Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 9
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता
    ललित

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करAugust 8, 2026No Comments7 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रदीप केळुस्कर, लेखक प्रदीप केळुसकर, कलाकारांचा एस ए ग्रुप, एस ए व्हॉट्सॲप ग्रुप, प्रणिती नांदेची एफबी पोस्ट, प्रणिताकडून ड्रग्जचे अतिसेवन, एस ए ग्रुपची धडपड, प्रणिताची व्यसनमुक्ती, पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्र, डॉक्टर अवचटांचे व्यसनमुक्ती केंद्र
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 3

    प्रणिता नांदेची फेसबुक पोस्ट पाहून वंदनाने एस ए (Struggler Actors) हा व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिन मनीषला फोन केला आणि नंतर व्हॉट्सॲप ग्रुपवर याची माहिती पोस्ट केली. तेव्हा तिचा मोबाइल नंबर मिळाला. तिने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते – “आज माझा या जगातील शेवटचा दिवस, मी पुरती निराश झाले आहें, आईवडिलांशी भांडून मी मुंबईत आले… पण माझा लोकांनी गैरफायदा घेतला. कामे मिळत नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत…. अलविदा!”

    याची माहिती पोलिसांना दिल्यावर त्यांनी मोबाइल नंबरवरून तिचा पत्ता शोधला. वाशीच्या सेक्टर 20मध्ये ती रहात होती. पोलिसांनी तिची चाळ शोधून काढली. घराचे दार आतून बंद केलेले होते. पोलिसांनी धक्के मारून दार उघडले. कॉटवर अस्तव्यस्त अवस्थेत पडलेल्या प्रणिताची लेडी पोलीस कॉन्स्टेबलने नाडी चेक केली आणि सर्वांकडे वळून ती म्हणाली, “नाडी संथ आहे, पण लागते आहे. तिला हॉस्पिटलला तातडीने न्यायला लागेल.”

    तिला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. तिला तपासल्यानंतर डॉक्टर वंदनाला म्हणाले, “खूपच क्रिटिकल कंडिशन आहे. बहुतेक हिने भरपूर ड्रग्ज घेतले असण्याची शक्यता आहे. वाचण्याची शक्यता कमी आहे. हिचे जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना बोलावून घ्या.”

    मग तिच्या आईचा नंबर शोधून काढला. आई-वडील साताऱ्याला रहात होते. घरच्यांना तिचा अपघात झाल्याचे सांगितले. नंतर तिची मैत्रीण आरतीला फोन केला. तीही साताऱ्याचीच होती. तिला आईला घेऊन यायला सांगितले. तिनेच प्रणालीच्या भावाचा नंबर दिला. मनीषने भावाला फोन लावला… आपल्या बहिणीचा नंबर दिसला म्हणून त्याने उचलला नाही. मग मनीषने आपल्या फोनवरून त्याला कॉल केला. त्यालाही प्रणिताचा अपघात झाल्याचे सांगितले आणि ठाण्याला यायला सांगितले.

    “मनीष, आपण आता वाशीमध्ये असताना तू तिच्या भावाला ठाण्याला ये असे का सांगितलेस?” असे वंदनाने विचारले.

    मनीष – याचे कारण म्हणजे या हॉस्पिटलमध्ये तिची व्यवस्थित ट्रीटमेंट होईल असे मला वाटत नाही. तेव्हा आपण तिला पोलिसांची परवानगी घेऊन ठाण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावे, हे बरं.

    वंदना – हो, हे खरे आहे… पण आपल्या ग्रुपच्या सर्व मेंबर्सचे मत घ्यायला हवे.

    मनीषने एस ए ग्रुप मेंबर्सना जवळ बोलावले.

    मनीष – ग्रुप मेंबर्स, प्रणिताची कंडिशन अजून क्रिटिकल आहे. या हॉस्पिटलमध्ये फरशा सुविधा नाहीत… तेव्हा आपण तिला ठाण्यात ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू. तुमचे काय मत आहे?

    श्याम – होय, बरोबर आहे. लवकर हालचाल करायला हवी.

    संगीता – त्या हॉस्पिटलमध्ये माझा मावस भाऊ सर्जरीमध्ये डॉक्टर आहे. तो या वेळेस ड्युटीवर असेल. मी त्याला फोन करून लक्ष देण्यास सांगते.

