Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, July 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 जुलै 2026
    पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 जुलै 2026

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 21, 2026Updated:July 21, 2026No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीसाहित्य, पंचांग, दिनविशेष, Panchang, Dinvishesh, जुलै महिना, दर्शन कुलकर्णी, कुंडली, राशीभविष्य, आजचे राशीभविष्य, ज्योतिष
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दर्शन कुलकर्णी

    • आज, दिनांक : 21 जुलै 2026; वार : मंगळवार
    • भारतीय सौर : 30 आषाढ शके 1948; तिथि : अष्टमी 29:16 ; नक्षत्र : चित्रा 20:48;
    • योग : सिद्ध 18:24; करण : विष्टि 16:34;
    • सूर्य : कर्क; चंद्र : कन्या 07:53; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18;
    • पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
    • शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128

    दुर्गाष्टमी

    वेद कन्सल्टन्सी / 9987433660


    दिनविशेष

    रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे

    टीम अवांतर

    रोजगार हमी योजनेचे जनक विठ्ठ्ल सखाराम पागे यांचा जन्म 21 जुलै 1910 रोजी सांगली जिल्ह्यातील बागणी येथे झाला. सांगलीच्याच विलिंग्डन महाविद्यालयातून कला शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर कोल्हापूरच्या विधि महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले आणि काही काळ त्यांनी वकिलीही केली. पण तो काळ स्वातंत्र्याच्या स्वप्नाने भारावलेला होता. त्यामुळे त्यांनी विद्यार्थी दशेतच महात्मा गांधी यांच्या आवाहनाखातर सविनय कायदे भंग, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन प्रसंगी कारावासही भोगला.

    भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पागे संसदीय राजकारणात सक्रिय झाले. 1952 ते 1978 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यापैकी 1960 ते 1978 पर्यंत त्यांनी वरिष्ठ सभागृहाचे सभापतीपदही भूषविले. 1961 ते 1979 या कालखंडात ते राज्य ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर 1979 ते 1990 पर्यंत रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष होते. या काळात सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा, सेवासुविधा, बंगला, गाडी, भत्ते देऊ केले, पण त्यांनी केवळ मासिक 1 रुपया मानधनावर काम केले. एवढेच नाही तर, बानगी या आपल्या मूळ गावी असणारी 21 एकर जमीन आपल्या कुळांना दिली. राहता वाडा बानगी ग्रामपंचायतीस देणगी म्हणून दिला.

    हेही वाचा – कलियुगातील एकलव्य

    वि. स. पागे आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे दोघेही ग्रामीण भागातील होते. त्यामुळे त्यांनी रस्ते, पाझर तलाव, नाला बंडिंग, विहिरी यासारख्या विविध कामांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि त्यातून विकास साधण्याची शाश्वत प्रक्रिया सुरू केली. पागे यांची रोहयोची कल्पना वसंतराव नाईक यांनी उचलून धरली. त्यामुळे पागे आणि नाईक या दोघांनाही या योजनेचे जनक मानले जाते.

    सुरुवातीला 1969 साली ही योजना प्रायोगिक पातळीवर सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील विसापूर नामक गावात राबवण्यात आली. त्यानंतर ही योजना 100 आणि पुढे  2 हजार गावांत पोहोचली. अवघ्या 3 वर्षांतच ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात आणि नंतर देश पातळीवर लागू करण्यात आली.

    भारताला प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1 जुलै 1975 रोजी ‘वीस कलमी कार्यक्रमाची’ घोषणा केली. या योजनेमागेही पागे यांचेच योगदान होते. वि. स. पागे यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते. ते वकील, समाजसेवक, राजकारणी, लोकप्रतिनिधी, चिंतक, अर्थव्यवस्थेचे अभ्यासक तसेच उत्तम प्रशासक होते. याशिवाय, संत साहित्याचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. पागे स्वतः उत्तम गात असत. तसेच हार्मोनियम आणि वीणाही वाजवत असत. त्यांनी ‘वीर मोहन’ नामक नाटकही लिहिले. एवढेच नाही तर, ‘तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत’ हे संगीत नाटकही त्यांनी रचले. शिवाय, या नाटकात संत तुकोबारायांची भूमिकाही साकार केली होती.

    पहाटेची नौबत, अमरपक्षी हे त्यांचे काव्यसंग्रह, निवडणुकीचा नारळ, विश्वदर्शन ही त्यांची इतर नाटके, लोकमान्यांवरील भाषणे, बेकारी निर्मूलनातून ग्रामविकास ही मराठी पुस्तके, तर अ डायलॉग विथ दी डिव्हाइन हे इंग्रजीतील पुस्तक त्यांच्या सिद्धहस्त लेखणीचा अविष्कार होता. 16 मार्च 1990 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेत भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केले आहे.


    आजचे राशिभविष्य

    मेष – तुमच्या मेहनतीचे फळ आज मिळेल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा, कारण एक छोटीशी चूक देखील मोठ्या समस्या निर्माण करू शकते. भागीदारीच्या कामातून सकारात्मक परिणाम मिळतील. रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होऊ शकतात, ज्या वेळेवर ओळखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

    वृषभ – जबाबदाऱ्यांसोबतच तुम्हाला नोकरीच्या अनेक संधीही आज मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. एखाद्या गोष्टीमुळे कुटुंबात तणाव वाढला असेल, तर आज त्यावर उपाय सापडू शकतो. संततीकडून आलेली एखादी चांगली बातमी घरात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. स्वतःच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा, अन्यथा निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात.

