Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, August 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!
    ललित

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    प्रणाली वैद्यBy प्रणाली वैद्यAugust 14, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मराठीकथा, प्रेमकथा, लव्हस्टोरी, भेटशी नव्याने, आराध्याचा नवा अध्याय, आराध्या आणि शर्वाय जहागीरदार, माधवचे कटकारस्थान, माधवला निशाची साथ, शर्वाय आराध्या प्रेमकहाणी, शर्वायचे आराध्यावर प्रेम, आराध्या शिवाची भेट, क्षितिज 9 प्रोजेक्ट हायजॅक, प्रोजेक्ट हायजॅकमागे माधव, शर्वायचा विश्वासघात, माधवकडून क्षितिज 9 हायजॅक
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 38

    शर्वाय तिच्या समोर आला, त्याच्या नजरेत प्रश्न नव्हता — फक्त एक ओळखीचा विश्वास होता.

    “मला माहिती आहे, तू नाहीस यामागे. पण माझ्या सावलीतून चालणाऱ्यांनी ही चूक का केली, हे शोधण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन करावं लागेल, आराध्या.”

    ती त्याच्याकडे पाहत राहिली… तो शर्वाय होता — रागात असलेला, पण अजूनही तिच्यावर विश्वास ठेवणारा! त्या क्षणी तिच्या मनात उमटलेलं फक्त एकच वाक्य होतं…

    “ज्याने आपल्यावर एवढा विश्वास दाखवलाय, त्याच्यासाठी मी आता स्वतःला सिद्ध करणारच…”

    ती पुन्हा आपल्या डेस्कवर परतली. शर्वायनं एकदा सांगितलं होतं – “जे घडतं त्याच्या पाठीमागे कारणं असतात, पण ती शोधणं आपल्याच हातात असतं.”

    संपूर्ण प्रोजेक्ट ‘क्षितिज 9’ ची फाइल्स, लॉग्ज, ट्रॅफिक रेकॉर्ड्स, शेअरिंग हिस्टरी — सगळं एकामागून एक ओपन करत गेली. आराध्याने  संपूर्ण डेटा ट्रेस केला –  प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक न्याहाळत होती… अन् तिचं लक्ष एकाच गोष्टीवर खिळलं… एका विशिष्ट फाइलला ‘क्लोन’ करण्यात आलं होतं. जी मूळ फाइल होती, तिच्यावर टीममधून  ॲक्सेस टोकन टाकलं गेलं होतं…

    कोणीतरी तिनं वापरलेली आयडी क्लोन करून लॉगिन केलं होतं. त्याचवेळी, एका USB लॉग ट्रॅकिंग सॉफ्टवेअरमध्ये तिनं सेट केलेला hidden trigger ट्रिप झाला होता. एक अनोळखी बायनरी कोड… आणि त्या कोडमधून एका नावाचं सूचक संकेत तिला सापडले…

    “MXD_V1”

    ती एकदम सावध झाली… MXD… हा माधव असेल का?

    आराध्याने  आपल्या शंकेची पडताळणी करण्याचं ठरवलं. असंच  सर्वांसमोर नाव घेणं बरोबर दिसलं नसतं, त्याकरिता पुराव्याची गरज होती…

    आपली शंका खरी आहे, हे सिद्ध करण्यासाठी  दत्तासोबत ती गुपचूप आयटी डिपार्टमेंटच्या सपोर्ट लॅबमध्ये गेली. दत्ताला तिने पूर्ण विश्वासात घेतलं…

    “दत्ता, मला हे सगळं कुणालाही न सांगता तपासायचंय. माझा कुणावर संशय आहे, हे तुम्ही ओळखाल  किंवा आतापर्यंत ते तुम्हाला माहीतही असेल. पण  शंका सिद्ध करायला पुरावे आधी हवेत.”

    तिचं म्हणणं बरोबर आहे, हे दर्शवायला दत्तानं डोळे मिटले, आणि मान हलवली.

    “बॉस नेहमी म्हणतात — कोणतीही गोष्ट पूर्णपणे स्पष्ट नसेल, तर संशय सिद्धीच्या आधी गृहित धरावा लागतो.”

    आराध्या  मन लावून शोध घेत होती… तिला काळवेळेचे भान नव्हतं… असं काम कोणी करत असेल तर उत्तर न मिळणं अशक्य होत… आराध्याचे कष्ट कामाला आले कनेक्शन सापडलं…

    ती फाइल माधवच्या अकाऊंटवरून ‘सेंड’ झाली होती. ती एका बाह्य क्लायंट कंपनीच्या सर्व्हरवर लीक झाली होती — आणि त्या क्लायंटचं नाव होतं – Vericon!

    ही कंपनी आधी दिवाकर यांचे एकेकाळचा जुना व्यावसायिक संबंध असलेली संस्था होती… पण काही कारणास्तव त्यांनी  ते संबंध तोडले होते.