    संगीताने आपल्या मावस भावाला फोन लावला. मनीष आणि वंदना तिथल्या डॉक्टर्सना इथून डिस्चार्ज मिळविण्यासाठी भेटायला गेले. मनोज ॲम्ब्युलन्स शोधू लागला. त्याला सुसज्ज ॲम्ब्युलन्स मिळाली. पंधरा मिनिटांत वाशीच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन प्रणिताला ठाण्यात शिफ्ट केले गेले. ॲम्ब्युलन्स पाठोपाठ एस ए ग्रुप्स मेंबर्स स्कूटरं, मोटरसायकल घेऊन जात होते.

    हेही वाचा – एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    संगीता आपल्या मावसभावाच्या संपर्कात होती. ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधी प्रणिताचा बेड तयार होता. मनीषने लगेच सर्व कागदपत्रं हॉस्पिटलच्या ऑफिसमध्ये नेऊन दिली. दोन मिनिटांत प्रणिता स्पेशल रूममध्ये ॲडमिट झाली. मग भराभर सर्व टेस्ट घेतल्या गेल्या. ऑक्सिजन सिलिंडर जोडला गेला, भराभर इंजेक्शन दिली गेली… सलाईनमधून औषधं दिली गेली.

    रात्री दहाच्या सुमारास मनीषच्या मोबाइलवर प्रणिताच्या भावाचा फोन आला. मनीषने त्याला ज्युपिटर हॉस्पिटलजवळ बोलावले. तिचा भाऊ हॉस्पिटलकडे आला… त्याची आणि मनीषची ओळख झाली. मनीषने त्याला आपला एस ए ग्रुपमधील मंडळींची ओळख दिली.

    भाऊ – कशी आहें तिची तब्येत? आणि कोठे अपघात झाला आणि कसा?

    वंदना – तिचा अपघात झाला नाही, पण ती सकाळी फोन उचलेना म्हणून मी तिच्या घरी गेले, तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. मी लगेच आमच्या ग्रुपवर ही बातमी कळवली आणि तिला दुपारी वाशीमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि आता सायंकाळी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले.

    तिचा फेसबुकवर पाहिलेला फोटो आणि पोलिसांनी फोडलेले दार या सर्व गोष्टी तिच्या भावापासून लपविल्या.

    भाऊ – मग डॉक्टरांचे काय म्हणणं आहे?

    मनीष – सध्या आम्हाला कोणाला तिला भेटायला देत नाहीत… त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे एवढ्यात कळणार नाही. ती शुद्धीवर आली की, सर्व काही कळेल. तिची आई येते आहे का?

    भाऊ – हो, आरती माझ्या आई, बाबांना घेऊन येत आहे. एवढ्यात पुण्यापर्यंत आली आहे.

    संगीता – तिचे बाबा पण येत आहेत का! बरं झालं…

    तोपर्यंत प्रणिताच्या बाबांचा फोन भावाच्या मोबाइलवर आला. तिच्या भावाने आपण हॉस्पिटलजवळ पोहोचल्याचे सांगितले. तिची सर्व मित्रमंडळी म्हणजेच त्यांचा एस ए ग्रुप तिच्यासाठी धडपडत आहे, त्यामुळे तुम्ही सावकाश या असा निरोप त्याने दिला.

    आत डॉक्टर्स प्रणिताच्या ऑक्सिजन लेवलवर लक्ष ठेऊन होते. ब्लडप्रेशर वर वर येण्यासाठी धडपडत होते.

    बाहेर एस ए ग्रुपचे शंभराहून जास्त मेंबर्स चांगल्या बातमीची वाट पहात होते. तसेच प्रणिताच्या आई-वडिलांचीही वाट पहात होते.

    पहाटे चार वाजता हॉस्पिटलकडून सांगण्यात आले, प्रणिताची ऑक्सिजन लेव्हल 90पर्यंत आली आहे. ब्लडप्रेशर नॉर्मल होत आहे. एस ए ग्रुपच्या मेंबर्सनी आनंदाने जल्लोष केला.

    प्रणिताच्या भावाच्या डोळ्यात अश्रू आले. कोण कुठलीही अनोळखी मुले, नाटक-सिनेमाच्या वेडापोटी इकडे जमा झाली आहेत, अजून पाय स्थिर नाहीत, आज काम आहे तर, उद्या नाही अशी परिस्थिती… पण प्रेमाने एकमेकांना धरून राहिले आहेत.

