकांचे चमकणारे टक्कल
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    तर ही गोष्ट मी सरकारी क्वार्टरमध्ये राहत होतो तेव्हाची. आमच्या फ्लॅटच्या शेजारचे साठेकाका रिटायर होऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये नवीन पटेल आणि अवनी पटेल हे जोडपे राहायला आले. लग्नाला बहुतेक 1-2 वर्षेच झाली असणार. अवनी दिसायला सुंदर. मराठी अस्खलित बोलायची. कदाचित इंटरकास्ट लग्न असावे. अर्थात, या वयात मला फक्त दृष्टीसुख. अधूनमधून ‘Hi’, ‘हॅलो’ चालायचे. नवीन सकाळीच जायचा तो थेट संध्याकाळी यायचा.

    माझीही सकाळी लवकर ड्युटी असायची. मी पण सकाळी आठेक वाजता निघायचो. स्कूटरवरून जायचो. काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की, मी सकाळी ड्युटीसाठी स्कूटरवरून घराबाहेर पडलो की, अवनी तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत येऊन मला बघायची… मी जाईपर्यंत! सुरुवातीला वाटले, योगायोग असेल… तिची गॅलरीत कपडे वाळविण्यासाठीची वेळ आणि माझी वेळ एकच असेल. पण नंतर बघितले तर ती कपडे कधीच गॅलरीत वाळत टाकत नसे. म्हणजे, फक्त मला बघायला ती गॅलरीत येतं असे. म्हणजे?…

    माझी धडधड वाढली. अजूनही मी इतका देखणा दिसतो? या वयात? मी आरशात पाहिले. अजूनही मेंटेन होतो. चेहराही आकर्षक होता. माझी छाती अभिमानाने भरून आली. पुढचे दोन दिवस मी बरोबर लक्ष ठेवले. माझी स्कूटर मी बिल्डिंगच्या बाहेर काढली की, ती गॅलरीत यायची. दुसऱ्या दिवशी मी सहज मागे बघतो, असे दाखवून बघितले तर, ती माझ्याचकडे बघत होती. माझ्या नसानसातून उत्साहाचे कारंजे उसळत होते. मी स्कूटर नसून बुलेट 350 चालवत असल्याचे फीलिंग मला आले.

    दुसऱ्या दिवशी मी मुद्दामच बिल्डिंगच्या बाहेर पडताना स्कूटर हळू केली आणि मागे वळून पाहिले. अवनी माझ्याकडेच पाहत होती. अचानक ती हसली आणि घाईघाईत आतमध्ये पळून गेली. माणसाला अजून काय हवे?

    हेही वाचा – ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    दुसऱ्या दिवशी रविवार होता. ही मंदिरात गेलेली. सकाळीच अवनी घरी आली. बहुदा हिने काही खाण्याचा पदार्थ पाठवला असेल, तर रिकामा डबा द्यायला आली. मला उगाचेच धडधडून आले. आज छान संधी होती, तिला विचारायची. घरात आम्ही दोघेच. तिने डबा माझ्याकडे दिला आणि परत जाण्यासाठी वळणार तोच मी हिम्मत करून विचारले.

    “अवनी, मी ऑफिसला जातो तेव्हा तू गॅलरीत का येऊन उभी राहते?”

    “ते होय… सांगते. पण तुम्हाला राग तर नाही येणार ना?”

    “नाही नाही. राग कसला…” माझ्या मनातला मोर नाचू लागला.

    “हे बघा. तुम्ही सकाळी ऑफिसला जाता तेव्हा कोवळे ऊन पडलेले असते. आपल्या बिल्डिंगच्या बाहेरच पूर्वेकडे तोंड असलेले बाहेरून पूर्णपणे काच लावलेले कॉर्पोरेट ऑफिस आहे.”

    मी आता गोंधळात पडलो… “त्याचं काय?”

    “सूर्याची किरणे त्या काचेवर पडून परावर्तीत होऊन आपल्या बिल्डिंगच्या बाहेरच्या रस्त्यावर पडतात.”

    “मग काय?” आता मला काही म्हणजे काहीच समजेना. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय का? काचेची बिल्डिंग काय? परावर्तीत किरणे काय?”

    हेही वाचा – प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असते…

    “सांगते ना,” आपले हसू कसेबसे आवरत अवनी पुढे म्हणाली, “वैद्यकाका तुम्ही त्या किरणामधून गेला ना की, तुमचे टक्कल चमकायला लागते. अगदी एखादी दिव्याची माळ कशी चमकते चम चम… तशीच! तेच पहायला मी रोज बाहेर येते.”

    आणि अवनी मोठमोठ्याने हसायला लागली…

    तिच्याबरोबर मीही हसलो ओढूनताणून..

    तर ते असो..

    दुसऱ्या दिवसापासून अवनी माझ्या ऑफिसच्या वेळी गॅलरीत दिसायची बंद झाली…
    आणि मीही त्या दिवसानंतर ऑफिसला कॅप घालून जायला लागलो.

    0000

    आता मी रिटायर झालो. गावी राहायला आलो. अवनीशी अजूनही नाते टिकून आहे. एका गोड मुलीची ती आता आई आहे. तिच्याकडून थोडेफार गुजराती मीही शिकलो.

    अधूनमधून तिचा फोन येतो आणि ती विचारते, “वैद्यकाका, केम छो?”

    आणि माझ्या टकलावरून हात फिरवत मी म्हणतो, “बस्स! मज्जामा.”

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026 ललित

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026 ललित

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    August 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    By प्रणाली वैद्यAugust 21, 2026

    भाग – 39 आराध्याने खिडकीबाहेर पाहिलं, थोडं पुढं वाकून… “हां… हाच तो व्हिला?” — तिच्या…

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    राहुल अग्रवाल पार्थच्या घरी गेला आणि…

    August 20, 2026

    उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!

    August 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली

    August 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 21 ऑगस्ट 2026

    August 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 403
    • अवांतर 206
    • आरोग्य 140
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 543
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 250
    • मैत्रीण 24
    • ललित 866
    • शैक्षणिक 85
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    माधवचा खेळ संपविण्याचा शर्वायचा निर्धार

    August 21, 2026

    चमचम

    August 21, 2026

    निसर्गाचा इकोसिस्टीम इंजिनीअर : हत्ती!

    August 21, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… अष्टम भाव आणि तर्क

    August 21, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.