    मिथुन – वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आज तुमच्यासाठी यशाचा मार्ग खुला करू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी संयमाने विचार करा. संततीवर अनावश्यक जबाबदाऱ्या टाकणे टाळा. भविष्यात फायदेशीर ठरतील अशा नवीन व्यवसाय योजनांवर काम सुरू होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगा.

    कर्क – उत्पन्न आणि खर्च यांच्यात आज संतुलन राखावे लागेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ लागतील. कार्यक्षमता वाढेल आणि तुम्ही तुमची कामे अधिक वेगाने पूर्ण कराल. एखादी इच्छा पूर्ण झाल्याने तुमचा आनंद द्विगुणी होऊ शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल. मात्र, मुलांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा ठेवावा लागेल.

    सिंह – आपल्या सभोवतालच्या लोकांना ओळखायला शिका. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. व्यग्र वेळापत्रकामुळे कामात होणारी दिरंगाई हानिकारक ठरू शकते. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी अनुकूल आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी परिस्थिती अनुकूल असेल.

    कन्या – कठोर परिश्रम आणि संयम ही आज तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. कामाचा ताण जास्त असेल, पण हे कठोर परिश्रम भविष्यातील यशाचा मार्ग मोकळा करतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि अविचाराने निर्णय घेणे टाळा. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्यात रस असेल. त्यांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले, तर त्यांना चांगले यश मिळेल.

    तुळ – शांततेने आणि सामंजस्याने वागण्याचा आजचा दिवस आहे. कोणत्याही वाद आणि संघर्षापासून दूर राहणे हिताचे ठरेल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी निर्माण होतील, योग्य वेळी घेतलेला निर्णय फायदेशीर ठरू शकतो. कौटुंबिक समस्या चर्चेद्वारे सोडवल्या जाऊ शकतात. कोणालाही पैसे उधार देणे टाळा. आपल्या बोलण्यात संयम ठेवा. मालमत्तेसंबंधी एखादे प्रकरण काही प्रमाणात चिंतेचे कारण ठरू शकते. व्यवसायात चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत.

    वृश्चिक – व्यवसायासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता असून यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. धार्मिक कार्यांमध्ये तुम्हाला रस वाटेल. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याचे नियोजन कराल.  शासकीय बाबींमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. अगदी लहानसा निष्काळजीपणासुद्धा समस्या निर्माण करू शकतो.

    हेही वाचा – Movie : Whiplash जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन?

    धनु – प्रत्येक पाऊल आज काळजीपूर्वक टाकावे लागेल. कामाच्या ठिकाणी घाईत निर्णय घेणे टाळा. बँकेकडून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. संततीच्या मित्रमंडळींकडे आणि भविष्याकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाने आनंदी वातावरण निर्माण होईल. प्रलंबित निधी मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रयत्नांना सकारात्मक यश मिळू शकते.

    मकर – भागीदारीतील व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. मात्र अनोळखी व्यक्तींना व्यवसायाची माहिती देणे टाळा. सरकारी नोकरीत असलेल्यांचे मेहनतीबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होईल. दिवसभरात तुमच्या आवडत्या जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. सासरच्या मंडळींच्या भेटी होतील.

    कुंभ – आरोग्याबाबत आज कोणताही निष्काळजीपणा करू नका. जीवनशैली सुधारण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी घाई टाळा. प्रत्येक काम संयमाने पूर्ण करा. व्यवसायात दीर्घकालीन योजना पुढे सरकतील. एखाद्या सहकाऱ्याच्या बोलण्याने तुम्हाला थोडे वाईट वाटू शकते, पण संयम राखा. तुम्ही वरिष्ठांना सुचविलेल्या उपाययोजनांचे कौतुक होईल.

    मीन – आर्थिक बाबींमध्ये आज अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सध्या गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय पुढे ढकलणे उत्तम ठरेल. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित बाबींवर अनुभवी सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. अनोळखी व्यक्तींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणे टाळा. संयम आणि समजूतदारपणाने उचललेले प्रत्येक पाऊल आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026 पंचांग आणि भविष्य

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 जुलै 2026

    July 20, 2026 पंचांग आणि भविष्य

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 जुलै 2026

    July 19, 2026 पंचांग आणि भविष्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    पंचांग आणि भविष्य

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    By ज्योतिषी हृषिकेश पानकरJuly 20, 2026

    वैदिक ज्योतिषशास्त्राचे हे 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत प्राचीन आणि आधुनिक ग्रंथांतील सखोल अंतर्दृष्टीच्या आधारावर सादर करण्यात…

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 20 जुलै 2026

    July 20, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 19 ते 25 जुलै 2026

    July 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 19 जुलै 2026

    July 19, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    July 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 जुलै 2026

    July 21, 2026

    वेळ

    July 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 366
    • अवांतर 198
    • आरोग्य 131
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 499
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 240
    • मैत्रीण 24
    • ललित 792
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026
    Most Popular

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.