Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 12
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एआयच्या पलीकडे…
    ललित

    एआयच्या पलीकडे…

    दिलीप कजगांवकरBy दिलीप कजगांवकरAugust 11, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मी मराठी, अभिजात मराठी, दिलीप कजगांवकर, लेखक दिलीप कजगांवकर, खरी बुद्धिमत्ता, खरी नीतिमत्ता, एआय तंत्रज्ञान, एआयने नोकरीवर गदा, राजचे दु:ख, राजला मर्सिडिज गिफ्ट, एआयच्या पलीकडे माणुसकी, राजचा वाढदिवस, नव्या तंत्रज्ञानाने नुकसान, नव्या तंत्रज्ञानाचा फायदा, नव्या तंत्रज्ञानाने नुकसान
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    “राज, पुढच्या महिन्यात तुझा वाढदिवस आहे. बाबा तुला वाढदिवसाची भेट म्हणून नवी कोरी मर्सिडीज देणार आहेत. ती गाडी आणि तिचा ड्रायव्हर फक्त तुझ्यासाठी असेल.”

    “आई, खरंच?” राजने आश्चर्याने विचारले.

    “हो राज. काल रात्री बाबांनी सांगितलं. नवीन तंत्रज्ञान आणि विशेषतः एआयचा वापर करून कंपनीचा खर्च खूप कमी होणार आहे. त्यामुळे कंपनीला भरघोस नफा होईल, असं बाबा म्हणत होते.”

    राज आनंदाने अक्षरशः हवेत तरंगत होता. मित्रांना काहीच न सांगता वाढदिवसाच्या दिवशी मर्सिडीज घेऊन शाळेत जायचं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा, असा त्याने बेत केला.

    वाढदिवसाला अजून आठ दिवस बाकी होते. शाळेतून परतला, तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता.

    “राज, काय झालं?” आईने काळजीने विचारलं.

    “आई… माझे दोन जिवलग मित्र आणि माझ्या आवडत्या मॅम पुढच्या महिन्यात शाळा सोडून दुसऱ्या गावी जाणार आहेत.”

    “अरे, तुझ्या मित्रांच्या बाबांना आणि मॅमच्या हसबंडना दुसरी चांगली नोकरी मिळाली असेल.”

    राजने नकारार्थी मान हलवली.

    “नाही आई. माझ्या मित्रांच्या बाबांना आणि मॅमच्या हसबंडना त्यांच्या कंपनीने कामावरून काढलं आहे.”

    “मग आपण तुझ्या बाबांना विचारू या. आपल्या कंपनीत त्यांना काम देता येईल का?”

    राजचा आवाज भरून आला.

    “आई, ते तिघेही बाबांच्या कंपनीतच आहेत… आणि खर्च कमी करण्यासाठी बाबांनीच त्यांना कामावरून काढलं आहे.”

    आई नि:शब्द झाली. तिच्यासमोर पहिल्यांदाच एआय, नफा आणि माणुसकी यांचा संघर्ष उभा राहिला होता.

    रात्री जेवताना राज फारसा बोलत नव्हता.

    “काय रे? इतका शांत का?” बाबांनी विचारलं.

    “बाबा, एआयमुळे कंपनीचा नफा वाढतो, हे खरं आहे ना?”

    “हो बेटा.”

    “पण त्या नफ्यामुळे जर आपले प्रिय आणि जवळचे आपल्यापासून दूर जाणार असतील, तर तो नफा कोणासाठी?”

    बाबा शांत होते.

    हेही वाचा – अबोली, मी अन् ती…!

    राज पुढे म्हणाला, “बाबा, एआयच्या पलीकडे काय असतं?”

    बाबांनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.

    “बाबा, माणसं… त्यांची स्वप्नं… त्यांची घरं… त्यांचं आयुष्य… हे सगळं एआयच्या पलीकडे नाही का?”

    बाबांच्या हातातील घास तसाच राहिला.

    त्या रात्री ते बराच वेळ जागे होते. लॅपटॉपवर नफ्याची आकडेवारी होती… कर्मचाऱ्यांची यादी होती… आणि मनात घुमत होता मुलाचा तो प्रश्न —

    “एआयच्या पलीकडे काय असतं?”

    खूप विचाराअंती त्यांनी मनोमन एक निर्णय घेतला.

    दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीपेक्षा लवकर कंपनीत पोहोचले. एचआर प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी बोलावून घेतलं.

    “आजपासून कोणत्याही कर्मचाऱ्याला केवळ एआयमुळे कामावरून कमी केलं जाणार नाही.”

    “सर, मग ज्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांचं काय?”

    “त्यांना नव्या कौशल्यांचं प्रशिक्षण द्या. नव्या जबाबदाऱ्या द्या. एआयसोबत काम करण्यासाठी त्यांना सक्षम करा.”

    क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, “एआय माणसांसाठी आहे… माणसं एआयसाठी नाहीत.”

    सभागृहात शांतता पसरली. त्या शांततेत प्रत्येकाला जाणवलं — आज कंपनीचा निर्णय बदलला नव्हता; कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता.

    राजच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. बंगल्याच्या पोर्चमध्ये काळीभोर मर्सिडीज दिमाखात उभी होती. गाडीची पूजा झाल्यावर बाबा म्हणाले,

    “राज, आधी हे बघ.”

    त्यांनी खिशातून एक दुमडलेला कागद बाहेर काढला.

    “हा कागद ओळखतोस?”

    राजने तो उघडला.

    “अरे… हे तर माझं पत्र!”

    त्यात लिहिलं होतं—

    प्रिय बाबा,

    मला मर्सिडीज नको. तिच्या बदल्यात माझ्या मित्रांच्या बाबांची आणि माझ्या आवडत्या मॅमच्या हसबंडची नोकरी परत द्या. माझ्यासाठी तीच सर्वात मोठी वाढदिवसाची भेट असेल.

    द्याल ना, बाबा?

    तुमचा राज

    “बाबा, हे… तुमच्याकडे कसं आलं?”

    “तू झोपल्यानंतर आईने मला दिलं.”

    “मग…?”

    बाबा हसले… “मग मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं.”

    “काय?”

    “एआयच्या पलीकडे माणुसकी असते!”

    क्षणभर शांतता पसरली.

    हेही वाचा – बायकोची साडी खरेदी अन् मी

    “राज, मी फक्त निर्णय बदलला नाही…”

    राज आश्चर्याने बाबांकडे पाहू लागला.

    “मी माझा दृष्टिकोन बदलला.”

    “म्हणजे?”

    “आता तुझे मित्र शाळा सोडणार नाहीत. तुझ्या आवडत्या मॅमही जाणार नाहीत. एआय आपल्या कंपनीत असेल… पण माणसांच्या जागी नाही; त्यांच्यासोबत असेल.”

    राजच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. राज आणि त्याच्या बाबांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहत आई हसून म्हणाली,

    “एआय हे तंत्रज्ञान म्हणून स्वीकारा. त्याचा वापर करून नवी क्षितिजं गाठा. पण एआयच्या पलीकडे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा —

    माणसाने माणसाशी माणसासम वागणे — हीच खरी बुद्धिमत्ता आणि हीच खरी नीतिमत्ता.”

    Avatar photo
    दिलीप कजगांवकर

    तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.

    Related Posts

    सर्वात मोठा बदला कोणता?

    August 11, 2026 ललित

    माझे आजी-आजोबा आणि गणगोत

    August 10, 2026 ललित

    हलकल्लोळ

    August 10, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सर्वात मोठा बदला कोणता?

    By ॲड. कृष्णा पाटीलAugust 11, 2026

    उत्तरार्ध संदेश माने जामिनावर बाहेर आला. संपाबुवा त्याला घरी घेऊन आला. विस्कटलेली केसं, वाढलेली दाढी,…

    माझे आजी-आजोबा आणि गणगोत

    August 10, 2026

    हलकल्लोळ

    August 10, 2026

    वारसा

    August 10, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 12 ऑगस्ट 2026

    August 12, 2026

    एआयच्या पलीकडे…

    August 11, 2026

    सर्वात मोठा बदला कोणता?

    August 11, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 392
    • अवांतर 203
    • आरोग्य 138
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 530
    • फिल्मी 63
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 843
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Recipe : खवा-काजू तिरंगी मोदक अन् कच्च्या केळ्याची उपवास पुरी

    August 12, 2026

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं

    August 12, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.