    पहाटे साडेचार वाजता आरती प्रणिताच्या आई-बाबांना घेऊन हॉस्पिटलजवळ आली. प्रणिताचा भाऊ बाहेर होताच. काळजीत पडलेल्या तिच्या आई-बाबांना त्याने धीर दिला, तसेच ती संकटातून बाहेर पडल्याचे त्याने त्यांना सांगितले. “ही सर्व मुलं प्रणिताची मित्रमंडळी, तिच्यासारखी नाटक-सिनेमा-मालिकाच्या वेडापायी घरदार सोडून येथे रहात आहेत. कधी जेवण मिळते, कधी नाही… कधी काम असते, कधी नसते… पण सर्वजण एका ग्रुपवर  मैत्री सांभाळतात. सकाळपासून हीच मंडळी प्रणिताच्या आजूबाजूला आहेत. या मंडळींना कळले की, ती रूममध्ये बेशुद्ध पडली आहे. त्यावेळेपासून ही मुलं ती बरी होण्यासाठी धडपडत आहेत…” भावाने आई-वडिलांना सांगितले.

    प्रणिताच्या आईने सर्वाकडे प्रेमाने पाहिले, बाबा पण सद्गतीत झाले. त्यांनी मनीषच्या खांद्यावर थोपटले. एवढ्यात हॉस्पिटलमधून बातमी आली, प्रणिता शुद्धीवर आली आहे. एस ए ग्रुपने आनंदोत्सव सुरू केला.

    सकाळी सहा वाजता प्रणिताच्या आईला तिला भेटायची परवानगी मिळाली. आईला बघितल्यावर प्रणिता पुन्हा रडू लागली. मग तिचे बाबा, भाऊ आत गेले. प्रणिताच्या लक्षात येत नव्हते, आपण कुठे आहोत? आजूबाजूला सलाइन, ऑक्सिजन मॉनिटर दिसतो आहे… म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये असणार! मग आपल्याला इकडे कुणी आणले?

    सकाळी नऊ वाजता डॉक्टरांची टीम तपासण्यासाठी आली. त्यांनी तिला तपासले आणि आता ती संकटातून बाहेर आल्याचे तिच्या आई-बाबांना सांगितले. बाबांनी डॉक्टरांना विचारले,

    “पण ती बेशुद्ध का झाली?”

    डॉक्टर – तिला ड्रग्जचे व्यसन आहे. ड्रग्जचा जास्त डोस तिच्या शरीरात गेला होता. आता ड्रग्जपासून तिला लांब ठेवायला हवे. ती वेळेत या हॉस्पिटलमध्ये पोहोचली म्हणून… अन्यथा तिचा कालच अंत झाला असता.

    प्रणिताचे आई-बाबा सुन्न झाले. काय आपल्या या मुलीची परिस्थिती? प्रणिताच्या बाबांच्या मनात आले, आपण सुद्धा तिच्या या परिस्थितीला जबाबदार आहोत. तिची आवड-निवड आपण लक्षात घेतली नाही. तिच्याशी संबंध तोडले. तिच्या आईला पण तिला भेटायला बंदी केली. जर तिच्या आवडीला आपण सुद्धा प्रोत्साहन दिले असते, तर ती एकटी पडली नसती.

    प्रणिताची आई गप्प बसून होती, तिचा भाऊ पण गप्प बसून होता… ड्रग्जचे व्यसन लागलेल्या आपल्या या बहिणीला त्यातून कसे बाहेर काढायचे, याचा तो विचार करत होता.

    प्रणिताची आई मनात म्हणत होती, ‘आपल्या घरी किंवा माहेरी कुणाला सुपारीचे सुद्धा व्यसन नाही. उलट, तिचे बाबा कोण व्यसनी दिसला तर, त्याचे व्यसन कसे सुटेल, यासाठी धडपड करतात, आणि आमची मुलगी…’

    दुपारी प्रणिताची ड्रग्ज घेण्याची वेळ झाली होती, त्यामुळे ती रेस्टलेस होऊ लागली… आळोखेपिळोखे देऊ लागली… तिची बुबूळं वर-खाली होऊ लागली… पुन्हा डॉक्टर धावत आले, त्यानी तिला झोपेचे इंजेक्शन दिले, तशी ती झोपी गेली.

