Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, July 31
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 31, 2026No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 31 जुलै 2026; वार : शुक्रवार
    • भारतीय सौर : 09 श्रावण शके 1948; तिथि : द्वितीया 22:31; नक्षत्र : धनिष्ठा 19:26;
    • योग : सौभाग्य 23:53; करण : तैतिल 10:03;
    • सूर्य : कर्क; चंद्र : मकर 06:37 ; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15;
    • पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित व गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी

    टीम अवांतर

    प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित आणि गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 31 जुलै 1907 रोजी गोव्यातील‌ कोसबेन येथे झाला. जागतिक कीर्तीचे बौद्ध धर्माचे अभ्यासक प्रा. धर्मानंद कोसंबी हे त्यांचे वडील. पुण्यातील शालेय शिक्षणानंतर ते वडिलांबरोबर अमेरिकेत गेले. तिथे त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची पदवी संपादन केली. विद्यार्थिदशेत  एक छंद म्हणून त्यांनी बॅलिस्टिक्सचा अभ्यास केला.

    1929 मध्ये भारतात परतल्यानंतर ते बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. त्यांची ख्याती सर्वदूर पसरल्यानंतर त्यांना अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने गणिताचे प्राध्यापक म्हणून बोलावलं. त्या ठिकाणी ते वर्षभर होते. पुढे 1932मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी पत्करली. याच ठिकाणी धर्मानंद कोसंबी यांनी पाली भाषा शिकवली होती. फर्ग्युसनमध्ये त्यांनी 14 वर्षं नोकरी केली.

    हेही वाचा – बिघाड

    त्यांनी 1934 मध्ये गणितातील ‘रामानुजम् मेमोरियल पारितोषिक’ तर 1947 साली भाभा पारितोषिक’ पटकावले. काही काळ त्यांनी अमेरिका आणि  इंग्लंड  या देशांमध्ये अधिछात्र म्हणून काम केले. पुढे प्रिन्स्टन आणि शिकागो येथे प्रगत अभ्यासासाठी अभ्यागत प्राध्यापक म्हणून गेले. या वेळी त्यांना आइन्स्टाइन आणि वेब्लेन या प्रसिद्ध व्यक्तींबरोबर अनेक शास्त्रीय विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांना अनेक देशांमधून अभ्यागत प्राध्यापक म्हणून निमंत्रणे आली. मात्र त्यांपैकी फक्त रशिया आणि चीन येथीलच निमंत्रणे त्यांनी स्वीकारली. 1946 मध्ये ते टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या गणित विभागाचे प्रमुख बनले. 1962 पर्यंत ते या पदावर होते. या संस्थेमुळेच त्यांच्याच तोडीच्या जगभरातल्या तत्त्वज्ञ आणि अभ्यासकांच्या ते संपर्कात आले.

    गणिताव्यतिरिक्त इतरही अनेक विषयांचा त्यांनी अभ्यास केला. ‘अणुऊर्जेचा शांततेसाठी कसा उपयोग होईल’ या विषयावर रशियाच्या ‘सोव्हिएट अकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये त्यांनी व्याख्यान दिले. आनुवंशिकीतील गुणसूत्रांमधील अंतराचे महत्त्व त्यांनी विशद केले. नाणकशास्त्र हे एक शास्त्र आहे, हे त्यांनी असंख्य नाण्यांच्या अभ्यासावरून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे सूक्ष्म पाषाण आयुधांचा मोठा संग्रह होता. कार्ले येथील ब्राह्मी लिपीचा शोध व पूर्वाश्म संस्कृतीचे अनेक अवशेष व तत्संबंधीची तार्किक अनुमाने, यांवरून पुरातत्वविद्या विषयांतील त्यांच्या सखोल अभ्यासाची कल्पना येते.

    संस्कृत भाषा आणि इतिहास यांचाही त्यांचा अभ्यास होता. भर्तृहरीची शतके आणि विद्याकराचा सुभाषितरत्नकोष  हे ग्रंथ त्यांनी सटीप संपादिले. अखेरच्या दिवसांत ते कौटिल्यलिखित अर्थशास्त्राचा समग्र अनुवाद करीत होते. त्यांचे इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्टरी, एन्शंट इंडिया आणि मिथ अँड रिॲलिटी  हे त्यांचे ग्रंथ अभ्यासकांमध्ये लोकप्रिय आहेत. विविध क्षेत्रांतील त्यांचे अनुभव आणि विचार त्यांनी स्फुट लेखांद्वारे प्रसिद्ध केले. त्यांना ‘भारतीय शास्त्रोक्त इतिहासलेखनाचे जनक’ मानले जाते.  29 जून‌ 1966 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले.


