Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, September 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?
    ललित

    प्रणिताबद्दल मनीषने भावाला खोटं का सांगितलं?

    प्रदीप केळुस्करBy प्रदीप केळुस्करAugust 1, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी आर्टिकल, मराठी लेख, मराठी साहित्य, मराठी कथा, मी मराठी, अभिजात मराठी, प्रदीप केळुस्कर, लेखक प्रदीप केळुसकर, कलाकारांचा एस ए ग्रुप, एस ए व्हॉट्सॲप ग्रुप, प्रणिती नांदेची एफबी पोस्ट, प्रणिताचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रणिताकडून ड्रग्जचे अतिसेवन, प्रणिताची आई, प्रणिताचा भाऊ, प्रणिताची मैत्रीण आरती, एस ए ग्रुपला प्रणिताबद्दल चिंता,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 2

    आज शूटिंग नसल्याने वंदना सकाळी निवांत आठ वाजता उठली. गेले पाच दिवस तिला सहाच्या शूटिंगसाठी जावं लागे… तिच्यासारख्या नवीन ॲक्ट्रेसना तर वेळेत हजर रहावंच लागे. कॉफी पिता-पिता तिने आधी आपला एस ए (Struggler Actors) हा व्हॉट्सॲप ग्रुप ओपन करून बघितला. त्यानंतर तिने फेसबुक ओपन केलं आणि ती पोस्ट पाहू लागली. एवढ्यात तिचे लक्ष एका फोटोकडे गेलं, बेडवर पडलेल्या एका तरुणीचा फोटो होता, मुलगी अस्ताव्यस्त पडली होती. वंदनाने निरखून पाहिले आणि ती मनात म्हणाली, “अरे, ही तर प्रणिता नांदे!” तिने लिहिलेला मजकूर वाचून तिला धक्का बसला.

    प्रणिताने लिहिले होते – “आज माझा या जगातील शेवटचा दिवस, मी पुरती निराश झाले आहें, आईवडिलांशी भांडून मी मुंबईत आले… पण माझा लोकांनी गैरफायदा घेतला. कामे मिळत नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत…. अलविदा!”

    ग्रुप ॲडमिन मनीषला फोन करून सर्व माहिती दिली. व्हॉट्सॲप ग्रुपवर याची माहिती टाकली आणि तिचा मोबाइल नंबर मिळाला. पोलिसांनी त्या नंबरवरून तिचा पत्ता शोधला. वाशीच्या सेक्टर 20मध्ये ती रहात होती. पोलिसांनी तिची चाळ शोधून काढली. घराचे दार आतून बंद केलेले होते. पोलिसांनी धक्के मारून दार उघडले. पोलिसांच्या मागोमाग एस ए ग्रुपमधील मेंबर्स पण आता घुसले…

    दार उघडताच अस्तव्यस्त अवस्थेत प्रणिता कॉटवर पडलेली दिसली. लेडी पोलीस पुढे झाली, तिने तिला हलवून उठवायचा प्रयत्न केला, मग तिने तिची नाडी चेक केली आणि सर्वांकडे वळून ती म्हणाली, “नाडी संथ आहे, पण लागते आहे. तिला हॉस्पिटलला तातडीने न्यायला लागेल.”

    मनीषने येताना एका राजकीय पक्षाचे ऑफिस जवळच असल्याचे पाहिले होते. त्यामुळे मनीष धावत खाली उतरला आणि त्या ऑफिसमध्ये गेला.

    सुदैवाने त्या पक्षाची ॲम्ब्युलन्स बाजूच्याच गल्लीत पार्क केलेली होती. त्याने ड्रायव्हरला ती चाळीखाली आणायला सांगितली. महिला पोलीस आणि वंदनाने तिला उचलून जिन्यातून  खाली घेतले.

    एव्हाना एस ए ग्रुप मेंबर्सना हा पत्ता कळला होता, त्यामुळे त्या ग्रुपमधील बरीच मंडळी जमा होऊ लागली.

    ॲम्ब्युलन्स पुढे, त्यात लेडी पोलीस सोबत वंदना होती आणि पाठोपाठ एस ए ग्रुप्समधील स्त्री-पुरुष सदस्य वेगवेगळ्या गाडीतून येत होती. ॲम्ब्युलन्स गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि पोलिसांनी प्रणिताला ॲडमिट केले.