    आराध्या दरवेळी एकेक पायरी पुढे सरकत होती. तिला आता समजून गेलं होतं — हे हायजॅक केवळ माहितीचे नव्हते, तर… हा ‘प्रेस्टिज हिट’ होता — आणि माधवचं फार काळापासूनचा तो डाव होता.

    शेवटी तो क्षण आलाच… आराध्याने स्वतःला शांत केलं  आणि मग ती शर्वायच्या ऑफिसमध्ये गेली. शर्वाय खुर्चीत मागे मान टेकवून विचारात बसला होता. तिनं समोर जाऊन त्या सगळ्या पुराव्यांची एक एक फाइल त्याच्यासमोर ठेवली…

    “हे बघा मला वाटतं, मी कोणावरही बोट ठेवायच्या आधी माझी जबाबदारी  आहे की, मी सर्व बाजूंनी या घटनेकडे बघावं. पण आता, या पुराव्यानंतर… तुमचं रागावणं मला चालेल, पण ही लढाई आपण सोबतच लढू शकतो.”

    शर्वाय काही क्षण तसाच शांत राहिला. नंतर त्यानं तिचा हात हातात घेतला.

    “तू शोधलेलं नाही, आराध्या… तू वाचवलेलं आहेस — फक्त एक प्रोजेक्ट नव्हे,  तर एक विश्वास! आणि आता, हे सगळं तोंडावर फेकून मारायचं आहे… पण योग्य वेळी,” तो तिला म्हणाला. त्याने तिला आश्वस्त केलं.

    ऑफिसच्या त्या संध्याकाळी सगळं गडबडलेलं होतं. प्रोजेक्ट ‘क्षितिज 9’ हायजॅक झाल्याचं कळल्यापासून वातावरणात एक प्रकारे तणाव पसरला होता. प्रत्येकजण आपापल्या जागी अस्वस्थ… पण एकमेकांना काहीही न दर्शवता काम करत होता.

    शर्वाय नेहमीसारखा शांत, पण त्याच्या डोळ्यांत ती एक वणव्यासारखी जळणारी नजर होती. तो सगळ्यांशी बोलत होता, निर्णय घेत होता, सूचना देत होता — पण त्याची नजर सतत एका दिशेने जात होती…

    आराध्या.

    ती तिच्या डेस्कवर शांत बसलेली होती… हातातलं ते पेन फिरवणं, स्क्रीनकडे तिचं एकटक पाहणं — तिच्या मनात खोल काहीतरी सुरू होतं, हे त्याचं अनुभवी मन जाणून गेलं होतं. शर्वाय तिच्याजवळ गेला नाही… त्याला माहीत होतं, हे ते क्षण नाहीत… तिच्या डोक्यावर आणखी काही विचारांचं ओझं टाकायचं नव्हतं. त्याने हळूच तिच्या डेस्कवर एक post-it note ठेवली. त्यावर लिहिलं होतं :

    “जेव्हा वेळ होईल… फक्त बघ. समोर कुणीतरी थांबलेलं असेल, शब्दांशिवाय… पण संपूर्ण विश्वासासहित. – S.”

    आणि मग तो वळून आपल्या केबिनमध्ये गेला, पण त्याचा एक कान तिच्या दिशेने आणि मन तिच्या श्वासांच्या लयीशी जोडलं गेलेलं होतं.

    हेही वाचा – आराध्याचे धाडस अन् शर्वाय…

    संध्याकाळ हलकेच उतरायला लागली होती. ऑफिसच्या फ्लोअरवर मंद प्रकाशात, आराध्या अजूनही तिच्या स्क्रीनकडे पाहात बसलेली होती. पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं. मनात फक्त क्षितिज 9चं हायजॅक होणं आणि शर्वायचा संयम हरवलेला चेहरा…

    तेवढ्यात तिच्या नजरेला टेबलावरचा ती छोटासा post-it note दिसली… पिवळसर चिठ्ठीवर ओळखीची हस्ताक्षरं… ती थोडी चकित झाली. ती तिने वाचली… क्षणभर तिला काहीच उमजलं नाही. पण मग, जणू हृदयाने त्या शब्दांचा अर्थ उलगडला… त्या शब्दांत आश्वासन होतं. तिला दोष न देता, तिला धीर देणारं…

    ती हळूच उठली आणि आपल्या डेस्कपासून थोड्याच अंतरावर असलेल्या त्याच्या केबिनकडे पाहिलं. तो तिथेच होता. समोर पेपर्स, लॅपटॉप, मीटिंग नोट्स… पण डोळे अजूनही तिच्या दिशेने होते. त्यांच्या नजरा एकमेकांवर विसावल्या… कोणताही शब्द नाही, कोणतंही हसू नाही, पण ती नजर… ती विश्वासाने ओथंबलेली नजर… आराध्याच्या तणावग्रस्त मनावर एक अलगद फुंकर मारून गेली.

    तिने नजरेनेच हलकी मान डोलावली… “मला समजलं…”

    शर्वायने केवळ डोळ्यांतून तिला सांगितलं, “तू एकटी नाहीस. मी आहे.”