    आजचे राशिभविष्य

    मेष – आजचा दिवस सकारात्मक असेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने निर्माण होतील, परंतु आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल. आर्थिक परिस्थिती मजबूत बनेल, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. आरोग्य सामान्य राहील, मात्र संतुलित दिनचर्येचे पालन करा.

    वृषभ – जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. जर काही मतभेद असतील, तर चर्चेने ते सुटू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली असेल. खर्चही नियंत्रणात येऊ शकतील. आरोग्यही अनुकूल राहील. सकारात्मक विचार आणि संयम यामुळे यशाचा मार्ग अधिक प्रशस्त होईल.

    मिथुन – आजचा दिवस तुमच्या क्षमतेची आणि संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. समोर आलेल्या आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जा, कारण हाच तुमच्या प्रगतीचा पाया असेल. नोकरीत आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक बाबींबाबत सुज्ञ निर्णय घ्या. तुमच्या नव्या प्रकल्पासाठी जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. आरोग्यही चांगले राहील. मानसिक ताण टाळण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव करा.

    कर्क – कर्क राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस संधींनी भरलेला असेल. तुमचा दृष्टिकोन आणि निर्णयक्षमता यामुळे योग्य दिशेने मार्गक्रमण कराल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कोणाला उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सामान्य राहील. कोणत्याही आव्हानाचा सामना मोकळ्या मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने करा.

    सिंह – आजचा दिवस प्रेम आणि आनंद घेऊन येणारा असेल. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यात नवचैतन्य येईल. कामाच्या ठिकाणी व्यावसायिक वृत्ती ठेवल्याने वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. आरोग्य चांगले राहील. फक्त आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा.

    कन्या –  जुने मतभेद आज मिटतील, त्यामुळे नातेसंबंधांमध्ये नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने स्वीकारल्याने करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील, पण पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि वेळेचा सदुपयोग करा.

    तुळ – आजचा दिवस नवीन संधींचा असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचा आत्मविश्वासच यशाची गुरुकिल्ली ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील. आरोग्य चांगले राहील आणि तुमची मानसिक ऊर्जा टिकून राहील.

    वृश्चिक – नवीन संधी आणि सकारात्मक बदलांचे संकेत आजचा दिवस देत आहे. भावनिक संतुलन राखल्यास वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये फायदा होईल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. विचारपूर्वक घेतलेले आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील. आरोग्य सामान्य राहील. घाई टाळा आणि संयमाने पुढे जा.

    हेही वाचा – हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    धनु – संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असेल, मात्र तरीही जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील, उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. आरोग्य चांगले राहील. नवीन संधी स्वीकारल्याने भविष्यात फायदा होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.

    मकर – मकर राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस सकारात्मक बदल घेऊन येणारा आहे. नवीन अनुभवांसाठी तयार रहा आणि आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि भविष्यातील योजनांवर तुम्ही काम सुरू करू शकाल. आरोग्य चांगले राहील. आत्मविश्वास आणि संयम टिकवून ठेवा.

    कुंभ –  नवीन संधी शोधणे आज फायदेशीर ठरेल. आपल्या सर्जनशीलतेचा पुरेपूर वापर करा आणि इतरांशी मनमोकळेपणाने संवाद साधा.  तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. करिअरमधील नवीन जबाबदाऱ्या यश मिळवून देऊ शकतात. आर्थिक परिस्थिती संतुलित राहील, आरोग्यही चांगले राहील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे वाटचाल करा.

    मीन – आजचा दिवस शुभ असेल. जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. सुयोग्य आर्थिक नियोजनामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल,  नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. आत्मविश्वास टिकवून ठेवा, भविष्यातील योजनांवर लक्ष केंद्रित करा.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 जुलै 2026

    July 30, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जुलै 2026

    July 29, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 जुलै 2026

    July 28, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 30 जुलै 2026

    By Team AvaantarJuly 30, 2026

    दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 08…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 29 जुलै 2026

    July 29, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 28 जुलै 2026

    July 28, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – उच्च शिक्षण, प्रगती, स्थैर्य

    July 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026

    बिघाड

    July 30, 2026

    हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे

    July 30, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 378
    • अवांतर 200
    • आरोग्य 134
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 512
    • फिल्मी 60
    • फूड काॅर्नर 243
    • मैत्रीण 24
    • ललित 816
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 31 जुलै 2026

    July 31, 2026

    शार्वीमुळे नाराज गरिमासमोर पार्थकडून प्रपोजल…

    July 30, 2026

    उमाला चक्कर आल्याचं निमित्त अन्…

    July 30, 2026
    Most Popular

    हनुमान चालीसा… चौपाईमध्ये साक्षात हनुमंताचे दर्शन

    July 30, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.