    प्रणिताचे बाबा आणि भाऊ बाहेर आले, बाहेर एसए ग्रुपचे मेंबर्स उभे होते. एवढ्या कडकडीत दुपारी सुद्धा 50पेक्षा जास्त मंडळी बाहेर उभी असल्याचे पाहून बाबांना गहिवरून आले. बाबांनी मनीषला जवळ घेऊन सांगितले,

    “डॉक्टर म्हणतात, तिला ड्रग्जचे व्यसन लागले आहे. मघा ती जागी झाली, पुन्हा तिचे शरीर ड्रग्ज मागू लागले, ती रेस्टलेस झाली. डॉक्टरनी झोपेचे इंजेक्शन देऊन झोपून ठेवले आहे, पण पुढे काय? या ड्रग्जच्या विळख्यातून ती बाहेर कशी पडणार?”

    एस ए ग्रुपमधील पूर्वा बोलू लागली, “अंकल, याकरfता तिला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवायला हवे. माझा मामेभाऊ असाच ड्रग्जच्या विळख्यात अडकला होता, पण पुण्यातील डॉक्टर अवचटांच्या व्यसनमुक्ती केंद्रात त्याच्यावर योग्य उपचार झाले आणि तो ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर पडला. तुम्ही जर हो म्हणालात तर. मी माझ्या भावाकडे चौकशी करून थोड्या वेळात तुम्हाला सांगते.”

    प्रणिताच्या बाबांनी होकार देताच तिने त्वरित आपल्या भावाला फोन लावला. त्याच्याकडून व्यसनमुक्ती केंद्राचा फोन नंबर घेतला आणि तेथूनच व्यसनमुक्ती केंद्राला फोन लावून प्रणिताची केस सांगितली. व्यसनमुक्ती केंद्राने प्रणिताला आपल्या केंद्रात आणण्याची परवानगी दिली.

    हेही वाचा – प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    चार दिवसांनी प्रणिता ठणठणीत बरी झाली आणि आई-बाबा, भाऊ यांनी तिला व्यसनमुक्ती केंद्रात नेण्याची तयारी केली. प्रणिताचे आई, बाबा एस ए ग्रुप मेंबर्सना भेटले, तुमच्यासारखी धडपडी प्रेमळ मुलं आहेत, म्हणून जगात माणुसकी शिल्लक आहे… असे म्हणताना ते भावूक झाले.

    “या एसए ग्रुपमुळेच माझी मुलगी मला मिळाली… असेच एकत्र रहा, एकमेकांसाठी धावा, एकमेकांना मदत करा. तुमचे उपकार न फेडण्यासारखे…” प्रणिताची आई सर्वाना सांगलीत येण्याचे आमंत्रण दिले.

    शेवटी प्रणिता ग्रुप मेम्बर्सना भेटली… विशेष करून वंदना आणि मनीष यांनी धावपळ करून घर फोडून आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेले नसते तर….

    प्रणिता व्यसन मुक्ती केंद्रात जाताना पुन्हा सर्व एस ए ग्रुप हजर होता. सर्वांनी तिला निरोप दिला.

    त्या व्यसन मुक्ती केंद्रात ती दीड वर्ष राहिली पेशंट म्हणून, व्यसनातून पूर्ण बाहेर पडली आणि त्याच व्यसनमुक्ती केंद्रात मार्गदर्शक म्हणून काम करू लागली. पण तिच्या मनात एस ए ग्रुपबद्दल कृतज्ञता कायम राहिली…

    समाप्त
    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    हलकल्लोळ

    August 8, 2026 ललित

    कॉफीशॉप

    August 7, 2026 ललित

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    हलकल्लोळ

    By पराग गोडबोलेAugust 8, 2026

    बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका कार्यातली. त्या काळी साधारणपणे अशीच असायची सगळी कार्य… तेव्हा बँक्वेट्स…

    कॉफीशॉप

    August 7, 2026

    ‘क्षितिज 9’ प्रोजेक्ट हायजॅक करणारं नेमकं कोण?

    August 7, 2026

    उपवास

    August 7, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव

    August 8, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 08 ऑगस्ट 2026

    August 8, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 388
    • अवांतर 202
    • आरोग्य 137
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 524
    • फिल्मी 61
    • फूड काॅर्नर 246
    • मैत्रीण 24
    • ललित 837
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    एसए ग्रुप… व्यसनाच्या विळख्यात प्रणिता

    August 8, 2026

    हलकल्लोळ

    August 8, 2026

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कारक ग्रहाचा भाव सुद्धा महत्त्वाचा!

    August 8, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.