    …आणि त्या क्षणी, त्या चिठ्ठीवरचे शब्द, शब्दांशिवाय संवाद… त्यांचा पूर्ण अर्थ घेऊन जागेवर उतरले.

    आराध्याने ती चिठ्ठी व्यवस्थित फोल्ड करून आपल्या डायरीत ठेवली —

    एक आठवण, एक विश्वास आणि… एका नात्याचा अबोल करार!

    उशीर होतोय पाहून  ती घाईत निघाली… समोर पांढऱ्या रंगाची एक एअर-कंडिशन्ड कॅब थांबली. काच हळूच खाली सरकली होती, पण आतमधून कोणीच बोललं नाही. ड्रायव्हर शांतपणे पुढं पाहत होता. आराध्या थोडी घाबरली.

    “ही माझ्यासाठीच आहे का?” असा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

    तिने सावध नजरेनं आजूबाजूला पाहिलं… तेवढ्यात डावीकडे, थोड्या अंतरावर दत्ता उभा होता — शांत, पण सतर्क. त्याने नजरेनेच तिला खूण केली —

    “हो, हीच गाडी. जा.”

    आराध्याने एक दीर्घ श्वास घेतला. नकळत हात घट्ट झाला बॅगवर. पण मग तिने स्वतःला सावरलं. शर्वायच्या त्या मेसेजच्या ओळी तिच्या मनात पुन्हा गुंजल्या — “जेव्हा सगळं अवघड वाटतं, उत्तर कुठेतरी शांततेत मिळतं.”

    कॅबचा दरवाजा उघडताच तिच्या मनातली सगळी धाकधूक हळूहळू पुसली जाऊ लागली. ती गाडीत बसली आणि दरवाजा बंद झाला. गाडी अलगदपणे शहराच्या गडबडीपासून दूर, त्या खास पत्त्याच्या दिशेने वळली.

    आराध्याच्या हृदयात आता फक्त एकच ओढ होती —

    तो… आणि त्याचं शांत, पण खोल वचन — “मी वाट पाहतोय.”

    शहर मागे पडलं होतं आणि त्याबरोबर गर्दी, गोंगाट आणि रोजच्या जगण्याचा कोलाहलही! कॅब आता एका छोट्या घाटातून वळणं घेत जात होती… पावसाने न्हालेली झाडं, हिरव्यागार कुशीत लपलेला रस्ता… सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं.

    हेही वाचा – ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    थोड्याच वेळात, एक सुंदरसा व्हिला नजरेस पडला — टेकडीवर उठून दिसणारा, सूर्याच्या कवडशांमध्ये चमकणारा.

    आराध्याने खिडकीबाहेर पाहिलं, थोडं पुढं वाकून… “हां… हाच तो व्हिला?” — तिच्या मनात विचार आला. शहराच्या बाहेरून जाताना दिसणारा हा व्हिला… नेहमी प्रश्नच पडायचा — कोण राहत असेल इथे? इतक्या उंचीवर, इतक्या एकांतात?

    आज मात्र तिची कॅब थेट त्या व्हिलाकडे जात होती. क्षणभर तिला असंही वाटलं, की कदाचित चुकून ही वाट निवडली गेली आहे. पण समोरच बसलेला कॅब ड्रायव्हर शांत होता.

    गेटजवळ गाडी येताच सेन्सरवरून ते आपोआप उघडलं. कॅब आत गेली आणि तिच्या छातीत एक अनाम धडधड सुरू झाली.

    क्रमशः
    Avatar photo
    प्रणाली वैद्य

    प्रणाली वैद्य लेखनाची मुळातच आवड असल्याने शब्दांमधून भावना आणि कल्पना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. आपल्या लिखाणातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि नातं जोडण्याची ताकद मिळावी, अस वाटतं. प्रतिलिपी मराठीवर कथा, मालिका आणि कविता प्रसिद्ध केल्या आहेत.

    Related Posts

    भैरू आणि पारू

    August 14, 2026 ललित

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026 ललित

    समजून घेणं

    August 14, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    भैरू आणि पारू

    By डॉ. विवेक वैद्यAugust 14, 2026

    आपल्या एकुलत्या एक हुशार मुलाला शिक्षणासाठी विलायतेत पाठवण्यासाठी वाडवडिलांनी सांभाळून ठेवलेली शेती भैरूने विकायला काढली,…

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026

    समजून घेणं

    August 14, 2026

    शार्वीची वेगळी खेळी

    August 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026

    समजून घेणं

    August 14, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : सापाच्या तोंडीं, पडली जे उंडी

    August 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 ऑगस्ट 2026

    August 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 395
    • अवांतर 204
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 532
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 851
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याने शोधला ‘क्षितिज 9’ प्रोजेक्टचा हायजॅकर!

    August 14, 2026

    भैरू आणि पारू

    August 14, 2026

    आनंदाच्या राज्यातले चार मित्र

    August 14, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.