Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026

    संपला गं नवरात्रौत्सव!

    October 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, October 22
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » संपला गं नवरात्रौत्सव!
    ललित

    संपला गं नवरात्रौत्सव!

    नीता चंद्रकांत कुलकर्णीBy नीता चंद्रकांत कुलकर्णीOctober 21, 2026Updated:October 21, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, नीता चंद्रकांत कुलकर्णी, लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी, लेखिका नीता कुलकर्णी, नवरात्रौत्सव, नवरात्रौत्सव 2026, नवरात्री उत्सव, देवीच्या नवरात्री, देवीची उपासना, आईची भेट, आईशी जवळीक, बाबांची भेट, वडिलांना भेटणे, आई हेच देवी रूप, वडिलधाऱ्यांची भेट घेणे, वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद
    फोटो सौजन्य - AI
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    देवीचा नवरात्रौत्सव आला आला म्हणता म्हणता संपला सुद्धा… दिवस कसे भुर्रकन उडून गेले. किती तयारी आणि गडबड चालली होती… माती आणायची, सप्त धान्य पेरायचं आणि मग ती वर उगवून आलेली हिरवीगार लुसलुशीत पात… त्याचा अलवार स्पर्श… तो सुंदर  असा सृजनाचा सोहळा डोळे भरून पाहायचा… घट बसवायचे… कडकण्या करायच्या… रोज  एक माळ अर्पण करायची… श्री सूक्ताची सोळा आर्वतनं… सप्तशतीचा पाठ… घागरा घालून केलेला गरबा… भोंडल्याची गाणी म्हणत धरलेला फेर… नंतर खिरापतींची मजा… भजनाचे कार्यक्रम… त्यात गोंधळ, जागरण हवेच… कुंकूम् आर्चन,  सवाष्णींच्या ओट्या… कुमारीपूजन… रोज रंगीबेरंगी जरीच्या साड्या, दागिने… बाहेर जाणं… सर्वांना भेटणं, गप्पा… टाळ घेऊन आरत्या म्हणायच्या… घरी गोंधळी बोलवायचा… डफ तुणतुण्यावर म्हटलेली देवीची गाणी ऐकायची.. निरनिराळे उपवासाचे पदार्थ… आरास, रांगोळ्या… नऊ दिवस रोज देवी दर्शनाला जायची गडबड… नवरात्रीची सांगता, देवीला पुरणावरणाचा नैवेध दाखवून…!

    कसं भारल्यासारखंच वातावरण असतं नाही का? दसरा झाला आणि आज बघ… सगळं  कसं शांत शांत झालं.

    अगं लक्षात घे…

    नवरात्रीपुरतीच देवी आई आली होती का? ती जगत् जननी आहे, ती इथेच असते! प्रतीकात्मक रूपात इथल्या अनेक देवळांत आपली वाट बघत उभीच असते… आपण त्या सणांपुरते, त्या दिवसांपुरते जातो तिच्याकडे… गर्दीत, गोंधळात, हारा-फुलांच्या राशीत… एक मिनिट गडबडीत आईला बघतो…

    आता एक कर… शांतपणे उद्या परवा जा तिच्याकडे… देऊळ रिकामं असेल. कुठलाही भपका नसेल. आई तिच्या नेहमीच्या रूपात समोर दिसेल. मग शांतपणे बसावं तिच्यासमोर. इतर वेळेस पण भेटावं गं देवी आईला… नवरात्र नसताना सुद्धा! सहज आठवण आली म्हणून अचानक पण जावं… किती बरं वाटेल तिला… आणि आपल्यालाही!

    हेही वाचा – नवरात्री… आत्मिक शक्ती जागृत करण्याचे पर्व

    मध्यंतरी फोनवर आई पण हेच म्हणत होती…

    “सवड काढून येत जा बाळा… बघावंस वाटतं तुला!”

    वाट बघणाऱ्या आई, आजी, मावशी, काकू आहेत, तोपर्यंत भेटत जा त्यांना… खूप वेळा असं होतं की, आपण आपल्याच विश्वात दंग राहतो. आईला तर गृहीतच धरतो! आपल्या वाढत्या  पसाऱ्यात, संसारात, नोकरी करण्यात, अनेक उद्योगात, अगदी मित्र-मैत्रिणींमध्ये सुद्धा हरवून जातो. काही वेळेस घरी जाऊनही आईशी निवांत बोलणं होतंच, असं नाही… खरंच, मनात  याचा शांतपणे विचार करा…

    हेही वाचा – गौरीमायला निरोप…

    आईची तर तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. तिला स्वतःसाठी काहीही नको आहे. तुमचे दोन हात गळ्यात पडले आणि तिच्या मिठीत सामावलं की, ती तृप्त असते… स्पर्शाचं सुख वेगळंच असतं… आईला ती जवळीक मनातून फार सुखावते… तिचा आशीर्वादाचा हात तुमच्या पाठीवरून फिरू दे. मनातल्या सुखदुःखाच्या गोष्टी तिला बोलायच्या असतात…

    आता आईला लेकीकडून फक्त एवढच तर हवं असतं… सुखी लेकीला डोळे भरून बघावं, हेच तिचं मागणं आहे. आठवणीनं तुमच्या आईला आणि वडिलांनाही भेटायला जाऊन या. बापाची माया आतल्या आत असते, ती वर दिसत नाही. मनानेच ओळखून घ्या!

    नाहीतरी देव अजून वेगळा कुठे असतो गं? त्याला इथे तिथे हुडकत बसू नका… आता कुठे आणि कशात देव, देवी पाहायची, हेही लक्षात घ्या…

    बाकी तुम्ही सुज्ञ आहातच!

    Avatar photo
    नीता चंद्रकांत कुलकर्णी

    एमए असून माझे वय 73 आहे. मी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर इत्यादी मासिकांत कथा लिहित होते. माझा ‘पूजा’ हा कथासंग्रह सरकारी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेला आहे. पूर्वी छोट्या ग्रुपमध्ये कथाकथन करत होते. माझे मिस्टर स्टेट बँकेत नोकरीला होते. आता रिटायर आहेत. आम्ही सांताक्रुजला रहात असताना काही वर्षं तेथे कौन्सिलिंग करत होते. पुण्यात आल्यानंतर काही वर्षे मी पौरोहित्य करत होते. सध्या थोडेफार लिखाण सुरू आहे. मोबाइल - 9763631255

    Related Posts

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026 ललित

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026 ललित

    अहंकार

    October 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    मानसची क्लास ॲडमिशन

    By दीपक तांबोळीOctober 21, 2026

    भाग – 1 “आई खूप आनंदाची बातमी आहे. मला 98 टक्के मिळाले,” आईला मिठी मारत…

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026

    अहंकार

    October 20, 2026

    नाते

    October 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026

    संपला गं नवरात्रौत्सव!

    October 21, 2026

    नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण करणारे वास्तुदोष आणि त्यावरील उपाय

    October 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : अगा अज्ञानाचिया निदा, जो घोरत होता बदबदा

    October 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 ऑक्टोबर 2026

    October 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 2
    • अध्यात्म 477
    • अवांतर 217
    • आरोग्य 161
    • पंचांग आणि भविष्य 640
    • फिल्मी 75
    • फूड काॅर्नर 260
    • मैत्रीण 32
    • ललित 1009
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मानसची क्लास ॲडमिशन

    October 21, 2026

    एन्ट्री आणि एक्झिट…

    October 21, 2026

    संपला गं नवरात्रौत्सव!

    October 21, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.