    हेही वाचा – एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट

    मेडिसिन डिपार्टमेंटच्या मुख्य डॉक्टरने तिला तपासले. तिची नाडी मंद चालू होती, ब्लड प्रेशर खूपच खाली गेलं होत, ऑक्सिजन लेव्हल चिंताजनक होती. सोबत असलेल्या वंदनाला डॉक्टर म्हणाले, “खूपच क्रिटिकल कंडिशन आहे. बहुतेक हिने भरपूर ड्रग्ज घेतले असण्याची शक्यता आहे. वाचण्याची शक्यता कमी आहे. हिचे जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना बोलावून घ्या.”

    वंदनाला प्रश्न पडला, “हिची फारशी ओळखच नव्हती, मग हिचे नातेवाईक शोधायचे कसे? हिचे गाव, तालुकाही काही माहीत नाही.”

    एवढ्यात वंदनाच्या लक्षात आले, मग हा तिच्या रूममध्ये तिच्या कॉटवर असलेला मोबाईल मी माझ्या पर्समध्ये टाकला होता. वंदनाने आपली पर्स उघडून प्रणिताचा मोबाईल बाहेर काढला. तू आता चालू कसा करायचा, हे तिला कळेना. मग अनेक युक्त्या वापरून  (नेहेमीच्या) तिने तिचा मोबाईल ओपन केला.

    तिचे कॉल लिस्ट उघडून ओळखीचे नाव येते का, ते ती पहात होती. एवढ्या तिला ‘आई’ असे नाव दिसले. वंदनाने ओळखले हा प्रणिताच्या आईचा नंबर असणार. तिने मनीषला आणि संगीताला तिच्या मोबाईलमधला आईचा नंबर दाखवला. मनीष तिला म्हणाला, “तूच तिच्या आईला फोन कर, ती सीरियस आहे असे सांगू नकोस, तिचा अपघात झाला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे, असे सांग.”

    संगीताचे पण तसेच म्हणणे होते. यावेळेपर्यंत त्यांच्या एस ए ग्रुपमधील श्याम, अनुजा यांचंही तेच म्हणणे होते… “तू फोन कर आणि तिच्या आईला न घाबरवता कळव आणि ती मंडळी मुंबईत येत असतील तर येऊदे.”

    मग वंदनाने ‘आई’ या नंबरवर फोन लावला…

    आई – काय गं, नवीन काही काम मिळते आहे का?

    फोन प्रणिताचा म्हणून तिच्या आईला फोनवर प्रणिता वाटली असणार, हे वंदनाच्या लक्षात आले.

    वंदना – काकू, मी प्रणिताची मैत्रीण वंदना… मी आणि तिने अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे.

    आई – अगं, मग प्रणिता कुठे आहे?

    वंदना – काकू, प्रणिताला लहानसा अपघात झाला आहे. आता ती तशी बरी आहे. पण डॉक्टरने तिला बोलायला बंदी केली आहे.

    आई – अरे बापरे, काय झालं प्रणिताला?

    प्रणिताची आई रडू लागली.

    वंदना – अहो काकू ती बरी आहे, पण तिला आईची आठवण येत आहे, म्हणून मी फोन केला. तुम्ही कुठे राहता?

    आई – सांगलीला.

    वंदना – तुम्ही मुंबईला येऊ शकता काय?

    आई रडत रडत म्हणाली, “अगं, ही आमचं न ऐकता घर सोडून गेली, तिचे बाबा तिचे नाव घेत नाहीत. आमचा मुलगा पुण्यात असतो, मी कशी येणार सांग.” वंदनाने “बरं”  म्हटलं आणि ती एस ए ग्रुप मेंबर्सजवळ आली. आता सुमारे साठ लोक जमली होती. सगळी नाटक – सिनेमाच्या मोहापोटी आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कुठून कुठून आलेली… अजून जम बसत नाही, पण एका ग्रुपमार्फत एकमेकांना धरून राहिलेली. एवढ्यात मनीष म्हणाला, “पण तिच्या आईला आणावेच लागेल, तिच्या भावाचा नंबर मिळाला तर त्याला पण घेऊन येऊ. पण नंबर कसे मिळतील?”

    “वंदना, तू अजून कॉन्टॅक्ट लिस्ट बघ, कोणी ओळखीचे दिसते का बघ… किंवा तिचे जास्तीत जास्त कॉल कुणाला गेलेत ते बघ.”

