Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, July 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » वाकडं बोट
    ललित

    वाकडं बोट

    सुरेखा मोंडकरBy सुरेखा मोंडकरJuly 21, 2026No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सुरेखा मोंडकर, लेखिका सुरेखा मोंडकर, पार्टीत न दिसलेली माणुसकी, दोन म्हाताऱ्यांचे हाल, बेशिस्त पार्किंग, माणसांची बेपर्वाई, पार्टीत वृद्धांचे हाल, सीधी ऊंगली से घी, ऊंगली टेडी करना,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    परिचितांपैकी एकाने त्यांचं यश साजरं करण्यासाठी ग्रँड पार्टी दिली होती. सर्व यजमानांच्या प्रतिष्ठेला साजेसेच होते. आम्ही पण निमंत्रितांपैकी एक होतो. परफ्युम्सचा घमघमाट, ऊंची कपड्यांची सळसळ, रंगवलेल्या ओठांच्या कमानी विस्कटणार नाहीत याची कसरत करत करत चालेलं खानपान! अदबशीर बोलणं नखरेल वागणं…!

    असं म्हणतात की, हास्यमुख ठेवायला चेहऱ्यावरच्या कमीत कमी स्नायूंचा उपयोग होतो… खोटं आहे ते! थोड्याच वेळात माझी जिवणी आणि चेहऱ्यावरचे यच्ययावत स्नायू दुखायला  लागले. पुरातन काळी भाल्याच्या टोकावर शिकार रोवून ती फिरवली जायची, त्याप्रमाणे टूथपिकला टोचलेला, पेपर नॅपकीनने लपेटलेला कोणतातरी एक पदार्थ घेऊन मी हळूहळू हॉलच्या सुरक्षित कोपऱ्याकडे सरकायला लागले.

    इतक्यात माझं लक्ष दोन वयस्क स्त्रियांकडे गेलं. प्रत्येक घोळक्यात जाऊन त्या प्रत्येकाला काहीतरी विचारात होत्या! ऐकणारे ऐकत होते, स्माइल देत होते, मोठ्या स्मार्टली काही उत्तर देत होते… पुन्हा आपल्यातच मश्गुल होऊन जात होते.

    हेही वाचा – असेच कानावर पडलेले संवाद…

    दोघींनाही बहुतेक गुडघ्याचा विकार होता, त्यांच्या चालीवरून ते कळून येत होतं. त्यातल्या एकीच्या घशाला बोलून बोलून इतकी कोरड पडली होती की, ती मधे मधे फिरवले जाणारे प्लास्टिकचे पाण्याचे बंद पेले एकावर एक रिचवत होती. उत्सुकतेने मी हळूहळू त्यांच्या दिशेने मोहरा वळवला. इतक्यात कोणीतरी त्यांना जाणवून दिलं की, तिथे माइकची सोय आहे.

    त्यातल्या एकीने माइकवरून सांगितलं, “फलाण्या नंबरची, अमुक मेकची पांढरी गाडी… ज्यांची असेल त्यांनी ती हलवावी…” ती विशिष्ट गाडी कोणीतरी त्यांच्या गाडीसमोर पार्क केली होती. त्यांना घरी जायचं होतं, पण गाडी बाहेर काढता येत नव्हती. त्यांनी तीनदा सांगितलं, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्या दोघींनी पुन्हा प्रत्येकाला विचारायची मोहीम काढली. आता तर दोघीही पेल्यावर पेले पाणी पीत होत्या.

    मला राहवेना, मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना म्हटलं, “मॅडम, तुम्ही कशाला फिरता? तुम्ही  बसा… तुमच्या ड्रायव्हरला विचारायला सांगा!”

    त्या म्हणाल्या, “अहो, आधी ड्रायव्हरलाच पाठवलं होतं, त्याला तर कोणीच दाद दिली नाही; आम्ही पण अर्धा एक तास फिरतोय… अजून गाडीचा मालक सापडला नाही! गाडी लावून कुठे बाहेर गेला आहे की काय, कोण जाणे!”

    त्यांचं म्हणणं खरं होतं. या वयस्क, शारीरिक पीडा असणाऱ्या स्त्रियांची कोणी दखल घेत नव्हतं… तर त्या सामान्य ड्रायव्हरकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नसणार!

    इतक्यात माझा मुलगा आला. आम्हाला त्या हॉटेलसमोर सोडून तो पार्किंग शोधत गेला होता… तो आत्ता आला होता. त्याला मी सगळी घटना सांगितली. त्याने त्या दोघींना सांगितलं, “आंटी, तुम्ही दमल्या आहात… तुमच्या गाडीत जाऊन बसा… पंधरा मिनिटांच्या आत तुमची गाडी बाहेर निघेल.”

    हेही वाचा – ट्युबलाइट… एलसी

    दोघींचा आणि माझाही त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. इतक्या वेळात कोणीही त्या विशिष्ट  गाडीची मालकी स्वीकारली नव्हती… तर आता हा कोणता अल्लाउद्दीनचा दिवा घासणार होता! त्या दोघी इतक्या दमल्या होत्या की, हताशपणे अन् थोड्या अविश्वासानेच त्या बाहेर गेल्या.

    माझ्या मुलाने पाच एक मिनिटं वाट पाहिली, हातात माइक घेतला आणि म्हणाला, “फलाण्या  नंबरची, अमुक मेकची पांढरी गाडी ट्रकने ठोकली आहे. ट्रक ड्रायव्हरला बाहेर थांबवून ठेवले आहे… ज्यांची ती गाडी…” त्याचं वाक्य संपायच्या आत तिथे एकच हलकल्लोळ माजला. हातातला घास प्लेटमध्ये टाकून चार-पाच जण, दरवाज्याकडे वळले. माझ्या समोरच्या टेबलावर बेफिकीरपणे, ‘आपण त्या गावचेच नाही’ असा आविर्भाव आणून स्वादिष्ट पदार्थ खात बसलेला चाळीशीतला माणूस तर, ताडकन उठला आणि बाहेर धावला…

    मी चकित झाले होते! हीच का ती सगळी माणसं जी हास्यविनोद करीत निवांत बसली होती! हाडामासाच्या माणसांना होणाऱ्या त्रासाची ज्यांना पर्वा नव्हती… एक निर्जीव पत्र्याची कार ठोकल्यावर त्यांचे प्राण कंठाशी आले होते… बरोबर आहे, त्या गाडीची किंमत लाखांत होती! आणि माणसाची किंमत…

    खरोखरच पंधरा मिनिटांच्या आत, त्या दोघींची अडकलेली गाडी बाहेर निघाली. मी भुवया उंचावून प्रश्नार्थक नजरेने मुलाकडे पाहिलं… मिश्किलपणे हसून तो कुजबुजला, “जब सीधी  ऊंगली से घी नहीं निकलता…”

    खुसूखुसू हसतच आम्ही ते टूथपिकला टोचलेले पदार्थ विजय चिन्हासारखे मिरवण्यासाठी वळलो… आता माझ्या चेहऱ्याचे स्नायू दुखत नव्हते…

    Avatar photo
    सुरेखा मोंडकर

    लेखिका सुरेखा मोंडकर या M A, B Ed, माजी मुख्याध्यापिका (मराठी माध्यम हायस्कूल) आहेत. याशिवाय, समाजकार्यकर्ती, Rotarian, आकाशवाणी कलाकार, हौशी नाट्यकर्मी (अभिनय, लेखन, दिग्दर्शन), कथाकथनकार, समुपदेशक (मानसशास्त्र), निसर्ग/ बागप्रेमी, यूट्यूबर आणि दोन इंजिनीअरिंग कंपनीच्या संचालिका देखील आहेत.

    Related Posts

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026 ललित

    मैत्री

    July 21, 2026 ललित

    वेळ

    July 20, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    अंतर्मनातील विठ्ठल

    By ॲड. कृष्णा पाटीलJuly 21, 2026

    उत्तरार्ध आज बारावीचा निकाल लागला. सौरभ हुशार आहे… चुणचणीत आहे. शाळेत नेहमी डिस्टिंक्शनमध्ये असतो. त्यामुळे…

    मैत्री

    July 21, 2026

    वेळ

    July 20, 2026

    कलियुगातील एकलव्य

    July 20, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026

    वाकडं बोट

    July 21, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते

    July 21, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 जुलै 2026

    July 21, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 366
    • अवांतर 198
    • आरोग्य 131
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 499
    • फिल्मी 59
    • फूड काॅर्नर 240
    • मैत्रीण 24
    • ललित 793
    • शैक्षणिक 83
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    अंतर्मनातील विठ्ठल

    July 21, 2026

    मैत्री

    July 21, 2026

    Kitchen Tips : बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी…

    July 21, 2026
    Most Popular

    वैदिक ज्योतिषशास्त्र : 100 महत्त्वपूर्ण सिद्धांत – बाल्यावस्थेतील आरोग्य, शिक्षण

    July 20, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.