    वंदनाने परत मोबाईल उघडला, तेव्हा ‘आरती’ नावाच्या मुलीला तिचे रोज फोन जात होते हे लक्षात आले. वंदनाने आरतीला फोन लावला…

    आरती – काय ग प्रणे, आज शूटिंग नाही वाटतं? आता कॉल केलास म्हणून विचारते.

    वंदनाने तिला आपण प्रणिताची मैत्रीण असल्याचे सांगितले आणि प्रणिताला ॲक्सिडन्ट झाला म्हणून तिचा फोन आपल्याकडे असल्याचे सांगितले. सुदैवाने, आरती सांगलीतील तिची लहानपणापासूनची मैत्रीण निघाली. ती म्हणाली, “मी प्रणालीच्या आईला घेऊन एक तासात निघते.”

    तिने प्रणालीच्या भावाचा नंबर दिला. वंदना मनीषला म्हणाली, “तिच्या भावाला तू फोन कर.”

    मनीषने तिच्या भावाला फोन लावला… आपल्या बहिणीचा नंबर दिसला म्हणून त्याने उचलला नाही. मग तो नंबर मनीषने आपल्या फोनवरून लावला. त्या नंबरावरून त्याने फोन उचलला.

    मनीष – मी मनीष बोलतोय, ठाण्यावरून… तुमची बहीण प्रणिता हिला लहानसा अपघात झालाय. आता ती बरी आहे. पण तिच्या घरचे तिच्या जवळ असावे म्हणून तिच्या मोबाइलमधून तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला फोन लावला.

    प्रणिताचा भाऊ – खरंतर गेली दोन वर्षे मी तिच्याशी बोललेलो नाही. तिने घेतलेला निर्णय आम्हाला पसंत नव्हता म्हणून. पण ती माझी बहीण आहे. तिला बरे नसेल तर मला तिकडे यावेच लागेल. मी माझ्या आईला कळवतो.

    मनीष – आम्ही तुमच्या आईला कळवले आहे. ती आरती बरोबर बहुतेक ठाण्याला येते आहे.

    भाऊ – मग ठीक आहे, मी पण माझ्या आईला फोन करून सांगतो. पण माझी बहीण खरोखर बरी आहे ना? काही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे का?

    हेही वाचा – एका घासात विठ्ठल…

    मनीष – काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. पण हॉस्पिटलमध्ये तिच्या घरचे कुणीतरी सोबत असायला हवे, आम्ही मित्रमंडळी जास्त वेळ राहू शकत नाही, म्हणून मी फोन केला.

    भाऊ – मी लगेच निघतो. ठाण्याजवळ आलो की, तुम्हाला फोन करतो. मग मला कुणीतरी घ्यायला या.

    मनीष – तुम्ही कसे येणार आहात ते पण कळवा.

    अशा रीतीने प्रणिताचा भाऊ ठाण्यात येत होता.

    वंदना – मनीष आपण आता वाशीमध्ये असताना तू तिच्या भावाला ठाण्याला ये असे का सांगितलेस?

    क्रमश:
    Avatar photo
    प्रदीप केळुस्कर

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील पाट गावात वास्तव्य. स्वतःचा व्यवसाय आणि बागायती असून गेल्या पाच वर्षांत 120 कथा लिहिल्या. आतापर्यंत तीन कथासग्रह प्रकाशित झाले असून स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. त्यावर सर्व कथा आपल्या आवाजात रेकॉर्डिंग केल्या आहेत. मोबाइल – 9307521152 / 9422381299

    Related Posts

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026 ललित

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026 ललित

    बदला

    September 15, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    सुधाकररावांची प्रस्तावना

    By दीपक तांबोळीSeptember 16, 2026

    पूर्वार्ध “सर नमस्कार. मी चेतन शेलार, माळी सरांनी मला तुमच्याकडे पाठवलंय,” दारात उभा असलेला तरुण…

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    बदला

    September 15, 2026

    वधू-वर सूचक मंडळ

    September 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026

    तुलना आणि मत्सर

    September 16, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : छत्तीसही वानीभेद, तोडोनियां निर्विवाद

    September 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 सप्टेंबर 2026

    September 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 436
    • अवांतर 208
    • आरोग्य 147
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 584
    • फिल्मी 68
    • फूड काॅर्नर 255
    • मैत्रीण 29
    • ललित 923
    • शैक्षणिक 87
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    सुधाकररावांची प्रस्तावना

    September 16, 2026

    ललिताची गीता

    September 16, 2026

    वास्तुशास्त्र… मानसिक तणाव आणि नैराश्य

    September 16, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.